नाती (बदलते नातेसंबंध)
🌱वि४🌿 या व्हाट्सअप ग्रुपवरून
नाती (बदलते नातेसंबंध)
source:- INTERNET
- श्री गणेश सि. वायभासे,अमरावती.
एका महान विचारवंताने म्हटले आहे कि बदल हा निसर्गाचा नियम आहे. प्रक्टिकली पाहिल्यास हे खरे वाटते. बदल आवश्यक असतो. परंतू बदल हा सकारात्मक कि नकारात्मक आहे यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे.
अर्थातच नात्यांमधील बदल सकारात्मक असल्यास त्याचे ऋनानुबंध खोलवर रुजले जातात. बदलत्या काळात नात्यांमधली गोडी कमी होत असुन त्यामधील कटुता वाढत आहे हे सत्य पचविणे कठिणच आहे. आपण सर्वांनीच नात्यातील संबंधाचा आढावा घेतल्यास असे दिसते कि पूर्वीप्रमाणे नात्यांमध्ये असलेली जवळीकता आपण हरवून बसलो आहेत.
जग तंत्रज्ञानामुळे जवळ आले आहे पण आपण एकमेकांपासून दूर गेलो आहेत.सुखदुःखाच्या क्षणी कोणी आपले जवळ येऊन सांत्वन करावे हि भोळी भाबडी आशा आपल्याला नात्यांचे महत्व दर्शविते. आई,बाबा,बहिण,भाऊ यापलिकडे जाऊन आपण विश्वबंधुत्वाचा विचार करायला हवा. कारण जगाला खऱ्या अर्थाने गरज आहे प्रेमळ नात्याची व विश्वबंधुत्वाची.
वाढत्या वयाबरोबर वाढणारा अहंकार,पैसाचा घमंड,पोस्टची मस्ती आपल्याला आपल्यांपासून दुर घेऊन जाते व आपण स्वतःला आयुष्याच्या शेवटी एकटे आढळून येतो. जर आपण आपला अहंकार बाजूला ठेवला तर परिस्थिती नक्कीच सुधारेल. शेवटी गरज आहे ती पुढे होऊन सकारात्मक बदल घडवून आणण्याची व स्वतःमधील अहंकार जाळण्याची.एकदा परिवर्तन सुरु झाले कि मंग बघा कसे हे जग सुंदर दिसते. गरज आहे फक्त विश्वबंधुत्वाच्या दृष्टिकोनाची आणि त्यातून जन्म घेणाऱ्या प्रेमळ नात्यांची.तर मग चला उठा आणि सुरुवात करा स्वतःमध्ये सकारात्मक बदलाची.

महेश देशपांडे,
ढोकी, जिल्हा धाराशिव
काही नाती ही जन्माने आलेली असतात (उदा. आई, बाबा, मामा, आत्या ई.) तर काही नाती ही आपण निर्माण करतो. दोन्ही प्रकारची नाती कशी संभाळायची हे आपल्या हातात असते. नोकरी किंवा उपजीविकेसाठी घर, गाव सोडून राहणाऱ्या सर्वांना नवीन नाती निर्माण करावीच लागतात, त्यांना पर्याय नसतो कारण समाजात राहायचं असत.
बदलते नातेसंबंध हा विषय पूर्वी (काही दशकांपूर्वी) आणि आत्ता नाती कशी बदलत गेली हा आहे. पूर्वी अस्तित्वात नसलेली काही नाती आता व्यवस्थेने निर्माण केली. पूर्वी फक्त घर, गल्ली गाव आणि ओळखीचे काही एवढाच पसारा होता. आज अनेक अनोळखी माणसं भेटतात खूप चांगले मित्र बनतात (विचार ग्रुप मधून खूप चांगली माणसं भेटली). आधीच्या काळी हा एवढा प्रवास होत नसल्याने तसे होत नसावे. बदलते नाते संबंध हे यांत्रिकीकरण झाल्यामुळे अतिशय *कोरडे* झाले आहे, कारण आज मोबाईल आणि इतर साधनांमुळे *वेळ* हा कमी पडतो.
वेळ, स्वभाव आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे *विश्वास* या गोष्टी फार महत्वाच्या असतात कुठलेही नात टिकवण्यासाठी. वेळ जरी कमी पडला तरी जेवढा वेळ मिळतो तेवढा वेळ आपण कसे वागतो यावर ते नाते अवलंबून आहे.
अगदी नवरा-बायको या नात्यात विश्वासाला फार महत्व आहे. पालक-पाल्य या नात्यात आपल्या वागण्याला म्हणजेच स्वभावाला फार महत्व आहे.
तसेच इतर नात्याच्या बाबतीत त्या अनुषंगाने वेगवेगळ्या गोष्टींचं महत्व आहे.
आजच्या जमान्यात आपण तंत्रज्ञान नाकारू तर शकत नाही, मग हे तंत्रज्ञान सोबत असताना आपली नाती कशी टिकवायची ही एक *कसोटी* प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या स्वभावात, वागण्यात, विचारांमध्ये थोडा बदल केला तर सगळी नाती खूप चांगली राहू शकतात.

वाल्मीक फड ,नाशिक
नाती अनेक प्रकारची असतात खरं तर असे आहे की,ज्या नात्यात प्रेम आहे तेच नातं खरं आहे असं समजायला हरकत नाही.
बरीच नाती ही माणसाची आर्थिक परीस्थीती कशी आहे यावर अवलंबून असते.नाती ही प्रेमाने तयार झालेली असली पाहिजे कारण प्रेम नसेल तर नाती ह्या शब्दाला काहीच किंमत उरत नाही.
बदल हा निसर्गाचा नियम आहे तसाच माणूस बदलत असतो.प्रथमतः तो मुलगा असतो एका आईचा,बापाचा बहीणिचा भाऊ असतो,काकाचा पुतण्या असतो,आजा आजीचा नातु असतो असा अनेक नात्यांमध्ये माणूस गुंतलेला असतो.शिक्षकाचा शिष्य असतो.एखाद्या प्राण्याला प्रेम दिले तर त्या प्राण्याचा जिव कि प्राण असतो.अशी अनेक प्रकारचे ऊदाहरण आपल्याला देता येतील.
परंतु जेव्हा बायको,मुलं आल्यावर हि नाती जो सांभाळत असतो त्याला खर्या अर्थाने पुरुष म्हणता येईल.लग्न झाल्यावर बरेच जण आपली जुनी नाती सोडून नविन नात्यांनाच आपले सर्वस्व मानतात जसे सासु,सासरा,मेहुणा,मेहुणी,सारे काही नाते तिकडचेच .आईवडीलांना पुरता विसरून जाणारा वर्ग मी पाहिलेला आहे.एक तर असा महाभाग असा आहे कि,तो सासुरवाडीला माझे गांव म्हणून याञा,ऊत्सव ह्या गोष्टिला तो सासुरवाडीला जात असतौ.मला एवढंच सांगायचं आहे कि,परिस्थिती अनुकूल असो किंवा सानुकूल असो परंतु नात्यात जो बदल घडून देत नाही त्याच व्यक्तीला खराखुरा माणुस म्हणावं असं मला वाटतं.जगाला काय वाटतंय ह्या गोष्टीशी मला काही घेणेदेणे नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा