नकार पचवता येणे किती गरजेचे ?


नकार पचवता येणे किती गरजेचे ?

🌱वि४🌿 या व्हाट्सअप ग्रुपवरून

नकार पचवता येणे किती गरजेचे ?
source: INTERNET
-शीतल शिंदे - जगताप
दहिवडी , जि - सातारा .

नकार पचवता येणं हि काळाची ची गरज आहे जशी आता विज्ञानाची गरज आहे तशीच  !

जिकडे जाईल तिकडे कॉम्पिटि -  शन ! या स्पर्धेच्या युगात नकार पचवण्याची ताकत , वैचारीकता, आपल्याकडे ,  बरोबर असलीच पाहिजे .
लहानपणापासूनच पालकांनी मुलांना नको त्या गोष्टींचे लाड करणे , मागेल त्या वस्तु लगेच देणे त्यामुळे मुलांना धीर धरणे हा प्रकारच माहीत नसतो किंवा नाही म्हणायची , थांबजरा हे ऐकायची  सवय लागत नाही अथवा लागू दिली जात नाही .हि कारणे फार महत्वाची असतात .
10 वी  , 12 वी चे रिज़ल्ट्स त्याआधी मुलांचे समुपदेशन कारणे फार गरजेचे असते .

डिग्री , मास्टर डिग्री निकाल आणी त्या नंतर जॉब अपोर्चुणीटिस आणी इंटरव्यूव फेल अशा वेळी आपण अजून ह्यपेक्श्या आणखी चांगले काही करू शकू आशी जिद्द निर्माण करणे , होणे गरजेचे आहे .
आपण पाहतोय सध्या लिव्ह इन रीलेशन शीप मधे तरुण तरुणी राहतात आणी काही वर्षांनी नकार मिळाला की आत्महत्या करतात .खरेतर हि अकर्तब्दारीची लक्षणे आहेत .
हल्लीच्या मुलांना पालकांचा सहवास कमी पडतोय , त्यांची जाणीव नाही हे करत असताना एखादा तरी आपल्या आई वडिलांची आठवण काढत नाहीत ज्यांनी हाडांची काडे केली आपल्याला  संभाळताना !

मैत्रिणी ने नकार दिला की जाळली तिला आणी स्वतःलाही .

कोणतीही परीस्थिती असूदेत त्यातून मार्ग काढायला शिका , शिकवा .कारण जगात अशी कोणतीही गोष्ट नाही की त्याला पर्यायच नाही .

प्रथमतः आपण जे करणार आहोत त्याला  यश नाही आले तर त्यावर मार्ग काढण्याचा पर्याय सुद्धा आपण आधीच शोधला पाहिजे .
फार ओव्हर कॉन्फिडन्स असणे , ठेवणे हेहि गरजेचे आहे पण तेवढाच अपयश आल्यावर पचवण्याची ताकत , मानसिकता असणे - करणे - ठेवणे गरजेचे आहे असे मला वाटते .


source: INTERNET
-नवनाथ पोरे,
 पंढरपूर

माझ्या वयाच्या 22 व्या वर्षीच पितृ छत्र हरपलं आणि  पोरके झालो. बाकीच्या मित्रांची लग्ने जवळपास झालेली होती आणि माझं वय पुढं सरकत होतं. लग्नासाठी मुली पाहण्याची मोहीम हाती घेतली. आर्थिक परिस्थिती हलाखीची आणि अल्पभूधारक, शिक्षण कसबस पदवी पर्यंतच झालेलं. नोकरी नाही की उत्पनाच चांगलं साधन नव्हतं, म्हणजे अगदी दिशाहीन अवस्थेत मुलगी शोधायला निघालो होतो. जवळपास 10 ते 12 मुली पाहिल्या. तेव्हा मुलींची संख्या बरी होती म्हनून स्थळं यायची. मात्र माझी एकूणच परिस्थिती पाहता मुली ही तशाच डाव्या म्हणता येतील अशा असायच्या. त्यामुळे सलग 12 मुलींना मी नकार दिला होता. मुलगी पाहिली की नको म्हणायची सवयच लागली होती. वय 24 च्या पुढं निघालं त्यामुळे घाई तर होतीच. अशातच अक्कलकोट ला एक मुलगी पसंत पडली. तिला होकार देऊन आलो आणि तिच्या उत्तराची वाट पाहू लागलो. 2 दिवस, 4 दिवस, 6 दिवस वाट पाहिली, निरोप काही येईना. दिवस पुढे गेला की नकाराच्या भीतीने ग्रस्त होऊ लागलो. एके दिवशी थेट नकाराचा निरोप मिळाला. त्यावेळी मनात जे काहूर माजलं, नैराश्याने जेवढं ग्रासलं तेवढं त्यापूर्वी कधीच जाणवलं नव्हतं. खूप दिवस मनातच कुढत राहिलो, कुणी तरी आपल्याला नाकारत आहे ही कल्पना असह्य झाली होती. एके दिवशी असाच विचार केला मला एक मुलीने नकार दिला तर माझी ही अवस्था आहे. मी 12 मुलींना नकार दिलाय त्यांना काय वाटलं असेल ? बाजारातील वस्तू नाकाराव्यात तशा मी मुली नाकारत गेलो आणि मला एकीने नाकारले तर मी कोसळन्याच्या मार्गावर आलो? विचार केला, नाकारलेल्या मुलींकडूनच प्रेरणा घेतली आणि पुन्हा नव्याने शोध मोहीम सुरू केली. पुढच्या टप्प्यात आणखी 4 मुलींनी नकार दिला तरीही का नाकारलं याचा विचार करीत, उणेपणा दूर करीत गेलो आणि 22 व्या मुलीने होकार दिला आणि आयुष्याचा मार्ग सापडला. आजही मी नाकारलेल्या त्या 12 ते 15 मुलींची क्षमा मागावीशी वाटते, मी त्यांचं अस्तित्वच नाकारत होतो.



source: INTERNET
-सैनपाल पाटील, आजरा,
जि-कोल्हापूर.

जगात कुणीही स्वयंपूर्ण नाही. अगदी छोट्या जीवापासुन झाडेपेडे ते मनुष्य प्राण्यापर्यंत. सर्वांकडे काही ना काही गोष्टींचा अभाव असतो. मग आपल्याला हव्या असणाऱ्या काही गोष्टीसाठी तो इतरांवर अवलंबून असतो. पण ज्याच्या कडे ती वस्तू वा गोष्ट आहे त्याने त्याला नकार दिला तर. दुसरे म्हणजे समजा एखादी गोष्ट, वस्तू, सेवा, एखादं स्किल किंवा तंत्र तुमच्या कडे आहे पण बाजारात त्याला मागणी नाही. या बाबतीत तुमचे प्राॅडक्ट वा सेवा अंतिम उपभोक्त्या कडुन नाकारली जाते. म्हणजे पहा तुमच्याकडे नसताना तुम्हाला नकार मिळू शकतो आणि तुमच्याकडे असून सुद्धा तुम्हाला नाकारले जाऊ शकते. नकार किंवा नाकारणे हे आपल्यातील कमतरतेची वा अभावाची जाणीव करून देते. नकार का आला हे जर समजून घेतले तर नकाराचे व्यवस्थापन व समुपदेशन करणे सोपे जाते. त्यामुळे नकार समजून घेणे खूप महत्वाचे आहे. नकार समजून घेतला तर तो पचवणे जड जात नाही आणि मग आत्ताचा नकार होकारात बदलायला वेळ लागत नाही. कारण नकार हा केव्हाही स्थायी नसतो.

नकारानंतर याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तरच त्याला पचवणे सोपे जाते. नकारामुळे नव्या संधी धुंडाळायला वाव मिळतो आणि चौकटीबाहेर विचार करायला भाग पडते. आजच्या स्पर्धेच्या युगात कॉर्पोरेट क्षेत्रात नकार मिळणे किंवा एखादे प्रॉडक्ट नाकारणे म्हणजे कदाचित त्यातील काही त्रुटी दूर करण्यासाठी मिळालेली संधी आहे असे मानले पाहिजे तर आणि तरच तर स्पर्धेत टिकून राहता येईल.

कठिण परिस्थितीमध्ये मनामध्ये चाललेले द्वंद्व हे बरोबर की चूक हे काहीही ठरवू देत नाही. होय किंवा नाही यामध्ये हिंदोळत राहते.त्यावेळी आपल्यातला आत्मविश्वास एका बाजूला म्हणतो की आपण हे करू शकतो तर दुसर्या बाजुला त्या निर्णयातील अपेक्षित यश अपयश त्यातील अनिश्चितता निर्णय घेण्यासाठी आपल्याला रोखू शकते. स्पर्धा परीक्षा, शालेय परीक्षा यांच्यामध्ये जर विद्यार्थ्यांना किंवा स्पर्धकांना अपेक्षित यश मिळाले नाही तर त्यांचे मानसिक खच्चीकरण होते. आपण एवढी साधी परीक्षा पास होऊ शकलो नाही, त्यामुळे आपल्या नोकरी मिळणार नाही आणि आपण जीवनामध्ये काय करू शकणार नाही ही नकारात्मक विचारधारा मनात रूजू लागते. त्याच्यामुळे यावेळी परीक्षार्थीनी किंवा स्नातकांनी नेहमी सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून निर्णय घ्यावेत व त्यावेळी काय मानसिक तयारी करावी यासंदर्भात योग्य ते प्रशिक्षण घेणे योग्य ठरेल.

नकारातून येणारी नकारात्मक ऊर्जा ही सकारात्मक कामात लावली तर आवाक्या बाहेरच्या गोष्टी घडतात. यासाठी योग्य वेळी योग्य समुपदेशनाची गरज आहे . नकारामुळे जीवनात तणाव निर्माण होतो आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते. अनेकांना फ्रस्ट्रेशन येते. विसराळूपणा, हिस्टेरिया इत्यादी रोगामुळे अनेकदा वेळ व पैसा वाया जातो. कौटुंबिक आयुष्य उध्वस्त होते. त्यामुळे नातेसंबंध बिघडतात प्रसंगी दुरावा वाढतो. नकारातून येणारे डिप्रेशन, स्ट्रेस यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावे यासाठी प्राप्त परिस्थिती सकारात्मकरीत्या स्वीकारली गेली पाहिजे.

बऱ्याचदा नकार हे योग्य रीतीने हाताळले गेले नाहीत तर त्याचे बरेच दूरगामी परिणाम होतात. कधी तो आपल्या अस्तित्वाचा मुळावर उठतो. तर कधी मनाला उभारी देऊन जीवनाला यशस्वी करण्यात मदत करतो. नकार हा नव्या संधी शोधण्यासाठी मागचे मुळ आहे. काही नकार सौम्या व काही तीव्र स्वरूपाचे असतात. तीव्र नकाराने आपला ईगो दुखावतो आणि बदला घेण्याच्या पातळीपर्यंत पोचतो. प्रेमात आणि आर्थिक अभावात मिळणारे नकार हे या स्वरूपाचे असू शकतात.

तुम्ही नकार कसा पचवता यावर तुमचा संस्कार दिसतो. तुमची वैचारिक व गुणात्मक परिपक्वता दिसते. तुम्हाला शक्य असणाऱ्या गोष्टी बदला आणि आवाक्याबाहेरच्या गोष्टीत तुम्ही स्वतःला बदला. नकारात होकार असतो असे म्हणतात तेव्हा नकार व होकार यातील गॅप सांधताना तुमची कसोटी लागणार आहे. ते आव्हान आहे ते तुम्हाला पेलायचे आहे. ज्यांच्याकडे तुमच्या समस्यांची उत्तरे आहेत त्याच्याशी बोला. नकाराचे योग्य समुपदेशन आणि व्यवस्थापन करणे म्हणजेच नकार पचवणे होय असे मला वाटते. शेवटी काय नकारात उध्वस्त व्हायचे की सावरायचे हे ज्याच्या त्याच्या वैयक्तिक क्षमतेवर अवलंबून असते, नाही का?



source: INTERNET
-निखिल खोडे,
 ठाणे.

            प्रत्येकाच्या आयुष्यात नाही हा शब्द कोणाकडून तरी ऐकायला मिळाला असेलच.  मनाला योग्य वाटेल असं नेहमीच घडत नाही. कोणत्याही क्षेत्रात असो काही वेळेस आपल्याला नाही जमणार, हे नाही होणार असे नेहमीच ऐकायला मिळतात. थोडक्यात आपल्या मनाप्रमाणे काम नाही झाल तर आपल्याला राग येतो किंव्हा आपल्याकडून काहीतरी अनपेक्षित घडत असत.
 
             एखादा गृहस्थ त्याच्या नोकरीच्या संदर्भात मुलाखती साठी गेला आणि त्यावेळेस जर नकार ऐकायला मिळाला तर डोक्यात नको ते विचार येतात. मनामध्ये खुप राग येतो. मला स्वतःचा व्यवसाय करायचा होता. माझ्याकडे पुरेसे पैसे नसल्यामुळे कर्ज मिळवण्यासाठी बँक कडे दोन वेळा अर्ज केला दोन्ही वेळेस बँकेने नकार दिला. मनाला खूप वाईट वाटल एक वेळ तर आता यापुढे व्यवसाय करायचा नाही हेसुद्धा विचार डोक्यात आले. प्रत्येकाच्या प्रोफेशन मध्ये नकार ऐकायला मिळतोच. सरकारी कामात आपल्याला अनेकदा आज तुमच काम नाही होणार हे वाक्य तर खुप वेळा ऐकायला मिळते. प्रवाहाच्या विरुध्द दिशेने कोणते इनोव्हेटिव्ह काम करण्याची इच्छा असेल तर त्याला सुरवातीला लोकांकडून हे यशस्वी नाही होणार असे ऐकायला मिळते.

          अनेकदा नकारामुळे खचून जाऊन आपण प्रयत्न करणे सोडुन देतो. त्यामुळे आपल्यामध्ये मानसिक ताण, चिडचिड वाढते.आपल्या सोबत घडलेल्या नकारार्थी गोष्टी झाल्या त्याच ठिकाणी विसरून त्या दिशेने प्रयत्न चालू ठेवले तर आपल्याला मिळालेला नकार होकारार्थी स्वरूपात बदलता येईल.




source: INTERNET
-संदेश पाटील
(धुळे)

खरं म्हणजे नकार हा शब्द युवक अवस्थेत च जास्त कानी पडत असावा असं मला वाटतं कारण ह्या मागील कारण ही तशीच आहे.घरून आई वडील हे मुलाला शिकण्यासाठी कॉलेजात पाठवत असतात.परंतु कॉलेज मध्ये मुक्त पणे शिक्षण घेत असताना  मुला ची मैत्रिणी सोबत ओळख होते.आणि आज काल कॉलेज मध्ये तरुणीशी ओळख करणे हे फारसे अश्यक देखील राहिले नाही ये कारण त्या साठी आपल्याकडे फेसबुक सारखी प्रसार माध्यमे आहेतच ना मदतीला.
मग कॉलेज च्या पहिल्या च दिवशी काही बहादर फक्त मुलीचे नाव काय ते जाणून घेतात मग घरी किंवा तिथल्या तिथेच नाव सर्च करता मग तिथून खऱ्या अधोगती ला सुरुवात होते.पाहिले मैत्री नंतर मग लागलीच एका आठवड्यात मोबाईल नंबर आणि मग चालू होतात रात्र भर मोबाईल कानाला लावून अभ्यास करण्याचे आधुनिक प्रयोग मग त्या नंतर सोबत फिरणे वगैरे मग एक दिवस मुलीला प्रपोज करायचा आणि मुलगी जर नाही म्हटली मग काही चे पुरातन प्रयोग असतातच "मी माझे आयुष्य संपवेल" मी माझी नस कापून घेईल वगैरे वगैरे. काही तर असे देखील आहेत की तिने नाही म्हटले म्हणून व्यसनाच्या आहारी गेले आहेत अगदी तरुण वयात ...
आणि ह्यात फक्त मुलं च असू शकतात असं नसतं तर मुली देखील ह्या आज काल असतात.
मग अशा वेळी गरज भासते ती योग्य मित्राची ज्याने परिस्थिती ओळखून वागणे गरजेचे ठरते.आणि अशा वेळी पालकांनी देखील लक्ष देणे गरजेचे ठरते की , आपला पाल्य काय करतो आहे ह्या कडे कटाक्षाने लक्ष देण्याची नाही तर मग तरुण वयात प्रेम नैराश्य येऊन आत्महत्या केलेले खुप सारे प्रकरण आपल्याला दिसतात. म्हणून नकार पचवून पुन्हा आपल्या ध्येयासाठी सक्षम पणे उभे राहणे हे खुप मोलाचे ठरते.


source: INTERNET
-वाल्मिक फड
नाशिक

         आजकाल एखाद्या व्यक्तीला कोणी कशासाठी नकार जर दिला तर  समोरच्या व्यक्तीला खुप राग येतो.नकार जर नाही पचवता नाही आला तर ह्या जगात हाहाकार माजेल,कुणी कुणाचे एैकणार नाही.नकाराचे एक ऊदाहरण सांगायचे झाले तर,काॅलेज मध्ये शिकणारी तरूण,तरूणी त्यांची मैत्री जुळली,एकमेकांकडे बघायला सुरूवात झाली,एकत्र जेवणे एकत्र फिरणे प्रसंगी त्यांची रात्ररात्र एकत्रच रहाणे असे प्रकार सुरू झाले.पुढे पुढे याचा परीणाम असा झाला की,त्या तरूणाकडून ती तरूणी प्रेग्नेंट राहीली.बघा झाली ना पंचायत?झाले डोक्यात विचार सुरू काय करायचे काय नाही असे असंख्य प्रश्न.तरूणीने सांगीतले तुला माझ्याशी लगेच लग्न करावे लागेल! ह्याला मोठा प्रश्न पडला काय करावे काय नाही काही सुचेना.शेवटी त्याने हिंमत करून आपल्या वडीलांना फोन केला,झालेला सर्व प्रकार सांगितला.वडीलांनी स्पष्ट शब्दात सांगितले की,तु एका परजातीय मुलीशी हा विवाह करू शकत नाही.हा वडीलांनी दिलेला नकार त्याला काही पचवता आला नाही.पर्यायाने त्याने आत्महत्या करून टाकली.बघा अशा प्रकारचे अनेक नकार हे आपल्या आयुष्यात येत असतात पण आपण असे खचून न जाता येणार्या संकटाचा सामना केला पाहीजे.


source: INTERNET
-विकास येवले
पुणे

शैलजा तशी मोकळ्या स्वभावाची अगदी थोड्या वेळात कुठेही मिसळून जाईल. सागर तिचा लहान पणीचा मित्र अगदी नेहमीच सोबत राहणारे ते स्वाभाविक तीच त्याच्याशी बोलणं वागन आपुलकीच काळजीच. त्याच्या सुख-दुःखात, चांगल्या-वाईट वेळात त्याला गरज असताना नेहमीच त्याला तिचा अधार देणं, मैत्रीचं अन फक्त मैत्रीचच निखळ नात तीच मनापासून जपन, कधीही त्याच्याविषयी प्रेम भावना तिच्या मनात नव्हतीं, पण तिच्या वागण्याचा अर्थ सागर ने चुकीचा त्याच्या सोई नूसार लावावा. प्रेमात पडला तो तिच्या, मान्य आहे प्रेम भावना वेगळी कोणाला कधी, कुठं, कस, कोणावर प्रेम जडेल सांगता नाही येणार. कळायच्या भावना त्याच्या तिलाही, कदर होती तिला त्याच्या प्रेमाचीही पण परिस्थिती म्हणा की तिचा निर्णय, की तिचे ते संस्कार पण शेवट तेच खर.
तिला ही असेलच ना रे अधिकार स्वतःचा निर्णय घेण्याचा... तिलाही असेलच ना रे हक्क स्वतःच्या भावना व्यक्त करण्याचा... तिलाही असेलच ना रे काळजी बापाच्या ताठ माणेची, आईच्या संस्कारी पदराची... जेव्हा निर्णय घेता वेळी त्या मुलीचा त्या नात्यास नकार असावा तर मात्र त्या मुलाने काय करावं..? तिच्या साठी दुःखात बुडाव तिला मिळवण्यासाठी जीवाचा आकांत करावा..? की मरावं..? माझ्या मते मुळीच नाही.
कारण प्रेम भावना ती व्यक्ती आपलीच व्हावी यात नसते तर तिला सुखी पाहून स्वतः सुखी का राहण्यात असते.
जितक्या मोठ्या मनाने तिला विचारता ना तितक्याच मोठ्या मनाने तिच्या निर्णयाचा आदर ही करावा.
सूंदर दिसतात की चंद्र तारे दुरून प्रेम करतो की आपण त्यांचा वर खूप तरीही न मिळून छान वाटत त्यांना फक्त बघून तसच मनाच्या खोलीत जपावं ते प्रेम अखेर पर्यत गोड आठवणीत तिच्या/त्याच्या सागर ही तेच करतो आजही ते बोलतात चांगले मित्र म्हणून आजही त्यांच ते नात तसच आहे मैत्रीचं पेक्षा खूप जास्त प्रेमा पेक्षा थोडं कमी..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************