आजचा मी आणि कालचा मी

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप

📄 आठवडा 5⃣2⃣वा📝
💖💖💖💖💖💖💖💖💖💖
अभिमानाचे आणि यशस्वितेचे एक वर्ष
🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈
🖊🖋✒🖌🖍✏🖋✒🖌🖍
28 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2018
💬✍💬✍💬✍💬✍💬✍
💐💐💐💐💐💐💐💐

आजचा मी आणि कालचा मी

भाग २  

श्रीनाथ कासे,सोलापूर.

रंगूनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा
गुंतूनी गुंत्यात सार्‍या, पाय माझा मोकळा...

या सुरेश भट यांच्या ओळी मानवी जीवनात प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो, जगण्याची रीत वेगळी असते. हेच दाखवून देतात. शेवटी सर्वांना एकाच ठिकाणी पोहचायचे असते.
सामाजिक, आर्थिक, राजकीय, भौगोलिक, संस्कृतीक या सर्व बाबी आपल्या जीवनावर आणि बौद्धिक वाढीवर परिणाम करीत असतात. याच गोष्टी माझ्यावर पण परिणाम केलेले दिसून येतील. आजचा
मी आणि कालचा मी हा विषय अत्यंत कठीण आहे. पहिल्यांदा कालचा मी कसा होतो ? ते बघावे लागेल. माझं गाव भीमेच्या काठी असल्यामुळे लहानपण खूपच गमतीदार गेले. नदीकाठची मुले लवकर पोहायला शिकतात आणि तेथील वातावरण वेगळेच असते. मी फारच लाजर्या स्वभावाचा होतो. घरी आणि गावामध्ये कन्नड भाषेत जास्त बोलत असल्यामुळे मराठी भाषेमध्ये बोलायला मनात भीती वाटायची. मराठी भाषेत बोलणारे पाहुणे किंवा कोणी आले तर मी त्यांना कामापुरते बोलायचो. पण मराठी कविता, कथा, चरित्र भरपूर वाचायचो.
माध्यमिक शिक्षणासाठी रोजचा १० की.मी चा प्रवास सायकलिवर असायचा. शाळेत बऱ्यापैकी हुशार होतो पण पाठीमागे बसणाऱ्या मित्रांमध्ये मी खुश असायचो. त्यांचं शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असायचो. काही मुली परीक्षेमध्येच बोलायच्या, त्यांना उत्तर हवे असायचे, उत्तरं मिळाली की त्याही खुश असायच्या.
अकरावी, बारावी दरम्यान शिक्षण आणि शेती या दोन्ही गोष्टीवर भर दिला. यादरम्यान वाहन घेतलं शेतीमाल घेऊन गाव ते सोलापूर असा प्रवास सुरू झाला. एकेकदा रात्रभर प्रवास व्हायचा. पण तेथील अडत व्यापारी, कर्मचारी, शेतकऱ्याचा आर्थिक प्रश्न इ. चा जवळचा संबंध आला. स्वतःची शेती कडे पण वेळ जास्त द्यायचो. पुढे खऱ्या शिक्षणाचा प्रवास सुरू झाला तेथे भाषण, वाचन, लेखन इ. चा अभ्यास केला. येथेच कविता, लेख, लिहिण्याची आवड निर्माण झाली. गजल संमेलन आणि इतर संमेलन जवळून बघायला मिळाले. तेंव्हा मी शाहू महाराजांच्या जीवनावर लेख लिहिला आणि सहज वृत्तमानपत्राला पाठवून दिली. दुसऱ्या दिवशी पहिल्या पानावर माझा लेख झळकला. दुसऱ्या आणि तिसऱ्या पानावर काही प्राध्यापकांचे ही लेख वाचायला मिळाले.
पुढे MBA करण्यासाठी मला पुण्याशिवाय पर्याय दिसला नाही. त्यामुळं सरळ पुण्याची वाट धरली, तेथे मुक्कामाची व्यवस्था पासून कॉलेजमधील एडमिशन पर्यंत सर्व व्यवस्था करेपर्यंत दमून गेलो. एकदाचा मी पुण्यात स्थायिक झालो तेथे M.B.A बरोबरच अनेक चर्चासत्रे, बालगंधर्व, S.M जोशी, फर्गुसन, रानडे, इ. अनेक जागी मी वेळ घालवत होतो भरपूर शिकायला मिळालं. फर्स्ट क्लास मधे पदवीत्त्युर पदवी मिळाली.
न संपणारा प्रवास चालू आहे..... उद्याच्या मी कडे...
==============================

प्रवीण, मुंबई


कालचा "मी" आणि आजचा "मी" असा जेव्हा विचार चालू झाला तेव्हा कळलं की हा सारा एका बंडखोरीचा प्रवास आहे.  प्रत्येक वेळी वर्तमानाने भूतकाळाशी बंड केलं आहे. देवावरच्या आणि दैवावरच्या आंधळ्या विश्वासावर चिकिस्तक वर्तमानाने बंड केला आणि नास्तिक आणि विज्ञानवादि बनवलं.
बालपणीच्या खेळकर मनावर प्रौढवस्थेतील परिपक्व मनाने अशी बंडखोरी केली की बालमन कुठे गडपच झाले.
पहिल्या प्रेमाने प्रीतीरुपी आभाळात स्वच्छंद पणे विहार करणाऱ्या मनाशी जबाबदाऱ्यानी बंड केले आणि स्वच्छंदपणा नाहींसाच झाला.
भूतकाळातील "मी" च वर्तमानाकाळातल्या "मी" चाललेलं हे युद्ध भविष्यातील "मी" साठी असत.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वर्तमानाने भूतकाळाशी बंड केले, कधी हतबल केले तर कधी क्रांतिकारी बनविले.
==============================

सौदागर काळे,पंढरपूर.

'मी'
'मी'तीन प्रकारचा...
कालचा,आजचा आणि उद्याचा.
घड्याळाच्या सेकंद काट्याप्रमाणे...
फिरत राहतो 'मी'पणाचा काळ.

हा स्वार्थी 'मी'निरंतर आहे....
कधी स्वतःसाठी,कधी इतरांसाठी
तो बदलत नाही म्हणूनच,
त्याच्यातला 'मी'अजूनही जिवंत आहे.

ओंजळभरच्या पाण्यात 'मी' ला पाहतो.
निसटत जातो हात ओले करून..
अजूनही 'मी' पणाचा ओलावा तसाच आहे,
लोकांना चित्र दाखवण्यास सज्ज आहे.

तुमचा-माझा ,त्याचा-ह्याचा .
'मी'पणाचा अभंग जिभेत आहे.
कित्येक पिढ्या टाळ-मृदंगात गेल्या,
'मी' पणाचा 'विठ्ठल'अजूनही तसाच आहे.
==============================

दिपाली वडणेरे, नाशिक


कालचा/ची मी आणि आजचा/ची यामध्ये माझ्यात  खरचं खूप बदल झालाय तो बदल असा कि साधारणतः मागील 9-10 वर्षांपूर्वी म्हणजे मी 9-10 ला आणि 11-12 वी ला असताना चारही वर्षातले  माझे 2  शिक्षक होते दोन्ही  इंग्रजी विषयाचेच शिक्षक दोघांनीही  राज्यसेवा परिक्षा दिलेली  पण 1-2। मार्कांवरून गेलोय असे आम्हाला सांगायचे तर तेव्हा मी स्वतःलाच  म्हणायचे की हे आपले शिक्षक आहेत आणि जर हे पास होऊ शकत नाहीये तर आपण तर यांच्यापुढे  काहीही नाही आणि मी तर उतरणारच नाही स्पर्धा  परीक्षेंमध्ये  आणि त्यानंतर म्हणजे मी पुढच्या  शिक्षणासाठी बाहेरगावी  पडले आणि मग मलाही थोडेफार समजायला लागले मुळात म्हणजे जोपर्यंत  आपण कोणत्याही स्पर्धा  परीक्षा देत नाही तोपर्यंत  आपल्याला कसे समजणार की आपण हे करू शकतो की नाही ते आणि  मग मी ठरवले की काहीही  होऊ दे स्पर्धेमध्ये  उतरायचेच आणि त्यानंर स्पर्धा  परिक्षेची तयारी करणारे मित्र - मैत्रीण मिळाले नंतर मग 1-2 what's  app गृप पण मिळाले आणि अचानक माझे विचार असे बदलले की जर ही इतकी सर्व  माणसं करू शकतात तर मग मी का नाही आणि तेव्हापासून  स्वतःची विचार करण्याची पद्धत  बदलली लोक काय म्हणतील  याचा विचार तर थोड्याफार  प्रमाणात  का होईना सर्वच  करतात आणि याला मीही अपवाद नाही पण मीही करते अजुनही असा विचार पण फक्त  5- 7 % (आणि खरतंर 5-7 % इतका तरी सरवांनीच केला पाहिजे पण नेमकी कोणत्या वेळी , कोणत्या कारणासाठी हे ज्याचे  त्याला समजले ना की मानूस बर्यापैकी यशस्वी  झालाच म्हणून समजा) बाकी वेळ मी फक्त  माझ्या  ध्येयाकडेच ठेवते  हा विषय निवडण्यामागचे कारण म्हणजे माझ्यात  आणि माझी विचार करण्याची पद्धत  यांमध्ये  झालेला बदल यासाठीच
आणि अजून एक मला आधी अशा मोठमोठ्या पोस्ट   वाचायला खूप कंटाळा  यायचा पण यागृपमध्ये अॅड झाल्यानंतर मला वाचनाची जास्तच  आवड व्हायला लागलीये प्रत्येकजण आपापले विचार /  अनुभव इतक्या छान आणि मनमोकळेपणाने सांगतात की मलाही वाटले की लिहावा आपणही काहीतरी पण नेमके काय ते सचत नव्हते मग मी  आधी सर्वांचे  अनुभव वाचले तेव्हा  वाटले की लिहिवेआपणही  म्हणून आज माझा अनुभव म्हणा किंवा माझ्यात  आजवर जालेला बदल म्हणा लिहीला  तसे  शिरिश सरपण मला बोलले होते की मॅडम तुम्हीही  लेख लिहा पण सरांना म्हटले की प्रयत्न  करेन मी आणि आज लिहीण्याचे अजुन एक कारन म्हणजे आज माझा वाढदिवस आहे आणि मला हे नेहमी लक्षात राहील की मी देखील पहींलायादाच एक लेख / माझा अनुभव इतरांसोबत शेयर केला होता आणि इथुन पुढे मी देखील लिहीण्याचा  प्रयत्न  करीन कारण  एक हक्काचे  व्यासपीठ आता आपल्याला मिळालेय जिथे आपण आपले विचार मनमोकळेपणाने  मांडु शकतो.
==============================

डॉ. विजयसिंह पाटील. कराड.


तसं पाहिलं तर या विषयाचा आवाका फार मोठा आहे.
एकतर सुरवातच 'मी ' या शब्दात आहे. आणि'  या 'मी 'ने आपलं कालचंआयुष्य आणि आजचं आयुष्य विशद करणे पक्षपातीपणाचं होईल असे वाटते. जे. कृष्णमूर्ती म्हणतात त्याप्रमाणे, पूर्णपणे त्रयस्थाच्या दृष्टीने मी जेंव्हा माझ्या ह्या क्षणापर्यंतच्या आयुष्याकडं पहातो, तेंव्हा जे जे फरक जाणवले ते थोडक्यात लिहितो , तरी कितीही प्रयत्न केला तरी यात 'मी' हा डोकावणारच .
प्रत्येक सजीव प्राणिमात्रांमध्ये वयपरत्वे शारीरिक स्थित्यंतरे होत असतात, मानवही त्यातून सुटला नाही. ते नैसर्गिकच आहे.
मनुष्याच्या जीवनाला, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, मानसिक असे अनेक पैलू असतात.
त्या प्रत्येक बाजूने विचार करायला हवा.
थोडक्यात सांगायचे तर, मी माझ्या 'काल' चे दोन भाग करीन. एक- शिक्षण-उच्च शिक्षण पूर्ण होईपर्यंतचा.
दोन--कमवायला लागल्यापासून
स्थिर स्थावर होईपर्यंत ( यात लग्न, मुलं इत्यादी सर्व )होईपर्यंतचा...

बालपण मजेत गेलं. या वयात कुठलाचं प्रश्न नव्हता. परत उच्च शिक्षणापर्यंत , घरच्या जेमतेम आर्थिक परिस्थितीने काही गोष्टींना मुरड घालावी लागली. त्या वेळेस त्याचं वैश्यम्य वाटायचं. पण आज त्याचं हसू येतं.
नक्की मी / अहं/ इगो मनात कधी शिरला हे काही सांगता येणार नाही. पुढं पुढं तर त्याचं प्रस्थ वाढतंच गेलं. (आणि अजूनही वाढतच असावं )..
पहिल्यापासून शीघ्रकोपी स्वभाव. तो आत्ता आत्ता पर्यंत तसाच होता. पण गेले तीन चार वर्षात त्या स्वभावाचे तोटे  आणि त्यातील व्यर्थात लक्षात येऊ लागली. प्रयत्न करून तापट स्वभाव मृदू करण्यात बऱ्यापैकी यशस्वी झालो असं वाटतं.
पूर्वी सिगरेट, दारू याचं व्यसन होतं असंही म्हणता येणार नाही (?इगो) आणि नव्हतं असंही म्हणता येणार नाही. सिगारेट कशीबशी सुटली. दारूही सोडली. मध्यंतरी सलग बारा वर्षे मांसाहारही बंद केला होता.
पूर्वी पैशाअभावी कपडेलत्ये हौस असूनही घेता येत नव्हते. आतां मात्र त्यात अजिबात हयगय करत नाही.
बंगला गाडी घोडा स्थावर इत्यादीची पण हौस पूर्ण झाली.
ह्या झाल्या भौतिक गोष्टी.
पूर्वीपासून असलेलं देवधर्माचे आचरण आजही कायम आहे.
अध्यात्मिक प्रगती दिवसेंदिवस वाढत चाललीय असं वाटतं.
अहं पणा कमी झालाय. गर्व तर पूर्वीही नव्हता आणि आज तर नाहीच नाही.
स्वतः ची कुवत मर्यादा ओळखून गरजा सीमित करण्याचं जमू लागलंय.
==============================

अनिल गोडबोले,सोलापूर


कालचा म्हणजे किती दिवस, महिने वर्षापूर्वीचा....? हे आपल्यावर सोडलेलं असल्यामुळे मज्जाच मज्जा..

साधारणपणे लहानपणी चा मी....
मुंबई पुसट देखील आठवत नाही
शाळा कोकणातील
खोडकर, एका जागी न बसणारा, रोज घरी तक्रारी घेऊन जाणारा..

प्रचंड भित्रा, भुताच्या गोष्टी ऐकून तेच स्वप्नात बघणारा..
लाईट नव्हती तेव्हा कंदिलाच्या वातीला कमी जास्त करून सावलीचा खेळ खेळणारा..

मांजर आणि शाळा भयानक प्रिय असलेला.. शाळेतील मॉनिटर(गुंडाला राजकारणात का आणतात हे आत्ता कळलं..)

तरीपण अभ्यास न करून कधी नापास न होणारा.. गणित डोक्यात न बसवता सोडवणारा..

हायस्कूल मध्ये मात्र भांबावून गेलेला..
कॉलेज मधील ढ(सायन्स मध्ये 54 % वाल्याला ढ म्हणतात)

बारावी नंतर 180 अंशात जीवन बदलून सोलापुरात कॉलेज.. आणि स्वप्न.. बायोटेक्नॉलॉजी ची स्वप्न बघून धाडकन पडलेला

Midc पूर्ण पालथी घालून मग सागवान रोप मार्केटिंग करत फिरणारा

तिथून पळून येऊन समाजकार्य मध्ये काम करणारा त्या नंतर त्या विषयांची डिग्री घेऊन तिथेच शिक्षक झालेला

मॅनेजमेंट शी न पटलेला.. विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यात आयुष्यभराची नोकरी घालवलेला..
सोलापुरात एड्स विरोधात मनापासून काम करून 350 बाळांना नवीन लागणी पासून लांब ठेवण्यासाठी काम करणारा


लग्न त्याची कथा वेगळीच.. त्या नंतर एक संस्था उभी केलेला
शहाण्यांनी ज्याची पायरी चढायची नसते तिथे च जाणारा(कोर्ट, पोलिस, हॉस्पिटल, स्मशान, सोपडपट्टी, कारागृह)

त्यानंतर वजन वाढल्यामुळे कमी करणारा आणि आता लोकांना शहाणपणा सांगत फिरणारा..

नेट पास झाल्याचा धादांत खोटा अभिमान असलेला.. स्पर्द्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यासाठी पुन्हा हातात खडू पकडलेला..

आणि इथे अडमिंन म्हणून एक उगाचच मॉनिटर गिरी करणारा..

असा मी ... म्हणालात काही कर्तृत्व नसलेला.. पण उगाचच पंगे घेत फिरणारा..

तसाच आहे.. न थांबणारा..!!!!
==============================

विकास येवले, पुणे

आयुष्य एक प्रवास आहे. माझ्या मते आयुष्याच्या प्रवासातला अर्धा टप्पा मी चालून पुढे आलोय. या प्रवासात मागे वळून पाहिलं की आश्चर्य वाटत माझंच मला, हो खरच हा मी तोच आहे का..? ज्यान स्वतःच्या आयुष्याला दोन वेळा पूर्ण विराम लावण्याचा प्रयत्न केला होता. (कारण ही होत त्याला पण झालेल उगाळत बसल की अजून त्याचा त्रास होतो) म्हणतात ना लहान वयात अक्कल कमी आणि अतिशहाणपन असलं की मूल नको ते करून बसतात. तसाच मी ही, त्यातलाच एक होतो.
अगदी फाटायच्या स्थितीत असलेलं जून पुस्तकं तस माझं आयुष्य होत. खितपत धूळ खात पडलेल्या त्या जून्या पुस्तकाची पान, जशी कुणी पुस्तक रसिकान अलगद त्या अडगळीच्या अंधाऱ्या खोलीतुन सारी जळमट बाजूला सारत फुंकर मारून पुसावी, अगदी तसच तीन ही माझ्या आयुष्यात येऊन माझं आयुष्य बदललं. अगदी दबक्या पावलांनी माझ्या आयुष्यात येऊन कधी तीन तीच स्थान अटळ केलं तिलाच माहीत. मला तशी तिची आवड लहान पणा पासूनचीच रोज एकदा तरी मी तिला दुरूनच नेहाळायचो (तितकच नेत्र सुख म्हणा) की अजून काही कधी अनुभवलं नव्हतं की स्पर्श ही नव्हता केला. तिच्या बाबतीतील आकर्षण मला नेहमी असे.
माझ्या केलेल्या मूर्खपणाचा फायदा म्हणा की काहीही, ती मला भेटली अन माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. हल्ली तीच माझ्या जगण्याचं कारण बनलीय. मी तिच्यात नेहमी हरवून जातो.
एकदा ती सोबत असली की भान नाही राहत मग जगाचही, तीच माझं विश्व आता वेगळंच आहे. असच तिच्या विषयी सांगता सांगता वेड्या सारखा खूप बडबडतो, अशी माझी लेखणी जीच माझ्या आयुष्यात स्थान अनमोल आणि अटळ आहे.
#as_u_wish
==============================
IMAGES SOURCE : INTERNET

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************