माझा "🌱वि४🌿ग्रुप "सोबतचा आजवरचा प्रवास. भाग -2 (दुसरा )




 निखिल खोडे, ठाणे.
           विचार ग्रुप म्हणजे स्वतःचे विचार बिंदासपने मांडण्याचे व्यासपीठ आणि त्याच बरोबर इतर सदस्यांचे विचार,  एकाच विषयावरचे वेगवेगळे मते वाचायला मिळतात.
            माझा वि४ ग्रुप सोबतचा प्रवास... सुरुवातीला ग्रुप ची लिंक शिरीष सरांकडून मला व्हॉट्स अप ला मिळाली. जून च्या शेवटच्या आठवड्यामध्ये मी करन दादा ला वयक्तिक संदेश पाठवून मला ग्रुप जॉईन व्हायचे आहे असे सांगितले. त्यांनी ग्रुप चे नियम मान्य आहे का? असा प्रश्न विचारून मी हो म्हटल्यावर मला ग्रुप मध्ये जॉईन केले. सुरवातीचे खुप दिवस हे बाकी सदस्यांचे ग्रुप वरील विचार वाचण्यात गेले. परंतु स्वतः लेख लिहिण्याची कधी हिम्मत नाही झाली.
             खुप दिवसानंतर ही लेख नाही आला तुझा? असा शिरीष सरांचा व्हॉट्स अप वरती मेसेज आला. त्यांना सांगितल की सर मला नाही जमत आहे लिहायला! त्यांनी लगेच म्हटल की बाकी लोकांचे लेख वाच आणि पहिल्या फक्त ४ ओळी लिही. नंतर आपोआप सुचेल. त्यानंतर मी लेख लिहायला सुरुवात केली. पहिला लेख लिहायला मला जवळपास ५ दिवस लागले... आज लिहू ... उद्या लिहू करता करता !! 😅 आणि विषय होता "नेमके कशात बिझी असतो आपण" !! 😆 माझा पहिला लेख १०-१२ ओळींचा लिहिलेला.
               त्यानंतर आतुरता होती ती म्हणजे लेखचा ब्लॉग कधी येतोय म्हणून 🤗 माझा पहिला लेख होता आणि ज्या दिवशी ब्लॉग वरती लेख आला तेंव्हा दिवसातून खुप वेळा लिंक उघडून बघितला व माझ्या मित्रांना शेअर केला. एक वेगळ्या प्रकारचा आनंद होता मनामध्ये. त्यानंतर हळूहळू लिहायची आवड निर्माण झाली आणि लिहायचं म्हटल की वाचन गरजेच आहे. वि४ ग्रुप मुळे जॉब वर लागल्या नंतर ची माझी वाचनाची कमी झालेली सवय आपोआप वाढली.
                 शेवटी ज्यांनी ह्या ग्रुप ची सुरुवात केली सौदागर काळे सर, ज्यांनी मला लिहिण्यासाठी प्रेरणा दिली शिरीष सर, मला ग्रुप मध्ये सामील केले ते करण दादा, मेहनत घेऊन ग्रुप सुरळीत रित्या चालवते अडमीन टीम, ज्यांचे सुंदर विचार वाचायला मिळते ते सदस्य त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. सर्वात सुंदर ग्रुप माझ्या व्हॉट अप मधला..!!😍👍🏻~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 
किरण पवार,औरंगाबाद.
                 नक्की काय काय लिहावं मुळात हाच प्रश्न पडलायं. जरी लिहण्यासाठी माझी शब्दमर्यादा थोडीशीच जाणवेलं पण भावनिक नातं मात्र पुरतं जोडल्या गेलयं माझं या विचार ग्रुपशी. मी जवळपास साधारणत: बऱ्यापैकी आधीच चालू झाला होता; मला आत्ता ते आठवतं नाही. पण मुळात ज्यावेळी मी सुरूवातीला नवीन जॉईन झालो तेव्हा मला या ग्रुपचा *कन्सेप्ट* फारच आवडला होता. मी आजवर इथे आहे त्याच कारण हेच आहे. खरतरं या ग्रुपने मला माझं वैयक्तिक मत व्यक्त करायला केवळ शिकवलचं असं नाही तर विविधांगी पैलू हाताळायला शिकवले. जसे आपण इंद्रधनुष्यात पाहतो; अगदी तसचं काहीसं. कमी वेळात अवाजवी पेक्षा ज्ञान मिळत नाही; हे सर्वांच सहसा मत असतं. पण मला या ग्रुपने ते भरपूर ज्ञान कमी वेळात दिलं. मी ग्रुपशी जुळलो तेव्हा आज आहे तितका प्रगल्भ कधीच नव्हतो. आजही अपुरा असेन. पण इथे आल्यापासून शिकायला मात्र खूप काही मिळालं.
                    कधी ग्रुपवर दिल्या गेलेल्या विषयांमधून बालपण उलगडलं तर कधी देशाची आर्थिक/ सामाजिक महाराष्ट्राव्यतिरिक्तचीही बऱ्याचवेळा परिस्थितीही समजत गेली. मला खरतरं एक आंतरिक उर्जा मिळवून दिली या ग्रुपने. मी बऱ्याचदा नैराश्यात असताना कधी-कधी एखादा लेख यायचा आणि मी ते वाचण्याच्या नादात माझं काय चालू होतं हे विसरून जायचो. चौकटीबाहेरच जग जे सहसा वृत्तपत्रांमधून काही ठराविकच विचारवंतांच्या स्वरूपात दिसायचं ते या ग्रुपमुळे भरपूर व्यक्तिंच्या माध्यमातून दिसू लागलं होतं. थोडक्यात म्हटलं तर , एक ना अनेक दार या ग्रुपच्या माध्यमातून सुरूवातीला आमच्यासारख्या नवीन लिखाणं करणाऱ्यांसाठी खुली झाली. विशेषत: मी सौदागर सरांचे खूप आभार मानतो. आयुष्यात किमान एकदातरी माझी त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा आहे. भेटेनही. थोडक्यात जे काही आहे ते जरा छोट्या काव्य स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करतो.
धन्यवाद!

*वि4र:-*

वाटलेला एक आभास जो
तो शिक्षक झालासं तू नवख्यांसाठी *वि4र,*

काय असतो नेमका ग्रुप
पण एक बदलाचा अविष्कार
झालासं तू नवख्यांसाठी *वि4र,*

कधी कोणी नैराश्यात जखडलेला
त्यासाठी नकळतं आधार
झालासं तू सकारात्मकतेचा एक *वि4र,*

विविधांगी पैलूंचे विश्व देऊनी
आयुष्यातला आमच्या तो
झालासं तू तेजोमय एक दिव्याचा *वि4र.*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

वैशाली खरात,पंढरपूर.             
                                                               
           विचार ग्रुप वर येऊन मला खूप दिवस झाले नाहीत पण या ग्रुप मधून मला खूप काही शिकायला भेटल.मला वाचणा ची आवड आहे.पण मी कधी लिहल नाही पण मध्ये काही दिवस माझं वाचन बंद झालं होत.पण नंतर विचार या ग्रुप मूळ वाचनाला     सूरवात झाली वेगवेगळ्या विषयावर खूप जण लिहितात त्यामुळे आपल्या विचारात भर पडते आणि आपले विचार आजुन सुधारतात आणि आपल्या विचारला अजून चालना मिळते.या ग्रुप मध्ये आल्यापासून मला खूप छान वाटत आहे सगळ्यांचे विचार खूप छान असतात.या ग्रुप मधे मी माझी फ्रेंड वैशाली मुळे आली तिने मला विचार समूहाची माहिती दिली त्यामुळे या ग्रुप मध्ये आले आल्या पासून मी सगळ्यांचे विचार वाचती आहे छान वाटत आहे हे विचार वाचून अस वाटत की आपण पण लिहावं असं काही तरी मग लिहायला घेतलं तर  मराठी टाइपिंग कस करायच ते समजेनासे झाले मग एके दिवशी ग्रुप वर अाडमिन टीम नी मराठी टायपिंग च ऍप्लिकेशन पाठवलं अता मराठी टायपिंग सोप चालल आहे पण आजुन तरी काही लिहल नाही पण लीहणार आहे सगळे जण लिहतात म्हणून मला अस वाटत की आपण पण अस काही तरी लिहावं. आपले पण विचार मांडावे.समजत नवहतं काय लिहावं ते म्हणून मी कधी लिहाल नाही एकदा फ्रेंडशिप डे ला एकदा  लिहिलं होत नंतर काहीच  लिहिलं नाही ग्रुप मध्ये चर्चा चालू होती की जे लिहत नाहीत त्यांना काढून टकाययच त्या वेळेस मला वाट होत आता आपल्याला काढून टाकतेत पण नंतर टीम चा  विचार बदलला आणि त्यांनी कोणालाच काढल नाही त्या मुळे मी सगळ्या टीम चे आभारी आहे मला हे खूप छान व्यासपीठ मिळाले आहे ह्या ग्रुप वरचे विचार मी जेव्हा बाहेर मांडते तेव्हा ते सांगळे म्हणतात खूप छान विचार आहेत तुझे ते विचार मला ह्या ग्रुप मुळे मिळाले आहेत या ग्रुप मुळे मला अजुन जास्त  वाचनाची सवय लागली आहे तरी मी सगळ्यांना चे खूप आभारी आहे 🙏🏻🌱आसाच हा ग्रुप पुढे चालत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना काही चुकले असेल तर माफ करा🙏🏻
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मुकुंद बसोळे,लातूर.
        वि4 सोबतचा प्रवास तसा छोटासाच....आणि या प्रवासात मीच एकदा स्वतःच स्वतःला हाकललं🤣🤣😂😂 आणि परत आलो.....पण काही वेळेला असं होतं की तुमच्या जीवनात अगोदरच काही व्यवस्थित चालत नसतं.... आणि असं काहीतरी होतं... त्यावेळेस खूप वाईट वाटतं.... जीवनात कुणीच सोबत नसल्यासारखं  वाटतं.... आणि असं काहीतरी चुकून होऊन जातं....ते करावं  नाही म्हंटलं  तरी आपोआप होत....तसंच झालं माझ्यासोबत....असो शिरीष सरांनी मला परत add केलं आणि माझा ह्या ग्रुप सोबतचा जवळपास संपुष्टात आलेला प्रवास त्यांनी चालू केला...तो न संपण्यासाठीच....येथे खूप काही शिकायला भेटेल याची खात्री वाटते...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 शीतल शिंदे, दहिवडी, जि. सातारा .
          "विचार " ग्रुप खरोखरच आपल्या जीवनाला , आयुष्याला चालना देणारा मंच आहे .आपल्याकडे असलेली महितीची  , अनुभवाची  इतरांशी इतरांशी देवाण - घेवाण करणारा आणी आपल्या मतांना सामावून घेणारा असा एकमेव मंच आहे .
  खरेतर मला वाचनाची फार आवड आहे .msw पर्यंत कॉलेज पर्यंतच्या  जीवनात बरेच  वाचन केले अगदी सर्व कथा , कादंबरी, धार्मिक ग्रंथ , विचार ईत्यादि .मात्र एम . एस .डब्लू .पासून वेगळ्या वाचनाला सुरुवात झाली . मग
इतर वाचनाला वेळ कमी पडू लागला .मात्र डॉ .नरेंद्र दाभोळकर यांच्या बरोबर अंधश्रधा , सत्य शोधक समाज ईत्यादि विषयांवरील चर्च्या सत्रातील काही दिवस माझ्या पतीबरोबर  सहभागी झाले.
मात्र त्यानंतरलगेच जॉब मिळाला आणी  कामाचा एक भाग म्हणून  जनजागृतीपर कार्यक्रम करण्याची संधी मिळाली .मग  कॉलेज युवक - युवती , विध्यार्थी @ पालक मेळावा , बचत गट , नेहरू युवा मंडळ , गावामधिल लोक ,  ग्राम पंचायत , शासकीय - अशासकीय विभाग आशा आणी अनेक ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली मात्र तेथे औपचारिक - अनौपचारिक शब्दामध्ये बोलणे होते .
  सुरवातीला "V 4 टिम "मधे जॉईन  झाल्यावर लिहायचे कसे हा प्रश्न पाडला .कारण मी कधी लिहिलेच नव्हते .
पण याच्याही पलीकडे जावून आपल्या विचारांची देवाण घेवाण व्हावी ही पण इच्छा " वी 4 च्या "माध्यमातून पूर्ण झाली  अलीकडे जास्त वाचन होत नाही तर आपल्या ग्रूप मधून बरीच महिती मिळते .मात्र आता लिहायला विचार करायला वेळचमिळत नाही .नोकरी करून लिखाणाला वेळ मिळतच नाही .खूप सारी कामे असतात .मिळाला तरी बाकीचे काम रहतेच.मला  विचार करून लिहायला वेळच मिळत नाही म्हणून मी डायरेक्ट लिहायला घेते .मी नास्तिक असल्यामुळे माझे लेखही तसेच असतात .म्हणून कोणी लाइक करत नाहीत पण हरकत नाही विचार च्या माध्यमातून माझे विचार 1000 मधील 10 जणांना पटले तरी पुष्कळ .आभारी आहे व  राहीन मी "वी  चार टीम ची ".आता सुद्धा काय लिहिले आहे हे पुन्हा वाचायला वेळ नाही .कोणाचे मन दुखावले असेल तर क्षमस्व .🙏
पुन्हा एकदा "v4 ग्रूप "ची आभारी 🙋🏻‍♀

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मयुरी देवकर ,पिलीव ता. माळशिरस.
             वि-४ म्हणजे  (1) विद्यार्थी,(2) विवेक ,(3)विनय आणि (4)विरजा हे मिळून "विचार " हा ग्रुप तयार झाला. प्रथमतः मला वैशालीने या ग्रुपमध्ये ऍड केले,नियम वगैरे वाचले आणि मग वैशालीला फोन करूनच ग्रुपविषयी चर्चा केली आणि मग विचार ग्रुपची संकल्पना नीट समजली आणि मग चालू झाला माझा विचार सोबतचा प्रवास....
             पहिलाच विषय होता 'श्यामच्या आईने माझ्यातला श्याम असा घडवला....' आम्ही सर्वांनीच यावर लेख लिहिले होते पण, श्यामची आई वाचून झाल्यावर जेवढा आनंद मिळाला त्यापेक्षा जास्त आनंद या विषयावरील लेख वाचून झाला.प्रत्येकाचे अनुभव प्रत्यक्षात अनुभवल्यासारखं झाले आणि हीच असते लेखणीची पावर....या ग्रुपच्या माध्यमातून रोज नवीन विचार वाचायला मिळू  लागले आणि थोड्याच दिवसांत सौदागरने ऍडमिन टीम मध्ये येण्याची संधी दिली.खरे तर सौदागर आणि मी एकाच कॉलेजमध्ये शिकलो, दोघेही वक्तृत्व स्पर्धेतील प्रतिस्पर्धी पण बोलण्याचा कधीच संबंध आला न्हवता पण या विचार ग्रुपच्या माध्यमातून पुन्हा आमचे विचार जुळले. ऍडमिन टीममध्ये आल्यानंतर अनिलजी,अक्षयजी,प्रवीणजी, पवनजी, करण,बालाजी,नरेशजी आणि  शिरिषदा यांची ओळख झाली.वैशाली आणि मी आधीपासूनच मैत्रिणी होतो पण सीमालिजी आणि संगीताजी यांची सोबत मिळाली. या 'विचार' ग्रुपने फक्त आणि फक्त विचारांवरच सर्वांना जवळ आणले आहे.या विचार ग्रुपमधील प्रत्येक सदस्य हा आपल्या कुटुंबातीलच वाटतो.सगळ्यांचे नवनवीन विचार वाचले कि, मनाला आशेचे पंख फुटतात.....
             विचार ग्रुपमध्ये असे खूप सदस्य आहेत ज्यांनी आधी कधीच लिखाण केलेले न्हवते पण आज त्यांचे लेखन उत्कृष्ठ आहे...आणि हेच या विचार ग्रुपचे यश आहे.आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ग्रुपमध्ये असणारे नियम....कधी कधी या नियमांमुळेच ऍडमिन टीममला कठोर भूमिका घ्याव्या लागल्या.आज हा ग्रुप टिकला आहे आणि जो नावलौकिक आहे ते फक्त आणि फक्त या नियमांमुळेच....
          आज आपली वाचन संस्कृती हरवत चालली आहे असं आसपास लोक नुसतं म्हणत असतात तेव्हा अभिमानाने आपल्या ग्रुपविषयी सांगणं होतं. यामध्ये फक्त वाचनच नाही तर लेखनसंस्कृतीचा उदय झाला आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही.इथून पुढे अजून नाविन्यपूर्ण कल्पना या विचारच्या  माध्यमातून पुढे येतील.आणि खऱ्या अर्थाने या स्मार्ट जगात स्मार्टफोनचा स्मार्ट वापर केल्याचे समाधान मिळेल....
विचारांनी विचारांना विचारलेला प्रश्न म्हणजे वि४
विचारांनी विचारांना दिलेलं उत्तर म्हणजे वि४
भग्न वाळवंटातील आशेचा किनारा म्हणजे वि४
आणि धडपडीतल्या जगण्यातला श्वास म्हणजे वि४
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सिमाली भाटकर, रत्नागिरी.   
     लेखणी हरवून बसलो होतो,
जीवनाच्या प्रवासात,
समुद्राच्या लाटा होत्या, 
लाटांच्या वाफा होत्या, 
ऋतूंच्या आभासात,
दाटले होते मेघ काळे, 
उणीव मात्र थंडगार फुंकरीची होती,
 कडक उन्हाच्या सावलीत भेट एका माऊलीची होती,
रखरखीत क्षण गारव्यात बदलले, 
दाटले ढग विचार रूपे बरसले,
कधी वीरश्री संचारली अन, 
अत्याचार विरोधी लेखणी बरसली,
जीवनाच्या प्रवासातली अबोलकी शाळा, 
यांनी पानोपानी साकारली,
अनाथांची आपुलकी मनी ठासून भरली होती,
विचार च्या कल्पनेने पानोपानी सजली होती,
डिजिटल इंडिया कल्पना भारताची होती,
विचार न मात्र ती गावरान मन हुबेहूब टिपली,
आणि गावच्या मातीला न्यायाची साद घातली,
 आयुष्याच्या प्रवासात ही लेखणी गवसली,
अन कोरी पडली पाने विचार नि सजवली.....

                 धन्यवाद
       विचार ग्रुप सोबत चा माझा प्रवास थोडक्यात रेखाटला. यांनी माझ्या विचारांना एक व्यासपीठ मिळवून दिले आणि बुद्धिमत्तेला चालना मिळाली.
       धन्यवाद विचार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


सानप बालाजी,बीड.
              मी बरोबर एकवर्षांपूर्वी हार्मोनि युथ फेस्टिवलला *कर्णाल, हरियाणा* येथे गेलो होतो तेथे गेल्यानंतर दिवसभराच्या घडणाऱ्या घडामोडींचा एक लेख लिहून आमच्या फेस्टिव्हलच्या ग्रुप मध्ये एक व्यक्ती टाकत असत, या लेखांची महती महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून ते कला व क्रीडामंत्र्यांपर्यंत पोहोचली होती व जो तो त्या लेखकाची स्तुती करू लागला होता त्या लेखमालिकेमुळे माझी आणि त्या लेखकाची भेट झाली आणि ओळख झाली त्या लेखकाचे नाव म्हणजे *सौदागर सर*.
              माझ्या मनामध्ये मला विचार यायचे आणि निघून जायचे पण त्या विचारणा लेखनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न मी कधी केलाच नाही. फेस्टिवलनंतर  महाराष्ट्रामध्ये आल्यावर एके दिवशी सौदागर सरचा व्हाटस अँप ला एक मेसेज आणि एक ग्रुप लिंक आली, आणि मी लगेच ग्रुप जॉईन झालो.अश्याप्रकारे माझा आणि विचारचा पहिल्या आठवड्यापासून प्रवास चालू झाला.
              ग्रुप जॉईन झाल्यानंतर मग लेख लिहिण्यास कशी तरी जसे जमेल तसे सुरवात केली. पुढे चालून सौदागर सरांचा आणखी एक मेसेज आला तुम्ही ग्रुप मध्ये जबाबदारी स्वीकारण्यास इच्छुक आहेत का अश्या आशयाचा तो मेसेज होता आणि मी जबाबदारी तर नाही पण *फुल ना फुलाची पाकळी*आशा प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न केला करत आहे आणि करत राहील.
              मध्ये काही वेळा कामामुळे आणि काही पर्सनल प्रॉब्लेम मुळे 2 वेळा इच्छा नसताना सुद्धा वि४ ग्रुप च्या माझ्या जबाबदारीतून मी न सांगता मुक्त झालो होतो त्याबद्दल मला सौदागर सर आणि ऍडमिन माफ करतीलच.
              सौदागर सर, अनिल सर, शिरीष सर, प्रवीण सर, करण सर,वैशाली मॅम, मयुरी मॅम, नरेश सर, पवन सर, संगीता  मॅम, सीमाली मॅम आणि अक्षय सर हे सध्या खुप मेहनतीने वि४ ग्रुप मधील विविध जबाबदाऱ्या पार पाडत आहेत या सर्वांचे मनापासून अभिनंदन.
              मला ग्रुप मध्ये ऍड केल्याबद्दल सौदागर सरांचे खूप खूप आभार, आणि ग्रुप ऍडमिन टीम मधील सर्वांचे मला समजावून घेतल्याबद्दल आणि समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद....!
 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 

सिताराम पवार,पंढरपूर(सध्या परभणी).
          हा ग्रुप स्थापन केला की मला लवकरच ऍड केलं कारण सौदागर काळे सर यांचा सहवास मला 11वी व 12 दोन वर्षे लाभला तेव्हा आमचा हा संबंध कामी आला आणि मला या ग्रुपमध्ये सामील होता आले. खरं तर हा एक नाविन्यपूर्ण असा विचार आहे .आपणमोबाईल चा वापर किती चांगल्या पद्धतीने करू शकतो याच उत्कृष्ट उदाहरण आहे.ह्या मुळे वैचारिक परिपक्वता येण्यासाठी ह्या ग्रुपमधील लेख खूप उपयोगी पडतात. वैचारिक संकल्पना, तत्वज्ञान, वैचारिक बैठक कृती याचा सध्या जगात घसरण सुरू असताना आणि आजच्या तरुणांना ह्या गोष्टींमध्ये रस कमी होत असताना असे ग्रुप एक संजीवनी आहे.मी बरेच लेख लिहिले आणि सगळे वाचतो त्यातून विचार करण्याची क्षमता वाढते.आजच्या चिखलफेकही राजकारणात तत्वनिष्ठ राजकारण पहायलाही मिळत नाही एकही पक्ष विचारला वाहून घेतलेला दिसत नाही.त्यामुळे आपल्याला सुजाण नागरिक बनण्यासाठी हा ग्रुप महत्वाची भूमिका बजावत आहे.
     ग्रुपमध्ये खूप मोठे विचारवंत असल्याने माझ्यासारख्याला त्यांचे लेखन वाचायला मिळत, अगदी ग्रामीण भाग, शहरी आणि तेही एका क्लीकवर हे खूप महत्वाचे आहे.काहींना वाटत फक्त लिहून काय कृती महत्वाची पण मला असा अनुभव आला की जर एखाद्या विषयावर लेख वाचला आणि आपल्या मनातील शंका दूर होते, चुकीची कृती होताना क्षणोक्षणी लेखातील शब्ध आठवतात. त्यामुळे जे लेख लिहीत नाहीत पण वाचतात त्यांना भरपूर सूट द्यावी.
      मला वाटते प्रत्येक आठवड्यात आपल्या देशातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, संशोधन ह्या सर्व प्रकारच्या क्षेत्रात जे आपलं सरकार निर्णय घेतात,उदा. रिझर्व्ह बँकेची जाहीर झालेली धोरण ह्यावर विषय नक्की असावा कारण आपल्या ग्रुपवरून जाणकाराकडून निःपक्षपाती अशी माहिती मिळते आणि त्याचे फायदे तोटे समजतात.आता या ग्रुपने बऱ्यापैकी महाराष्ट्र व्यापला आहेही आनंदाची बाब आहे.
     तुकोबारायांच्या अभंगानुसार"विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म!भेदाभेद भ्रम अमंगळ"आणि "उचणीच कोणी नाही भगवंता!तिष्टे भावभक्ती दवखोनिय!  असा मानवतेला वाहून घेलेला समाज निर्माण होण्यासाठी असा ग्रुप मोलाची कामगिरी बजावतो आहे.
      ग्रुप चालवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्वांचा मी व्यक्तिशः ऋण व्यक्त करतो. काळे सर, वैशाली मॅडम यांनी प्रथम संकल्पना मांडली,असंच आपलं मार्गदर्शन राहो. सर्व ग्रुप सदस्य 🙏"" सुसंगती सदा घडो.......
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*शिरीष उमरे, नवी मुंबई*
          जेंव्हा हा विषय *शब्दमर्यादा नाही* म्हटल्यावर मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या.🤗 इनमिन पाच-सहा महीन्याचा प्रवास सहा दिवस झालेत, रोज विचार करतोय हे लिहीन अन ते लिहीन पण विचाराचे वासरु शब्दाच्या दावणीत बंधायला तयारच नाही. कानात हवा भरल्यासारखे सुसाट धावतेय सारखे. आज कसेबसे वाक्यांच्या गोठ्यात पकडले.

तर झाले असे की व्हॉटस्अप ग्रुपच्या महापुरात वि४ ची लींक आली. ब्लॉगच्या लिंक ला जाऊन एकदोन लेख वाचले. कंसेप्ट आवडला. जुन्या लिहीलेल्या लेखांची व डायर्यांची आठवण झाली... परत लिहीण्याची खुमखुमी वाढली. ✍🏻

जुने दिवस आठवले !! माझ्या वडीलांनी मला वयाच्या पाचव्या वर्षी लावलेली वाचनाची सवय वीस वर्षे टिकली. त्यानंतर माणसे व समाज वाचण्याची चटक वीस वर्षे कायम होती. ह्याच दरम्यान इंटरनेटच्या मायाजालात जे गुरफटलो ते आजगायत... पण मागील पाच वर्षापासुन जे निसर्ग वाचतोय तेंव्हापासुन प्रत्येक क्षण वाचतोय... अनुभवतोय 😇

ह्या माझ्या प्रवासात जे मी अनुभवलय ते इतरांना वाटायचे ह्या शुध्द स्वार्थी विचाराने ग्रुप जॉइन केला. झपाटल्यासारखा दिलेल्या विषयावर लिहीत गेलो. कोणी पसंती देवो वा ना देवो.... बसस् लिहीत गेलो माझे मन मोकळे करण्यासाठी... जवळपास दोन महीने सगळ्याच विषयांवर !!

मग हळुहळु रवीवारी होणार्या चर्चेत भाग घ्यायला लागलो. तोपर्यंत  कोणकोण अॅडमिन आहेत याचा अंदाज आला होता. त्यांचे डीपी, स्टेटस व सोशल मिडीया प्रोफाइल वरुन त्यांच्या व्यक्तीमत्वांचा आढावा घेणे चालु होते. सोबतच त्यांचे ग्रुपवरचे वर्तणुक, त्यांचे लेख व त्यांचे अभिप्राय यांचा अभ्यास सुरु होता. ( जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही.😜) त्यावरुन त्याच्यांतले दुर्गुणांसोबत त्यांची ताकद लक्षात येत गेली. अर्थात मी त्यांच्या पॉजिटीव्ह गुणांबद्दल च बोलणार 😅 हे वाचुन काहींनी सुटकेचा श्वास टाकले असतील😆

जाड भिंगाचा चष्मा, नेहमी गंभीर तर कधी चुकुन हसरा असा खादी मध्ये दिसणारा सौदागर मला पहीले पत्रकार च वाटला. मग गांधी  फेलोशिप वर प्रोजेक्ट करणारा हा ऐन पंचविशीतला तरुण काहीतरी वेगळच बेणं आहे हे लक्षात यायला लागले. मोजक्या शब्दात लिहुन शांततेने समर्पक प्रत्युत्तर देणे ह्यातली त्याची मॅच्युरिटी  भावली मला. माणसे हेरण्याची त्याची स्पेशॅलीटी अॅडमिन टीम मेंबर्स वरुन लक्षात आली होती. असा हा इंट्रोस्पेक्टीव्ह पर्सोना आजही हळुहळु उलगडतोय त्याच्या सहकारी मित्रांच्या लेखातुन. ..

असाच गैरसमज माझा अनिल बद्दल झाला होता. त्याच्या स्थितप्रज्ञ व बर्फासारख्या शांत स्वभावामुळे मला वाटले होते की ह्या अॅडमिनचे एकतर साडीचे दुकान असावे कींवा कुठल्या धार्मिक स्थळाचा ट्रस्टी असावा. माझे सगळे अंदाज धुळीला मिळवले. 🙃 हा समाजशास्त्राचा प्राध्यापक जीम चालवतो 😳 होय हे खरे आहे !! 🤩
विचाराची खोली बघता हा माणुस साठीचा वाटतो पण तिशी ही न गाठलेला हा जबरदस्त हरफनमौला  जिवलग मित्रांच्या मोठ्या नेटवर्कचा खजिना दडवुन ठेवतो.

बालाजी, पवन व संगिता हे अॅडमिन ही असेच छुपे रुस्तुम!! तिघांनाही स्वत:च्या ताकदीची पुर्ण कल्पना पण वेळेच्या तारेवर कसरत करत आपली जबाबदारी पार पाडत पडद्यामागे ह्या ग्रुपचे आधारस्तंभ म्हणुन कार्यरत आहेत.

माझ्या आवडीचे अॅडमिन आहेत प्रविण व करण !! हे दोघे  अक्षरश: ग्रुप जगतात. चोविस तास ग्रुप ह्यांच्या मनात असावा. निस्वार्थी सेवा काय असते हे अनुभवयाला मिळते ह्यांच्याकडे बघुन!! पॅशन काय असते हे कळत ह्यांच्याकडे बघुन 😍

तर गोष्ट आहे काही रविवारांची ... सुरुवात शाब्दिक चर्चेची... वादविवादाची.. आवाहनाची आणि मग हळुहळु शाब्दिक हींसेची, वादावादीची, आव्हानाची !! शब्दांचे फटकारे ओढत, नैतिकता पाळत नियमांच्या कील्ल्याला सुरुंग लावत आमचा रथ सुसाट वेगाने गडाकडे !! गडकरी गोडबोले धास्तावलेले.... मग स्वत: सुत्रधारानेे तुम्ही स्वत: च अॅडमिन व्हा ह्या आवाहन देऊन आमची बोलती बंद केली. सदस्याकडुन सुत्रधाराकडे असा प्रवास सुरु झाला. जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे ही म्हण आठवली. आ बैल मुझे मार अशी अवस्था झाली.  इफ यु वॉन्ट टु नो दि पर्सन देन वॉक इन हीज शुज असे का म्हणतात ते समजायला लागले होते. 😅

अॅडमिन टीममध्ये सुरुवातिला काहीसे उपहासात्मक तर काहीसे कुतुहलात्मक तर काहींनी मदतीचा हात समोर करुन स्वागत केले. मी परत सवयीप्रमाणे नविन ग्रुपचा अभ्यास करायला लागलो. दिलेल्या जबाबदार्या इमानइतबारे पार पाडायला लागलो. येड करतेय तर द्या अजुन जबाबदार्या असे समजुन ह्या खेचरावर अजुन जबाबदार्या दिल्या गेल्या. 😜

काही वेळ माझी अवस्था दोन कारवर उभे राहणार्या अजय देवगण सारखी झाली. सहन ही होइना अन बोंबलता ही येइना !! दोन्ही ग्रुपवर अॅक्टीव राहण्याची कसरत करतांना मला पुलंची गोष्ट आठवली.. रेल्वेच्या जनरल डब्यात प्रवेश करतांना आतल्यांशी युध्द आणि एकदा आत घुसल्यावर मग आत येणार्यां बाहेरच्यांशी युध्द !! 😅
त्यातच मधातच आलेली सौदागरची विरक्तीची भावना 😱

मग मी उचलला जागृतीचा विडा ( एकदम शायिस्तेखानाची आठवण आली की हो... लगेच डाव्या हाताची तीन बोटे चाचपुन बघितली😝) मग चालु झाला माझा दाणपट्टा ... उजव्या हाताने पँट वर करुन डाव्या हाताने कपाळावरचा घाम पुसत उसणे अवसान गोळा करुन मी सिंव्ह का काय म्हणतात तशी गर्जना करुन पाहीली. कोणी सिरीयसली घेतली नाही हा भाग अलहीदा... पण मला सौदागरने दिलेली सुट चा गैरफायदा घेत मी सदस्य कसे खुष होतील, वाचकातुन नवलेखक कसे तयार होतील, जुने लेखक परत कसे जोडता येइल, वाचकांची संख्या कशी वाढेल ह्यावर काम करणे सुरु केले. ह्यात मोलाची साथ मिळत गेली सगळ्या अॅडमिन टीमची !! त्यांचाच वेळ क्रीएटीविटी कडे वळवल्याने पुढचे सगळे सोपे होते.
ह्यातही जुने नियम मोडतोड करुन अनिलला जीमची कसरत करायला लावली. ह्या बर्फाची गरमी अनुभवयाला मिळाली. सौदागरला मौनव्रतातुन बाहेर आणुन अॅक्टीव मोडमध्ये आणले. सगळ्यांना मोठी मोठी स्वप्ने दाखवली. ते जे मराठी भाषेच्या विकासासाठी करत आहेत व त्याचा खासकरुन ग्रामीण भागातील युवांवर काय पॉजिटीव्ह इंपॅक्ट पडतोय ह्या माझ्या शब्दजाळ्यात अडकुन सगळ्यांनी भारावुन जे सहकार्य दिले त्याचे रिझल्ट आपण सगळेच बघत आहात. माझ्या पोपटपंचीमुळे त्यांना त्यांच्यातल्या ताकदीची जाणीव झाली. मी शतश: आभारी आहे सगळ्या अॅडमिन व वि४ सदस्यांचा 🙏🏼
माझ्या दाखवलेल्या स्वप्नाचे मुर्त रुप तुम्ही मला दाखवले ... मी ऋणी आहे तुम्हा सगळ्यांचा 😇
ह्या म्हातार्याच्या अनुभवातुन झालेल्या कामाची कडवट सुरुवात झाली तरी आता गोड फळे आलीत...
# विषय संख्या ३ वरुन ५ वर.
# एका आठवड्यात ५०-६० उत्तम लेख येणे !
# एका दिवसात १५-१६ लेख लिहील्या जाणे !!
# २५-३० नविन लेखक मिळणे !!!
ही वर्षपुर्तीची उपलब्धी !!😍

आज फेसबुकवर २५०+ फॉलोअर्स आणि आठवड्याला १२००+ वाचकांची पोष्टला पसंती ह्याव्यतिरिक्त एकेका पोस्टला लाभलेली ६००-७०० जणांची वाचकसंख्या हे वैभव 🤩

आज ब्लॉग साइटवर २१००० विजिटर्स, ६०० पेक्षा जास्त लेख अशी भव्य कामगिरीचे शिलेदार आहेत करण व प्रविण आणि अॅडमिन टीम !! 🤗

मी आता नविन स्वप्न बघतोय..

✨ वि४ चा डीजीटल दिवाळी अंक
 ✨वि४ चे दहा व्हाॅटस्अप वाचक ग्रुपस
✨ वि४ ची १००+ लेखकांची फौज

ह्यासाठी हवी नविन दमाची युवा टीम... 👍🏻आहात ना तुम्ही तयार 🌱वि४🌿 च्या वर्ष २ च्या प्रवासाला ? ही *वि४* ची मशाल 🔥आता तुमच्या हाती 🤝🏻मित्रांनो 🙏🏼😊

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************