सरकारी रूग्णालय(ग्रामीण)
सिताराम पवार,
सिताराम पवार,
पंढरपूर.
सरकारी रुग्णालयात सुरवातच होते"अहो या चैकाशी कक्षातील सर कुठे गेलेत, कोणी आह का नाही इथं"अशी चैकाशी करून होत.पुढं केस पेपर काढण्याची रांग अधिकारी आतूनच ओरडतात सुट्टे दहा रु ध्या. शुक्रवारी आणि मंगळवारी डोळ्याची तपासणी असते सगळी म्हातारी आजी आजोबा रांगेत असतात कधी पूर्वसूचना न देता डॉक्टर येत नाहीत मग आजीची प्रतिक्रिया"सकाळी पाचला उठून साडेसहाच्या बसने आले(ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय तालुका)आले गेल्या मंगळवारी पण असंच पोटची पोरीचं संग इनात तर या डॉक्टर ला काय म्हणावं".तोपर्यंत एक काका पुटपुटत आले"औषध नाहीत तर दवाखाना कशाला काढायचा"दोन दिलीत बाकीची बाहेरून घ्या मन. जास्त काय बोलावं तर लगीच शब्द तयारच"सगळं फुकट नसतं मिळतं मामा".जस काय यांच्या घरचेच द्यायचं.ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची रिक्त पदे खूप दिसून येतात. किरकोळ आजारावरील औषधे वगळता इतर सुविधांचा अभाव आहे.
ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील बहुतांश डॉक्टरांचे खाजगी रुग्णालयाशी संबंद दिसून येतात. सरावासाठी आलेल्या विध्यार्थी डॉक्टरवर जबाबदारी टाकून अथवा नवीन कंत्राटी डॉक्टर आपल्या जागेवर लावून काही डॉक्टर स्वतःच्या, नातेवाईक यांच्या रुग्णालयात जातात. काही महागड्या इंजेक्शन चा काळाबाजार सर्रास केला जातो. तसाच रुग्णालयात भौतिक सुविधा, स्टाफ चा अभाव, औषध चा अभाव दिसून येतो.
एक मात्र डिलिव्हरी च्या वेळी फोन केला की लगेच शासनाची गाडी येते.आणि खेड्यातील लोक आरोग्याची काळजी घेत आहेत. म्हणून एका ग्रामिन रुग्णालयातील नर्स ना विचारलं त्या म्हणाल्या"काय थोडं झालं की पळत लोक येतात दवाखान्यात"
हे झालं जेथे दवाखाना आहे तेथील पण ज्या दुर्गम भागात आणखी दवाखाने नाहीत, पुरेशा सुविधा नाहीत त्यांचं काय.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे,
वाशिम.
रुग्णालय म्हणल की माझं जरा डोकच हालत कारण आहे त्यामागे मला सर्वात प्रिय होते ते माझे वडील आणि तेही काम करत होते रुग्णालयात (सरकारी रुग्णालयात) जरा वेगळा अनुभव आहे माझा...
लहान असताना वडील रुग्णालयात कामाला असल्याने आमची फार मोठी पंचाईत व्हायची जेव्हा पोलिओ लसीकरण मोहीम सुरू व्हायची आम्हाला ऐकडे लपू की तिकडे लपू असं व्हयाच शेवटी "दो बूँद जिंदगी के" वडील स्वतः च्य्या हातांनी द्याचे आणि आमचं लसीकरण पूर्ण व्हयाचा. तुम्हाला खरं सांगतो लसीकरण च्या कामाला आठवडाभर वडील रात्र दिवस राबताना पाहिलं.
जसं जसं वय वाढत गेलं रुग्णालय काय असत कळत गेलं तिथं काय चालत तेही समजत होत सरकारी रुग्णालय नेमक काय समजायला लागलं जिथं आज नुसता सर्दी खोकला साठी पण सहज होणार ५०० - १००० च खाजगी दवाखान्यातलं बिल आणि एकीकडे 5 रू ची चिठ्ठी फाडून उपचार देणारं सरकारी रुग्णालय तफावत आहे.
मला मान्य आहे सरकारी रुग्णालयात जेवढ्या सोयी सुविधा हव्यात त्या पूर्ण नाही होत. आजची परिस्थिती पण बदलली आहे पण परिस्थिती बरोबर रुग्णालये बदलली नाहीत याचं भानही आहे मला.
माझं डोकं फिरत तेव्हा जेव्हा मला कळलं मी बाहेर शिकायला होतो आणि रात्री झोपेत वडिलांना हायपर टेन्शन आलं आणि मदती साठी अंबुलान्स वेळेवर नाही पोहचली त्यांना रुग्णालयात वेळेवर न नेल्याने पुढे काय झालं ते समजू शकता... शेवटी २५ वर्ष ज्या अंबुलान्स वर नोकरी केली ती अंबुलान्सच वेळेवर ना आल्याने व्हात्याच नवत झालं.
बऱ्याच चांगल्या बाबीही आहेत पण वाईट गोष्टीचा अनुभव जास्त हेही तितकेच खरं.

सैनपाल पाटील,
आजरा, जि-कोल्हापूर.
ग्रामीण रुग्णालय हे खेडोपाड्यांसाठी हक्काचे आरोग्यधाम आहे. सरकारतर्फे जनसामान्यासाठी चालवले जाणारे ही सामाजिक आरोग्य सेवा आहे. दारिद्र रेषेखालील जनतेस तर येथे मोफत उपचार उपलब्ध आहे. आज कल खेडोपाडी प्राथमिक आरोग्य केंद्रे आहे. तिथे प्रशिक्षित नर्सेस व आशा मदतनीस आहे. ही आरोग्य केंद्रे हर एक तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयाला जोडलेली असतात. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात येणारा रुग्ण हा त्याच्या अखत्यारित येणाऱ्या खेड्यापाड्यातून आलेला असतो. अशा रीतीने प्रत्येक गाव हे ग्रामीण रुग्णालयाची जोडलेले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार ग्रामीण रुग्णालयात साधारणतः 25 ते 30 खाटा, 4 तज्ञ डॉक्टर्स नर्सेस व इतर कर्मचारी असतात. डॉक्टरांच्या मध्ये एक बालरोग तज्ञ, एक स्त्रीरोग तज्ञ, एक शल्यविशारद (सर्जन) आणि एक भूलतज्ञ असतो. या ग्रामीण रुग्णालयाला येणाऱ्या रुग्णांच्या मदतीसाठी 'रुग्णकल्याण समिती' कार्यरत असते. ही समिती उपलब्ध सेवांच्या प्रती वर लक्ष ठेवतेे. तसेच रुग्णाला रुग्णालयात औषधे उपलब्ध नसलेल्या परिस्थितीत लागणाऱ्या बाह्य औषधांचा रुग्णावर वारंवार भार येणार नाही याची दक्षता घेते.
आरोग्य विभागाने एवढी सर्व व्यवस्था लावली असली तरी जमिनी हकीकत काही वेगळी आहे. खिशात चार पैसे असणारा कोणीही रुग्ण सरकारी रुग्णालयात जात नाही. मग केवळ मजबुरी म्हणून आर्थिक हलाखीत नडलेले रुग्ण येथे जातात. त्यांनाही योग्य व वेळेवर याची आपण खात्री देऊ शकत नाही. ग्रामीण रुग्णालयात जाणे हे आजकल आपल्याला कमीपणा वाटतो आहे. काहीना त्यामध्ये त्यांची प्रतिष्ठेला धक्का लागेल असे वाटते.
आता ग्रामीण रुग्णालयात बद्दल असे कटू मत होण्याबद्दल काय काय बरे कारणे असावित, याचा अंदाज ग्रामीण रुग्णालयाची संबंधित तक्रारी पाहिल्या तर येऊ शकतो. ग्रामीण रुग्णालयात जायचे तर वेळ पाहून आजारी पडावे लागते. काहींच्या मते औषधांची उपलब्धता वेळेवर नसते. त्यांच्या वैधता पडताळणी यांची व्यवस्था ठीक नसते. रुग्णालयातील डॉक्टर्स आपले खाजगी हॉस्पिटल उडून रुग्णांना आपल्या खाजगी दवाखान्यात बोलवून आर्थिक अधिकार टाकतात. मिती कार्यशील नसतात. रुग्णाच्या आजाराचे वेळेत निदान करणे व त्यांच्या तक्रारी बद्दल गांभीर्य नसणे. औषध उपचारात दिरंगाई करणे पुन्हा पुन्हा हेलपाटे मारायला लावणे. आणि अत्यावश्यक संवेदनशील आजारात अंबुलन्स सारख्या सेवा उपलब्ध करून न देणे. बऱ्याच ग्रामीण रुग्णालयाचे ठिकाण आहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणापासून दूर असते रात्री-अपरात्री वाहनांची येण्या जाण्याची सोय नसते जवळपास खानपानाची सोय नसते. त्यामुळे रुग्णाचे नातलग आणि प्रसंगी रुग्णाचे ही खाना पाण्याचे हाल होतात. बाह्य औषधांसाठी जवळपास मेडिकल नसते. बऱ्याचदा डॉक्टर नसतात, त्यामुळे उपचारात दिरंगाई होऊन रुग्णाचा जीवावर बेतल्याच्या घटना घडतात. रुग्णालयातील स्वच्छता आणि इमारत देखभालीकडे तिचे लक्ष दिले जात नाही. थोडक्यात काय तर आरोग्य उपचारांत गुणवत्तेची हमी देता येत नाही; असा सार्वत्रिक समज आहे आणि तो बऱ्याच अंशी खरा आहे हे खेदाने म्हणावे लागेल.
मुळात ग्रामीण रुग्णालय ही सरकारची जनआरोग्य मोहिमा राबवणारी एक महत्त्वपूर्ण संस्था आहे. सरकारच्या आरोग्यविषयक धोरणांना जनसामान्यापर्यंत पोचवणारी प्राथमिक केंद्रे आहेत. प्रत्येक खेडोपाडी असणारी त्यांची जोड ही आरोग्य विषयक संवाद निर्माण करते. आरोग्यविषयक जनजागृती करते. लोकांमध्ये पसरणाऱ्या साथीच्या रोगांना आटोक्यात आणण्यात या ग्रामीण रुग्णालयानी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अशावेळी रुग्णांना घ्यावयाच्या काळजी व साथींच्या प्रतिबंधित उपचार पद्धतीविषयी या ग्रामीण रुग्णालयानी एक रोग प्रतिबंधक शिक्षण चळवळ राबवली आहे. काही असाध्य व घातक रोगांच्या उच्चाटनात व प्रतिबंधात या रुग्णालयाचा मोठा वाटा आहे. पोलिओ, डेंगू, कावीळ, न्युमोनिया या सारख्या रोगाच्या समूळ उच्चाटन या रुग्णालयांची महत्वाची भूमिका होती. येथे टीबी वर खात्रीशीर इलाज होतो. तसेच एडस् सारख्या असाध्य रोगावर उपचार पद्धतीत रुग्णाबद्दल पुरेशी गोपनीयता राखली जाते.
या सर्व गोष्टी मान्य केल्या तरी जनसामान्यांमध्ये आजारपण आणि आरोग्यविषयक बाबतीत ग्रामीण रुग्णालयाचा आधार व भरोसा वाटत नाही. लगेचच व वेळेवर उपचार न मिळणे तसेच रुग्णांना योग्य वागणूक मिळणे अशा बऱ्याच रुग्णांची धारणा आहे. उपचार पद्धतीतील वेळकाढूपणा व सरकारी कारभारातील संथपणा इथेही जाणवतो. यात तब्येतीची हेळसांड होते अशी रुग्णांची भावना आहे. दुसरा मुद्दा असा की सर्व सेवा एका छताखाली मिळत नाहीत त्यामुळे रुग्णांना काही सेवां साठी इतरत्र धावाधाव करावी लागते.त्यात ग्रामीण रुग्णालयाचे ठिकाण शहरापासून थोडे दूर असेल तर फरपट ही ठरलेली आहे.
खेडोपाडी किंवा रिमोट एरिया मध्ये डॉक्टर सेवा करायला तयार होत नाहीत.त्यामुळे कायदा करून जबरदस्तीने डॉक्टरांना तिथे पाठवावे लागते. वैद्यक क्षेत्रात जो सेवाभाव अपेक्षित आहे त्याचा अभाव जाणवतो. कारण वैद्यक शिक्षण प्रचंड महागल्यामुळे ती गुंतवणूक लगेच भरून काढण्यासाठी चांगल्या डॉक्टर शहरांत प्रॅक्टिस करण्यास जास्त प्राधान्य देतात.त्यामुळे क्रिटिकल अवस्थेतील रुग्णांना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागते आणि महागड्या उपचारांमुळे त्यांचा खिशाला कात्री लागते.
या सर्व गोष्टींचा आढावा सरकार आणि संबंधित यंत्रणा घेत नसेल असे नाही. पण ज्या योजना व सुखसोयी जनसामान्यांसाठी सरकारला अपेक्षित आहेत, त्या जमिनी हकिकतीत उतरताना दिसत नाहीत. यात थोडा सरकारी ढिसाळपणा असेलही, सरकारी आरोग्य विषयक योजना कागदावर कितीही चांगल्या असल्या तरी त्याला लाभार्थीपर्यंत पोचण्यासाठी जी इच्छाशक्ती पाहिजे तिचा अभाव दिसून येतो. रेशन दुकानावर मिळणारे धान्य व इतर वस्तु प्रत यथातथाच असते; ते सरकार खराब वस्तूंचा पुरवठा करते म्हणून नव्हे तर वाटप पद्धतीतील दिरंगाई आणि वेळ काढूपणा चांगले राशन खराब करतो. तेव्हा चांगल्या आरोग्यासाठी पोषक आहार योजनेने किती बालकांचे पोषक पोषण झाले हे विचार करावयास लावणारे आहे. त्यात भरीस भर म्हणजे आरोग्य विषयक जागृतीचा अजून म्हणून म्हणावा तसा प्रभाव ग्रामीण भागात दिसत नाही आणि अशाच रुग्णांची आरोग्यविषयक काळजी घेणारा दवाखाना ही सुदृढ नाही. त्यामुळे सरकारी रुग्णालयाचेच आरोग्य धोक्यात आहे असे खेदाने म्हणावे लागेल.
बदलत्या काळानुसार ग्रामीण रुग्णालय बदलली नाहीत. आताच्या काळी असणाऱ्या सुविधानी ती अद्यावत केली गेली नाहीत. आजही खाजगी रुग्णालयात जाणारा वर्ग ग्रामीण रुग्णालय आकर्षित करू शकले नाही. एखाद्या तालुका अखत्यारीत येणारी ३०-४० गावे यांचे सर्वतोपरीने आरोग्यविषयक शंकांचे समाधान करण्याची कुवत ग्रामीण रुग्णालयानी कमवली नाही. नवनवीन व आकर्षक आरोग्य विषयक योजना आरोग्य विभाग राबवू शकला नाही.पण ज्या योजना येतात त्या सरळ धोपट मार्गाने पारंपरिक पद्धतीने राबवल्या जातात. मग लोकांच्या मनात ग्रामीण रुग्णालयाबद्दल विश्वास आणि आधाराची भावना कशी वाढावी. दुसर्या राज्याच्या आरोग्य विषयक धोरणात आणि आपल्या राज्याच्या धोरणाची एक तुलनात्मक चिकित्सा केली तर खूपश्या सुधारणांची गरज वाटते. आता देशाला जागतिक महासत्ता करण्यात व्यस्त असलेल्या सरकारांना लोकांची प्राथमिक गरज ध्यानात येत नाही असे तरी कसे म्हणावे. आजकाल तसे प्रयत्न होताना दिसताहेत पण त्याचे परिणाम समोर येण्यास थोडा वेळ जावु द्यायला हवा. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयांचे आरोग्य सुधारुन भविष्यातील ग्रामीण भारत अधिक सशक्त आणि निरोगी असेल अशी आशा धरुया.

योगेश्वर पाटोळे .
पेठ. ता.वाळवा जि.सांगली.
ग्रामीन रुग्नालय हेच तर आमच्या सारख्या गरीब जनतेसाठी वरदान आहे भारत सरकारचे याचा गावी असताना खुप लाभ झाल कारण आर्थीक परीस्थिती जेव्हा जेव्हा काही आजार व शारीरीक त्रास होतो व पैसे नसायचे मग पेर्याय एकच सरकारी ग्रामीण रुग्णालय .याम्ध्ये तेथील सर्व नोकर वर्ग व अधीकारी खुप काळजीपुर्व आजारी व्यक्तीचा औषधोपचार करुन त्याना बर करुन सोडतात .या यंत्रनेचे आभार मानावे ते कमीच .

शीतल शिंदे,
दहिवडी, जि- सातारा.
ग्रामीण रुग्णालये , प्राथमिक आरोग्य केंद्र , उपकेंद्र या शासकीय संस्था त्या ठिकाणी असलेल्या लोकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी उभारण्यात आलेल्या आहेत मात्र त्याचा फायदा फ़क्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले घटक घेताना दिसतात .त्यांच्यासाठी हे माध्यम खूप महत्वाचे आणी फायद्याचे असुन एक हक्काचे माहेरघर आहे .
ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी पहिल्या पेक्षा आता खूप चांगल्या सुविधा पुरविल्या जातात परंतु लोकांची मानसिकता अजून बदलली नाही .खरेतर जेवढा पगार तेथील कर्मचाऱ्या वर दर महिन्याला शासन खर्च करते साधारणता 8 ते 13 लाख त्यांपैकी 1 लाख रुपयांचा खर्च सुद्धा लोकांच्या आरोग्य सेवा पुरविण्यासाठी होत नाही म्हणजे त्या प्रमाणात लोक त्याचा फायदा घेत नाहीत .
म्हणजे पुढ्यात वाढलेय पण आपल्याला खाता येत नाही असंच.तत्काळ आणी निशुल्क सेवा पुरविणारे शासकीय केंद्र असूनही लोक खाजगी रुग्णालयाची धाव घेतात .मान्य आहे काही प्रमाणातच सेवा असतात पण जे आहे त्याचा फायदा करून घेणे गरजेचे आहे .
या ठिकाणी 4 डॉक्टर्स नसले तरी दोन - तीन तरी असतात आणी तेही mbbs असतात . 7 परिचारिका , 1औषध निर्माता , 2 रक्त तपासणीसाठी , 1 एक्स रे कर्मचारी , शिपाई अशा प्रकारचे प्रशिक्षित कर्मचारी असुन त्याशिवाय इतर अशासकीय कर्मचारीही कार्यरत असतात .शासनाचे वेगवेगळे प्रकल्प असुन त्या ठिकाणी विविध सेवा पुरविल्या जातात .
1) जसे की क्षयरोग तपासणी व उपचार ,
2) आई. सी .टी .सी. विभाग म्हणजे ऐच्छिक सल्ला व मार्गदर्शन विभाग _ मोफत समुपदेशन केले जाते .
एच .आय. व्ही . तपासणी व त्याचे ए. आर. टि . उपचार .
3) एन सी डी _ नॉन कम्युणीकेबल डिसेस - अ संसर्गजन्य रोग निदान - जसे की उच्य रक्तदाब , मधुमेह , केन्सर यासाठी तपासणी व उपचार पद्धती हे हि मोफत पुरविले जातात .
शिवाय महालॉब तपासणी - सी बी सी , एच बी , थायरॉड , कोलेस्टेरॉल आणी आणखी तपासण्या होतात .याचा सर्वांनी फायदा करून घेतला पाहिजे .
आताच्या संकरित बियाण्यापासून उत्पन्न घेतलेले धान्य , पालेभाजी ,फळे आणी चुकीची आहार पद्धती , व्यायामाचा अभाव यामुळे वाढत चाललेले मधुमेहीण्चे , उच्य रक्तदाब यांचे प्रमाण खूप वाढलेले आहे .या साठी याठिकाणी उपचार मोफत दिले जातात .त्यातून अगदी गरज भासली तर थोडफार खाजगी उपचार घेवू शकतो .
या शिवाय शाळा तपासणी पथक ज्यात 4 डॉक्टर्स 2 फर्मसिस्ट , 4 परिचारिका असे यांचे पथक प्रत्येक तालुक्याला असते की ते 0 ते 18 वयोगटातील मुला मुलींची अंगणवाडी , शाळा , विद्यालय , कॉलेज या ठिकाणी जावून तपासणी करून कमतरता असलेली मुले निवडून , गरजू ऑपरेशन , व इतर उपचारजिल्हा पातळीवर केले जातात हे हि महत्वाचे आहे .
शिवाय गरोदर मातेला सर्वमोफत तपासण्या अगदी एक सोनोग्राफी मोफत , डीलिवरी साठी गाडीची सेवा ,बाळांचे लसीकरण आणी नसबंदी शस्त्र क्रिया मोफत पुरविली जाते .
आता त्रुटी मात्र असतातच की सगळीकडे पण जे आहे त्याचा फायदा का करून घेवू नये आणी ज्या दिसतात त्रुटी त्यांवर आवाज उठवा .
लोकांना सरकारीत यायचे म्हटले की नाकं मुरडली जातात आणी कमीपणा वाटतो .आम्ही दोघे दोघे जण नोकरी करतो तरी असणाऱ्या सर्व आरोग्य सोईचा लाभ घेतो .कारण बोलणारे काय दवाखान्याचा खर्च देणार आहेत? रात्री अपरात्री हक्काचे आणी जीव वाचवीणारे ठिकाण !
काय मग त्यांना का म्हणून लाजायचे ?
ते पैसे आपण दुसऱ्यांना मदत करण्यासाठी वापरू शकतो इतरांचे पण
सहकार्य होते !
शेवटी खरेच सांगेन , आग्रह करेन घ्या सर्वांनी लाभ हि !
हि लोकांनी लोकांसाठी पूरवीलेली सेवा आहे आणी त्यावर आपला पूर्ण अधिकार आहे.

अक्षय पतंगे,
आ.बाळापुर, जि. हिंगोली.
ग्रामीण रुग्णालयास आपण सरकारी दवाखाना म्हणुन ओळखतो. ग्रामीण भागात 'सर्वांसाठी आरोग्य' या ब्रीदवाक्याने सरकारी दवाखाने आरोग्यसेवा पुरवतात. केंद्र व राज्य सरकारच्या विविध आरोग्य योजना व उपक्रम या माध्यमातून चालविले जातात. भारतात देवी नावाचा आजार, पोलीओ तसेच कृष्ठरोग यावर समाजात प्रभावी जागृती करून हे संपवण्यासाठी सरकारी रुग्णालयांनी केलेले प्रयत्न नाकारता येणार नाही. वयोगट ०-५ मधील बालकांना वेळोवेळी लसीकरण देण्याचे काम ही रुग्णालये करत असतात. पुर्वी घरोघरी बाळंतपण व्हायची. मात्र सरकारी दवाखाने आल्यापासून गरीब कुटुंबाना आधार मिळाला. बाळांतपणे आणि शस्त्रक्रिया मोफत व्हायला लागल्या. लोकसंख्या नियंत्रण किंवा वय पुर्ण झाल्यावर विवाह ही जनजागृती सुद्धा सामाजिक आरोग्य ठेवण्यासाठी महत्वाची ठरली.
ग्रामीण भागातील रुग्णालयांत खाटांची संख्या, रुग्णांची आबाळ, अपुरे मनुष्यबळ तसेच औषधींचा तुटवडा असे वारंवार निदर्शनास येते. आशा कार्यकर्ती किंवा आंगणवाडी शिक्षिका यांनाही वेळोवेळी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. कारण त्या थेट गावात काम करत असतात. वरील बाबींकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.

अर्चना खंदारे,
हिंगोली.
आपल्या कडे असा समज आहे कि,ग्रामीण सरकारी दवाखान्यामध्ये विलाज म्हटलं कि गैरसोय आणि गरीब व्यक्तीच इथे येतात आणि दुसरीकडे खाजगी दवाखान्यामध्ये विलाज केला तर तो उत्तम मानला जातो. का ? तर तिथे आपण जास्त पैसा खर्च केला असतो.म्हणजे इथे पण पैसा च महत्वाचा आहे.पण ज्यांच्या जवळ पैसे नाहीत अस्या व्यक्तींनी काय करायचं. त्यांच्या जवळ ग्रामीण रुग्णालय शिवाय पर्याय नसतो आणि तिथे हि डॉक्टर च रुग्णांचा विलाज करत असतात.ग्रामीण आणि खाजगी रुग्णालयातील डॉक्टर मध्ये एक फरक जास्त प्रमाणात आढळतो .तो म्हणजे खाजगी डॉक्टर आपल्याला जरा जास्तच प्रेमाने बोलतात आणि ग्रामीण म्हणजे सरकारी रुग्णालयात डॉक्टर जरा जास्तच कडक बोलतात यालाही एक कारण आहे.ते म्हणजे आपण लोक त्याचा गैर फायदा घेतो, सरकारी आणि स्वस्त वस्तूची आपण किंमत करत नाही.नुकसान झालं तर झालं सरकारच होणार त्यात आपलं काय जाणार. या दृष्टीकोणामुळे सरकारी रुग्णालये अस्वच्छ राहतात .इथे हि आपल्याला आपल्या सरकारी रुग्णालय विषयी आपले विचार आणि आपला दृष्टिकोन बदलणे फार महत्वाचे आहे.
सरकारी रुग्णालयामुळेच आज गरीबाची कुटुंबे चांगल्या व बऱ्याच प्रमाणात स्वस्थ होत आहेत .पूर्वीच्या वेळी हि लोकांवर ज्या भयंकर आजाराने थैमान घातले होते त्यावेळी हि सरकारी रुग्णालयानेच त्या आजारावर मात करत सर्वांना बरेही केले. सरकारी रुग्णालयातून आज हि खूप चांगल्या प्रकारे रुग्णांना सोई सुविधा पुरविल्या जात आहेत आणि त्याचा फायदा हि गरीब असो वा श्रीमंत सर्वांना सारखाच होत आहे.

(यातील सर्व संबंधीत छायाचित्रे गुगलवरून घेतलेली आहेत.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा