खरंच आम्ही..दगडाइतके संवेदनाहीन झालो का! & सांस्कृतीक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कलाजाणिव"

🌱वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

विषय : *खरंच...आम्ही दगडाइतके संवेदनाहीन झालो का!* (राजस्थान दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर)

सौदागर काळे:
               ‎ते साल होतं ,1993.सुदान या देशात भयंकर दुष्काळ पडलेला.सर्वत्र भूकबळीने थैमान घातलेलं.तेव्हा जोहान्सबर्ग वरून एक छायाचित्रकार न्यूजच्या बातमीसाठी या देशात जातो.  तेव्हा सुदान मधील लोकांचे हाडाचे सापळे,त्यांची होणारी उपासमार त्याला इतकी असह्य होती की,तो रात्र रात्र झोपत नव्हता.अन एके दिवशी तो आत्महत्या करतो.
       
     आत्महत्या करण्यापूर्वी तो छायाचित्रकार म्हणतो," *मी गरिबांच्या दारिद्र्याचं भांडवल केलं.परुंतु त्यांच्यासाठी भांडवल गोळा करू शकलो नाही. माझं हे अनैतिकपणाचं वर्तन माझं जगणं अशक्य करत आहे"* आत्महत्या करणाऱ्या छायाचित्रकाराचं नाव होतं " *केविन कार्टर"* .( _गुगलवर आजही सर्च केलं तर आपल्याला ते रडवणारे सुदान मधील भूकबळीचे छायाचित्र दिसेल_ )
     
      आपल्या ‎भारतात दारिद्र्याचं, शेतकऱ्यांचं,कामगाराचं दुःख जगासमोर दाखवणारे खूप मोठे डॉक्टरेट,पत्रकार,मंत्री झाले पण एकही केविन कार्टर झाला नाही.
  
  ‎        अन आता भारतातील नुकतीच घडलेली घटना.या आधी खूप घडलेल्या आहेत तशा.या घटनेचा प्रत्यक्ष भूकबळी, दारिद्र्य याचा संबंध नाही पण केविन कार्टर च्या विरुद्ध भावनेशी आहे.गेल्या दहा वर्षांपासून पश्चिम बंगाल मधील महम्मद भट्टा शेख नावाचा कामगार  राजस्थान मध्ये मजुरी करत होता." *लव्ह जिहाद* "च्या नावाखाली राजसमंद जिल्ह्यात शंभुनाथ रायगार याने त्या मजुराला कुदळीने वार करून जिवंत जाळलं अन त्याची चित्रफित स्वतः समाजमाध्यमांवर प्रसारित केली.

    एकीकडे केविन कार्टरला भूकबळीचे दृश्य पाहून वेदना होतात अन तो शेवटी आत्महत्या करतो. तर दुसरीकडे भारतात धार्मिकतेच्या नावाखाली कट्टरवादी एकजणाला जिवंत जाळतो .त्यांनी बनवलेली चित्रफित लोक तेवढ्याच मुरदांड मनाने पाहतात.पुन्हा शांत बसतात.काहीच न घडल्यासारखं.
      
     असेच  देशातील राज्यकर्ते, नोकरशहा अप्रत्यक्षरित्या  भूकबळीच्या, दारिद्र्याच्या माध्यमातून जिवंत लोकांना मारत असतात.तेव्हापण आपण शांत राहतो.
       ‎
       ‎ _खरंच...आपण दगडातील देव शोधता शोधता स्वतः दगड झालो.आपल्यात एखाद्या देवीला बळी देणाऱ्या बकऱ्याचं गळा चिरताना  जेवढं हासुरी हास्य ओठांवर असतं तेवढंच आता माणसाच्या बाबतीत झालं.होत आहे.आपल्या कृतिशील संवेदना जिवंत होतील का!_
       ‎
मयुरी देवकर:
खरंच आज या सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या समाजात आज पुन्हा एकदा गरज आहे ती मूल्ये शिकण्याची आणि ती अंगीकारण्यचि ....कारण आज माणुस माणूस राहिलेला नाही , तर त्याची संवेदनशीलता काय ....आज असे माणुसकीला काळिमा फासणारे आणि स्वतःला फक्त डिग्री घेवुन सुशिक्षित म्हणनारेच वाढत आहेत .....आज सगळीकडेच माणूस माणुसकीच विसरून चालला आहे ...आणि याची प्रचिती राजस्थान मधील घटनेने पुन्हा दिली खरंच काय चाललय .....आणि खंत ही की आम्ही हे पहातच बसलो आहे ....आज माज्या शेजारी ही घटना होते तरी मी शांत का तर मला काय करायच आहे मला नाही ना त्रास झाला ला ...ही भावना ....हेच आहे की आपण आता दगडच झालो आहे ....मग काय संवेदना होणार ???
(साभार-गुगल)

वैशाली गोरख सावित्री:
   हो आपण दगडाइतके संवेदनहीन झालो आहेत यात आता तरी मला काही संशय वाटत नाही आणी राजस्थानच्या प्रकरणाने तर तो पक्काच झाला .साधी हातावर चडलेली मूंगी जरी मारली तरी वाईट वाटणारी आपण माणसं असं दिवसाडवळ्या एकाद्या माणसाला एकादाच माणूस कूह्रडीने वार करतो एवढच नाही तर वरुन पेट्रोल टाकूण जाळतो आणी एक 8/9वर्षाचा मुलगा ह्याचा व्हिडीओ काढतो कसं जमलं असेल एवढ सगळ कीती संवेदनहीन झाले असतील ते लोक आणी तो व्हिडीओ facebook ला पाहूनही त्यावीषयी ब्र ही न उच्चारणारे आपण भारतीय नागरीक त्याच्यापेक्षाकीतीतरी पटीने संवेदनहीन , दगड ,बनलोय . जूनैद ,अखलाक ह्यासारख्या तरुण मूलांना मारल्यावरही आपण दगडच बनून राहीलो होतो. आणी आहे. त्याच्या हत्येच्या वेळी जर हे भारतीय नागरीक रस्त्यावर मोठ्यासंख्येन उतरली असते तर आज राजस्थानमधला मोहम्मूद अफ्रजूल वरती आज ही वेळ आली नसती . आणी ह्या फक्त येवढ्याच घटना नाहीत 1महीन्याखाली बिहार मधे एका दलित मासेमारी करणार्र कूटूंबातील 4 जणाना अत्यंत निर्घूण पणे मरण्यात /कापण्यात आले व आजूनही त्याचे शेजारी जे सर्व त्याच जातीतले आहेत तरीही सांगायला तयार नाहीत की हे कोणी केलं आहे ह्या माणूसकीला काळीमा फासणार्र घटना पाहील्या की राञराञ झोप लागत नाही ,राजस्थानधल्या घटनेचा व्हिडीओ पाहण्याचा प्रयत्न दहावेळा केला पण पाहूच शकले नाही . आताफक्त एवढक मनेन
नाही हिंदू ग मारला
नाही मुस्लिम मारला
माणूस मारला.......
बाई माणूस मारला..............         

क्षितीज गिरी:
मला वाटते या मध्ये मुख्य म्हणजे कट्टतरतावाद आहे मग तो कोणताही आसूनदे जातीय धार्मिक भाषिक प्रांतिक वंश वाद किंवा कोणताही एकदाका  तो कट्टर झाला कि मग तो माणुसकी नावाची गोस्ट पूर्णपणे विसरतो।यामध्ये आपल्या मनामध्ये फक्त दुसऱ्या समाजाबद्दल मनामध्ये द्रेषाची भावना असते किंवा तशी जाणून बुजून कळत नकळत  पसरवली जाते।मग आपली उत्तरे आदोगरच तयार असतात आपण कोणत्याही गोष्टींचा दोन्हीं बाजींनी विचारच करत नाही किंवा करू शकत नाही आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कारटं अशी अवस्था आपली असते।
       यांसारख्या अश्या घटना समाजामध्ये घडतात याला समाजायची  मानसिकता महत्वाची आहे ती बदलायची असेल तर तशी आपण पावले उचलली पाहिजेत ।जसेकि आपल्या शिक्षण पद्दतीत बदल करायला पाहीजे। विज्ञानाचा प्रसार प्रचार आणि अंगीकार करायला पाहिजे असे खुप उपाय राबवता येतील यामध्ये सरकारची भूमिका पण महत्वाची असते त्याची पण तशी मानसिकता पाहिजे । देशाच्या कोणत्याही समस्यांवर भारतीय म्हनून एक झाले पाहिजे हि फक्त शेतकऱ्याची समस्या आहे मग मी काय शेतकरी आहे काय हि फक्त त्या समाजाची समस्या आहे मग मी काय त्या समाजाचा आहे काय  किंवा हि कुपोषणाची समस्या काय आपली आहे का आसा विचार करण्या पेक्षा आपण ती भारताची समस्या आहे आणि ती आपल्यालाच सोडवली पाहिजे असा विचार करून राजस्थान सारख्या घटनांचा विरोध झाला पाहिजे असे मला वाटते .
आता तर तसे होताना दिसत नाही घटना घडतात तरी आपण न घडल्या सारखे दाखवतो तसे एक प्रकारे समर्थनच करतो(कार्ल मार्क्स एका ठिकाणी म्हणतो तुम्ही एखांद्या  गोष्टीच्या पाठीशी तरी असता किंवा मग विरोधात तरी तुम्ही त्याकडे दुर्लक्ष कधीच करू शकत नाही )आजही अश्या प्रकारच्या घटना सर्रास घडताना दिसतात मग मात्र वाटते खरच  आम्ही दगडाइतके संवेदनाहीन झालो का!

विषय:"सांस्कृतीक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कलाजाणिव"

सोमनाथ आदमिले:
न्यूड व एस.दुर्गा यासारखे वास्तव घटनेवर आधारित चित्रपटांना गोवा येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रिय चित्रपट महोत्सवात बंदी घालण्यात आली.
रवी जाधव दिग्दर्शित न्यूडला तर उदघाटनाचा चित्रपट होण्याचा मान मिळाला होता.परंतु सरकारी यंत्रणेत काय सूत्र फिरली आणि न्यूड आणि एस.दुर्गा दोन्ही चित्रपट काढून टाकण्यात आले.
अश्याप्रकारे दिग्दर्शक आणि लेखक यांच्या सांस्कृतीक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कलाजाणीव यावर बंधन आणण्यात आले.हा सरकारी हस्तक्षेप  संबंधित सिनेमांवर
अन्याय करणारा आहे.

कलाबाह्य कारणांनी कलाकृतींवर बंदी घालणं,त्यांना विरोध करणं,त्यांची मुस्कटदाबी करणाऱ्या गोष्टी देशात वाढायला लागल्या आहेत.

माझ्यामते अशा घटना घडायला नकोत,कारण चित्रपटातून समाजात घडत असणाऱ्या घटनांचे दर्शन आपल्याला होत असते,त्येचं तर त्या लेखकाचे /दिग्दर्शकाचेअभिव्यक्ती स्वातंत्र्य असते.

अनिकेत:
कालबाह्य रूढी- परंपरा, चुकीच्या धारणा, समाजाची प्रगती रोखणाऱ्या अनिष्ट गोष्टी यापासून समाजाला मूक्त करण्यासाठी आवश्यक ते वातावरण तयार करणे हेच तर कलाकृतींचे प्रयोजन असते. आणि जे सरकार अशा कलाकृतींना घाबरते ते एक प्रकारे उत्क्रांतीचा वेगच रोखायचा प्रयत्न करते असे म्हणायला हरकत नाही...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************