🌱वि४🌿 व्हॉट्सअप ग्रुप
तरूणांना नेमका राग येतो तरी कशाचा?
वाल्मीक फड ,नाशिक.
सध्या अनेक तरूण आपला रस्ता भरकटताना दिसताय. कोण जाणे त्यांना एखादा वाईट मार्गाकडे घेऊन जणारा माणूस आपला मित्र वाटतो आणी जे आईवडील त्यांना सन्मार्ग दाखविण्याचे काम करतात ते मात्र शत्रु!काय म्हणावं या अशा तरूणांना?आणी अशाच प्रकारच्या गोष्टींना जसे वाईट वर्तन करणे,एखादी चांगली गोष्ट किंवा एखादा चांगला सल्ला दिला,समजा एखादे गरीब कुटूंब आपल्या मुलाच्या काही बिनकामाच्या गरजा जसे की,मोबाईल घेणे रिकामे मोटरसायकल घेऊन फिरणे अशा अनेक गोष्टींना नकार दिला की,आजच्या तरूणाला लगेच राग येतो.माझ्या मते जे तरूण आपली ऐैपत नसताना असे काही ऊद्योग करत बसतात की,ते त्यातून आयुष्यभर सावरत नाही.आणि यावर जर कोणी काही चांगलं सांगायला गेलं की त्यांना लगेच राग येतो.काही वेळेस एखादा शिक्षणक्षेत्रात पारंगत असणारा पालक तरूणाला जर म्हणाला की, तु ह्या क्षेत्रात करीयर कर कींवा तुला हे केले तर तुला चांगले राहील की लगेच त्याला राग येतो.ह्यांचा राग हा काही वेळेस इतका भयंकर असतो की, ते स्वताला संपवायला मागे पुढे पहात नाही काय करणार अशा ह्या राग येण्याला?
हरीश पोटे,पुणे.
मी आजचा तरूण राग येतोय मला, खुप राग येतोय...
राग येतोय मला या गढूळ झालेल्या मानसिकतेचा आणि ढवळून निघालेल्या वातावरणाचा...
राग येतोय मला माझ्या बहीनींवर झालेल्या, होत असलेल्या बलात्काराचा आणि त्यांचा आवाज दाबून मारणाऱ्या गिधाडांचा...
राग येतोय मला माझचं घर जातीच्या नावावर फोडणाऱ्यांचा आणि धर्माच्या नावावर जाळनाऱ्यांचा...
राग येतोय मला घुबडासारख्या डोळ्यांनी गर्दी करणाऱ्यांचा आणि किळसवाणी होत चाललेल्या माणुसकीचा...
राग येतोय मला पुरूषसत्तकपणा मिरवणऱ्या माजूर्ड्यां जमातीचा आणि जगदंबेलाही गाभाऱ्यात डांबणाऱ्यांचा...
राग येतोय मला पांडूरंगाच्या नावावर समाज नासवणाऱ्या दलालांचा आणि विवेक गहान ठेवून लाळ चाटणाऱ्या भक्ताचा...
राग येतोय मला जिवंत सरण बघणाऱ्या डोळ्यांचा आणि काळीज जळत असलं तरी पुढं न सरसावणाऱ्या हाताचा...
सिताराम पवार,पंढरपूर.
आज आपण सहज बोलताना म्हणतो की ,आजची पिढी खूपच चंचल निघाली आहे .खूप हुशार पण आहेत. सगळ्या गोष्टींचा पुरेपुर माहिती साठा त्यांच्याकडे आहे .पण बारीक लक्ष दिले तर अस दिसून येत आजच्या तरुण पिढीला राग खूप येतोय. समोरच्या व्यक्तीचे मत शांतपणे ऐकून घेण्याची मानसिकताच राहिली नाही. सहनशीलते बद्दल जर आपण जास्त बोललो तर लगेच सांगणाऱ्या ला वेड्यात काढतोय आजचा तरुण।
"सोडी रे "मी"पण तोचि सुखी।सुखी ज्याने व्हावे जग निववावे अज्ञानी लावावे सन्मार्गाशी" यानुसार आजच्या पिढीला"मी" पणा चा खूपच अभिमान वाटतो आहे .आणि हेंचमुख्य कारण आहे वाढत्या रागाचा.
वाढती बेरोजगारी,चुकिची सरकारी धोरणे ,वाढता भेदभाव याबद्दल राग नक्कीच यावा पण ""राग अन भिक माग" एवढा राग काय कामाचा!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
शीतल शिंदे.दहिवडी,सातारा.
आजच्या तरुणांना लहान सहाण गोष्टींचा राग येतोय .कर्तुत्व मात्र शून्य आणी रुबाब मात्र मोठा .
तेव्हा राग येण्यापूर्वी प्रत्येकाने हा विचार करणे गरजेचे आहे की आपण त्या पातळीचे आहोत काय ? नाहीतर राग येण्याचा आपला हक्कच नाही .आपण आधी ज्या गोष्टीचा राग येतोय त्या गोष्टीच्या लायक बनने गरजेचे आहे मगच राग येवू देणे .
पालकांनी नकार दिला आला राग
मुलीने नकार दिला आला राग !
परीक्षा फेल झाला आला राग !
नोकर लागेना आला राग !
शेजारी पुढे निघाला आला राग !
शेती पिकेना आला राग !
अरे कर्तुत्ववान बना !
जबाबदाऱ्या घायला शिका नाही येणार राग !
आपल्यापेक्षा कमी -असलेले - आर्थिकदृष्ट्या , शारीरिक द्रुष्ट्या, मानसिकदृष्ट्या मागासलेले पहा ! पहा त्यांची परिस्थिती आणी मग येवूदया राग !
विचारांची कमतरता असेल, सण्कोचीत व्रुत्ती असेल रागच येणार की .
जेव्हा राग येतो तेव्हा स्वतःतील त्रुटी पहा !
मग नाही राग येणार !
⏯⏯⏯⏯⏯⏯⏯⏯⏯⏯⏯⏯⏯⏯⏯⏯⏯⏯
क्लिक करा..वि४ दिवाळी अंक २०१८
⏭⏭⏭⏭⏭⏭⏭⏭⏭⏭⏭⏭⏭⏭⏭⏭⏭
राग यायचाच असेल तर येवूद्या भ्रस्ठाचाराचा , बेइमाणीचा , जातीयवादयाचा , आतंकवादाचा, लूटमारीचा , चुकीच्या न्याय पद्धतीचा , देशातील राजकारणाचा , शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा , दुष्काळाचा आणी करा काहीतरी त्यासाठीच .
लागू दया तुमचा राग सत्कारर्मी .
घर सोडून जावून , आत्महत्या करून प्रश्न सुटत नाहीत उलट वाढतात .
भुषण निलगिरवार पहापळ,यवतमाळ.
माझा पहिलाच लेख विषय पण तसाच मिळाला मी पण तारूण्य वयात आणि मला राग येणे साहजिकच आहे, लहान पणा पासुन ऐकत आलो आहे कि राग येणे हा माणसाचा स्वाभाविक गुणधर्म आहे पण नेमका राग कशाचा यावा हे आजचा तरूण विसरत चालला आहे शिवाजी महाराजांना राग येत असे जुलमी राजवटीमुले लोकांना होत असलेल्या त्रासाचा जोतिबा फुले राग येत असे देशात अशिक्षीत असलेल्या समाजाला शिक्षित करण्यसाठी आणि आज तरूणांना राग येतो येतो बांबानी मोबाईल घेऊन दिला नाही बाबांनी गाडी दिली नाही यासाठी या धकाधकि जीवनात कित्येक आईवडीलांना आज आपल्या मुलांना वेळ द्यायला पण मिळत नाही अशातच लहानपणीच शैक्षणिक जीवनाला सुरवात इतक्या इवल्याशा मेंदुवर धावत्या रेस मध्ये शामिल केल जात आणि आजकाल आईवडिल पण पैशांच्या भरवश्यावर आपल्या मुलाबाळांची मने जिंकण्याची प्रयत्न करतात । आज हट्ट पुरवतात मग एखादा हट्ट पुरवण्यात असफल ठरले मुलाच्या रोषाला सामोरे जावे लागते , इथे निर्माण झालेल्या रोषामुले कधिकधि मुलांना मार पण मिळतो पण नेमकी ही चिडचिड ( राग) कुठून तयार झाला असेल ?? ते जिद्द नाही मला हे पाहीजेलच
हि जिद्द शिवाजी महाराजांच्या काळात पण होती पण ते जिद्द अनायाविरूद्ध लढायची आणि आता ति जिद्द झाली आहे तु किती पँक मारू शकते *व्यसनासाठी* *स्वार्थासाठी* कारण माणसाला र्सव काही चटकन हवय रिमोटवर चँनल बदलवल्या सारखे ।
माझ्या या लेखातून हेच सांगायचे कि राग येणे स्वाभाविक आहे पण राग कशाचा येतोय हे महत्वाचे आहे. राग यायला हवा अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी , राग यायला स्वताची पिळवणूक थांबवण्यासाठी राग यायला हवा देशाच्या विकासासाठी बाध्य येत असलेल्या प्रत्तेक गोष्टीसाठी लढण्यासाठी. व्यसनाच्या आहारी जाऊन मस्तकात आणि वाणीवर जो राग ताताथैया करेल त्याला देशाच्या उन्नतीमध्ये कवडीची पण किंमत असणार नाही .

(यातील सर्व संबंधित छायाचित्रे इंटरनेटवरून घेतलेली आहेत.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा