अध्यात्मिक असणे आणि धार्मिक असणे यात नेमका काय फरक आहे?

 वाल्मीक फड,नाशिक.
        अध्यात्मिक असणे म्हणजे अध्यात्म ज्ञान ,अध्यात्मिक वस्तू,अध्यात्मिक धार्मिक बाबी यांचा सखोल अभ्यास करुन त्यातून 
     समाजाच्या कल्याणकारी भाग जो असेल त्याचाच आग्रह धरणे ह्याच गोष्टिला मला वाटतं अध्यात्मिक असणं असं मला वाटतं.
     अध्यात्म हे काही विशिष्ट जाती,संप्रदाय किंवा धर्म यांच्याशी निगडीत नसते ते समाजातील सर्व घटकांना सर्वसमावेशक असते.
     अध्यात्मिकतेबद्दल आपल्याला एक ऊदाहरण सांगता येईल जशी एखादी व्यक्ती सकाळी भल्या पहाटे ऊठून शास्त्रीय पुस्तके वाचन तसेच त्याच गोष्टी वाचुन त्यावर योग्य असे निर्णय घेणे यालाच अध्यात्मिक असणे असे मला वाटते.
याऊलट धार्मिक असणे आहे.धार्मिक असणे वाईट नाही परंतु धार्मिकतेच्या नावावर भोंदुगिरीला थारा देणे हे काही खरं नाही.धार्मिकतेचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्या मुलांना वळण लावण्याचा हा एक मार्ग आहे.
        धार्मिक असणे याचा सरळ अर्थ असा आहे कि,कोणतीही गोष्ट असुद्या फक्त धार्मिक भावनेने तिच्याकडे बघने मग त्यारा गोष्टी स्वतःसाठी असो किंवा दुसऱ्यासाठी असो मग वाईट असली तरी तिचाच स्विकार करणे यालाच धार्मिक असणे आहे असे माझे मत आहे.
---------------------------------
विशाल कांबळे,आटपाडी (सांगली ).

       अध्यात्मिक असणे म्हणजे काय यासाठी आपण पहिल्यांदा अध्यात्म म्हणजे काय हे पाहू..
अध्य- अध्ययन  (अभ्यास करणे)
आत्म- स्वतःचे  (चित्त,आत्मा)
     अध्यात्म म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाचे अध्ययन (अभ्यास) करणे. जसे तथागतांनी आपल्या चित्ताचा अभ्यास केला. 
    अध्यात्मिक असणे म्हणजे  आपल्या स्वतःच्या अंतर्मनाचा अभ्यास करून तसेच सर्व धर्मातील सकारात्मक विचारांच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्याचा वापर हा जीवसृष्टीच्या कल्याणासाठी करणे.
तसेच दुसर्‍यांचे चांगले व्हावे ही भावना मनात असणे.
निस्वार्थीपणे समाजाची सेवा  करणे म्हणजे आध्यात्मिक असणे होय.अस मला वाटतं. 

 धर्म म्हणजे -  मनुष्याला सदाचार व सामाजिक व्यवस्थापन या साठी नेमून दिलेली विचार - वागणुकीची चौकट...

          धार्मिक असणे म्हणजे धर्माच्या चौकटीत राहून धर्माच्या चालीरीती नुसार वागणे. मग यामध्ये श्रद्धा तसेच अंधश्रद्धा या सर्व गोष्टी येतात.

-----------------------------

शुभम राधेश्याम,पंढरपूर.

*धर्म* या शब्दाला विविध अर्थ व छटा आहेत जसे की -- 
१)  गुणधर्म :  आंबा गोड आहे ....  येथे गोडवा हा आंब्याचा गुणधर्म आहे.
२)  कर्तव्य :  राजधर्म, क्षात्रधर्म, पितृधर्म..   इत्यादी
३)  आचरण करणे, पालन करणे,  धारण करणे, जीवन जगण्याची पध्दत... इत्यादी.

         प्रचलित समाज व्यवस्थेत एखादा व्यक्ती किंवा व्यक्तीसमूह आपले दैनंदिन जीवन जगत असताना तो जी जीवनपध्दती अवलंबितो किंवा संबंधित जीवनपध्दती व्यथित करत असताना तो जे कर्मकांड, पूजा, विधी, प्राथर्ना करतो आणि हे सर्व करत असताना तो त्यासाठी ज्या काही गोष्टी प्रमाण किंवा आधार मानतो त्यावरून धर्माचे विविध प्रकार पडतात.  जसे की--  हिंदू, मुस्लिम,जैन, बौद्ध, ख्रिश्चन, पारसी.... इत्यादी.


    *आध्यात्म*  म्हणजे आपल्या मूळ आत्मरुपी प्रेरणेचे केलेले स्वअध्ययन होय...  किंवा वैयक्तिक पातळीवर आपल्या स्वतःच्या मूळ स्वरूपाचा शोध घेण्यासाठी अवलंबिलेली यात्रा किंवा प्रवास होय. 

       आध्यात्मिक ग्यान म्हणजे आपल्या स्वतःच्या वैयक्तिक अनुभूतीतून किंवा आत्मअध्ययनातून प्राप्त झालेले ग्यान होय. 

      गौतम बुद्ध, वर्धमान महावीर किंवा इतर काही बुद्ध पुरूष हे आध्यात्मिक होते.... कारण त्यांना प्राप्त झालेले आत्मिक ग्यान हे त्यांना त्यांच्या वैयक्तिक अनुभूतीतून किंवा  आत्मअध्ययानातून प्राप्त झाले होते....   म्हणून त्यांचा उल्लेख आध्यात्मिक व्यक्ती असा केला जातो..... पण त्याचबरोबर  गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर हे अनुक्रमे बौद्ध व जैन धर्माचे संस्थापक म्हणून प्रसिद्ध झाले... कारण त्यानी आपल्याला आलेले वैयक्तिक अनुभव इतरांना सांगितले ... या त्यांनी सांगितलेल्या अनुभूतीवरुन किंवा शिकवणी अनूसार इतर व्यक्तीनी त्या गोष्टी प्रमाण किंवा आधार मानल्या व त्यानुसार मार्गक्रमण केले ....ते त्यांचे अनुयायी झाले..... तसेच त्यांनी दिलेली शिकवण संबंधित धर्माच्या धर्मग्रंथात बीजस्वरूपात सामाविष्ट झाली.

        कोणत्याही धर्माचे *अनुयायी* हे  संबंधित धर्माच्या विशिष्ट शिकवणी अनूसार किंवा संबंधित धर्माच्या संकेतांनुसार आचरण करतात. 

        स्वतःच्या वैयक्तिक अनूभुतीतून प्राप्त झालेले *आत्मिक ग्यान*  म्हणजे  *बीज*  ......
त्या बीजाचे   *वटवृक्षात* झालेले रूपांतर म्हणजे  *धर्म*  ......आणि त्या धर्मरुपी वटवृक्षाला आलेल  *फुल किंवा फळ*  म्हणजे  *आध्यात्मिक व्यक्ती* .......व त्या संबंधित व्यक्तिकडे असलेले  *आत्मिक ग्यान*  म्हणजे *बीज*........ पण दुर्दैवाने आध्यात्मरुपी वृक्ष आज वांज झाला आहे ...  त्याची फुले आणि फळे फार दुर्मिळ झाली आहेत... आणि बीज तर जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर आहे....

        *बीज*(आध्यात्मिक ग्यान)-----    *वृक्ष* (धर्म)------  *फूल किंवा फळ*(आध्यात्मिक व्यक्ती)  ------- *बीज*


     आजच्या आधुनिक यूगात सर्वच धर्मामधील बहुतांश समाज हा आध्यात्मरुपी वटवृक्षाला लागलेल्या कर्मकांडरुपी पारंब्याच्या जंजाळात गूरफटला आहे.... त्याचबरोबर ह्या धर्मरुपी वटवृक्षावर बूवा, बापू, स्वयंमघोषित आध्यात्मिक गुरू यांच्या स्वरूपात आढळ्णाऱ्या बांडगूळ किंवा अमरवेल यांच्या कूप्रभावाखाली येत आहे.... ही खूप मोठी शोकांतिका आहे.

----------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************