आजचा मी आणि कालचा मी

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप

📄 आठवडा 5⃣2⃣वा📝
💖💖💖💖💖💖💖💖💖💖
अभिमानाचे आणि यशस्वितेचे एक वर्ष
🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈
🖊🖋✒🖌🖍✏🖋✒🖌🖍
28 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2018
💬✍💬✍💬✍💬✍💬✍
💐💐💐💐💐💐💐💐

आजचा मी आणि कालचा मी

भाग १  


शिरीष उमरे, नवी मुंबई 

काल वाचनाच्या अदभुत विश्वात रमणारा पुस्तकी कीडा मी !
आज इंटरनेटच्या मायाजालात जिवनाची उत्तरे शोधणारा मी !!

काल पैस्याच्या मागे बिझनेस टुर करणारा मी !
आज शांत निसर्गसानिध्यात रमणारा मी!!

कालचा चिडखोर भांडकुदळ मी !
आजचा आनंदी बुध्द मी !!

कालचा पोटभर जेवुन ढेकर देणारा मी !
आज गरीब उपाशी पोरांचे दिनवाणे चेहरे बघुन अन्नाची वासना उडालेला मी !!

काल हजारो रुपये कपडयांवर उधळणारा मी !
आज कलामांमुळे भारावुन चार जोडी कपडे व खादी वापरणारा मी !!

काल गाडीघोडे चे स्वप्नपुर्तीचा गर्व बाळगणारा मी !
आज पब्लीक ट्रांस्पोर्ट चा वापर करणारा मी !!

 काल शुभंकरोती म्हणत आई सोबत मंदिरात जाणारा मी !
आज स्वत:ला वैश्विक उर्जेचा अंश मानणारा मी !!

काल वस्तुसंग्रहाचा कलासक्त मी !
आज विरक्त भावनेतुन देण्याचा आनंद मिळवणारा मी !!

काल विक्रीव्यवस्थापन क्षेत्रातला धुर्त यशस्वी(?) व्यावसायिक मी !
आज सामाजिक क्षेत्रात नवकल्पक, नवउपक्रमी, उत्प्रेरक उद्यमी मी !! (Catalyst for new innovative social entrepreneurship)

काल स्वत:ला वैचारिक, शारिरीक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, भावनिक तुरुंगात सुरक्षित ठेवणारा मी !
आज मुक्त, बेदरकार, आव्हान स्विकारणारा, धाडसी, नारळासारखा कठोर व मृदु मी !!

आता कालच्या मला मारुन उद्याच्या आव्हानासाठी रोज  स्वनवनिर्मीतीचा ध्यास घेतलेला माँक मी !!!......
==============================

हरिश पोटे, वाकड पुणे


काल ज्या मित्रांच्या संगतीत रमणारा मी आज त्याच गर्दीत स्वतःला वेगळ करून घेत आहे

विद्यार्थीदशेत स्वतःचे रंग उधळणारा मी आज समाजाच्या वेगवगळ्या रंगात स्वतःचा रंग कोणता हे शोधू पाहत आहे.

काल जातीचा आणि धर्माचा माज बाळगणारा मी आज तेच चक्रव्युव तोडून सदभावनेचा शिवधनुष्य उचलू पाहत आहे.

काल ज्या देवाच्या दर्शनासाठी उपाशी पोटी रांगेत ऊभा राहून धडपडणारा मी आज त्याच्या कळसाला लांबूनच हात जोडत आहे.

पैसा कमवण्याच्या शर्यतीत रणशिग फूंकणारा मी आज स्वतःचे हरवलेले बालपण शोधू पाहत आहे.

काल ज्या समाजात स्वतःच्या नशेत सैराट होवून हिंडणारा मी आज त्याच समाजात गुदमरत एका श्वासासाठी संघर्ष करत आहे.

स्वतंत्र फुलपाखरू होवून स्वच्छंद हुंदडणारा आज मी पिंजऱ्यातील पोपटाचा सहकारी होत चाललो आहे

खेड्यातुन शहरी स्वप्न पाठीवर टाकून गरम रक्ताच्या जोरावर स्वार झालेला मी आज त्याच मायाजालात स्वतःच्या खेड्याचा रस्ता शोधू पाहत आहे...

कालचा धर्मवादी मी आज समाजवादी होत आहे..
==============================

अमोल उंबरकर, पालघर.


एकच विषय डोक्यात घुमतो सध्या तो म्हणजे मी काल कोण होतो न आज कोण आहे?
आतून एकच आवाज येतो तो म्हणजे-
काल मी होतो एक स्वछन्द, मुक्त पक्षी वावरत होतो कुठल्याही भीतीविना जगाच्या कुठल्याही बंधनात न अडकता.
कसलंही नात असो ते जीवापाड जपून जगत होतो खरंखुरं आयुष्य. लोक ही समोरून जाताना दिसली की भेटत होती ती हो गळाभेट करून, न आता मात्र समोर भेटण्यापेक्षा विविध सोशल साईट्स वर भेटण्यातच फार अप्रूप वाटतं
कालचा मी हा असा नव्हतो मुळीच तर होतो एक मित्र, सखा, भाऊ, बाप, आई ही न बहिण सुद्धा ती ही अगदी खरी.
आता मात्र मला खऱ्या नात्यांपेक्षा जवळ वाटतात ती म्हणजे सोशल नाती न मग मी गुंतत जातो न वेळेचही भान राहत नाही.
मी हा आजचा खरोखरच खूप पुढारलो असलो तरी मात्र जेव्हा एकांतात बसतो तेव्हा,,,,, सगळी ओझी वाटायला लागतात.
जरा जरी नेट बंद असलं तरी कसंतरी होत असे वाटत जगाशी संपर्कच तुटला की काय.
न मग शेजारी बसलेल्या बाबा, भाऊ, बहीण ही नाती महत्वाची नाहीत काय?
घरातही आम्ही नेटवरच बोलतो न मग जो खरा निर्मळ आनंद आहे तो मिळतच नाही.
सगळं कसं तांत्रिक झालय न असा मी काल मुळीच नव्हतो पण आता होत चाललोय, याची भीती वाटते?!!!!!

पहिल्यांदाच लिहितोय न तेही मराठीत, शब्दरचना चुकली असल्यास समजून घ्यावी, धन्यवाद, शिरीष भाऊ
==============================

प्रमोद पांचाळ, रा. धर्मापुरी, ता. परळी जिल्हा. बीड

आजच्या माझ्यात आसा खूप काही बदल झाला आहे
पण आंदोगर मी कालचा कसा होतो हे सांगतो
मी आज पर्यंत असा कधीच वागलो नाही मी आधी रोज आमच्या गल्लीतल्या मित्रा बरोबर बसत होतो त्यांच्याशी गप्पा मारत होतो धीगाना करत होतो रात्री 12 वाजे पर्यंत बाहेर पार्टी करत बसत असे

 पण आज मी असे वागत नाही आता मी ऑफिस संपले की सरळ घरी जात आहे  घरी गेलो की मोबाईल वर नेट चालू करून  .फ .बी. किंवा वाटसाप वर रच माझ्या मित्राशी बोलत आहे ते पण 9 वाजे पर्यंत व नंतर मी झोपी जात आहे

पण मला माझे जुने दिवस आठवले की आज पण हासु येते करण मी म्हणजे आवारी पानाचा कळस होतो माझे रोजचे काम
कॉलेज मध्ये जाणे मुलींना छेडणे , भाडणमारामारी करणे, पुड्या खाणे  , कोणाला पण त्रास देने
अशी कामे होती माझी रोजची पण आता नाही राहिली
आता रोज ऑफिस जाणे ऑफिस मधून घरी येणे मोबाईल वर चॅटिग करणे व झोपणे  हा आहे  आसा आहे
 आजचा मी आणि कालचा मी
==============================

जगताप रामकिशन शारदा(जिल्हा:बीड)

दिवसागणिक वय आणि वयानुसार संमजसपणा वाढत आहे. भूतकाळातील अनेक चूका मानगुटीवर भुतासारख्या नाचतात असतात. काळ वेळ आणि वय यानुसार बरोबर वागलो की चूकीचे यात ठोकताळा मांडण जमत नाही.
कालच्यापेक्षा आजचा माझा जीवनाचा आयाम नक्कीच मोठा.आहे. गधा पच्चीसी जी म्हणतात न ती आता आता उत्तरार्धात आहे. संघर्षाला नशिबाची उपमा देणे सोडून दिले आहे. सदैव स्वतः चा किंवा सदैव इतरांचा विचार करणे सोडून दिले आहे म्हणण्यापेक्षा दोघांत ताळमेळ घालणे शिकतो आहे. आपल्या कल्पना आपनच सत्यात उतरवू शकतो. यावर गाढ विश्वास बसला आहे. समाज समाज आहे पण आपण.त्याचा भाग असून जमल तर सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे नाही तर मग शांत. उगीचच घाईघाईने मत मांडणे योग्य नाही ही गोष्ट कळाली आहे. भावनेच्या भरात मत मांडत नाही. लिंगभेद, जातीवाद, यांना जीवनात कवडीमोल स्थान आहे हे कळाले आहे.माणसाचा जन्म नशिबाने की अपघाताने मिळालेला असो पण प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी तो पाया समजावा हे किरण बेदींचे वाक्य मला पटत. आणि काल आणि आज यात फरक करताना काल एवढीच अपेक्षा होती की विचारांना आदर मिळावा पण आज अशी भावना आहे की अखंड भ्रमांडात फिरणाऱ्या जीवाला जगण्याची ईच्छा होते म्हणून तो जन्माला येतो आपले विचार किंवा आपल्या परंपरा चालवण्यासाठी नाही. आणि त्याच बंधन ही आपण त्यावर लादू शकत नाही कारण तो स्वतंत्र विचारसरणी घेऊन जन्माला आलेला असतो.त्यामुळे प्रत्येकाच्या विचारसरणीचा आदर करतो आहे. आणि प्रत्येकाडून चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न नक्कीच आहे जो की कालच्या स्वच्या पुढे शून्य होत्या.
==============================

शीतल शिंदे, दहिवडी जि.सातारा


" गेले ते दिवस नी राहिल्या त्या आठवणी " !
कालची मी मुलींमध्ये गप्पा मारण्यात वेळ घालवणारी आज मला कोणाशी बोलायला वेळ नाही !
कालची मी मैदानी खेळ खेळणारी आज मला पाई चालायला वेळ न मिळणारी !
कालची मी आईला त्रास देणारी आज मझ्या मुलांच्या प्रश्नांना उत्तरे देवून थकनारी मी !
कालची मी  स्वार्थी आज पूर्ण निस्वार्थी झालेली !
लहानपणी स्वतःच्या सुखाचा विचार करणारी मी आज समस्त मानव कल्ल्यानाचा विचार करणारी मी !
कालपर्यंत सुखात रहनारी मी आज दुसऱ्यांना दुखः तून बाहेर काढणारी मी !
लहानपणी आईबरोबर व्रत वैकल्ले केलेली मी आज देवाच्या अस्तीत्वावर बोट दाखवणारी , देवाला दगड मानणारी , आणी जिवंत माणसात देव पाहणारी मी!
लहानपणी आई वडिलांवर रुसणारी मी आज सर्वांची मने जपणारी !

दहावीनंतर मैत्रिणींच्या पत्राने मिळालेला आनंद आज ऑनलाईन च्याटिंग करूनही आनंद न मिळणारी मी !
लहानपणी दिवाळीला मिळणाऱ्या आनंदाची आजही आठवण काढणारी मी !

लग्नानंतर - नौकर होंगे चाकर होंगे , बँकोमे अपने लॉकर होंगे ..
............................................
.............................................
असे म्हणणारी मी सर्व काही मिळून पण दुसऱ्यांची गरिबी पाहून दुखी : होणारी मी !

लहानपणी दुसऱ्यांच्या लग्नातील जेवणावर , गडंगनावर फराळावर पार्टीमध्ये जेवणावर टपून बसणारी मी आज मझ्या घरातील मीठाईचे ईतराणा वाटप करणारी मी !
कालपर्यंत पैसा मिळवन्यासाठी नोकरीच्या शोधत असणारी मी आज पैसा कसा जपायचा हे दुसऱ्यांना  सांगणारी मी !

कालपर्यंत ईतरांचे अनुभव ऐकलेली आज माझे अनुभव
ईतराणा सांगून शहाणे करणारी मी !
लहानपणी सुंदर दिसण्याचा प्रयत्न करणारी मी आज आचार विचारांनी सुंदर होण्याचा प्रयत्न करणारी मी !

लहानपणी सूर  परूमब्या खेळले ल्या आठवणीत आजही रमणारी मी !

कालपर्यंत खेळून खाल्लेली मी आज संसाराचा गाडा ओढायला मदत करणारी मी !

कालपर्यंत आई बाबा बरोबर एकत्र राहणारी मूळे आज त्यांना सोडून फक्त पत्नी बरोबर युवक पाहतेय मी !

कालपर्यंत आपल्या अप्तेस्ठाणाहि अग्नी देण्यासाठी धावत पळत येणारी मुले आज स्वतः च्या आई बाबांना  ऑनलाईन श्रधाण्जली देणारी मुले पाहतेय मी !

आई वडिलांना कर्ज काढून दवाखाना करणारी मुले आज त्यांचीच सम्पत्ती फस्त करून त्यानाच संकटात टाकणारी मुले पाहतेय मी !

लहानपणापासून आजी आजोबा
मामा मामी , मावशी काका मोठा भाउ बहीण यांनी लाड केलेली आणी माझ्या आई -  बाबांची लाडकी बाबी डॉल
मी आज मझ्या कुटुंबातील वरिस्थाची मने जपणारी मी !

मी कालही सुखी आणी
आजही सुख माननारी मी !
==============================

निखिल खोडे, ठाणे.

              साधारणपणे मागच्या ८-१० वर्षा पूर्वीचा मी.. आईच्या धाकामुळे मस्त्या कमी करत असलो तरी थोड्याफार तर करायचो. गावाला लागून असलेल्या चिंचेच्या झाडावरून चिंचा तोडून आणणे, कैऱ्याचा हंगाम आला की दुसऱ्याच्या शेतातून कैऱ्या चोरून आणणे, गावभर फिरत राहणे अश्याप्रकरचे सर्व उपद्व्याप लहानपणी केले. आज खुप मीस करतो ते दिवस....

              शालेय जीवनात वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो. आणि त्यामध्ये बऱ्यापैकी नंबर पण मिळाले आहे. त्यावेळेस एखाद्या मोठ्या यश संपादन केलेल्या व्यक्तीला बघितला की त्यांच्यासारखं बनायची इच्छा असायची आणि ही इच्छा नेहमीच बदलत जायची. म्हणूनच तेव्हा अब्दुल चाऊस यांचे यशशास्त्र, मनोहर भोळे यांचे राजमुद्रा, पाउलो कायलो यांच द अल्केमिस्ट, झीग झीगलर चे सी यू अट द टॉप यांसारखे पुस्तक वाचले कारण काहीतरी मोठे बनायची इच्छा होती. शाळा, कॉलेज मध्ये चांगली टक्केवारी मिळाली की चांगली नोकरी लागेल किंव्हा आपण खूप हुशार आहो असा चुकीचा गैरसमज त्यावेळेस झाला होता. त्याची जाणिव आज होते तेंव्हा हसु येते स्वत:चे !!

                 जबाबदारीची जाणीव झाल्यावरचा मी.. घरातून बाहेर कामासाठी गेल्यावर सर्वात खडतर अनुभव आला तो पुण्यात!  मी बारावी पास आणि सोबत काम करणारा ८ वी पास.. दोघांचा पेमेंट सारखच. दिड वर्ष पुण्यात काढल्या नंतर थेट मुंबई गाठली. मित्राच्या मामाकडे कामासाठी आलो. घरच्यांना सांगितल नाही की कोणत्या कामासाठी जात आहो कारण हॉटेल मध्ये काम करायला जात आहो असे घरी सांगितले तर आवडले नसते हा माझा समज. स्टार हॉटेल मध्ये लोकं कोणत्या प्रकारचे असतात, त्यांच्याशी कशाप्रकारे बोलायचे, राहण्याची पद्घत, एकंदरीत लाईफस्टाईल शिकायला मिळाली. येथूनच स्वतःचा व्यवसाय करायची खुमखुमी माझ्यामध्ये आली. पण सुरुवातीला झालेली अवस्था आठवता आज घेतलेल्या परिश्रमाचे चे समाधान वाटते.

                मागच्या एक वर्षापासुन एका खाजगी कंपनी मध्ये बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणुन काम करतोय. मागिल काही महिन्यामध्ये खुप काही शिकायला मिळाले आहे. लोकांशी संवाद कसा साधायचा, दिवसाचे नियोजन कशाप्रकारे करायचे, टीम वर्क, ऑब्झेरवेशन, निर्णय क्षमता अनेक चांगल्या गोष्टी या ठिकाणी शिकायला मिळत आहे.
  काल टीम मेबर म्हणुन काम करणारा मी आज टीम लीड करतोय.
                कालच्या पुस्तक वाचणे, मित्रांशी गप्पा मारणे, अशा अनेक गोष्टी कमी झाल्या आहेत कारण आज सर्व ऑनलाईन करता येते.

भविष्यात स्वतःचा व्यवसाय करायचा आहे म्हणून आज पैशाची बचत करायची आहे...

 लोकांनी केलेल्या चुकांमधून शिकायच आहे आणि त्या चुका पुन्हा होणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे. रोज स्वत:त थोडा बदल घडवायाचा आहे... कालच्या पेक्षा मला आज बेहतर व्हायचे आहे....
=============================

प्रा.अविनाश फुके(किल्लेधारुर जि.बीड)

जीवनाच्या रंगमंचावर अनेक पात्रातून माणसाला जावं लागतं
मुळात घरापासून दारापर्यंत अन गावापासून शहरापर्यंंत माणुस गेला की लगेच बदलायला लागतो.
मी पण त्यात कुठेतरी मोडला जातो..
बालपण तस्स खेडवळ पणाच पण आमच्या नशीबी ते कधी आलं तर कधी आलं पण नाही.
दिवस नुसते सरत होते अन अनुभव गाठीशी यायचे चिकीत्सकतेत आता वाढ होत होती.जीवनातले चढ उतार समजायला लागले होते अन माणसं माणसांशी वागताना मन अधीर व्ह्यायचे.
पन म्हणतात ना न कळत्या वयात जर वेगळा छंद लागला की माणुस वाईट बनतो,अशी कुठं रूजवणुक आई-वडीलांची सोबत सतत असायची त्याचमुळे आज जगताना काही नवीन काम करताना त्यांची आठवन येतेच अन चुकीच असल की लगेच मन ते धुडकारतं..
जस जस मोठे होत गेलो तस-तसे अनुभव पदरात पडत गेले. राग,लोभ,असूया यातले अनेक मार्ग आता दिसत होते.समंजसपणा रुजत होता.पण दुसरीकडे पाहीलं की मन विझुन जायचं. का की पण लोकं नाती तोडताना विचार पन करत नाहित बिनधास्तपणे तोडून टाकतात. जसे फुल तोडता तसे.
जसा पुर्वी जिव्हाळा,आपलकी असायची तशी आज खुप कमी दिसत आहे. अगदी आपण आपल्याच निरखून पाहीलं तर समजून येइल आपण पन आज कसे बदलत गेलो.
लग्न झाले की काही दिवस ते जोडपं आनंदांन नांदत पण कालांतराने घरात आदळ-आपट ठरलेलीच आहे.
शंका कुशकांचे बांडगुळ यांच्या मनात घर करते.
एवढं सारं पाहीलं की वाटत अजून पण तेच दिवस बरे जिथं शिक्षण होतं पन शिक्षणाचा माज नव्हता.हे सारं असच बदलत जाइल.
सारीपाटावर खेळ मांडावा तसा माणुस आपल्याच विश्वात रममाण झाला आहे.आपल्यासाठी सताड डोळे उघडे ठेऊन जगतोय अन शेजारच्यासाठी म्हटलं की तो कधीचाच आंधळ ढोंग करताना दिसतोय.
हे मात्र अजुन दिवसेंदिवस बदलातच जाईल कालचा विचार आज वर्तमानपत्रा सारखा जुना होत जाईल. कारण आज फक्त वाचन आलं आहे अंमलबजावणी   खुप कमी प्रमाणात दिसतेय.
प्रत्येक जण आपलाच स्वार्थ साधतो आहे.कुणालाच कुणाच देणं घेणं नाही.फक्त अपेक्षा अन आपला फायदा असाच रुचार मनात ठेवताना दिसत आहे.कालचा खरच मी बरा होतो आज मात्र समाज नुसता जगत आहे पन तोही दिशाहीन पाखरासारखा..
==============================
IMAGES SOURCE : INTERNET

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************