देशोदेशींच्या भेटी...परराष्ट्र धोरण सद्यस्थिती !



   🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

    देशोदेशींच्या भेटी...परराष्ट्र धोरण साध्यस्थीती !
    

Source: Internet

दत्तात्रय डोईफोडे, 
    वाशिम


परराष्ट्र धोरण म्हणजे प्रत्येक देशाचा जिव्हाळ्याचा आणि महत्वाचं विषय, साहजिकच आपल्या देशाचाही बाबतीत तसाच तो महत्वाचा आहे.

माझ्या मते परराष्ट्र धोरण सद्यस्थिती बाबतीत बोलायचं तर भारताच्या बाबतीत सद्या तरी एक कलमी कार्यक्रम चालू आहे तो म्हणजे भारताच्या माननीय पंतप्रधानांचे विदेश दौरे याबाबत शंका नसावी.

परराष्ट्र धोरणाची आखणी करताना परराष्ट्र मंत्री यांना कितीदा विचारणा करण्यात आली असणार याबाबतची शंकाच आहे?

होय सरकारचा प्रयत्न सुरू आहे काही बाबतीत बोलायचं तर देशाची प्रतिमा निसंकोच सुधारत आहे, पण काही बाबतीत परिस्थिती ढासळत चालली आहे.

भारताला 2020 पर्यंत महासत्ता बनवताना लागणारी इच्छाशक्ती या सरकार कडे आहे असं अजून तरी जाणवत नाही याचा कारण या सरकारकडे परदेश नीती/धोरण स्पष्ट नाही, ज्या धोरणाला बांधील राहून पुढे काम होइल असही नाही.

मुळात जगात सगळीकडे असुरक्षततेच वातावरण पसरत असताना भारताला संधी चालून आलेली आहे जर का अताच या संधीच सोनं केलं तर 21व  शतक नक्कीच भारतच असणार यात शंकाच नाही, कारण तिकडे अमेरिकेचा ट्रम्प महाशय यांचा बालिशपणा जगाला माहीत आहे, चीनवर विश्वास ठेवणे म्हणजे....झालं, युरोपीय महासंघ अंतर्गत बाबितून या वर्षी सुटणे नव्हे.

... म्हणून भारतानं पुढाकार घेत फक्त भारतीय उखंडात नव्हे तर संपूर्ण जगात स्वतः ची कीर्ती मिर्वण्याची हीच योग्य वेळ आहे!

शेवटी तुझ आहे तुजपाशी...



Source: Internet

-रामेश्वर रोकडे, 
  उस्मानाबाद  

आज जग जागतिकी करणाच्या धोरणामुळे जवळ जवळ येत चालले आहे.प्रत्येक देश द्विपक्षीय करार, व्यापारी तत्व, शैक्षणिक करार, तांत्रिक करार, ऊर्जा,नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन यासारख्या अनेक विषयावर विचारविनीमय होऊन सहकार्य व विकास यासाठी व्यासपीठे स्थापन होत आहेत. तसेच जिवंत प्रश्न म्हणजे शाश्वत  विकासासाठी पर्यावरण संरक्षण. विकासाच्या नावाखाली पर्यावरण ही एक समस्या या सर्व बाबी परराष्ट्रीय संबधाच्या नावाखाली येताना दिसातात.त्यातच आपल्या देशाचे पंतप्रधान विविध देशाच्या दौऱ्यावर जाऊन भेटी घेऊन विश्वास संपादन करत आहेत.परंतु फक्तघोषणा करून विकास व धोरणं यशस्वी होणार नाहीत तर त्यासाठी सुरक्षित , कुशल मनुष्यबळ,भांडवल,संसाधन,
बाजारपेठ, ऊर्जा , वाहतूक व्यवस्था आवश्यक आहे.हे सर्व होताना परराष्ट्रीय संबंध साधताना त्याचा राजकीय व आर्थिक परिणाम याचाही विचार महत्त्वाचा आहे.सध्याचे परराष्ट्रीय धोरण विकासाऐवजी चढाओढ निर्माण करताना दिसत आहे.

  

Source: Internet

- जयंत जाधव,
   लातूर


"परराष्ट् धोरण म्हणजे काय ?"

देशाच्या सामाजिक-आíथक प्रगतीसाठी इतर देशांशी मत्रीपूर्ण संबंध राखणे महत्त्वाचे आहे. हे संबंध विशिष्ट तत्त्वांवर आणि धोरणांवर आधारित असतात. अशा तत्त्वांना व धोरणांना परराष्ट्र धोरण म्हणतात व त्यासाठीच राष्ट्र प्रमुख यांच्या परदेशी भेटींची आवश्यकता असते.
** भारतीय परराष्ट्र धोरणाची तत्त्वे-
1.अलिप्ततावाद
2.वसाहतवादास विरोध
आणि साम्राज्यवादाला विरोध
3. वर्णद्वेष विरोध
4.जागतिक शांतता, प्रादेशिक सहकार्य, नि:शस्त्रीकरणाला पाठिंबा
मागील तीन वर्षाच्या परराष्ट् धोरणाचा आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल की भारताचे परराष्ट् धोरण सध्या संक्रमणकालीन अवस्थेत आहे.एकीकडे नवीन मिञ राष्ट्रे जोडली जात आहे तर जुनी हळूवार संबंध जपत आहे भारताचे शेजारच्या राष्ट्रांशी संबंध तणावाचे राहिले आहे.जे काळजी करण्या सारखे आहे.आपल्या शेजारी अर्थव्यवस्थांमध्ये एवढी गुंतवणूक करण्यासाठी भारताची आर्थिक क्षमता नाही.

1.भारत-चीन-पाकिस्तान संबंध-

चीन भारतापेक्षा जवळजवळ सर्व शेजारच्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे, त्या तुलनेत भारत आपले शेजारी देशांना आकर्षित करू शकत नाही, त्यामुळे चीन भारतविरुध्द नेहमी 'भौगोलिक-आर्थिक' तसेच 'भू-स्ट्रॅटेजिक' फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्याचप्रमाणे चीनबरोबर भारताच्या संबंधांनी गेल्या तीन वर्षांत फारशी सुधारणा दाखविलेली नाही. चीनच्या रेशीम रोड डिप्लोमसीने भारताच्या शेजारी देशांना यशस्वीरित्या आकर्षित केले आहे, त्यापैकी बहुतेक चीनच्या "वन बेल्ट वन रोड" प्रकल्पात सहभागी आहेत. भारताने या प्रकल्पात सहभागी होण्याचा निर्णय घेतला नाही कारण चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरीडॉर या प्रकल्पाचा एक भाग आहे, जे पीओके (पाकिस्तान व्यापारातील काश्मीर) च्या माध्यमातून जाते, ज्याचा भारत स्वतःचा प्रदेश म्हणून दावा करतो. सीपीईसी निश्चितपणे भारताच्या धोरणकर्त्यांसाठी एक डोकेदुखी आहे कारण यामुळे पाकिस्तान आणि चीन दोन्ही काश्मिरच्या संवेदनशील क्षेत्रासाठी एक रणनीतिक फायदे घेत आहे.

2.भारत-अमेरिका संबंध -

मोदी सरकारच्या काळात अमेरिकेच्या संबंधात  मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे, पंतप्रधान मोदींनी केलेल्या प्रयत्नातून हे स्पष्ट झाले आहे की पंतप्रधान  झाल्यापासून  त्यांनी अमेरिकेला 4 भेटी दिल्या आहेत. भविष्यासाठी एक नवीन योजना तयार केली, शेवटी भारत-अमेरिका संबंधांनी 'ईतिहासावर मात केली. भारताच्या प्रख्यात धोरणात्मक विश्लेषक हर्ष व्ही पंत यांनी भारत-अमेरिका संबंधांचे विश्लेषण केले आहे की "नागरी परमाणु ऊर्जा सहकार्याचे चिंतनशील मुद्दे सोडवण्यापासून आणि संरक्षण सहकार्य लक्ष्याधारित करण्याकरिता, आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरील एका समान समजण्यामध्ये, भारत-अमेरिकी संबंधांकडे 'असाधारण चांगले स्थान' असे दिसते.

3.भारत-रशिया संबंध -

भारतचा  असलेला मिञ राष्ट्र  रशिया भारतापासून दूर जात आहे व पाकिस्तानकडे झुकलेला आहे असे दिसते. या मुद्यावर लिहिताना भारताचे राजकीय  तज्ज्ञ सी राजा मोहन म्हणतात की, "रशियाने अलीकडे  पाकिस्तानी लष्कर सोबत सराव केला  म्हणून दिल्लीला अशी अपेक्षा आहे की, रशिया हा भारताचा सर्वोत्तम मित्र यापुढे  राहणार नाही. भारतातील धोरणात्मक गोळा-बेरजामध्ये रशियाची स्थितीचा पुनर्विचार करणे, दिल्लीतील अनेक लोकांना आवडेल ".
देशाच्या सामाजिक-आíथक प्रगतीसाठी इतर देशांशी मत्रीपूर्ण संबंध राखणे महत्त्वाचे आहे. हे संबंध विशिष्ट तत्त्वांवर आणि धोरणांवर आधारित असतात. अशा तत्त्वांना व धोरणांना परराष्ट्र धोरण म्हणता येईल.

सारांश,
मे 2014 पासून एकूणच , मोदींनी  विदेशी प्रवास केले आहेत, जे  इतिहासातील कोणत्याही भारतीय पंतप्रधानांद्वारे केलेल्या परदेशी भेटींची ही संख्या सर्वात जास्त आहे. परराष्ट्र धोरण विश्लेषक आणि प्रसारमाध्यमांना असे एक , ज्यांना असे वाटते की आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत उदयोन्मुख पद म्हणून आपली 'उपस्थिती दाखवण्यासाठी भारताला ही परदेशी भेटींची आवश्यकता आहे.
नोट:-सदर लेखात मांडलेले मत मी स्वतः अभ्यास करुन लिहले आहे.माहिती स्ञोत-बातम्या,वृत्तपञे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************