निराशा घालवण्यासाठी काय करावे ?

निराशा घालवण्यासाठी काय करावे ?

🌱वि४🌿या व्हाट्सअप ग्रुपवरून

निराशा घालवण्यासाठी काय करावे ?


source:- INTERNET
-रामदास हांडे.पुणे

  हल्ली नव्याने उदयाला येणारा नवीन आजार म्हणजे डिप्रेशन,उदासीनता निराशा....मानसोपचार तज्ज्ञांच्या मते 2020 मध्ये सर्वात जास्त लोकांच्या मृत्यूचं कारण डिप्रेशन असेल होय,डिप्रेशन..बऱ्याच दा व्यक्तीला हेच समजत नाही की,मला उदासीनता आली आहे,निराश आली आहे त्यामुळे त्यावरील उपयांकडे दुर्लक्ष होते.तज्ज्ञांच्या मतानुसार जर व्यक्तीला डिप्रेशन आलं असेल तर व्यक्ती सतत एकटी राहणे पसंद करते, जेवणाकडे दुर्लक्ष करते,अंगावर काही जखम झाली असेल तर ती लवकर बरी होत नाही,आपल्या मौल्यवान वस्तू इतरांना देऊन टाकते,मनात सतत आत्महत्येचे विचार येतात  रात्री झोप येत नाही,इ. जर अशी आपली परिस्थिती असेल आणि ती एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त काळ राहत असेल तर आपण तात्काळ तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.जर तुम्ही याकडे दुर्लक्ष कराल आणि तुम्ही 28 वयाच्या पुढच्या वयोगटाचे असाल तर लवकरच तुम्हाला उच्च रक्तदाब,मधुमेह,,हृदयरोग, अशा भयंकर आजारानं सामोरं जावं लागेल.
     आजार आला म्हणजे त्यावर उपचार पण आले त्यामुळे निराशा आली तर ती कायमची राहत नाही कारण ती आपल्या शरीरात होणारी एक संवेदना आहे आणि अश्या अनेक सुखद आणि दुःखद संवेदना आपल्या शरीरात दर सेकंदाला निर्माण होतात आणि नष्ट देखील होतात,त्यामुळे घाबरून जाऊ नये.
    या सर्वांवर उत्तम उपाय म्हणजे मेडिटेशन कारण निराश हा आजार आपल्या मनाच्या व्यकुळतेमुळे होतो.आपण निराश घालवण्यासाठी गाणी ऐकणे,कोठेतरी फिरून येणे,गप्पा मारणे असे उपाय करू शकता पण याने आपल्याला केवळ तात्काळ बरे वाटेल आणि ती वेळ गेल्या नंतर आधीची परस्थिती येण्याची श्यक्यता असते.यावर एकचं उपाय म्हणजे मेडीटेशन. पण हे करायचे कसे हेच बऱयाच लोकांना माहीत नसते,कोणी म्हणताय डोक्यासमोर कोणत्या तरी देवाची मुर्ती ठेवावी,किंवा कोणता मंत्र म्हणावं.याने आपला केवळ बौद्धिक स्तरावर विकास होईल.पण अंतरंगातील संवेदना ओळखुन त्यावर मात करणे आपल्याला अनापान तुन शक्य आहे,अनापान म्हणजे आपला श्वास आत येणे आणि बाहेर जाणे,ही नैसर्गिक क्रिया आहे आपण फक्त निवांत बसून आपल्या नाकाच्या दोन्ही नाकपुड्या वर लक्ष केंद्रित करायचे,कालांतराने आपल्याला जाणीव होईल की श्वास डाव्या नाकपुडी द्वारे की उजव्या किंवा दोन्ही द्वारे येतो हे समजेल,यामध्ये तुम्हाला आपल्या शरीरात वेगवेगळ्या भागात अनेक संवेदना जाणवतील उदा,अंगावर मुग्या सारखं किंवा डोक्यावर काही वळवळ करतंय असा वाटेल त्याला लगेच हात लावून नष्ट करू नका,त्याचे फक्त निरीक्षण करा,आपल्याला असा अनुभव येईल की या संवेदना निर्माण होतात आणि नष्ट देखील.
   आपण जर हे अनापान रोज सकाळी 10 मिनिटे आणि रात्री 10 मिनिटे केल्यास आपले मानसिक आजार उदा. निराश,भीती,चिंता,निद्रानाश तर बरे होतीलच त्याचबरोबर शारीरिक आजारावरही मात करण्यास यामुळे आपल्यास बळ मिळेल, कारण यामुळे आपले मन अधिक अधिक सूक्ष्म होईल आणि शरीरात होणाऱ्या प्रत्येक हालचाली अधिक बारकाईने जाणण्याचा प्रयत्न करेल......

source:- INTERNET
-तेजस महापुरे,कराड

                सर्वप्रथम मला असं वाटत की आपल्याला निराशा का आली असावी त्याची कोणती करणे आहेत हे तपासून पाहावं म्हणजे ती घालवणे फार सोपे होते, आपण निराश अनेक वाईट प्रसंगामुळे होऊ शकतो परंतु कधी कधी आपल्या गैरसमजुतीमुळे देखील हे होऊ शकते, त्यामुळे जर कोणा व्यक्तीमुळे आपल्याला निराशा आली असेल तर त्या व्यक्तीशी मोकळे पणे त्यावर बोलले पाहिजे कदाचित त्याने निराशा नक्की दूर होऊ शकते, माझं तर असं मत आहे की प्रत्येकाने इतकं सकारात्मक व्हावं की आयुष्यात येणाऱ्या नैराश्यावर सहजतेने मात करता यावी त्यासाठी गरज वातलीच तर समुपदेशन घ्यावं, माझ्याच बाबतीत घडलेली घटना सांगतो, यावर्षी 3 जुन ला पुण्याजवळ माझा अपघात झाला माझ्या उजव्या पायाच्या घोट्यावरून(ankle joint) वरून एक कार गेली मला रुग्णालयात दाखल केल गेलं माझ्या पायावर शस्त्रक्रिया झाली डॉक्टरांनी माझा पाय वाचवला याचा मला आनंद होता पण 3 ते 4 महिने बेडरेस्ट घ्यावी लागणार या कल्पनेने मी फार निराश झालो होतो, पण मी एक योगशिक्षक असल्याने इथे मी मेडिटेशन करत राहिलो त्यामुळे मी त्या सर्व वेदना विसरून गेलो त्या नैराश्यावर मात केली, स्वतःच स्वतःचा समुपदेशक बनलो, सप्टेंबरमध्ये दुसरी एक शस्त्रक्रिया झाली त्यानंतर चालायला परवानगी मिळाली पण पाय फार दुखत होता, डॉक्टरांनी सांगितले होतेच दुखलं तरी चालत रहा आता जर चाललं नाही तर पुढे अवघड होईल, सुरुवातीला 3 महिने कुबड्या घेऊन चालत होतो तेव्हा त्या कुबड्यांमुळे आलेली निराशा गेली होती पण मी लंगडत चालत होतो त्यामुळे परत निराशा आली पण त्यातून पण सावरून डॉक्टरांनी सांगितलेले व्यायाम करून आता मी आधीसारखा चालू लागलो, हे सर्व शक्य झालं ते सकारात्मक विचारसारणीमुळेच, तसेच घरातले, नातेवाईक, मित्रमंडळी यांनी केलेल्या वेळोवेळी समुपदेशनामुळे...शेवटी एकच सांगतो आयुष्यात कितीही कटू प्रसंग येऊ दे त्यावर आपण मात करायलाच हवी तोच निराशा घालवण्याचा सर्वोत्तम उपाय आहे असं मला वाटत....

source:- INTERNET
-नवनीता (शैलेश भोकरे) आळंदी

आशेचा किरण दिसेल तिकडे धावत सुटावं.
पण कधीकधी ती वेळ एवढी काळी असते की, माणसाला काहीच दिसत नाही; काजळीच एवढी असते. मग परत उरतो तोच प्रश्न. निराशा घालवण्यासाठी काय करावं?

खरं सांगू का? माझा अनुभव सांगतो की, बऱ्याचदा निराशेचा सुर विनाकारण असतो. उमजत देखील नाही की, आपण का नाराज आहोत! अशावेळी हलके फुलके व्हिडीओ पाहून वेळ घालवणे हा एक उत्तम उपाय मला वाटतो. मी तर बऱ्याचदा चला हवा येऊ द्या वगैरे विनोदी व्हिडिओ पाहतो. एकदा ती वेळ निघून गेल्यावर माणसाचा लहरीपणा दूर होऊन सद्सद्विवेक जागा होतो.

आणि प्रत्येकजण तेव्हा हे चांगल्याने समजून जातो की, निराशा ही केवळ एक मानसिक अवस्था आहे. तिचा किती बाऊ करायचा आणि किती सोडून द्यायचं हे सर्वस्वी ज्याच्या त्याच्या हातात आहे.
मुळात आपल्या आजूबाजूला खूप काही आहे जे आपल्याला प्रेरित करू शकतं. आपल्यातली आग धगधगत ठेऊ शकतं. पण निराशेमुळे अंधत्व येतं.
अहो शरीराने पंगू व्यक्ती सगळं स्वीकारून मार्ग काढत असतो रोज. ज्याच्या आयुष्यातले शेवटचे क्षण राहिलेत हे माहिती असलेला माणूस पाहा कसा जगतो ते. आपल्याकडे ठरलेला उद्याचा दिवस आहे....
ह्यानेही काम होत नसेल तर जगातल्या अपयश पचवून यशस्वी झालेल्या व्यक्तींचे चरित्र अभ्यासा. इंटरनेट धुंढाळून किस्से वाचा. खूप उदाहरणं आहेत. खूप काही आहे घेण्यासारखं!

वॉल्ट डिस्नी १००० वेळा नाकारला गेला. एडिसन ने १०००० प्रयोग केले म्हणतात, हेलेन केलर अंध होती. फोर्ड शिकलेला नव्हता. रामानुजन यांच्याकडे कोणतही फॉर्मल एज्युकेशन नव्हतं.
अशी शेकडो नाही तर हजारो उदाहरणं आहेत जी आपल्याला तोंडात बोटे घालायला लावू शकतात.
आणि हे सगळं वाचून झालं की, हळूच तोंडातली बोटं काढायची आणि स्मितहास्य करत कामाला लागायचं!
निराशेच्या पोकळीमध्ये काहीसुद्धा अर्पण करायचं नाही. कारण क्षण न क्षण मोलाचा आहे.

source:- INTERNET
-वाल्मीक फड नाशिक

उपाय तर अनेक आहेत पण जशी वेळ असेल त्याप्रमाणे उपाय केला तर माझ्या मते कोणीही निराश रहाणार नाही.घडतंय काय एखादी व्यक्ती खुप निराश आहे,निराशेपोटी ती जवळजवळ आत्महत्येसारखा विचार मनात आणतेय तर आपले कर्तव्य आहे की,त्या व्यक्तीला समजावून त्या गोष्टीपासुन परावृत्त करणे.असे अनेक अनुभव माझ्या जीवनात आलेले आहेत.माझ्या माहीतीत जवळजवळ चार ते पाच जणांंचे प्राण वाचवलेले आहेत.एकदा निराशा पदरात पडली की,माणूस काय करेल याचा काही नेम नाही.
निराशा घालवण्यासाठी माणूस नेहमी संयमी असावा लागतो,त्याला क्रोधावर नियंत्रण ठेवता आले पाहिजे,समोरून एखादी व्यक्ती खुप रागाने आपल्याकडे चाल करुन येत असेल तर आपल्याला त्या व्यक्तीपुढे नम्र होता आले पाहिजे.ह्या गोष्टीचा परीणाम एकच होईल की समोरील व्यक्ती आपोआप शांत होईल.थोडक्यात म्हणजे आपले त्याच्याशी भांडण होणार नाही.किंवा मारामारी होणार नाही पर्यायाने आपण निराश होणार नाही.
एखाद्या शेतकरी सोडला तर बरेच शेतकरी हे आशावादी असतात एखाद्या पिकात नाही काही ऊत्पन्न मिळाले तर पुढील पिकात मिळेल या आशेवर तो पुन्हा कामाला लागतो परंतु निराश होत नाही.
आपल्याला निराशा ही जर घालवायचीच असेल तर अनेक मार्ग आपल्याकडे आहेत जसे पुस्तक घेऊन वाचन करणे,दुसरा एखादा छंद जसे की,फिरायला जाणे,टिव्ही बघणे,एखादा आवडता पदार्थ बनवणे,पक्षांचे निरीक्षण करणे,गाई ,म्हशी असतील तर त्यांना धुणे आंघोळ घालणे असे अनेक प्रकारचे कामे आहेत किंवा छंद आहेत त्यामुळे आपल्याला निराशा घालवता येईल.
मि तर आयुष्यात कधिच निराश होत नाही तसं काही वाटलं तर मि लगेच माझा गायनाचा जो छंद आहे त्याला लगेच कवटाळून घेतो आणी एकटाच गायन करत बसतो तेही वारकरी संप्रदाय गायन.निराशाही दुर होते आणी नामस्मरणही होते.
म्हणून प्रत्येक व्यक्तीला सांगतो जिवनात कधीही निराश होऊ नका.हे आयुष्य खुप सुंदर आहे.एकनाथ महाराज सांगतात "बहुता सुकृती नरदेह लाभला "त्या देहाचा ऊपयोग मीञांमध्ये गप्पा मारण्यात,नामस्मरणात,हसण्यात,खेळण्यात,गरजूंना मदत करण्यात वापरले तर माणूस कधीही निराश होणार नाही.
"ठेविले अनंते तैसेची रहावे /चित्ती असो द्यावे समाधान"हि तुकारामांची ओवी जर आठवली तर आपल्या जिवनात कधिही निराशा येणार नाही.

source:- INTERNET
-स्वप्नील चव्हाण, Bjmc पुणे
बुलडाणा

      ती कालपण माझ्या मनात घर करण्याचा प्रयत्न करून गेली,पण मी तिला कालही नाहीच म्हटलं....हो तीच ती "निराशा".....      आयुष्यात असे क्षण नेहमीचेच आहेत.....
     20 दिवसांवर परीक्षा आल्यात, एकदम टेन्शनमध्ये कॉलेज वरून आलो....कसतरी चेहऱ्यावर पाणी मारून तावतावातंच अभ्यासाला बसलो,अभ्यासक्रम भरपूर आणि इतके दिवस खुप दुर्लक्ष केलेलं अभ्यासाकडे,आता अचानक सुरू करतोय,होईल का..?? होतंय की....त्याला काय झालंय न व्हायला.....शेवटी केलंच सुरू.....वाचताना बऱ्याच गोष्टी कळत नव्हत्या...मग जाणवलं आधी आपण काहीच लक्ष दिलेलं नाहीये,आता एकदम सगळं कळणे आणि परीक्षेतही लिहिणे थोडं खडतर जाणारच आपल्याला.......पण म्हटलं करावं तर लागेल....मग जोमाने लागलो ना परत.....पण जेवणाची वेळ झाली आणि कळलं की आपण अर्धाच टॉपिक वाचला आणि माझा रूममेट तेवढ्या वेळात 3 टॉपिक संपवून जेवायला निघतो......आणि म्हणतोय कसा, "अरे खूप कमी अभ्यास झाला यार, अजून खूप बाकी आहे"
    मी अगदी निःशब्द झालो,मला खुप अवघडल्या सारखं वाटलं,माझ्याकडून होणार नाही,मी पास होणार की नाही असं वाटायला लागलं, आणि शेवटी आलीच निराशा...!!  मग जेवून आलो....आमच्या गण्या सोबत बोलावं म्हटलं,त्याला बोललो आणि खरचं खूप मोकळं वाटायला लागलं...तो हसरा चेहरा कोणालाही हसवतो,व्यक्ती कितीही नाराज  असू देत याच्या पुढे तो हसल्याशिवाय राहत नाही......एक आगळ वेगळं व्यक्तिमत्व,तो कधी नाराज किंवा निराश दिसला नाही,का माहिती नाही पण त्याच्या निराशेसोबत लढायला त्याची शक्ती त्याचे वडील होते, त्याचं परिवार होतं, प्रत्येक गोष्टीला एकदम समाधानकारक स्पष्टीकरण द्यायला त्याचे वडील नेहमीच समर्थ होते.......आणि म्हणूनच त्याला कधी जास्त प्रश्न पडत नव्हते.... आणि म्हणून त्याच्या चेहऱ्यावर कधी निराशा दिसली नाही....
     तो माझा रूममेट आहे, जेव्हा पण रूम मध्ये असतो ना, एकदम हसक वातावरण होऊन जातं....आपली निराशा कधीच बाजूला होऊन जायची,आणि परत तेवढ्याच जोमाने कामाला लागता यायचं.....मग दुसरे किती वेळेत किती करताय याची पर्वा नसायची......आणि सकारात्मक परिणाम नेहमीच जाणवले मला......

        तात्पर्य एवढंच की,कोणासाठी एखादा व्यक्ती असू शकतो,कोणासाठी एखाद गाणं असेल,कोणासाठी वाचन असेल,कोणासाठी लिखाण असेल......पण निराशा नक्कीच दूर करता येते.....आपल्या मित्रांसोबत बोला,थोडं हलकं वाटेल...... नसेल जमत तर कुठेतरी लिहा,कागद फाडून फेका,पण मन हलकं करा...!!
  जोपर्यंत हे निराशेचं ओझं तुमच्या मनावर असतं, नवीन काहीतरी करण्याची उमेद लयाला जाते,आणि नकारात्मक परिणाम दिसून येतील.....ही एका विद्यार्थ्यांची दशा होती,तुमचं काम वेगळं असू शकेल,पण उपाय हेच असू शकतील......आपण जोपर्यंत आपल्यांच्या सानिध्यात असतो ना,एक सकारात्मक ऊर्जा नेहमी आपल्यासोबत असते आणि अशा अनेक निराशा तुम्ही सहज फेटाळून लावू शकता....म्हणून नेहमी खुश राहण्याचा प्रयत्न करा,आयुष्य खूप सुंदर आहे,निराश राहून जगण्यात आपण वेळ घालवतोय हे ध्यानात ठेवा.....स्वतःही खुश राहा....कोणाच्या तरी आयुष्यातील "गण्या" बनून बघा,खूप आनंद मिळेल......!!
source:- INTERNET
-यशवंती होनमाने, मोहोळ

 काय करावे निराशा घालवण्यासाठी ....अस जर मला कोणी विचारल तर माझ ऊत्तर ठरलेलं असत ...मस्त जगा ...अपना काम बनता , भाड में जाए जनता ..कशाला निराशेचा विचार करायचा ...आलीच जवळ निराशा तर ......मस्त टपरी वर जाऊन चहा घ्या , रोमँटिक गाणी ऐका , icecream खावा , फ्रेंड्स सोबत बोला , मस्त कुठे तरी फिरून या , मस्त गाण्यावर नाचा जीव दमेपर्यन्त ...बघा किती भारी वाटत ....
निराशेने ग्रस्त राहण्यापेक्षा , आशेवर मस्त रहा ....
love U  जिंदगी ....

source:- INTERNET

-अनिल गोडबोले
सोलापूर

एखाद्या व्यक्तीची मानसिकता ही त्याचौ विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे.भारत हा सर्वात जास्त तरुणांचा देश आहे आणि त्यामुळे सर्वात जास्त प्रमाणात भारताच्या बाजारपेठे मध्ये उलाढाल होत असते. या उलढालीमुळे जागतिक स्तरावर चाललेल्या सर्व गोष्टी भारतात 'विकल्या जातात पण 'तयार' होत नाहीत. या सर्व परिस्थिती मुळे प्रत्येक गोष्ट मिळवण्याची इच्छा वाढत आहे पण प्रत्यक्षात मात्र विरुद्ध चित्र आहे त्यामुळे मानसिकता बदलत चालली आहे व "निराशा" पसरत आहे.
तरुणांना घोर निराशा ग्रासत आहे. त्यामुळे कुटुंब, समाज दोन्ही वर परीणाम होत आहे.
शिक्षण वाढत चालले असल्याने कमीत कमी कष्टामध्ये जास्तीत जास्त सुखसोयी असलेली जीवनशैली व  जास्त संघर्ष न करण्याची मनोवृत्ती निर्माण झाली आहे.
निराशा टाळण्यासाठी खर तर आपल्या विचारांमध्ये आणि मनस्थिती मध्ये बदल करणे गरजेचे आहे. त्यापैकी काही मुद्धे खालीलप्रमाणे:-
अपेक्षा ठेवण्यापेक्षा महत्त्वाकांक्षी असावं. म्हणजे नुसतीच स्वप्न पाहू नका. त्याच्या पूर्ततेसाठी मागे लागण्याची वृत्ती ठेवा.
स्वतःवर विश्वास ठेवा. मानसिक त्रास होत असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याची गरज आहे हे लक्षात ठेवा.
भावना योग्य रीतीने व्यक्त होतील याची खात्री बाळगा. संवाद साधा, संशयी वृत्ती सोडा.
चुकीच्या गोष्टी बदलण्याची हिम्मत ठेवा. हिंसात्मक मार्गापेक्षा  भावनिक आवाहन केल्यास व्यक्ती मध्ये वर्तन बदल करता येतो.
बाहेरील परिस्थिती पेक्षा मनातील गोंधळ नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा.
जीवनशैली सुधारा. व्यसनाधीनता किंवा कशावर तरी अवलंबून राहण्याची वृत्ती सोडा.
नवीन नवीन पद्धतीने जीवनाकडे पहा. मेडिटेशन करा. प्रयत्न न करता एखादी गोष्ट मिळण्याची आशा न ठेवता.. योग्य प्रयत्न करा.
आनंदी रहा. कुटुंब आणि मित्र याना कमवा. पैसे आणि संपत्ती याच नियोजन करा.
वेड्यासारखं स्वप्नामागे धावा. डोकं रिकामी ठेवू नका. उत्साह साजरा करा.
खुलेपणाने जगा. नियमांचे पालन करा. सकारात्मक आणि आशादायी विचार करा.
जग चांगलं आहे. व चांगलं घडणार आहे यावर विश्वास ठेवा.. आनंद घ्या आनंद घ्या.

या शिवाय अजून काही असेल तर मला ही सांगा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************