कुणी माझं ऐकाल का ? अहो,मी तिरंगा बोलतोय….(भाग:-२)




  🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

कुणी माझं ऐकाल का? अहो, मी तिरंगा बोलतोय….(भाग:-२)

Source: Internet

-अमर चिखले
 पुणे

       उगवत्या सूर्याचा रंग भगवा आहे म्हणून त्याने स्वतःला कधी हिंदू म्हणून घेतले नाही; आकाशाचा रंग निळा आहे म्हणून त्याने कधी स्वतःला बौद्ध म्हणून घेतले नाही; या सृष्टीचा रंग हिरवा आहे म्हणून तिने कधी स्वतःला मुस्लिम म्हणून घेतले नाही परंतु हेच रंग याच भारत देशातल्या लोकांनी आणि राजकारण्यांनी वाटून घेतले .ते सर्व हे विसरले का याच रंगांचा मिळून बनलेल्या तिरंग्याचा सन्मानासाठी किती तरी क्रांतीकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होय मी तोच तिरंगा बोलतोय ! आज भारतातील किती तरी गरीब जनता हाच तिरंगा विकून पोट भरते . अशी अवस्था पाहिली की वाटते हा तोच भारत देश का ज्याचा दिल्लीच्या तिजोरीवर  जेव्हा इंग्रजांनी हल्ला केला तेव्हा संपूर्ण देश पेटून उठला तिरंगा हातात घेऊन परंतु आज मात्र आम्ही अजुनही इतक्या वर्षानंतर त्याच दिल्लीतली युवतीला अजून सुरक्षित करू शकलो नाही .वास्तव फार वेगळेच आहे म्हणून तर
आण्णाभाऊ साठे म्हणून गेले की ,"यह आझादी झूठी है देश की जनता भूखी हैं !" होय मी अशाच देशाचा राट्रध्वज तिरंगा आहे.ज्या गावात माझा स्वतःचा जन्म झाला त्याच गावात एका क्रांतिकारकाचाही जन्म झाला आहे ते गाव म्हणजे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ आणि ते क्रांतिकारक म्हणजेच हुतात्मा बाबू गेनू सैद होय .या युवकाने परदेशी मालाच्या गाडीपुढे आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्याच्याही हातात तिरंगाच होता होय मी तोच तिरंगा . दिवसेंदिवस आपले जवान रोजच शहीद होत आहेत देशाच्या रक्षणासाठी त्यांना बहाल केला जातोय तोच हा तिरंगा . आशा लोकांना आपण विसरत चाललोय असे मला वाटते . म्हणून तर कुसुमाग्रज म्हणून गेले ती त्यांची कविता 'स्वातंत्र देवतेची विनवणी ' त्यात ते सुद्धा आपल्याला समजवतात की वाट वाकडी धरू नका  परंतु आपण मात्र भान विसरत चाललोय . एकीकडे दादाभाई नौैरोजी यांनी भौतिक संपत्ती निसारणाचा सिद्धांत मांडला तो आजही लागू होत आहे की भारतातली संपत्ती आजही विजय मल्यासारखे लोक विदेशात नेत आहेत ज्याला आपण काळा पैसा हे नाव दिले आहे होय मी त्याच भारत देशातील सामान्य जनतेच्या आशेचा फडकलेला तिरंगा . कोण ऐकणार माझे गरिबांकडे वेळ पण पैसे नाहीत मध्यम वर्गीयांना यात काही रस नाही आणि श्रीमंत लोकांना वेळ नाही अशा परिस्थितीत ही सगळी परस्थिती बदलण्याची टाकत फक्त तुमच्या सारख्या युवकांमध्ये आहे म्हणून स्वामी विवेकानंद यांच्या शब्दात उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका .म्हणजे डॉ. कलाम सारख्यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी प्रयत्न करा . मग तुम्हालाही जीवनाच्या अखेरिस माझी प्राप्ती होईल म्हणजे तिरंगा !
         

Source: Internet

- डॉ. कौस्तुभ कल्पना विलास

       भारत स्वतंत्र व्हायच्या आधी माझा जन्म झाला, भारताच्या स्वातंत्र्यापासून आजतागायत भारतात जे घडले त्याचा मी साक्षी आहे. भारतात अनेक सुपुत्र जन्मले व अजून आहेत काही येणार आहेत त्यांचा मला अभिमानच आहे. त्यांनी दिशा दिली भारताला पण त्या दिशांची निवड व गती दिली ती सर्वसामान्य भारतीयांनी. मला अभिमान आहे भारतासारख्या महान देशाचे प्रतिक असल्याचा पण खंतही आहे अनेक गोष्टींची. जातींतील सामाजिक विषमता व परस्पर द्वेष, धार्मिक तेढ व दरी, आर्थिक दरी व त्यातील शोषण, लैंगिक अज्ञान व अत्याचार, वृक्षतोड, प्रगतीच्या नावाखाली सत्ता व पैशाचे केंद्रिकरण, अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा, अवैज्ञानिक विचारसरणी, अस्वच्छता आदी अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यांची यादी करायला बसलो तर पाने भरतील. पण या बदलायला तर पाहिजेच. यानेच आपल्या प्रिय भारताचे जगात हसू होते. मग बदलणार कसे? हातात तलवारी, दगडी घेऊन, तोडफोड वा रक्तपात करून??? नाही....हा बालिशपणा आहे याने कधीही प्रश्न सुटणार नाहित, चिघळतील मात्र. मग सुटणार कसे? तर प्रत्येक भारतीयाने स्वतःला बदलून. प्रत्येक जण स्वतः बदलला तर देश नक्की बदलेल. तुम्ही संविधान कधी वाचले आहे का? भारताच्या नागरिकांची मुलभूत कर्तव्ये वाचली आहेत का? वाचली असावीत, नसेल वाचली तर नक्की वाचा व भारतीय म्हणून आपण त्याचे किती पालन करतो ते स्वतःलाच विचारा. स्वतः स्वःतःला बदला, देश बदलेल. नक्की बदलेल. बुद्ध म्हणाल्याप्रमाणे "माणसाला फक्त स्वतःवरच (स्वत:च्या जीवनावरच) अधिकार असतो" व महात्मा गांधी म्हणाल्या प्रमाणे, "बदलाची सुरवात स्वतःपासून करा" हेच सांगणे - Be the change, what you want to see in society. बघा जमतंय का?
        


Source: Internet

✍️ निलेश पाटील,
    धुळे

कुणी ऐकाल का माझं? अहो मी तुमचा राष्ट्रध्वज अर्थात तिरंगा बोलतोय. तुम्ही तुम्ही तर ओळखले असेलच ना? माझा जन्म 22 जुलै 1947 ला झाला. नेहरूंनी माझी ओळख करून दिली आणि मला जगासमोर आणलं. माझा मानसन्मान व्हावा म्हणून काही विशेष तरतुदी ही केल्या गेल्या.
स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या रक्ताचा रंग माझ्यात वसलेला आहे.
माझा आकार रंग ठरवला गेला. माझ्यातील केशरी रंगाचे महत्त्व म्हणजे त्याग ,बलिदान आणि पांढरा रंग सत्य आणि शांततेचे प्रतिक तर हिरवा रंग साहस आणि शौर्याचे प्रतीक. खूप दिवसांनी बोलतोय ना... वेळच अशी आलीय म्हणून तुमच्यासोबत हितगूज साधतोय. हा तर मला असं सांगायचं होतं की, 15 ऑगस्ट 26 जानेवारी एवढे दोनच दिवस तुमची देशभक्ती असते का? हे 2 दिवस माझ्यासाठी ठरवले आहेत का? या दोन दिवशी तुमचा खूपच स्वाभिमान जागा होतो. आणि भारतीय असल्याचा गर्व वाटतो. छाती फुगते तुमची, नाही का? संध्याकाळ झाल्या बरोबर तुमच्यातला देशभक्ताचा अस्त होतो. वर्षांतून 2 दिवसच तुम्ही भारतीय असतात का? दुसऱ्या दिवसापासून तुमचे झेंडे वेगवेगळ्या रंगात दिसतात. भगवा, हिरवा अजून बरेच काही रंग दिसतात आणि तुम्हाला जातीची नशा चढते. मग कोणाला हिंदू असण्याचा गर्व होतो, कोणाचं रक्त भगवं होतं तर कुणाचं निळं होतं. तुम्ही तुमची ओळख जातीने दाखवता, भारतीय म्हणून कधी एक व्हाल? खरं तर मला तुमच्याकडून मानसन्मान मिळावा ही अपेक्षा मुळीच नाही. माझ्या निमित्ताने तरी एकत्र यावं, जातीधर्माच्या पलिकडे जाऊन भारतीय म्हणून एकत्र यावे ही अपेक्षा आहे. असं झालं तर तुमच्यासोबत झालेलं हितगुज सार्थ झालं म्हणावं. येत्या 26 जानेवारीला भारतीयांना बघायची संधी मिळावी हीच अपेक्षा.

Source: Internet

तेजस महापुरे,
कराड

              हॅलो आज दरवर्षी प्रमाणे मला सॅल्युट केला सर्वांनी तसेच फेसबुक वर ट्विटर वर इन्स्टाग्राम आणि व्हाट्सअप्प वर अनेकांनी माझेच फोटो ठेवलेत, तस हे वर्षातून दोनदा तुम्ही करताच,माझ्याबद्दल असलेल प्रेम या दोन दिवशी जरा जास्तच उफाळून येत असत, स्वातंत्र्यापासून पाहतोय मी तुमचे हे दोन दिवसाचे देशप्रेम,  याचा अर्थ तुम्ही तुमची प्रादेशिक अस्मिता विसरूनच जावा असे मी म्हणत नाही,कारण विविधता हे तुमचं फार मोठे वैशिष्ट्य आहेच मग त्यातून एकता का दिसत नाही,का अजून धर्म,जात,पंथ,भाषा यावरून एकमेकात भांडत असता,कशाला खोटा मोठेपणा मिरवत असता,केवळ विशिष्ट धर्मात,जातीत जन्माला आला यावरून तुमची श्रेष्ठता ठरते का,थोर महापुरुष वाटून घेण्याचा मूर्खपणा का केलाय तुम्ही,अजूनही त्यांचे विचार तुम्हाला समजलेच नाहीत,तुम्ही महापुरुषांची जयंती फक्त DJ लावून साजरे करता,विचार करा काय वाटलं असत त्या महापुरुषांना हे सर्व पाहून,आणि सेल्फीचे किती वेड यामुळे फक्त सेल्फीश झालात सर्वजण तुम्ही,शिवाजी महाराजांचे नाव घेणारे कितीजण त्यांच्या विचारांप्रमाणे कृती करतात,किती जण शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा फुले यांनी दाखवलेल्या वाटेवरून चालतात, किंवा तसे धाडस करू शकतात,फार कमी भेटतील असे,या थोर महापुरुषांना एकमेकात वाटून घेणारे तुम्ही कोण,काय तुमचं कर्तृत्व,एक लक्षात घ्या या सर्वांनी कधीही जात पात मानली नाही,या भूमीसाठी अनेकांनी बलिदान दिले आहे,त्याची जाण ठेवा कुणाच्याही हातातले दगड बनून एकमेकांवर बरसू नका,कारण दंगलीत जात कधीच मरत नाही,मरतो तो फक्त आणि फक्त माणूस,एक लक्ष्यात ठेवा लोकशाही एवढे स्वातंत्र्य दुसरे कुठेही मिळत नाही,त्याचा उपभोग घ्या, सनदशीर मार्गाने तुमचे म्हणने मांडा, मूलभूत हक्क आणि कर्तव्ये समजून घ्या मनात भारतीय असल्याची भावना रुजवून घ्या,माणूसकी ने वागा,लक्ष्यात ठेवा कोणतेही वाद हे चर्चा आणि सुसंवाद यामाध्यमातूनच सुटू शकतात, आणि जर माझं ऐकणार नसाल तर मला सॅल्युट पण करू नका,एकवेळ माझा फोटो फेसबुक,ट्विटर,इंटग्राम, व्हाट्सअप्प वर ठेवला नाहीतरी चालेल पण मी जे काही सांगितलं आहे ते नीट वाचा,त्यावर विचार करा,त्याप्रमाणे कृती करा तरच भारत महासत्ता होईल,प्रत्येक महापुरुषांकडून किमान एकतरी गुण घ्या व त्याप्रमाणे वागा सगळ्यांचे कल्याण होईल, आणि तुमच्यामुळे माझी शान कमी होता काम नये याचे भान ठेवा...............



Source: Internet

-करण बायस
जि. हिंगोली

(आकाशवाणी द्वारे तिरंगा भरतीयांसोबत संवाद साधतो)

नमस्कार, माझ्या देशवासियांनो मी तिरंगा बोलत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की आज अचानक तिरंगा कसं संवाद करतोय कारण मला असं वाटलं की मला सध्याच्या परिस्थिती बघून तुम्हाला संवाद साधावा.

मित्रांनो तुम्ही दर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी ला माझी आठवण करून माझ्याप्रति असलेली तुमची भक्ती दाखवता मला त्या दिवशी खूप छान वाटते.मी तुम्हाला काही सांगणार आहे ते तुम्ही ठरवा ते बरोबर की चूक.

मी बघत आहे की देशात सध्या एक अभियान चालू आहे ‘स्वच्छ भारत अभियान’ मला खूप आनंद झाला जेंव्हा मी याबद्दल ऐकले. जसजसे हा अभियान पुढं येत गेला तस मी बघितलं की काही लोक चांगल्या स्वच्छ जागेवर कचरा टाकून त्या जागेवर हातात झाडू घेऊन selfie काढत आणि social media वर टाकत आणि poapularity मिळवत. तुम्हाला कधी वाटलं नाही का की खरंच आपलं परिसर स्वच्छ असलं पाहिजे ,बर समजा वाटलं असेल तर आपण या अभियानात किती आपलं contribution दिलं. आपण आपल्या परिसरातील वातावरण किती प्रदुषित आहे यावर कधी लक्ष दिल का?कधी विचार केला का की वृक्ष आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत?आपण आपल्या पर्यावरणाचे संरक्षण करत अहो का ?


आपण आपल्या border वरच्या सैनिकांचा पण खूप आदर करतो.ज्या वेळेस एखादा सैनिक शहीद होतो आपण त्या वेळेस आपण त्याला सलामी देतो पण नंतर त्याच्या परिवरबद्दल कधी मानत विचार आला का हो?ज्याने आपल्या देशातील लोकांसाठी आपले जीव दिले. विचार करा त्याच्या जागी स्वतःला काही तरी वेगेळंच अनुभव येतो.


आणखी मी बघत आहे देशातील जास्तीत जास्त भागात आरक्षणासाठी आंदोलन चालू आहेत.काय करायचे हो आरक्षण ज्यावेळेस तुम्हाला बुद्धी दिली आहे त्याचा वापर करा काही गरज नाही आरक्षणाची. कधी आंदोलन करणार्यांनी या गोष्टींचा विचार केला का की जे लोक मेहनत करत आहेत त्यांचं काय? आरक्षण पाहिजे तर यासाठी आंदोलन करून दाखवा की मला border वर दुष्मणासोबत लढायचं करा !

या सर्व गोष्टी हे राजकारण करण्यासाठी काही लोक सामान्य लोकांना भडकवतात आणि आपण पेटून विरोध करतो कधी विचार केला की आपलं त्यात किती नुकसान आहे?


आपल्या देशात जातीवाद खूप चालत आहे.प्रत्येक जातीच्या लोकांनी आपला देव, आपला रंग एवढंच नाही तर स्मशानभूमी पण वाटून घेतली!!प्रत्येक जातीचे लोक आपल्या आपल्या जातीच्या माणसाला राजकारणात निवडून देतात त्यावेळेस हे बघत नाही की आम्हाला कोणता नेता योग्य ठरेल.


देशातील जे कष्टाळू शेतकरी आहेत आज त्यांना बरोबर भाव मिळत नाही कारण विचार केला का कधी? काय असेल? सरकार.ते तर आपण च निवडून देतो मग मला वाटते आपल्याला आणखी लोकशाहीचा अर्थ समजला नाही,आणखी हे नाही समजलं की तुमच्यात किती power आहे.


आज शिक्षणात बरोबर नौकरी मिळत नाही.कधी विद्यार्थ्यांनी विचार केला का की आपण शाळेत, महाविद्यालयात जाऊन काय करतो अभ्यासक्रम वर किती लक्ष देतो? त्या बद्दल किती जिज्ञासा असते आपल्याला?आपण नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो का?त्या नुसार आपल्याला आपल्या quality ची पगार मिळते.

माझी एक request आहे तुम्ही स्वतः ला बनवण्यात वेळ घाला कोण आपल्याला भडकवून देतो मग आपण पेटून विरोध करायची, धिंगाणा करायचं याकडे लक्ष देऊ नका.

आणि मी बोललो याचा विचार करा वाद करू नका.🙏🏻🙏🏻




Source: Internet

 -नवनाथ वाघ
   अहमदनगर

 झालं का सर्वांचं.....? की राहिलंय अजून..? नाही, राहिलं असेल अजूनही काही देशप्रेम (?)  दाखवायचं तर दाखवून घ्या. नाही मग कसं होतं पुन्हा वर्षभराची चिंता मिटून जाते ना. परत एकदा स्वातंत्र्यदिन सोडल्यानंतर पुन्हा पुन्हा संधी येणार नाही इतकं उफाळुन उफाळून देशप्रेम दाखवायला. राहिलेल्या वेळेत मग पुन्हा मग भगवे, निळे, हिरवे असे अजून कितीतरी रंगांचे मिरवायचे असतात ना तुम्हाला..
 वर्षातून दोनदा dp, प्रोफाइल, गाडी अजून कुठे कुठे मला चिकटवल की, वर्षभर झाले ना  मोकळे हेच सर्टिफिकेट दाखवीत, बेगडी देशप्रेमाच्या हाळ्या देत, रस्त्यावर थुंकण्यापासून ते बॉम्ब स्फोट घडवण्यापर्यंत आणखी बरच काही करायला.
 आणि म्हणे देश 2020 होणार. कोणी उतरणार आहे वरून देशाला महासत्ता करायला. हरामी साले... , राष्ट्रवाद, देशप्रेमाच्या नावाखाली काय काय चाललंय... मुजोर राजकारणी आणि हरामी जनता. राजकारणी सात पिढ्यांसाठी कमावण्यात व्यस्त, बिचारी भोळी(?), अन गरीब जनता तरी काय करणार नाही का? हा आता वेगवेगळ्या रंगाच्या झेंड्याखाली एकत्र येऊन हीच गरीब, भोळी जनता बीफच्या संशयावरुन एखाद्याला ठेचून मारू शकते, शांत जमावावर दगडफेक करू शकते, पुतळे तोडू शकते, पार सार्वजनिक बलात्कारापर्यंत आणखी बरंच काही करू शकते. बघा विचार करा.
   तुम्हाला माझ्यासाठी, देशासाठी भयंकर त्याग करायची गरज नाही. याची सुरुवात अगदी तुम्ही सिग्नल पाळण्यापासून करू शकता. समोरच्याकड एक बोट दाखवताना तीन आपल्याकडं असतात हे लक्षात असू द्या..आणि इकडं तिकडं देशप्रेमाची सल्ले झाडत हिंडण्यापेक्षा कुठून तरी सुरवात करा... अगदी छोट्या छोट्या गोष्टी. हे जमलं तर मात्र देशाला महासत्ता होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही ....
          इति. तुमचाच तिरंगा......
     

Source: Internet

-कृष्णकांत मोरेश्वर राईलकर
 मु.डहाणू
 जि. पालघर

आज जानेवारी सत्ताविस
माझा जिव हो कासाविस।

कुठेसा पडलो अडगळीत
तर कुठेतरी कचराकुंडीत।

काल तर किती माझी ऐट
होतो लाल किल्यावर थेट।

प्रत्येकाच्याच कार्यालयात
गावो-गावी, चौकाचौकात।

होतोच शाळांवर फडकत
हाती घेऊन ते हो मिरवित।

मज साठी बलिदाने केली
स्वप्राणांची आहुती दिली।

पण आज दिसतसे दुर्दशा
धर्म,जातीच्या चढती नशा।

स्वार्थासाठी होतातच अंध
ना राही कोणताही धरबंध।

तरी मलाअजूनआहेआशा
कु-प्रथा गुंडाळतील गाशा।

सुविचारे थोपवतिल दंगा
होय.मीच तो आहे तिरंगा।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************