उद्योजकता नवकल्पना



विषय क्र ४ : उद्योजकता नवकल्पना

शिरीष उमरे, नवी मुंबई
निखिल खोडे, ठाणे
महेश एम. कामडी, नागपूर
श्रीकांत निवल यवतमाळ
हरिश पोटे
अजय तळेकर
शीतल शिंदे, दहिवडी जि .सातारा 
पवन खरात, अंबाजोगाई
अनिल गोडबोले, सोलापूर
राकेश पवार , मालेगाव
यशवंती होनमाने, मोहोळ
हरीदास यादवमंगळवेढा,जि.सोलापूर
नरेश शिवलिंग बदनाळे, जि.लातुर






उद्योजकता नवकल्पना.
शिरीष उमरे, नवी मुंबई


पुर्वी ग्रामीण भागात शेती मुख्य व्यवसाय असायचा व त्याला प्रेरक कींवा आधारित बरेचसे व्यवसाय असायचे. त्याकाळी त्या व्यवसायिकांना नारु/कारु कींवा अलुतेदार/ बलुतेदार म्हणायचे. ही सर्वसमावेशक सेवा पुरवणारी उद्योजकीय व्यवस्था उत्कृष्ट दर्जाची असायची. ह्यात कुंभार, लोहार, सुतार, सोनार, चांभार, तेली, माळी, न्हावी, परीट, कोळी, गवळी कास्तकार अशी बारापगडी कारभारी व्यवस्थेमुळे खेडी स्वयंपुर्ण असायची.

नंतरच्या जागतिक औद्योगिकरणांमुळे कारखाने व शहरे ह्यांचा विकास होत गेला. रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध होत गेल्याने शहराकडे धाव वाढत गेली व खेडी भकास होत गेली. पाश्चीमात्य चंगळवादी जीवन शैलीकडे आकर्षित नवी पीढी आपली संस्कृती विसरुन गेली. कार्पोरेटच्या नोकरी रुपी गुलामीत धन्यता मानु लागली... दुरसंचार तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे जग एक ग्लोबल व्हीलेज झाले. व्यापारिकरणाचे दुष्परिणाम जाणावायला लागल्यावर मिडलक्लास लोकांची कुंचबणा झाली... इकडे आड तिकडे विहीर... ज्यांना शक्य होते ते विकसीत देशात निघुन गेले व काही गांधींचा चला खेड्यांकडे ह्या मार्गावर चलण्याचा प्रयत्न करताहेत. बाकी आठ-दहा तास न आवडणार्या कामात मरमर मेहनत घेऊन हवापाणीअन्न प्रदुषणाचे चटके सहन करत कसेबसे जीवन घालवत आहेत.

भविष्याचा विचार केला तर ८०% परंपरागत नोकरीच्या संधी ह्या एआय (artificial intelligence) व रोबोटमुळे संपनार आहेत. डॉक्टरच्या ऐवजी रोबोट सर्जरी करतील तर मग कामगार वर्गाचे काय होईल ह्याचा विचार न केलेला बरा !!

मग अश्या वेळी काय करावे हा यक्षप्रश्न युवा पीढीसमोर आहे. उद्योजक विकासाच्या नावाखाली स्वातंत्र्यानंतर शासनाने काय दिवे लावले ते दिसतच आहे. शिक्षणाच्या नावाखाली डीग्रीची पुंगळ्या घेऊन बेरोेजगारांच्या झुंडी सगळीकडे फीरतांना दिसत आहेत. पोलीस भरतीच्या वेळी लाखो मुलांच्या गर्दीत इडली विकणारा केरळी, पुरीभाजी विकणारा सरदार कींवा केळे विकणारा युपीवाला भैया बघितले तर एक आशेचा कीरण दिसतो. गरज ही व्यवसायाची जननी असते म्हणतात ते उगीचच नाही. 

जरी आपल्या देशामध्ये संशोधन विकासाची बोंब आहे तरीही मी म्हणेन की सध्या त्याचीच नितांत गरज आहे. आपल्याला हवेत लाखो राँचो ( ३इडीयट फेम ). छोटे छोटे व्यावसायिक व देशी तंत्रज्ञान ( जुगाड नाही) यांची सक्त गरज आहे देशाला ! उद्योग काही रॉकेट सायन्स नाही. कोणीही शिकु शकतो व करु शकतो.

शासनाने डीसेंट्रलायजेशन व आर अँड डी वर पॉलीसी डीझाइन करायला हव्या. शिक्षणाचे थेअरी ऐवजी प्रॅक्टीकल असे स्वरुप व्हावे... 

शिक्षणासोबत जॉब व नंतर स्वतंत्र व्यवसाय हा मार्ग सध्यातरी योग्य वाटतो. त्यासाठी हवी घारीसारखी नजर.. संधी शोधत राहणे, अनुभव वाढवत राहणे व योग्य वेळ साधुन प्रगती करणे.. हा मंत्र युवांसाठी... 
त्यासाठी हवे विस्त्रुत वाचन व योग्य लोकांसोबत नेटवर्क.... बघा आभाळएवढे स्वप्न व फुटु द्या तुमच्या कल्पनेला भरारीचे पंख !! 

उद्योजकता नवकल्पना.
निखिल खोडे, ठाणे.

एखाद्या व्यक्तीने व्यवसायात विशिष्ट कौशल्य मिळवले असेल तर त्याला उद्योजकता नवकल्पक म्हणता येईल. व्यवसाय करताना उत्तमरित्या कसा करता येईल, त्यासाठी नवीन इनोव्हेटिव्ह विचारांची करण्याची नेहमीच गरज असते.


एखाद्या वस्तु मध्ये योग्य प्रक्रिया केली तर, त्या वस्तूची किंमत दुप्पट होते. उदाहरणार्थ तूरी पेक्षा तूर डाळची किंमत जास्त असते. घरीच डाळ बनवली आणि सप्लाय चेन निर्माण करून विक्री केली तर चांगल्या भावात जाईल. 

तसेच भाजीपाला, फुल व फळ आणि सी फुड सोलर ड्रायर ने वाळवुन त्याची शेल्फ लाइफ व कींमत वाढते. नंतर मार्केट व डीमांड नुसार विकता येतो.

एखाद्या शहरात छोट्या जागेत छोट हॉटेल किंवा रेसटॉरंट्स टाकून ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने आपण आपला व्यवसाय उक्तृष्ट रित्या करू शकतो.

आदिवासी भागात कडकनाथ कोंबडी व अंडे हा सुध्दा विक्री व्यवसाय सध्या जोमात सुरु आहे.

ग्रामीण भागात बायो कम्पोस्टेबल सॅनिटरी नॅपकीन्स चे उत्पादन कमी गुंतवणुकीतुन करता येऊ शकते. बांबु पल्प व उसाचा चिपाड/बगास आणि केळीचे खोड असा कच्चा माल कमी कीमतीत मिळु शकतो. 

व्यवसाय करताना व्यावसायिक वृत्ती, नवीन कल्पना वापरून व्यवसायासाठी प्रयत्नशिल असणे, कष्ट, आशावादी विचार, पैश्याचा आवक-जावक वर बारकाईने लक्ष ठेवणे या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. 

महेश एम. कामडी, नागपूर 
उद्योजकता नवकल्पना

आज आपण पाहत असाल तरुण पिढी ही नोकरी व फक्त सरकारी नोकरी कडे जास्त भर देत आहे असं दिसून पडत.
येवढाच नाही तर लग्न जरी करायचं म्हतल तर मुलगा काय करू जॉब करतो का
जॉब करतो तर सरकारी जॉब आहे का
पण उद्योग, व्यापार करत असेल तर का? चालत नाही का? का असे वागतात लोक
उद्योजकता नवकल्पना तर नाही म्हणता येणार फक्त आपण नव्याने सुरू करण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे मराठी माणूस
कल्पना तर जुनीच आहे फक्त दृष्टिकोन नवा ठेऊन समोर जायचं आहे. आज काय नाही आपल्या महाराष्ट्रात सर्वच आहे तरी म्हणतात मराठी माणूस उद्योगात मागे आहे का
पण असे नाही आज महाराष्ट्रीयन माणूस सुद्धा उद्योजकता वर्चस्व प्रस्थापित करण्यास मागे नाही.
आज भाजीपाल्याच्या छोट्याशा ठेल्यापासून D - mart पर्यंत सुधा गेला आहे. ओद्योगिक क्षेत्रातही आपली थाप मारत आहे मराठी माणूस.
"केल्याने होत आहे आधी केल्याची पाहिजे"
फक्त स्वतःवर विश्वास हवा, जग आपल्याच हातात आहे मग




उद्योजक्ता नवकल्पना.
श्रीकांत निवल यवतमाळ
आजच्या जगात बेरोजगारी हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या मागील कारण म्हणजे आपल्या देशातील शिक्षण पद्धती. आपल्या देशात जे काही नवीन आले की सर्व त्याच्या मागे धावतात मग त्या साठी वाटेल ते करतात.वडील सुद्धा हा विचार करीत नाही की आपल्या मुलाला हे झेपेल की नाही व मग तो का एकदा मागे पडला की तो तिथेच थांबला. अशी आमच्या ग्रामीण भागातील मुलांची अवस्था झाली आहे. इंजिनिअरीग चे मुले खाली आणि ITI ची मुले खूप पगार घेत असल्याचे चित्र दिसत आहे.एखाद्याने जर एखादा धंदा टाकला की लगेच दुसरा पण तोच धंदा टाकणार मग दोघेचे धंदे हो अगर ना हो अशी आजची परिस्थिती आहे.
असो विषय भरकटत जात आहे.उद्योगजकाता नवकल्पना या विषयावर लिहायचे झाले तर देशातील ग्रामीण भागात शेतीवर आधारित लघुउद्योग युवकांनी करण्याची गरज आहे.विशिट भागात विशिष्ट पीक घेतल्या जाते. जसे आमच्या विदर्भ मध्ये तूर सोयाबीन आणि कापुस पिकण्याचे प्रमाण जास्त आहे परंतु या पिकांना भाव नसल्याने शेतकरी आत्महत्या चे प्रमाण पण जास्त आहे. जर जर या पिकांवर जर त्या भागातील युवकांनी इंटरनेटच्या माध्यमातून लघुउद्योगाचा शोध घेऊन काही लघुउद्योग उभे करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपआपला कुवतीनुसार सहभाग देने गरजेचे आहे.शक्य झाल्यास सरकारी योजना चा वापर करून घेता येईल. अगदी जवळच्या ठिकाणी योग्य प्रक्रिया करून सेल करून शेतकऱ्यांना जास्त भाव मिळत असेल तर बेरोजगाराना काम मिळेल व शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल.व आत्महत्यचे प्रमाण कमी होईल. नाहीतर सरकारने सोयाबीनचे हमीभाव ठरला आहे 3399रुपये आणि मार्केट देत आहे 2800 ते2900रुपये या मध्ये शेतकऱयांचा खर्च पण निघत नाही.जर अश्या लघुउद्योगातून विशिष्ट प्रक्रिया करून एकाच दगडात दोन पक्षी मारले जाऊ शकत असेल तर काय हरकत आहे.फक्त आता गरज आहे युवकांनी पुढाकार घेण्याची व नवीन उधोजक संकल्पना साकारण्याची.असे माझे वयक्तिक मत आहे.


उद्योजकता नवकल्पना
हरिश पोटे

उद्योग आणि उद्योजक म्हटलं की मनामधे आपसूक शहराचा विचार उतरतो
भारत हा युवकांचा देश, पण आज सरासरी पेक्षा ज्यास्त युवकांच्या मानसिकतेचा विचार केला तर आपल्याला समजते की आजचे युवक संकुचीत होत चालले आहेत विचारांच्या बाबतीत. नोकरशाहीच्या गुलामीचे शिकार होताना दिसतात, कमी वेळात पैसा कमावणे हे त्यांचे जणू धेय्यच बनल आह कीे काय ही शंका उदभवते कित्तेकदा. तर काही युवक परिस्थिशीची झगडताना दिसतातं. याहीपलिकडे जावून काही जन व्यवसायाचा विचार करतात आणि शेवटी शहराकडे वळताना दिसतात, मग शहरी लोकांची गरज, शहरातील गजबजलेला भाग, भांडवल, त्यावर आधारीत फायदा, आणि तोटाच झाला तर.. असे वेगवेगळे विचार घोंगावून लागतात..

पण शेती हा आपला मुख्य व्यवसाय आहे, त्याकडेही लक्ष वेधले गेले पाहीजे. पण आज तरूण उच्च शिक्षण घेऊन नोकरी साठी शहराकडे वळतात आणि तिथे वेगवेळ्या संधी शोधू लागतात आणि इथेही काही संधी न मिळाणारे स्पर्धा परिक्षांची तयारी करतात म्हणजे संपूर्ण प्रयत्न नोकरी भोवती फिरतात.

धेय्यवादी व मार्गदर्शक नेत्रृत्वाचा आणि शासनाच्या पोकळ नियोजनाचा परिणाम दिसतो. पण सध्याची नैसर्गिक परिसथिती पाहता शेती हा व्यवसाय देखिल अभ्यासपूर्वक करावा लागेल. त्याकरता सहकार चळवळीला पुनरोज्जिवीत करण्याची गरज पुन्हा भसते. तसेच संघटीत होऊन शेती सारखा व्यवसाय अभ्यासयुक्त उभा होऊ शकतो. तसेच वेगवळे लघु उद्योगांमधे उतरण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण शासकीय योजनांनद्वारे आपण मिळवू शकतो त्यासाठी तत्पर, चिकीत्सक, आभ्यासक व सतर्कता असे स्वभावगुण अंगीकीरण्याची क्षमता हवी. सतत समाजातील वेगवेगळ्या घटकाच्या संपर्कात व संवाद साधता यायला हवा या मधून नवनविन संधी व व्यवसायच्या कल्पना मिळतात. त्याचबरोबर पारंपारीक उद्योगही नवनवीन संधी उपलब्ध कारतायत त्यांना योग्य बाजारपेठ मिळवून देण्याची आवश्यकता आहे. शिक्षणाच्या बंधनाच्या मानसिकतेमधून बाहेर पडण्याची गरज आहे. शिक्षण हे बुद्धीला संमृद्ध करते नोकरीच्या क्षेत्रांबद्दल मर्यादा निर्माण करू शकत नाही. वेगवेगळे अनुभव आत्मसात करणे महत्वाचे आहे यातूनच एक उत्तम उद्योजक तयार होतो. 

शासनानेही त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडून धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. आैद्योगिक क्षेत्राचे झालेले केंद्रियकरण हे भक्त शहरांचाच विकास करू शकते. वेगवेगळे उद्योग हे ग्रामीण भागामधे देखिल घेऊन जाणे तेवढेच महत्वाचे आहे. भरभक्कम आरक्षित औद्योगिक क्षेत्र असण्यापेक्षा छोटी छोटी अंतराची मर्यादा असलेली औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मोठे उद्योग वेगवेगळ्या भागामधे पसरून रोजगार निर्मीतीतर होईलच पण विकास मोठ्याप्रमाणात होण्यास मदत होईल. तसेच आपल्या भागामधे आलेल्या उद्योगाला जोडउद्योग किंवा लघुउद्योगाच्या प्रेरणा युवकांना मिळतील आणि यामधून देखिल यशस्वी उद्योजक देश्याच्या विकासात हातभार लावतील..




अजय तळेकर
उद्योजक्ता नवकल्पना.

मित्रांनो आज सर्वच लोक हे नोकरी पाठी चालले आहे ,पण तोच प्रयत्न जर स्वताचा उद्योग उभा करण्यासाठी केला तर ना आपला कोण बॉस असेल ना आपन कुणाचे गुलाम असू.नोकरी करुण आपन जितकी इनकम मिळवनार त्यापेक्षा जास्त इनकम आपन आपल्या स्वताच्या व्यवसायात निर्माण करु शकतो सर्व आपल्या कामावर डिपेड़ आपन काय करतो .आणि व्यवसाय करायचा म्हटल तर कोणत्याही एका व्यवसायवर अवलंबून राहु नये त्या व्यवसयाला जोड धन्दा करावा म्हणजे हातामधे एक हातचा घेऊन काम करावे,

पण उद्योग करावा कसला
हा प्रश्न सर्वाणपुढे पडतो आपन जी गोष्ट करु शकतो ना अश्याच गोष्टीचा उद्योग व्यवसाय उभा करावा ,
जसे की शेतकरी बांधवाणी शेतीला जोडून पूरक असा दुग्ध व्यवसाय करावा ,पोल्ट्री फार्म करावे ,शेळीपालन करावे ,शहरी मंडळीनि शहर ठिकाणी कपड़ा दुकान मोबाईल शॉप हॉटेल .असे बरेच उद्योग असता त्यांची कमी शोधून तो व्यवसाय चालू करावे .
पण व्यवसायसाठी लागणारे भांडवल हे पहिल्यांदा कमी गुंतवणुकीतून करावे म्हणजे ना लॉस जाण्याची चिंता ना काय ,येणाऱ्या इनकम मधे आपले आर्थिक भांडवल जास्त गुंतवून उद्योग पण मोठा करता येतो ,
एक कोम्बडी एक अंडे देते त्या एका पासून त्याचे किती होता हे तर महितच असेल सर्वाना ,फक्त एकदा तुम्ही स्वताच्या हिमतिवर प्रयत्न करा लाइफ सक्सेस होईल शेवटी प्रयतनार्थी परमेश्वर.

ऊद्योजक्ता नव कल्पना 
शीतल शिंदे .
दहिवडी जि .सातारा 

आजची वाढती लोकसंख्या लक्षात घेता आणी मार्क्स , मेरीट , स्पर्धा , लक्षात घेता नोकरी मिळणे मिळवणे फार अवघड झाले आहे .
सुशिक्षित - बेरोजगारी वाढलेली पहावयास मिळते .आणी नव तरुण नोकरी न मिळाल्याच्या निमित्ताने भरकटतात .कोणी विचारले की स्वतःच्या पायावर उभे रहायचे प्रयत्न करतोय हे उत्तर . 

अरे दादा तु आत्ताही स्वतः च्या पायावरच उभा आहेस फक्त तुला आजूबाजूला पाहून तु तूझे पाऊल उचलायचे आहेस .

बघा जरा डोळसपणे आपल्या सभोवताली .वाडी वस्तीवर असाल तर शेतीबरोब छोटे दुकान, टफरि , दूध कलेक्शन , शेती मालासाठी चार चाकी ,शेलीपालण , कुकुट्पालण , फळबाग , फळ बाग विकत घेवून शहरात ताजे फळे भाजी पुरवणे इत्यादी व्यवसाय करू शकतात .

छोट्या गावात कापड दुकान -कफन सहित असावे .किराणा दुकान उन्हाळ्यात थंड पेये वाहतुकीचे वाहन व्यवस्था इत्यादी. 

निमशहरी भागात मुलांचे क्लास ,कराटे क्लास , डान्स , शिलाई , कापड दुकान , मुलांचे ड्रेस कोड ऑर्डर घेणे _ गारमेंट , पार्लर , ज्वेलरीआणी पुन्हा किराणा दुकान इत्यादी .

शहरात ngo मधे भरपूर कामे जॉब मिळतात .फक्त कष्ट करायची तयारी ठेवा .त्याबरोबर रूम भाड्याने पाहणे , प्लँट प्लॉट
विकणे , भुसार मालाचा व्यापार , नेट - काँप्युटर सेंटर , टायपिंग सेंटर , मोबाईल शॉप इत्यादी व्यवसाय करू शकता .

खरेतर व्यवसाय निवडताना तो परिसर , ठिकाण त्याची भौगौलीक परीस्थिती , मागणी - पुरवठा आणी खप याचा विचार करणे गरजेचे आहे .

उच्य शिक्षण , त्यानंतर नोकरी , शेती - व्यापार - उद्योग आशा पध्हतीणे काम करणे गरजेचे आहे .

दुष्काळात टँकर ने पाणी पुरवणे , भुसार माल पुरवणे ईत्यादि .

जश्या प्रकारे किराणा दुकान वाला अनेक वस्तु आपल्या दुकानात ठेवतो तश्या प्रकारे आपल्या उदरनिर्वाह साठी आपल्या डोक्यात अनेक प्रकारचे उद्योग करण्याचे विचार येणे गरजेचे आहे .एकमेकांना पूरक असे व्यवसाय बरे पडतात .
महिलांसाठी भरत काम शिवणकाम , ज्वेलरी इत्यादी .

नोकरी नोकरी नोकरी नाही मिळाली तर काय करणार .मग हे करा नक्कीच जमेल .



उद्योजकता नवकल्पना
पवन खरात, अंबाजोगाई.
खरं तर नौकरी आणि व्यवसाय या दोन भिन्न टोकाच्या गोष्टी आहेत. अनेकांना नौकरी मध्ये आवड असते तर काहीना नोकरीची बांधीलकी नको वाटते म्हणून व्यवसायात आवड असते, पण काही लोकांना नोकरी मिळत नाही म्हणून व्यवसाय करावा लागतो.
पण मला एक वाटत नोकरी म्हणजे सर्वस्व आहे असं नाही किंवा नौकरी नाही म्हणून तुम्ही बेरोजगार आहेत असे नाही. नोकरी व्यतिरिक्त असे अनेक व्यवसाय आहेत ज्यावर तुम्ही तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा उत्तमरित्या उदर निर्वाह करू शकता.
व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे तुमची तीव्र ईच्छा शक्ती महत्वाची असते, आज ही भारत देशात नौकरी करणाऱ्या लोकांपेक्षा व्यवसाय करणारे लोक पुढे आहेत. आपल्याकडे अनेक उत्कृष्ट व्यावसायिक लोक आहे ज्यांनी खूप हालाकीच्या परिस्थिती मध्ये व्यवसायाची सुरवात केली, आज त्यांची स्थिती काय आहे आपणास चांगले ठाऊक आहे. उदा. रतन टाटा, अंबानी.

पैसा कमावण्यासाठी फक्त उच्च शिक्षण लागते असे नाही, ज्याला शिक्षणात रस नसेल तर त्याला व्यवसायात आवड असू शकते. पालकांना सुद्धा एक विनंती आहे, तर आपल्या पाल्याला शिक्षण आवड नसेल तर त्याला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात करियर करू द्या. त्यात व्यवसाय असेल किंवा क्रीडा क्षेत्र असेल.
"काही नौकर वर्गाला वाटतो व्यवसाय करणारा खूप सुखी आहे आणि व्यवसाय करणाऱ्या काही जणांना वाटत की नौकर वर्ग खूप सुखी आहे." पण नेकम अस नसतं. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. काही उणिवा असतात काही फायदे असतात.
पण जर आपल्या नोकरी मागणाऱ्या पेक्षा नौकरी देणारे होता आले तर काय हरकत ?

तस मला व्यवसायातील जास्त माहिती नाही
ईच्छा तशी खूप होती पण कधी योग्य आला नव्हता. पण आमच्या सुमेध आणि ईश्वर नावाच्या या दोन मित्रा मुळे मी या क्षेत्राकडे वळलो आणि तिघांनी मिळून छोटीशी सुरवात म्हणून फ्रेंड्स फास्ट फूड नावाचे एक कॉफी शॉप ची सुरुवात के

ली. सुरवात करताना बराच विचार केला की आपण जे करतो आहेत ते योग्य करतो आहेत का ? पण शेवटी एक निर्णय झाला की ,झाले तर नुकसान होईल नाही तर अनुभव तरी येईल.

"मुश्किले तो मन्नत से मांगी है,
जिंदगी इस रेस में डरना मना है।
सपनो को सांसो मे बसाना है,
अब डर को ही हर कदम डराना है । "


उद्योजगता नवकल्पना..
अनिल गोडबोले
सोलापूर

नोकरी करणे हा प्रकार सगळ्यात आवडता.. सेफ.. आणि जबाबदारी नसलेला प्रकार..

आपल्याला दुसऱ्याला दोष देत जगायला आवडत.. कारण कोनितरी आहे ज्यांच्याकडे बोट दाखवून आपण वाट्टेल तेवढं काम कमी पैशात कुरकुर करत केलो तरी एका प्रमोशन वर समाधानी राहणारा व तशी मानसिकता ठेवून शिक्षण देणारा एक वर्ग आहे...त्यातला मी देखील एक आहे.

उद्योजग असणे किंवा होणे हे व्यक्तिमत्व नसून.. ती एक जीवनशैली आहे.

काहीतरी कल्पना डोक्यात आणून प्रत्यक्ष लोकांच्या मनात ती उतरवणे आणि बाजारात आणणे या साठी प्रचंड कल्पकता, जिद्ध आणि हार न मानण्याची वृत्ति लागते.. व ती उद्योजक झाल्यावर येते.

एक काळ होता तेव्हा.. एक गोष्ट घ्यायची किंवा कल्पना घ्यायची.. मांडायची, मार्केटमध्ये आणायची.. प्रचंड जाहिरातीच्या जोरावर.. 2 रुपयांची वस्तू 3 किंवा 5 रुपयाला विकायची. फारच वाटलं तर प्रक्रिया करायची.. 

पण आता हे स्वरूप मागे पडत आहे. आपल्याला आपल्या वस्तूच ब्रँडिंग करता येणं गरजेच आहे, आणि तीच 2 रुपयांची वस्तू 100 रुपयाला विकण्याची तयारी ठेवावी लागते.. याला म्हणतात नवीन कल्पना (इंग्लिश मध्ये याला इंटरप्रूनेर शिप म्हणतात)

कल्पना काढा.. व्हर्च्युअल विका.. लोकांना उपयुक्त आहे हे पटवून द्या.. या मध्ये सेवा देणाऱ्या संस्था नफ्यात आहेत..

सोशल मीडिया मार्केटिंग करा.. ऑनलाईन हा नवीन ट्रेंड किंवा इ- कॉमर्स आहे..यावर काम।करू शकतो.. दरवेळी परदेशी लोकांना दोष देऊन उपयोग नाही..

फक्त या साठी संयम पाहिजे.. खरतर जीवनशैली आणि विचार त्या पद्धतीने पाहिजेत. पैसे उभे करण्यासाठी योग्य पद्धत आणि योग्य 'आर्थिक साक्षरता' पाहिजे ते शिकता येऊ शकत..

रॉबर्ट कियोसकी यांचं 'रिच डॅड पुर डॅड' वाचलं.. त्यात एक गोष्ट कळली की श्रीमंत लोकांबाबत भ्रामक कल्पना ठेवल्यात आपण त्या सोडल्या पाहिजेत

आणि सगळ्यात महत्त्वाचं भावनिक गुंतवणूक पाहिजे.. तुम्ही तुमचया सेवे बद्दल, व्यवसायात, कर्मचारी व प्रोडक्त या सर्वांना भावनिक आवाहन करून टिकवता आलं पाहिजे..

बाजारात विकण्याचे कौशल्य असेल तर कुठलीही नवनिर्मिती करू शकतो... नवीन उद्योजक उभे राहतील स्टार्ट अप मधून किंवा.. आपण चांगला धडा घेऊन अजून परिपक्व होऊ शकतो.. 
काळाची पावले ओळखा आणि उद्योजक व्हा...!!!!


उद्योजगता नवकल्पना
राकेश पवार 
मालेगाव 

आज सर्वाच 1च लक्ष असते की चांगला जॉब हवा अणि सर्व मूल मूली इंजीनियरिंग मागे लागतात कारण प्रत्येकाला 1 चांगला जॉब हवा असतो 
पण मूल उधोग क्षेत्राची का नहीं निवड करत मि मनतो उधोग म्हटले तर भांडवल लगते यामुळे कोणी उधोग करत नही पन मित्रा नो उधोग म्हणजे अपन स्वता त्याचे मालक ना की कोणाची गुलामी सरकी नोकरी उधोगासाठी आपले सरकारने नवनवीन योजना देत आहेत जसे की मुद्रा योजना स्वताचा व्यवसाय करता येईल त्या साठी आपले सरकार आपल्याला पैसे देतात 

आता शेती ला जोड़धंदा म्हणून दूध उत्पादन कुकुट पालन इत्यादि आज 1 चांगला व्यवसाय म्हणून हॉटेल्स खुप कही आहे करायला पन म्हणतात ना जिद्द अणि हिम्मत असावी लागते

मित्रानो माजा हा पहिलाच लेक आहे म्हणून माप करा चुकी झाली असेल तर 
धन्यवाद



उद्योजकता नवकल्पना
यशवंती होनमाने.
मोहोळ ...

'अरे नसते ते भीकेचे डोहाळे लागलेत , चांगली नौकरी सोडून म्हणे उद्योग करायचाय ' अस ऐकायला मिळत ज्यावेळी आपण नौकरी सोडून धंदा करायचा म्हणतो ...किती अवघड आहे ना ? ? ? आपण मुलांना स्वावलंबना चे धडे देतो आणि आपणच त्यांना गुलाम बनवतो ...नौकरी म्हणजे सुख आणि धंदा म्हणजे डोक्याला कटकट , वैताग , नुकसान , टेनशन , अस वाटत .
आपण कधी चांगला विचार च करत नाही ..अहो छोट्या मोठ्या उद्योग धंद्या मधूनच सरकारला जास्त महसूल मिळतो .उद्योगात जम बसेपर्यन्त थोडा त्रास हा होणारच ..नौकरी मध्ये पण होतोच की सुरवातीला त्रास ...पण एकदा का जम बसला मग त्याच उद्योगाची भरभराट होते ...अहो म्हणतात ना की बोलणाऱ्याचे खराब गहू पण विकतात ...अगदी तसेच स्किल्स पाहिजेत मग बघा ....
उद्योग धंद्यात फक्त स्वतःला सिध्द करता आल पाहिजे ..तुम्ही कशाचाही उद्योग करा पण ....मार्केट मध्ये टिकून रहा ....


उद्योजकता नवकल्पना.
हरीदास यादव,
मंगळवेढा,जि.सोलापूर.

कोणताही नविन उद्योग करत असताना कांही गोष्टी खुपच महत्त्वाच्या असतात.

१) सळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जो उद्योग आपण करणार आहोत त्याची मनापासून आवड आसने गरजेचे आहे.

२) जो उद्योग निवडलेला आहे, त्याचे संपूर्ण ज्ञान असले पाहिजे.

३) आपण निवडलेला उद्योग यापूर्वी कुणी केला आहे का ते पाहिले पाहिजे, तो चालू आहे का ते पहावे जर बंद असेल तर तो का बंद आहे त्याची कारणे शोधून त्याच्या मुळापर्यंत जावून अभ्यास करावा लागेल.

४) कोणताही उद्योग असूद्या त्याची सुरुवात शक्य तेवढ्या लहान स्वरूपात करणे चांगले, कारण बाजापेठेचा अंदाज घेऊन पुढे उद्योग वाढवता येतो.

५) उद्योग भागीदारीत असो अथवा वैयक्तिक, सुरुवातीपासून हिशोब काटेकोरपणे ठेवणे फार गरजेचे असते.

६) शासन स्थरावरील सर्व परवानग्या, व अनुदानाविषयी माहिती करुन घेणे व योग्य वेळी कागदपत्रांची पुर्तता करणे गरजेचे असते.

७) शासकीय अनुदान हे उद्योगाला प्रोत्साहन देणेसाठी असते, ते आपल्या नफ्यात मोजू नये,त्याचा वापर संकट काळातील पुंजी म्हणून केल्यास खुप मदत होते.

८) अनुदान मिळतय म्हणून जर कोणी उद्योग करत असेल तर त्यांनी उद्योगात पडू नये. करण असे उद्योग बंद पडले आहेत.

९) बाजापेठेचा अभ्यास करुनच उद्योगाला सुरुवात करावी,उद्योगाची उभारणी करुन बाजाराचा शोध घेणे जिकिरीच काम होवू शकत.

१०) दर्जेदार उत्पादनाबरोबरच योग्य जाहिरात करणे ही महत्त्वाची बाब आहे. तसेच कोणत्याही उद्योगातील नफा-तोटा ३६५ दिवस म्हणजे एक वर्ष कळत नसतो, म्हणून एक वर्ष स्थिर राहून चिकाटीने,काटकसरीने व धैर्याने उद्योग करणे गरजेचे असते.

सर्वसाधारण पणे एवढ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर, उद्योगाचे यश व भरभराट याची देही याची डोळा पहायला मिळेल.

*तरुणाईची वेल कल्पकतेच्या जोरावर उद्योगाच्या यशशिखरावर विराजमान होवो,हिच सदिच्छा ...!*

उद्योजकता नवकल्पना...
नरेश शिवलिंग बदनाळे, जि.लातुर

मुळात उद्योजकता हा शब्दच खुप जड आहे...उद्योग सुरु करण्याच्या कल्पनेपेक्षा आणि उद्योग सुरु करण्याची कल्पना ही जेवढी सोपी वाटते तेवढी नाही असंही खुप जणांच मत असते हो आहेत ते बरोबर,कारण म्हणन्या इतके करणं सोप्प नाही आणि हे तितकंच खोटंपण आहे कारण जिद्द,मेहनत,चिकाटी,यासोबत हे इतके अवघड पण नाही...चला तर मग आपण त्याच्या अ आ ई कडे वळुया उद्योग,व्यापार,व्यवसाय,धंदा अशा अनेक नावांनी उद्योगाला ओळखलं जातं उद्योग म्हणजे काय तर अर्थशास्त्रात उद्योग ह्या शब्दाला मर्यादित अर्थ आहे. ह्या संदर्भात उद्योग म्हणजे ज्या उत्पादनसंस्थांत नैसर्गिक साधनसामग्रीवर प्रक्रिया करून उपभोग्य किंवा पुढील उत्पादन प्रक्रियेस उपयुक्त, असा एकच प्रकारचा माल निर्माण केला जातो, अशा उत्पादनसंस्थांचा समूह.हे कदाचित सर्वांना ठाउक आहेच,उद्योगाचे प्रामुख्याने ३ प्रकार पडतात प्राथमिक, द्वितीयक व तृतीयक विभाग. हे वर्गीकरण प्रामुख्याने या तीन विभांगातील उत्पादनाचे स्वरूप व त्यातील मानवी श्रमाचा भाग, ह्या दोन गोष्टी पुढे ठेवून केले आहे. प्राथमिक विभागातील कृषि-उद्योग, खनिकर्म, जंगल उद्योग, मच्छीमारी ह्यांचा जो तयार माल उपलब्ध होतो, त्यात निसर्गदत्त देणगीचा वाटा मोठा असून मालावरील प्रक्रियेत मानवी श्रमाचा भाग मर्यादित असतो. द्वितीयक विभागात नैसर्गिक साधनसामग्रीवर प्रक्रिया करून तिचे उपभोग्य वा पुढील टप्प्यांच्या वस्तूंच्या उत्पादनास योग्य, असे रूपांतर केले जाते. ह्या विभागात इतर आर्थिक व्यवहारांबरोबर अवजड उद्योगधंदे, भांडवली उद्योगधंदे, उपभोग्य वस्तूंचे उद्योगधंदे, कुटिरोद्योग, हस्तव्यवसाय, लघुउद्योग ह्यांचाही समावेश होतो. ह्या विभागातील मालाच्या उत्पादनात मानवी प्रयत्नाचा वाटा मोठा असतो. तृतीयक विभाग म्हणजे सेवा विभाग व वाहतूक, दळणवळण इत्यादी. ह्यात डॉक्टर, वकिलापासून घरगड्यापर्यंतच्या विविध तऱ्हांच्या व्यवसायांचा समावेश होतो. ह्या विभागाचे वैशिष्ट्य असे की, ह्यात दृश्य वस्तूंचे उत्पादन होत नाही.आणि हे उद्योग चालवणारा तो उद्योजक त्याची व्याख्या म्हणलं तर उद्योजकता म्हणजे Entrepreneurship उद्योजक म्हणजे Entrepreneur . हा शब्द इंग्रजी जरी असला तरी त्यांचं मुळ फ्रेंच भाषेमध्ये आहे. या शब्दाचा अर्थ आहे 'अशी व्यक्ती जी जोखिम घेते'. Someone who undertakes risk. उद्योजकाचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे 'जोखिम' आपल्याला उद्योजकता म्हणजे काय हे समजुन घ्यायचं असेल तर उद्योजक जोखिम का घेतो व कशी घेतो हे समजुन घेतलं पाहीजे. त्याचप्रमाणे उद्योगात संधी किती आहेत याचा विचारही करणे गरजेचे आहे. बाजारपेठेमध्ये कोणत्या गोष्टींना सतत मागणी असते, कोणकोणत्या नव्या संधी बाजारपेठेमध्ये उपलब्ध होत आहेत, निवडलेल्या संबंधित उद्योगात किती संधी आहे याची माहिती घेणेही महत्त्वाचे ठरते.काही उद्योगांसाठी मोक्याची जागा असणे आवश्यक असते, तर काहींसाठी मोठे गोडाऊन अथवा साठवणूक करता येईल अशी मोठी जागा असणे गरजेचे असते. अशी जागा थोडी आतल्या बाजूला असली तरी चालते. ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्री, हॉटेल, कपडे, औषधे, सौंदर्यप्रसाधने यांसारख्या उद्योगांसाठी तुम्हाला जागेची निवड काळजीपूर्वक करावी लागते. उदा. हॉटेल, मॉल, आदी उद्योगांसाठी पार्किंगच्या सोयीचा विचार करावा लागेल, अन्यथा त्याचा परिणाम उद्योगावर होईल. त्याचप्रमाणे काही उद्योग घरगुती असतील तर घराची रचना त्याप्रमाणे करावी आणि उद्योग सुरु करावा.परंतु उद्योग सुरु केला म्हणज खरा खेळ सुरु झाला आणि या खेळात शेवट पर्यंत कसे टिकुन राहायचे हे आपल्यावर असते त्यासाठी आपल्या प्रत्येक व्यवहारात, निर्णयात पारदर्शकता असली पाहिजे कोणाला तरी मागे टाकायचय या उद्देशाने नाही तर मला पुढे जायचय या उद्देशाने वाटचाल करायला हवी हे सर्व जो जाणतो तो खरा उद्योजक कल्पना जुनीच आहे काळाच्या गरजा नविन आहेत... 

हा लेख म्हणजे माझा उद्योग विषयावर वाचलेल्या विविध बाबींच एकत्रिकरण....


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************