क्रिकेटच्या फ्री हिट मुळे इतर खेळांचे मरण?

🌱वि४🌿या व्हॉटसअप ग्रुपवरून


क्रिकेटच्या फ्री हिट मुळे इतर खेळांचे मरण?

(यातील सर्व फोटो गुगलवरचे आहेत)

समीर सरागे ,यवतमाळ:
खेळ कोणताही असो त्या खेळाला एक विशिष्ट प्रेक्षक वर्ग असतो  ज्याचे अनेक चाहते देखील असतात, अलीकडे क्रिकेट या खेळात चुरशिच्या स्पर्धे बरोबरच रोमांच , ग्लैमर आणि पैसा या सर्वानी भरपूर प्रमाणात प्रवेश केला, आपल्या देशात क्रिकेट हा खेळ केवळ खेळ नसून तो सर्व देशवासिया करिता एक धर्म बनला आहे. आणि हेच धुरा पकडूंन केवळ भारतातच नव्हे तर अख्या आशियात क्रिकेटने आपले एक मनाचे स्थान प्राप्त केलेले आहे. या खेळाला लोकप्रिय आणि  सर्वोत्कृष्ट  बनविन्या करीता  विविध कंपन्यानी स्पॉन्सर केले आहे म्हणून आज क्रिकेट हा खेळ सर्वच फॉरमेट मधे जसे  कसोटी क्रिकेट , एकदिवसीय क्रिकेट आणि अलीकडे 20 20 यात फार यशस्वी झाल्याचे दिसन येत आहे,  पूर्वी दिल्ली ,मुंबई, कोलकाता, बैंगलोर आणि चेन्नई सारख्या महा नगरातूनच खेळाडू येत असायचे परंतु आता छोट्या छोट्या राज्यतुन आणि शाहरातून खेळाडू येत असल्याचे चित्र अलीकडे पहावयास मिळत आहे. आणि याचेच उदाहरण म्हणजे भारतीय क्रिकेट संघाने अलिकडच्या काळात केलेली सर्वोच्च कामगिरी होय ज्यात तिन्ही प्रकारचे विश्वचषक भारतीय संघाने पटकावले आणि याचेच द्योतक म्हणजे क्रिकेटला आजतयागत  मिळत असलेली अफाट लोकप्रियता आपल्या देशात क्रिकेट प्रति इतके वेड किंवा त्या खेळा प्रति निर्माण झालेली ओढ़ कारण येथील युवक सुरूवाती पासून  सुनील गावस्कर ,कपिल देव , मोहिंदर अमरनाथ , मोहम्मद अजरुद्दीन  सचिन तेंडुलकर, अनिल कुंबले,  हरभजन सिंह अलीकडे महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा ,  सुरेश रैना , विराट  कोहली आणि हार्दिक पांड्या  या युवा क्रिकेटरचा  आदर्श समोर ठेऊनच आजची युवा  पीढ़ी  त्यांच्या स्वताच्या म्हणतिने आणि चिकाटिने आजतयागत क्रिकेट विश्वात आपले स्थान पक्के करु पाहत आहे.म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की, क्रिकेटने इतर खेळाला संपविले तर ज्या खेळात प्रतिभा , लोकप्रियता, ग्लैमर आणि अमाप पैसा आहे आज घडीला तर यात तीळ मात्र शंका नाही की इतरही युवा भविष्यात क्रिकेट याच  खेळा कड़े प्रामुख्याने  वळलेले दिसतील.

रविराज साबळे ,मुंबई:
आज काल क्रिकेटचा इतका अतिरेक झाला आहे की दुसऱ्या मैदानी खेळाकडे  खरोखरचं दुर्लक्ष झाले आहे, येणारी नवीन पिढीला मैदानी खेळ शिकवले पाहिजे क्रिकेट शिवाय दुसरे ही खेळ आहेत त्याकडे पालक दुर्लक्ष करीत आपला मुलगा क्रिकेटर झाला पाहिजे असा मानस तयार झाला आहे.

पी. प्रशांत ,अहमदनगर:
....भारत हा sports playing nation नाही हे कटू सत्य आधी आपण स्वीकारलं पाहिजे...
.. ऑलिम्पिक मधले पदक/पदकविजेते ते प्रेम आपल्याकडे फक्त एक फार तर दोन महिने टिकतं .. पदक विजेत्यांवर बक्षिसांचा/पैशांचा वर्षाव करतो आपण (आणि त्यातही जुमला ) .. बक्षिस जाहीर करतात पण कित्येक राज्य सरकार ते देतच नाहीत..त्यासाठीही पाठपुरावा करावा लागतो..

क्रिकेट तसं नशीबवान अमरनाथ, मंकड, पतोडी ते सुनील,साची,विराट असे करिश्माई खेळाडू मिळाले आणि ते खेळाला खूप पुढे घेऊन गेले..आता त्यात लीग स्पर्धाने तर सर्वच खेळाडू मालामाल केलेत..एक काळ होता की आंतरराष्ट्रीय खेळाडू सोडले तर रणजीपटूही पैसाला मोहताज असायचे..आता खालच्या पातळी पर्यंत पैसा दिसतो .. पण खरंच क्रिकेट लोकप्रिय आहे पण वाटत तेव्हड आहे का?? .... रणजी सेमीफायनल/फायनल सारख्या मोठ्या पातळीच्या मॅचेसला तुरळक गर्दी दिसते स्टेडियमला..

...IPL ब्रँड बनवला .. चित्रपटासारखा तीन-साडेतीन तासांचा मनोरंजनाचा धमाका..त्यात सिनेतारका/चियर गर्ल्स सगळंच..
...अर्थात खेळाच्या विकासासाठी तो लोकांना अपील होईल असं वेगळं काही करणं गरजेचं आहे.. प्रो-कबड्डी मुळे कितीतरी गुणवंत खेळाडू दिसले.. त्यांना स्टारडम आणि पैसा मिळतोय ते पाहून बरं वाटत.. कितीतरी जुने उत्कृष्ट खेळाडू ..लोकांना माहित सुद्धा नाहीत तेही अंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेले...
...आपल्याकडे खेळ हा अजूनही शाळेत other activity म्हणूनच मानला जातो.. main activity नाही..
....सैन्य पोटावर चालतं अस म्हणतात तसाच खेळाडूंचही आहे.. त्याला आर्थिक स्वतंत्र असावं.. पोट भरण्याच आव्हान असू नये.. मग पहा कसे खेळाडू तयार होतील...

क्रिकेटला नावं ठेवण्यात अर्थ नाही .. अजून कितीतरी देश आहेत तिथे एकाच वेळी वेगवेगळ्या खेळांचे चाहते आहेत..

....खेळ आणि खेळाडूंप्रती आपला दृष्टिकोन बदलावा लागेल..नाहीतर दहावीत extra marks मिळतात म्हणून कागदोपत्री खेळाडू तयार होतात..

.. *खेळाडू तयार करणं/पोसण हे खूप खर्चिक काम आहे* आणि हे त्याला आणि कुटुंबालाच माहीत असतं.. आहार/व्यायाम/कोच/किट सगळं महाग.. पण आपली मानसिकता अशी आहे की आपण यश मिळाल्यावर नको तेव्हड डोक्यावर घेऊ पण तो कष्ट घेत असताना ढुंकूनही पहात नाही..पण तेव्हाच त्याला जास्त गरज असते..

..अर्थात खेळ म्हणजे फक्त क्रिकेट अस मानणारे पण बरेच आहेत.. पण खरंतर एक कला आणि एक क्रीडा प्रकार हा शालेय जीवनात कंपलसरी असावा हे माझं मत आहे.. क्रीडा शरीर सुदृढ ठेवेल तर कला जीवनाचा आनंद घ्यायला शिकवेल.. sportsmanship शिकवण्यासाठी तरी मुलांना खेळू द्या

....100 मुलांमधून एक खेळाडू तयार होतो आणि अशा हजारो खेळाडूंतून एखादा पदक विजेता..

... कुठलाही खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेणारे खेळाडू हे सारख्याच योग्यतेचे..मग क्रीडा प्रकार कुठलाही असू देत …

सागर राडे,पलूस;सांगली:
इंग्रज भारत सोडून जाताना 2 गोष्टी कायमसाठी देऊन गेले. पहिली गोष्ट म्हणजे चहा. त्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवातच होत नाही. आणि दुसरी गोष्ट क्रिकेट. खेळ म्हटलं की क्रिकेट ही संकल्पना अगदी बालपणापासूनच मनात रुजत जाते. क्रिकेटलाच धर्म आणि क्रिकेटरला देव मानणारा आपल्या देशातला क्रीडाप्रेमी. आमचंही काहीसं असंच झालेलं. आमच्या लहानपणीच सचिन तेंडुलकर नावाचा क्रिकेटर आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकायला सुरुवात झाली होती. सचिनची batting असली की सगळे रस्ते रिकामे व्हायचे आणि सचिन आऊट झाला की tv बंद व्हायचे. अशा वातावरणात आमचं बालपण गेलं त्यामुळे असेल कदाचित पण साहजिकच क्रिकेटविषयीची आवड निर्माण झालेली. पेस-भूपती, विश्वनाथन आनंद यांसारखे खेळाडू आपल्या खेळाने देश-विदेशात तिरंगा फडकवत होते पण तरीही क्रिकेटइतकी प्रसिद्धी त्यांना कधी मिळालीच नाही.

अलीकडच्या काळात तर क्रिकेटला जास्तच ग्लॅमर मिळालं. जे विकतं तेच पिकतं (किंवा पिकवलं जातं) या म्हणीप्रमाणे वेळोवेळी क्रिकेटच्या नियमांमध्ये आवश्यक ते बदल केले गेले. बदलत्या काळाप्रमाणे आणि प्रेक्षकांची मानसिकता ओळखून क्रिकेटची व्याख्याही बदलत राहिली. आता तर त्यात इतका बदल झालाय की क्रिकेट म्हणजे पैसा हे एक नवीन समीकरणच तयार झालं. क्रिकेटमधून मिळणारी प्रसिद्धी आणि पैसा यामुळे साहजिकच बहुतेकजणांचं क्रीडा क्षेत्रात करिअर करायचं असेल तर क्रिकेटलाच प्राधान्य असायचं.
   त्या तुलनेत आपल्याकडे इतर खेळांच्याकडे म्हणावं तसं लक्ष दिलं जात नाही. इतर खेळांमध्येदेखील कितीतरी असे खेळाडू आहेत जे सातत्याने आपल्या कामगिरीने स्वतःचं आणि पर्यायाने देशाचं नाव जागतिक स्तरावर उंचावत असतात. पण तरीही त्यांना म्हणावं तितकी प्रसिद्धी मिळत नाही. कुठलाही खेळ लोकप्रिय करायचा असेल तर त्याला राजाश्रयासोबतच लोकाश्रय असणं देखील तितकंच महत्वाचं असतं. पण इथेच आपण कमी पडतो. अपवाद वगळता आपल्याकडे इतर खेळांना ना राजाश्रय आहे ना लोकाश्रय. अन्य खेळांमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी कशी आहे हे फक्त ऑलिम्पिकच्या 15 दिवसांतच पाहिलं जातं. 4 वर्षे जो खेळाडू कुठला खेळ खेळतोय हेही बऱ्याच जणांना माहीत नसतं पण तेदेखील ऑलिम्पिकच्या 15 दिवसात पदकाची अपेक्षा करत असतात. इतर वेळी ना सरकारचं लक्ष असतं, ना क्रीडाप्रेमींच, ना मीडियाचं. म्हणूनच तर ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधू कडून सुवर्णपदकाची अपेक्षा करत फायनल बघायला tv समोर बसलेल्यांना ऑलिम्पिकनंतर तिने किती स्पर्धा जिंकल्या हेच माहीत नसतं.
     
हे खरं आहे की काही वर्षांपूर्वीपर्यंत क्रिकेटच्या फ्री हिटमुळे इतर खेळांचं मरण ओढवल्यासारखीच अवस्था होती पण आता परिस्थिती थोड्याफार प्रमाणात का असेना बदलते आहे. विविध खेळांमध्ये आपले भारतीय खेळाडू चमक दाखवत आहेत आणि थोड्याफार प्रमाणात का असेना त्याला प्रतिसाद ही मिळत आहे. क्रिकेटचा अतिरेक झाल्यामुळे असेल किंवा क्रिकेटमधल्या वाढत्या स्पर्धेमुळे असेल, क्रीडाप्रेमी प्रेक्षक आणि खेळाडू इतर खेळांच्याकडे वळतोय ही समाधानाची आणि तितकीच खेळाडूंचा उत्साह वाढवणारी गोष्ट आहे. प्रसिद्धी आणि पैसा मिळत असेल तर इतर खेळाकडेसुद्धा खेळाडू आणि प्रेक्षक वळू शकतात हे प्रो-कबड्डी लीग सारख्या स्पर्धांमुळे दिसून येत आहे.

.क्रिकेटच्या लोकप्रियतेमुळे झाकोळले गेलेले इतर खेळ त्या सावलीतून बाहेर येऊन पुन्हा एकदा एक वेगळी ओळख निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत. फक्त गरज आहे तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य क्रीडारसिकाच्या भक्कम पाठिंब्याची..

अभिजीत गोडसे,सातारा:
कदाचित पुर्वी पासूनच असेल .क्रिकेट या खेळाला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे . या खेळामधे मान , सम्मान , प्रसिद्धी  , पैसा एकुणच ग्लँमर आहे . आणि म्हणूनच की काय आपल्याकडे ऐखादा सामना जिंकला की फटाक्याची आताशबाजी केली जाते . आणि कदाचित सामना हरला की घरातील टिव्ही फोडण्या पासुन ते खेळाडुच्या घरावर दगड फेक करण्यापंर्यत क्रिकेटवेड्या प्रक्षकांची मजल जाते. त्यात आणि पाकिस्तान हा देश खेळायला असेल तर दिवसभरातील महत्त्वाची कामे बाजुला सारुन  प्रेक्षक वर्ग सामन्याकडे डोळे लावून बसलेला असतो.
          
        आता आशा परिस्थिती पुढे दुसऱ्या कोणत्या खेळाकडे लक्ष कसे जाईल बरे ? आणि म्हणूनच याच खेळावरुन आपल्याकडे राजकारणी व्यक्तीनी शिरकावा केला . वेगवेगळ्या क्रिकेटच्या संघटनाची अध्यक्ष पदे भुषवण्याची चढाओढ लागली. त्यातच  अलिकडे आयपीयल आले. आणि उद्योगपती , राजकीय व्यक्ती , अभिनेते अशा सर्वच स्थरातील मंडळी क्रिकेटकडे ओढली गेली . खेळाडू विकत घेण्याची स्पर्धा लागली . पैशाचा सुरसुळाट झाला . ऐका रात्रीत खेळाडू  मालामाल झाले . प्रसिद्धीच्या हव्यासा पोटी आणि पैशाच्या लालसे पोटी खेळाडू अक्षरशः विकले गेले . अचानक क्रिकेटवेड्या प्रक्षकांना खेळाडू देव वाटायला लागले. पद्म पुरस्कार आपल्याकडे दिले जातात ठराविक विषयात अतुंच्छ कामगिरी करणाऱ्याला दिले जातात. जणतेच्या रेट्यापुढे सरकारला  केवळ ठराविक खेळाडूच्या भक्तानं साठी त्या खेळाडूला भारतातील सर्वोच्च संम्मान भारतरत्न  दिला गेला.  

    हे  सर्व सांगायचे येवढ्यासाठीच की क्रिकेट या खेळासाठी आपल्याकडे देव सुद्धा पाण्यात घालतात. जर असे असेल तर बाकीच्या खेळांना न्याय कसा मिळेल हा प्रश्न आहे ?  या क्रिकेटचा आपल्याकडे प्रचार आणि प्रसार येवढा झाला आहे की बाकीच्या खेळांना वर येण्यासाठी जागाच शिल्लक नाही राहीली.माध्यमिक शाळेत , महाविद्यालयांन मधे खेळाला आठवड्यातून ऐक तास शिल्लक असतो. त्यावेळेस ईतर खेळ म्हणजेच मैदानी ( लांब ऊडी , उंच ऊडी , भालाफेक , खोखो , फुटबाँल , हँण्डबाँल , बँडमिटंन ई.)  खेळ शिकवले जातात पन याच पुढ काय होत ? हे खेळ फक्त आणि फक्त मार्क मिळवण्यासाठी असतात. पुढे या मधे फारस काही केल जात नाही . विद्यार्थी जस जस पुढील वर्गात जाईल तसतस खेळाकडे लक्ष देत नाहीत . आणि  ऐकादा विद्यार्थी  असेलच ऐकाद्या खेळामधे चांगले प्राविण्य मिळवनारा तर अशा विद्यार्थीस  चांगले प्रशिक्षक ही मिळत नाहीत . तो ऐका ठराविक उंची पर्यतच जातो . मुळात आपल्या सर्वाचीच जबाबदारी आहे ईतर खेळाना पुढे आणण्याची . चीन सारखा देश खेळामधे येवढे प्रावीण्य मिळवतो कारण का ? तर तेथे लहानपना पासुनच खेळांचा मुलांनव विकास केला जातो तसेच प्रशिक्षक ही महीनत घेत असतात . चांगल्या प्रकारचे खेळची साहीत्य मैदाने ई. प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात . खेळासाठी प्रचंड पैसा खर्च केला जातो आणि म्हणूनच हा देश आज आँलम्पीक मधे सुवर्ण पदके कमवत आहे . आपल्याकडे या अशा सर्व प्रकारच्या सुविधा निर्माण केल्या तर नक्कीच ईतर खेळामधे पुढे जाऊ शकतो .

      क्रिकेटच्या दुनयेतुन बाहेर पडुन ईतर खेळाकंडे आपन पाहिले पाहीजे . लहान मुलांच्या पालकांनी  आपला पाल्य नांमाकीत क्रिकेटर बनवन्यापेक्षा त्याला किंवा तिला साईना नेहवाल, सानिया मिर्झा , पिटी उषा , ललिता बाबर , कविता राऊत , साक्षी , फोगट , मेरी कोम , खाशाबा जाधव , मिल्का सिंग ई. बनवण्याचा नक्की प्रयत्न करा. या किंवा अशा भरपूर  खेळाडूनी  खुप काही आपल्या देशाला दिले आहे .ऐकूनच ईतर खेळांना मरण येणार नाही .

राहुल आनपट , मंगळवेढा .
क्रिकेट मुळे काही खेळ लोप पावत चालल्याची भीती क्रीडाप्रेमी कडून होते आहे .आम्ही ज्या महाराष्ट्र मध्ये राहतो त्या महाराष्ट्र मध्ये अनेक खेळ मातीशी निगडित आहेत .आट्यापाट्या,मैदानी खेळ खो खो, यांनां आंतरराष्ट्रीय दर्जा मिळायलाच हवा अस मला वाटत.या क्रिकेट च्या नादात आमची पोर राष्ट्रीय खेल सांगा म्हटलं की आता *क्रिकेट* सांगू लागलीत.एवढं प्रोत्साहन राष्ट्रीय खेळाला पण द्यायला हवं.खेळ खेळ असतो मग प्रत्येक खेळाला समान दर्जा असायला हवा .इथं आमचे राजकीय नेते सुद्धा राजकारणात क्रिकेटचीच भाषा वापरतात.

खेळ जोडतो जाती पाती
नका करू खेळांचाही अपमान
खेळ जपतो *सर्वधर्म समभाव*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************