कपडे घाण झाले की कपडे बदलतो, ‎शरीर नाही.मग तुमच्या नजरांसाठी ‎'ती'ने स्वतःलाच का बदलायचं? (भाग-2)

🌱वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून
कपडे घाण झाले की कपडे बदलतो,
‎शरीर नाही.मग तुमच्या नजरांसाठी
‎'ती'ने स्वतःलाच का बदलायचं? (भाग-2)
‎(यातील सर्व फोटो गुगलवरचे आहेत.)

किरण पवार,औरंगाबाद:
  आपण भारतीय पुरुष चालत आलेल्या रुढी परंपरेनुसारच आजवर चालत आहोत आणि त्यामुळेच आपण स्त्रियांबाबत असा विचार करतो की त्यांनी आपल्यासाठी स्वत:ला बदलायला हवं. पण ही मानसिकता चुकीची आहे. घराघरात छोट्या छोट्या गोष्टीत जे काही मुलींबद्दल बोलल जात किंवा त्यांना जस वागवल जात. आपणही मग पुढे चालून त्याच ठराविक साच्यात स्त्रिच्या वागण्याकडे पाहतो.
            प्रत्येक जीव स्वतंत्र आहे किंवा प्रत्येकाला हवं तस जगण्याचा हक्क आहे ही ‌साधी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आपण एखाद्यावर हक्क गाजवायला "नातं" या शब्दाचा आधार घेतो. या गोष्टी किती चुकीच्या आहेत? याचा आपण विचार करतच नाही.
        महासत्ता होणं म्हणजे केवळ  आर्थिक स्थिती सुधारण नसून विचारात प्रगती करण महत्त्वाच असतं.  शेवटी एवढंच सांगेन की, तिने माझ्यासाठी बदललंच पाहिजे हा अट्टाहास आपण करू नये.

निकीता गडाख ,अहमदनगर:
धाडसी मनासारख जगण, स्वतःची बुद्धी स्वतःच शहाणपण वापरून निर्णय घेणे,
इथे तुमचे कपडे, तुमच्या स्कर्ट चीन उंची यावरून तुमच चारित्र्य ठरवले जाते.
        *" Be Bold for Change* "
  स्वतःच स्वतःसाठी मर्यादा ठरवणं,
 स्वतःसाठी निर्णय घेणे.लोकांच्या कुनिर्णया पलीकडे जाऊन स्वतःचा विचार करणे.
पुरूषी समाज मानसिकतेला चॅलेंज करणे,
शेवटी मनासारख जगण्याची हिम्मत ठेवा,त्याची किंमत चुकवावी लागली तरीही.

सिताराम पवार,पंढरपूर:
आपण समाजात वावरताना महिलांची काय अवस्था आहे ती पाहतो, घरामध्ये कोणत्या7ही प्रकारचा व्यवहार असो त्यात "तू डोकं घालू नको आम्ही आणखी आहोत अशी टोमनी खावी लागतात.महिलांना ना बाजार आणायची परवानगी ना दळण!सहजपणे एखाद्या प्रतिष्टीत घरातील महिलांना विचारायचे"काहो तेल,भाजी काशी आणली तर त्यांची प्रतिक्रिया असते"आमची गडी माणसाचं आणतात आम्हाला ना बाजार माहिती ना पिठाच्या गिरणीची पायरी, आमचं त्यांच्या पुढं काय चलताय?
आज राजकारणात महिलांसाठी आरक्षण आहे पण सर्व कारभार पुरुषच बगतात, काही ठिकाणी तरी सूनबाई सरपंच आणि सासरा कारभारी, काही ठिकाणी तर चक्क नवराच सही मारतो, लोकशाहीत सर्वाना सामावून घेण्यासाठी, सत्ता म्हणजे काय ती राबवायची कशी, त्यातून येणारा समजसंपणा, सामाजिक भान,स्त्रियांचे प्रश्न ते सोडविण्यासाठी करायच्या उपाययोजना व सामाजिक जबाबदारी यासाठी महिलांना पुरेसे प्रतिनिधित्व दिले आहे पण तेथेही त्यांची "कुचंबणा"होते, क्षमता असूनही काय उपयोग आपलं काय चलताय हीच भावना वाढीस लागते आहे.

शहरामध्ये थोडं बर आहे बऱ्यापैकी महिला सुशिक्षित आहेत जरा त्यांना स्वतंत्र आहे पण"घरणदास पणा"नावाचं एक खूळ आहे आणि ते शहरात पण आहे आणि खेड्यात तर तेच भूषण मानून महिलांना धाकात ठेवलं जातं.
"मन नाही निर्मळ!काय करील साबण!"या उक्तीप्रमाणे आज पुरुष मनाच्या शंकेच्या खिडकीतून महिलांकडे पाहतो आहे. त्यांनासुद्धा व्यवहार, सार्वजनिक जीवन, आवडी निवडी, मैत्रीण-मित्र, आणि विशेष म्हणजे त्यांना सुद्धा"मन"असत याची जाणीव झाली पाहिज,आणि त्यासाठी आपल्या नजारा ,दृष्टकोण बदलाव्या हीच अपेक्षा!

जगदीश लोंढे,मुंबई:
" समाज बदलला जाऊ शकतो यांवर लोकांनी विश्वास ठेवला पहिजे "आपल्या नजरांसाठी नेहमी "ती" का बदलायचं.एक समाज म्हणुन आपण आजही आपण किती मागसलेलो आहोत याच प्रत्यय येतं हा लेख लिहताना  की आपल्याला या विषयांवर बोलाव लागत.
       "ती" मोठी झाली तर मग असतेच उपलब्ध सत्ता गाजावायला!अशी ही मुलगी आपल्या देशांत अनेक भागात केवळ मागासलेल्या दुर्गम प्रदेशात न्हावे तर शहरात गांवात वस्तीत सुद्धा आहेत.याची आपल्याला जाणिव आहे.उलट कूटल्याही क्रुतीनं चिड़वणे ; छेड़ काढणे ; शेरे मारणे ;संधी मिळताच वा ती मिळवून शरीराच्या विविध भागांना स्पर्श करणे असल्या पुरुष व्रुतीतुन गेली नाही अशी बाई-मुलगी आपल्याला माहीत असणे शक्य नाही हे वास्तव आहे.यानंतरच्या शोषणा च्या पायऱ्या कितीतरी आहेत.ही शोकांतिका आहे.
            हे कुठेतरी बदलायला हवंय.का तिला आपण आजही हवी ती स्पेस देण्यात अपयशी होतोय.मग ती स्पेस शहरातील असू देत की ग्रामीण भागातील.आजची "ती" सक्षम असूनही तिला हवा तो स्पेस देण्यासाठी आपली मानसिकता का बदलत नाहीये.
      शेवटी एवढंच सांगावे वाटते की "प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते."म्हणजेच "ती"असते.म्हणूनच खरं गरज आहे समाजातील मानसिकतेत बदल घडवण्याची.
      ‎
रविराज अकोस्कर,लातूर:
सनातनी विचार हेच सांगत आलेत की स्त्री ही फक्त मूल आणि चूल पर्यंत मर्यादित आहे.पण हे विचार किती भयानक आहेत हे आपण भारतात अनुभवत आहोत..किती तरी स्त्रिया आजही या विचारा मुळे स्वतःला घरातल्या घरात दाबून घेत आहेत..मग कशा जाणार त्या पुढे ???स्त्री म्हणून जगण्याच्या वेदना त्या निमुट पणे सहन करते. आपल जगण पूर्ण करत आहेत ..त्याना त्यांच्या वेषभूषणे निवडण्याचे पूर्ण स्वतंत्र आहे. त्यांना जड्ज करणारे हे "सनातनी "कोन ??त्यामुळे आपण आपला दृष्टीकोन आणि नजर बद्लयची गरज आहे.."ती "च आयुष्य आपोआपच बदलेल.
बस रेल्वे अशा अनेक सार्वजनिक स्थळांना होणारे डोळ्यांचे बलात्कार खूप घाण व सहन न होणारे असतात..हे फक्त ती स्त्री च कशी सहन करते हे तिलाच माहीत..म्हणून आपण वैयक्तिक पणे या नजरा बदलण्याचा निर्धार करू ...नक्कीच बदल जाणवेल..

बालाजी सानप, बीड:
भारतीय इतिहास हा जसा पुरुषांनी गाजवला तसाच तो स्त्रियांनीही गाजवला यात तिळमात्र शंका नाही.स्त्री ही त्याग, नम्रता, श्रद्धा व सुजाणपणा याची मुर्ती आहे. ती कोणत्याच बाबतीत कमी नाही. पारंपारिकरित्या पुरूषांची समजली जाणारी क्षेत्रे महिला काबीज करत आहे.स्त्री आणि पुरूष यांच्यात केवळ शरीरामध्येच भेद नाही तर स्त्री अधिक संवेदनशील असते, तर पुरूषाचे लक्ष्यमात्र भौतिकतेकडे, जडत्वावर अधिकार गाजविण्याकडे अधिक असते. जगभरातील स्त्रीयाप्रमाणे भारतातीय महिलांना पुरूषांप्रमाणे अधिकार मिळाले नाहीत ही मोठी शोकांतिका आहे.

वैशाली गोरख साविञी:
आत्तापर्यतच्या life मध्ये आम्ही मूली प्रत्येकाच्याच नजरांसाठी स्वताःला बदलत आलोय .रस्त्यावरुन जाताना रस्त्यातली मूले आमच्याकडे पाहू नये ,म्हणून व्यवस्थीत ओढण्या घेऊन ,निटनेटक जायचं का तर त्यांची विचिञ नजर आमच्यावर पडू नये, कॉलेज मध्ये असताना कोण त्याही मूलाशी काही बोलू नये कारण शिक्षकांच्या नजरा मूलींनवर ,घरात मूलींनी हातात जास्त वेळ मोबाईल घेऊन बसू नये कारण वडील आणी भावाची नजर बहीनीवर ,ह्या सगळ्याच्या नजरेत एक आदर्श मूलगी बनण्यासाठी आम्ही मूली /ती बदलते खूशाल कारण तीला स्वताःला तर कोठे आहे ना "स्व " ची जाणीव .गूलामाला गूलामाची जाणिव करुन द्या तो बंड करुन उठेल पण येथेही आमच्या (महीला)सारख्या गूलामाला जाणीवही नाही की आजही आपण गूलामीत आहोत ह्या पूरुषसत्ताक व्यवस्थेच्या .
तूमच्या नजरांसाठी तीनेच का बदलायचं?येथे बदलही दोन प्रकारचे असणार आहेत .
1)सकारात्मक
2)नकारात्मक
सकारात्मक बदलात तिने स्वताःला बदलायलाच पाहीजे .एकाद्या रस्त्यावरुन ती चाललीय तीला मूले रोज ञास देतात तर येथे तीन स्वताःची ओढणी सावरत ,मीच चूकतेय का? ह्याचा विचार करत न बसता न घाबरता ,ताठ मान करुन जर तीन असे प्रसंग हाताळले तर जास्त फायदेशीर ठरेल आणी वेळ पडली तर दोन द्यायच्या पण धाडास ठेवलं पाहीजे .घरात वावरताना सूद्दा तीन सकारात्मक बदल स्वताःच्यात करायला पाहीजेच .घरातली कामाची जबाबदारी तीचीएकटीची नाही ,घर आपलं दोघांच आहे तर घरकाम फक्त माझं एकटीच का? एवढ्या प्रश्नावर तर तीन विचार करुन स्वताःला बदललं तरी खूप मोठ परिवर्तन होईल .अशा प्रकारचे बऱ्याच गोष्टी मूली करु शकतात समाज्यात ,घरात फक्त त्यांना जाणीव झाली पाहीजे की आपणही माणूस आहोत मला फक्त एक आदर्श मूलगी , बहीन ,आई ,पत्नी न बनता एक चांगल , स्वतंञ माणूस म्हनून जगायचाय , राहायचाय . सकारात्मक गोष्टी साठी तिन स्वताःला बदलायलाच पाहीजे .त्याच्या नजरा कधी बदलतील ह्याची वाट न पाहता .
राहुल आनपट, मंगळवेढा:
'ती'ने थोडं बदलायला हवं.
माणूस खरं तर बंद मुठ्ठी घेऊन जन्माला येतो. जाताना पण काही घेऊन नाही अन जन्माला येताना पण काही घेऊन येत नाही. मग माणूस इतका स्वार्थी होऊन जगतो कशासाठी।
मुद्द्यावर येतो.एक घटना जी सत्य आहे अन ती खूप ठिकाणी अनुभवली.

मागच्या 2 महिन्याखालची आहे .
मी एक कामानिमित्त एक ऑफिस ला गेलो होतो त्या ऑफिसर ने आम्हाला एका ओळीत असलेल्या खुर्ची वर बसायला सांगितलं.

मी आपलं निवांत बसून बसलो होतो एकटा. काही वेळाने ती आली. आणि माझ्या शेजारच्या खुर्ची वर बसली. मी माझ्या नादात निवांत रिलॅक्स बसलो होतो. काही वेळानं मला त्या मुलीने बडबड केलेली समजली .तीच बडबड करण्याचं कारण होत माझा शर्ट (अर्थात माझा हात अन ढगळा शर्ट🙂) तिला स्पर्श करत होता .काही वेळाने चुकून पुन्हा माझा स्पर्श झाला असावा . तीन उठून 200 - 250 माणसात उठून बोलणं सुरू केलं .

मला अपमान वाटलं नाही पण कारण काय समजेना .ऑफिसर बाहेर आला आणि तिला समजावू लागला .काही वेळाने ती खुर्ची वर बसली अन मी खुर्ची सोडून जमिनीवर बसलो सगळे तोंडाकडे पाहू लागले । मी शांत होतो.ऑफिसर आला अन मला वर बसण्याची विनंती केली पण मी वर बसण्यासाठी तयार नव्हतो।काही वेळाने माझा नंबर आला . माझं काम करून मी माझ्या गाडीजवळ आलो अन त्याच ऑफिस मधला मुख्य अधिकारी माझा मित्र असल्याने भेट घेण्यासाठी मी थोडा वेळ वाटच पाहत बसलो होतो . काही वेळाने तो आला आणि आमच्या गप्पा सुरु झाल्या। त्याच वेळेला ती मुलगी कदाचित आमच बोलणं ऐकून घेत असावी .काही वेळाने तिला समजलं की आपण ज्याला थोड्या वेळापूर्वी अपमानित केलं तो माणूस चांगलं आहे .
तिने जवळ येऊन मला माहिती विचारली मित्र पण ते ऐकत होता. मी माझी ओळख सांगितली अन ती तोंडावर हात ठेवून माफी मागू लागली .
आता ती माझी चांगली मैत्रीण झालीय.
मला एवढंच म्हणायचंय

हो ती ने बदलायला हवं .तिचा विचार,तिच घाबरुन जाण, तिचं एकटं असणं या गोष्टी साठी ती न नक्की बदलायला हवं

मुलं पाळण्यात बिघडतात मग मुली याच वयात का ??
मान्य आहे त्यांना मुलांसारखं जगायला मिळत नाही पण मुलांसारखं जगायला त्यांच्या सारख व्हा मननार नाही पण नक्कीच वि4 पण त्याच पद्धतीने करायला हवा .

स्त्री आहे म्हणून तिला जास्त सवलत अन पुरुष आहे म्हणून त्याला नाही।
स्त्री पुरुष समानता हे तर राज्यघटनेत नमूद केलंय.

हो तीन बदलायला हवं

अत्याचार होत असताना(घरगुती) त्याचा विरोध करायला हवा . तीन बदलायला हवं तिच्या हक्कासाठी तीन बदलायला हवं तिच्या अस्तित्वासाठी हो मला तर खर्च वाटत तीन बदलायला हवं .
माणूस ओळखला नाही तरी चालेल पण ती न माणसाचं मनं ओळखायला हवं.

प्रत्येकाची नजर वाईट नसते हे तिलाही समजायला हवं .अन तिला या गोष्टी साठी तरी बदलायला हवं .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************