सरकारी नोकरीचे एवढे आकर्षण का?


सरकारी नोकरीचे एवढे आकर्षण का?

Image result for government jobs

सरकारी नोकरी चे आकर्षण, कमी पदभरती, सरकारी धोरणांवरची कडाडून टीका इ . अनेक पैलूंवर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून व्यक्त झालेली तरुणाई.

1)*R. सागर, सांगली*
2)
मुकुंद बसोळे,लातूर.
3)
अभिजीत गोडसे, ता.जि. सातारा
4)शिरीष उमरे, नवी मुंबई 5)किशोर शेळके, लोणंद. जि- सातारा.
6)
सचिन कंन्नाके, रा. पिंपळखटी, ता. राळेगाव, पो. झाडगाव, जि. यवतमाळ*
7)
निखिल खोडे, ठाणे.
8)
शीतल शिंदे - दहिवडी
9)
तेजस महापुरे, कराड.
10)
यशवंती होनमाने, मोहोळ.

R. सागर, सांगली
.
आपल्या भारत देशाची एक कृषिप्रधान देश म्हणून ओळख आहे. एक काळ असा होता की आपल्याकडे उत्तम शेती, मध्यम व्यवसाय व कनिष्ठ नोकरी असं क्रम असायचा. आता परिस्थिती अगदी उलट आहे. आता तोच क्रम उत्तम नोकरी, मध्यम व्यवसाय व कनिष्ठ शेती असं लावला जातो. नोकरीमध्येदेखील सरकारी नोकरीला जास्त प्राधान्य दिलं जातं. सध्याच्या युवावर्गालादेखील त्याबद्दल जास्त आकर्षण आहे. म्हणूनच तर एका-एका जागेसाठी हजारो अर्ज येत असतात. आणि किमान चौथी पास इतकी शैक्षणिक पात्रता अपेक्षित असणाऱ्या जागेसाठी PHDधारक अर्ज करतात.
.
सरकारी नोकरी म्हणजे ठराविक तास काम, कामाच्या तुलनेत मिळणारा चांगला पगार, त्यासोबतच मिळणाऱ्या सर्व इतर सोई-सुविधा आणि कुठल्याही कामाच्या पूर्ततेसाठी वेळेचं बंधन न ठेवता आपल्या सोयीनुसार त्यासाठी घेतला जाणारा वेळ असा आपल्याकडे एक साधारण समज आहे. त्यातूनच सरकारी काम, सहा महिने थांब अशी म्हणही रूढ झाली आहेच. याउलट खासगी नोकरीमध्ये वेगवेगळ्या शिफ्टमध्ये करायला लागणारं काम, कामाच्या पूर्ततेसाठी असणारी बंधनं, त्यातून येणारा अतिताण आणि केलेल्या कामाच्या तुलनेत मिळणारा कमी मोबदला या सगळ्या गोष्टी आहेतच. खासगी नोकरीमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी नाही झाली तर नोकरीतून कमी केलं जायची टांगती तलवार डोक्यावर आहेच. सरकारी नोकरी त्याही बाबतीत सुरक्षित आहे. शिवाय सोबत समाजात एक वेगळी प्रतिष्ठा मिळते ते वेगळंच.
.
वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्याकडे पुरेशी शेती उपलब्ध नाही. त्यात हवामानाच्या लहरीपणामुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळेलच याची शाश्वती नाही. व्यवसाय करायचा म्हटलं तर त्यात रिस्क घ्यायची आपली तयारी नसते किंवा अपेक्षित Output मिळेपर्यंत थांबण्याइतका संयम आपल्याकडे नसतो. खासगी नोकरीमध्ये विविध समस्या आहेतच. त्या तुलनेत सरकारी नोकरी ही भविष्याच्या दृष्टीने एक सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. कदाचित त्यामुळेच त्याचं आकर्षण वाटत राहतं.
.

______________________________________________________________________
मुकुंद बसोळे,लातूर

स्थळ- ( अर्थातच  xyz रिडींग रूम ) दोन परीक्षार्थी मध्ये  चाललेला संवाद आणि बाजूला काही श्रोते....म्हणजे ते सुद्धा परीक्षार्थीचं पण यांचा संवादामुळे श्रोते झालेले........
पहिला-  अभ्यास करून करून गां*ला फोड येयाची पाळी आली यार......पण साला पोस्ट काही निघनाय बघ...आबे 69 पोस्ट ला दहा हजार अर्ज....मायची गां*  त्या  सरकारच्या मजाक लावलाय का काय......(अर्थातच त्रासिक चेहरा)
दुसरा-  ( हा थोडासा समजदार 'चेहऱ्यावरून' तरी)  आबे निराश नको न होऊ....इस बार हम फाड डालेंगे  भाई......(शक्य तेवढं हसत).....

पहिला- आबे गप... आतापर्यंत सरकारने मजाक केलंय.... आणि आता तू सुरु झालाय व्हय.....आई*ल्या......आबे नौकरी नसल्यामुळे अजून लग्न नाही झालंय माझं...
दुसरा- (अजूनपन समजावण्याचा सुरातच) भाई थोडा पेशन्स रख ना....ऐसा क्यों कर रहा है.... भाई...."मंजिल उन्हीको मिलती  है  जिनके सपणो मे जाण होती है, युंही पंख होनेसे कुछ नही होता हौसले से उडान होती है"........
पहिला -(आता थोडं बरं वाटून)...होय का?...तरीपण सरकारच्या मायची गां*....हितक्या कमी जागा काढतेत होय कुठं?...मायला आमच्या शेतात हेच्यापेक्षा जास्त मजूर काम करतात.....
दुसरा-  आबे सरकारला शिव्या नको देऊ...त्याचंच काम करायचंय तुला?...म्हणजे सरकारी नौकर होणार ना तू...... बरं मला सांग तुला सरकारी नौकरीचं एवढं आकर्षण का आहे?....एवढी मोठी शेती तुझी...ती संभाळण्यापेक्षा इकडे कशाला मरऊन घेतोस.....

पहिला-  (तोंडावर काय येड ध्यान आहे हे हे भाव आणून.....म्हणजे याला एवढं सुद्धा माहीत नाही हे भाव) अरे यार....सरकारी नौकरी म्हणजे सरकारचा जावई....इथं कुणी विचारात नाही...कोण किती काम केलंय...निव्वळ आरामात काम करायचं....टाईमपास करत....फिक्स पगार तुम्ही काम करा अथवा न करा....वरून त्यात वेगळे वेगळे भत्ते....म्हणजे चांदीच चांदी... सेक्युर जॉब....तुम्हाला कुणी कामावरून काढू शकणार नाही....समाजात प्रतिष्ठा.....प्रत्येकजण साहेब म्हणून बोलणार....भले आपण सरकारी शिपाईच का असेना....पण 'साहेब'....अन  सर्वात महत्वाचं म्हणजे मधली कमाई...म्हणजे मलई रे....ती आपल्या मूळ पगाऱ्यापेक्षा जास्त....(चेहरा थोडा गोरामोरा होऊन,लाजत) आणि बायकू सुद्धा चांगली भेटणार.... (स्वप्नात रमल्यासारखं करत आणि एक स्मितहास्य चेहऱ्यावर)........
दुसरा- (एक दीर्घ निश्वास घेऊन आणि प्रभोनात्मक भाषण देण्याच्या पवित्र्यात)  असं आहे तर....भाई....पण मला मात्र 'सरकारी नौकरी' ही समाजसेवा करण्याचं 'उत्कृष्ठ' माध्यम वाटतं....( हे वाक्य उच्चारल्या बरोबर पहिल्याने दुसऱ्याकडे असं बघितलं जसं त्याने गुन्हाच केला आहे आणि त्याची शिक्षा आता फाशी च आहे.....पण दुसऱ्याने आपलं तसंच चालू ठेवलं) अरे....आपण समाजातील सामान्य घटक...ज्या समाजात आपण वाढलो त्या समाजाची सेवा आपण ह्या सरकारी नौकरीतून केली पाहिजे....सरकारी नौकरी म्हणजे 'मलई' हा समज आपण बदलला पाहिजे.... "रंजल्या गंजल्यांची" सेवा आपण ह्या  सरकारी नौकरी च्या माध्यमातून केला पाहिजे....तुला आठवतंय आपण तुझा कसला तरी 'कागुद' काढायला तहसील कार्यालयात गेलो होतो...तेंव्हा तेथील अधिकाऱ्याने  तुला 'मलई'मागितली तेंव्हा तू किती 'शिव्या' हासडल्या होत्या त्याला....मग आपण सुद्धा तसंच बनायचं का?...मग काय अर्थ आहे यार या जीवनाला....आपण ज्या अडचणीतून गेलो त्या अडचणीतून समाजाला सोडवायच की हे 'मलई' च भूत पुढच्या पिढी च्या मानगुटावर बसवायचं.....अरे सरकारी कार्यालयात येणारी जनता सगळी गरीब असते...आणि त्याच्याकडूनच आपण 'मलई'घेतो...हे चुकीचं आहे साफ....आणि अश्या 'मलई'मूळ देश्याची आणि देशातील जनतेची वाट लागते...भाई....आणि राहिला प्रश्न प्रतिष्ठेचा....ती 'मलई' खाऊन मिळवण्यापेक्षा 'समाजसेवा'करून मिळवावी....ती चिरकाल टिकेल....आणि राहिला प्रश्न बायकोचा तर ती अशीही मिळेलच की चांगली कामे करून....कुणी कितीही काहीही म्हणो मला मात्र 'सरकारी नौकरी'म्हणजे 'समाजसेवेच' उत्कृष्ठ माध्यम वाटतं.....बस्स....( माझं संपलं ह्या अविर्भवात खुर्चीला मागे टेकून बसला)
पहिला- ( भारावून  गेल्यासारखा आणि काहीसा विचार करून...) बरोबर आहे... भाई तुझं....आतापासून मी सुद्धा 'सरकारी नौकरीला' 'समाजसेवेच' उत्कृष्ठ माध्यम म्हणून चं बघणार.....( आणि बाकीचे सगळे पोर जे आतापर्यंत श्रोते बनून होते ते सुद्धा म्हणाले 'आम्हीसुद्धा'.....)
______________________________________________________________________

अभिजीत गोडसे , ता.जि. सातारा.  
                ' मनुष्याच्या अन्न , वस्ञ , निवारा या मूलभूत गरजा आहेतच . याच बरोबर अर्थजण करणे हे ही तेवढीच आणि महत्त्वाची गरज आहे . भले मग तो काही का करेणा. खाजगी असो की सरकारी. व्यक्तीच्या  हातात कुठून ना कुठून पैसा आला म्हणजे झाले. आता मुद्दा उरतो तो प्रतिष्ठेचा तो व्यक्ती काय काम करतो , कुठे करतो , कोणत्या पदावर करतो , कसा करतो , सुविधा किती  वगैरे वगैरे . खरेतर इथेच मेख आहे. सरकारी नोकरीची . सरकारच्या मुख्य प्रवाहात कोणाला नाही आवडणार काम करायला ? प्रतिष्ठा आहे , मान आहे , संम्माण आहे , पैसा आहे , सुरक्षा आहे , पेन्शन आहे. आणि खाजगी मध्ये याच्या सर्व विरूध्द बाजू आहेत ! असे म्हटले तर काही वावगे नाही . सरकारी नोकरीत असणारे  किंवा येवु इच्छेनारे बरेचदा समाजसेवा म्हणून आम्ही सरकारी नोकरी घेतली किंवा घेणार आहे वगैरे असे तोंड कौतुक सांगतात. सरकारी नोकरीची ठराविक वर्षे उलटली की हे समाजसेवेच ढोंग कुठे जाते. हा संशोधन करण्याचा प्रश्न आहे. अर्थात काहीजण याला अपवाद असू शकतात. केवळ सुविधा आणि सुरक्षा हाच ऐकमेव सरकारी नोकरीचा फंडा म्हणून पाहिले जाते. म्हणून तर सरकारी नोकरीची वयाची अट वाढवा म्हणून  मागणी चालू आहे. असो. स्पर्धा परिक्षांच्या महाजालातूण काबाड कष्ट करुण सुटलेले नवे अधिकारी वेगवेगळ्या मंचावार इतक्या तावातावाणे बोलतात की असे वाटावे हा आता सरकारी नोकरी  मध्ये गेला की सर्व प्रश्न सुटणार. खरे तर अशा नव युवकांचे  सत्कार तेव्हा केले पाहिजेत की त्यांनी खरच सरकारी नोकरीला न्याय दिला , सर्व योजना प्रामाणिकपणे राबवल्या , कोणताही भ्रष्टाचाराचा डाग अंगाला लावला नाही. जर असे असेल तरच खरी समाजसेवा झाली या नोकरीत येऊन असे समजावे. नाहीतर नुसत्या वेगवेगळ्या  मंचावरूण प्रेरणा देऊन बाकीचे विद्यार्थी पेटवण्या पलिकडे काहीही होऊ शकनार नाही.
              खाजगीत असलेल्या व्यक्ती  कायमच सरकारी नोकरदारांची टिंगल करतात . आणि आम्ही खाजगीत असून किती छान आयुष्य जगतो असे भासवतात. खर तर यातील बरचसे सरकारी नोकरीची परीक्षा देताना घाम फुटलेले अपयशी असतात. स्वतःला सरकारी नोकरी लागली नाही म्हणून दुसऱ्यावर शिंतोडे उडवायचे काम . पण आज बरेच मोठे उद्योग हे सरकारी नोकरदारांणा मदत करताना दिसतात. जसे की टाटा , रिलायन्स आदी समुह हे जरी खरे असले तरी याच्या मागे त्या - त्या समुहाचा  फायदा असतोच असतो. हे नाकारता येत नाही . तसेच सामाजिक संस्था देखील आपल्याला सरकारचा हिस्सा कसा बनता येईल या साठी प्रयत्न करताना दिसत असतात. सरकारी रोजगार मिळवण्यासाठी धडपडताना दिसतात. लग्नाच्या बाजारात डोकावून पाहिले तर दिसून येईल सरकारी शिपाई असला तरी चालेले . पण सरकारी नोकरदारच पाहिजे. हीच मागणी असते. ग्रामीण भागात काबाड कष्ट करणाऱ्या मजूर , अल्पभुधारक शेतकरी यांचा मुलगा  सरकारी नोकरी लागतो तेव्हा त्यांच्या आयुष्याच , त्याच्या आत्ता पर्यत केलेल्या कष्टांच सोन झाल हाच त्यांचा चेहऱ्यावर आनंद असतो. अशा वेळी तो गावातील पारावर जातो. तेव्हा त्यांचा आनंद फाटका लेंगा आणि फाटकी दंडकी घातलेली असून सुद्धा  त्यांन जग जिंकल हीच भावना असते. ही सर खाजगी कंपनीत मोठ्या पदावर असलेल्या मुलांच्या वडीलांना नाही ! पुर्वीच्या वयस्कर  माणसांना सरकारी नोकरीचे प्रंचड आकर्षण आहे. त्याच्यासाठी गावाचा तलाठी , ग्रामसेवक , पोलीस पाटील , पोलीस ही देव माणसं असतात. त्याच्या काळात त्यांनी प्रचंड  कष्ट केलेले आहे. त्यांना माहिती आहे. सरकारी नोकरी हीच आपल्या मुलांच भविष्य उजळू शकते. अशी कित्येक उदाहरण देऊन सांगता येईल सरकारी नोकरीला येवढ वलय का ते.
             सरकारी नोकरीत  समाजसेवा , देश सेवा हे सर्व ठिक आहे. पण काही ठराविक वयानंतर एकच मुद्दा उरतो तु खाजगीत  किती कमावतो आणि मि सरकारी नोकरीत  किती कमावतो .
______________________________________________________________________
शिरीष उमरे, नवी मुंबई

Image result for government jobs
काही सरकारी नोकरी हे जॉब सॅटीस्फॅक्शन देतात जसे मिलीटरी, एअरफोर्स, नेवी, पोलीस, फायर बिग्रेड, शिक्षक, सायंटीस्ट, पोस्ट, फॉरेस्ट वैगेरे. ह्यात बरेचवेळा पॅशन, अॅडवेंचर व आवड असणारी आणि देशसेवा करण्याची भावना असलेल्या लोकांचा कल जास्त असतो.
काही सरकारी नोकर्या ह्या जबाबदारी सोबत च स्पेशल पॉवर देणार्या असतात जसे की न्याय व्यवस्था, अॅडमिनिस्ट्रेटीव्ह सर्विसेस, रेव्हीन्यु डीपार्टमेमट... ह्या क्षेत्रात अधिकाराचा वापर करुन काही चांगले करण्याचा ध्यास असणारी लोक पुर्वी असायची... आताही आहेत पण संख्या रोडावली.. आता डबल इनकम पॉलीसी मुळे भ्रष्टाचाराचे कुरण बनलाय हा विभाग..
काही सरकारी जॉब देतात आर्थिक स्थैर्य व सुट्ट्या आणि कमी कामाचा ताण... ह्या कॅटॅगरीमध्ये ६०-७० % लोक असावेत. ह्यातले काही आपले काम चोख बजावुन उरलेल्या वेळेचा समाजासाठी सदुपयोग करतात. ह्यातले बरेचसे कुटुंबवत्सल लोक असतात. काही लोक कामाचा कंटाळा व वेळेचा दुरुपयोग करणारे असतात. हे लोक समाजाला लागलेली कीड आहे.
खाजगी नोकरीतील अनिश्चितता, कमी पगार, जास्त काम व पर्यायाने जास्त वेळ यामुळे सरकारी नोकरी प्यारी वाटते. सेम व्यवसाय/धंदा/ उत्पादन /सेवा ह्या क्षेत्रात असल्याने सरकारी नोकरीचे आकर्षण युवांमध्ये कायम असते.
तरीही हे लक्षात घ्या की उत्पन्नाच्या संधी ह्या सरकारी क्षेत्रात फक्त २% आहेत व ९८% खाजगी क्षेत्रात व उद्यमशिलता मध्ये आहेत. *शिकतांना कमवा* हे धोरण वापरले तर आयुष्याची महत्वाची वर्षे वाया जाणार नाहीत.
किशोर शेळके.लोणंद. जि- सातारा.
      आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी चार रुपयांच्या मिळकतीच्या शोधात प्रत्येकाला धडपडावे लागते. प्रत्येक माणूस आपापल्या परीने कमवतो, त्यातून स्वतःची व स्वतःच्या परिवाराची गुजराण करीत असतो. पैसे कमावण्यासाठी व्यवसाय व नोकरी हे दोनच पर्याय आहेत. व्यवसाय करण्यासाठी भांडवलाची गरज असते ही अफवा अजूनही आबाधित आहे, आणि जोपर्यंत राहील तोपर्यंत तरी तरूण वर्गाचा कल नोकरीकडे च राहील.
नोकरी करायची ठरवले तरी पैशाच्या स्वरूपात मिळणारा पगार, या व्यतिरिक्त सुरक्षितता आणि इतर सोयीदेखील बघितल्या जातात. सुरक्षितता आणि इतर सोयींचा विचार करता सरकारी नोकरीच उत्तम ठरते. आणि हेच एकमेव कारण आहे की सर्व तरूण वर्ग सरकारी नोकरीच्या मागे धावताना दिसतो.
        पोलिस यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा, पाटबंधारे विभाग, सुरक्षा विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग इत्यादी सर्व ठिकाणी सरकारी नोकर यंत्रणा कार्यरत आहे. ज्या त्या क्षेत्रातील अग्रगण्य लोक इथे काम करतात. इथे येण्यासाठी ठराविक स्पर्धात्मक परिक्षा अवलंबल्या जातात. या परिक्षा पास झाल्यावर या पदावर माणूस पोहचतो. भरपुर कष्टाचे हे फळ असते, म्हणून त्या पदाचे अधिकारही तेवढेच मोठे असतात. साहजिकच हे अधिकार ज्याच्या हाती येतील, तो तेवढे अर्थार्जन ही करेल.
        सरकारी नोकरी हे कमवण्याचं साधन असलं तरी जबाबदारीचा डोंगर देखिल आहे, पोलिस हवालदाराने दंड म्हणून मागितलेले दोनशे रूपये आपल्याला दिसतात. पण रात्रंदिवस केलेला बंदोबस्त आपल्याला दिसत नाही. जेवढे मोठे पद तेवढा जास्त पैसा हे जितकं खरं आहे तितकंच हेदेखील खरं आहे की, जेवढे मोठे पद तेवढीच जास्त जोखीम आणि जबाबदारी.
         आता राहिला प्रश्न तो भ्रष्ट यंत्रणेचा, तर त्याला खतपाणी घालण्याचे काम आपणच करतो. 'सरकारी काम आणि सहा महिने थांब' ही म्हण आपण सर्वजण जानून आहे. म्हणजे या कामात ऊशीर लागतो हे सर्वश्रृत आहे. पण आपल्याला वाट बघणं आवडत नाही, आणि आपले एखादे सरकारी काम लवकर करून घेण्यासाठी सरकारी अधिकाय्राला टेबलाखालुन दोन रूपये देतो. आणि वरून बोंब मारतो की, सरकारी यंत्रणा भ्रष्ट आहे. किंवा वैयक्तिक त्या सरकारी कर्मचाय्राला दोष देतो. पण यात काही विशेष सहभाग आपलाच आहे, हेदेखील विसरून चालणार नाही.
______________________________________________________________________
सचिन कंन्नाके, रा. पिंपळखटी, ता. राळेगाव, पो. झाडगाव, जि. यवतमाळ
हा माझा पहिला लेख तरी हा विषयावर खूप काही लिहण्यासारखे तरी मी माज्या विचार सरकारी नोकरीचे महत्व आपल्या गावाकडील वेक्ती मानतात की अरे तु एवढा शिक्षण घेतले पण पुढे जाऊन चांगल्या पदवी घे आणि आज मी पदवी पण पूर्ण केली आणि आज मी साधारण नोकरी करत अहो तरी आज मला माहित झाले की आजच्या लोकांना फक्त भ्रम आहे की सरकारी नोकरी चांगली आहे._
   
तरी माझ्या मनाने सरकारी नोकरी ही फक्त गुलाम असतो. त्यामध्ये आपण दुसऱ्याच्या वर्चस्वा खाली जखडलेलो असतो.

आणि त्यामध्येही आज सरकारी नोकरी हा एक माझ्या मताने व्यवसाय बनला आहे त्याचे कारण म्हणजे जेव्हा आपण एखादी नामकीत नोकरीच्या मुलाखतीला जातो आणि तो  प्रशिसक तो त्याच्या वेतरिक्त दुसरे प्रश्न विचारतो. कारण तो म्हणतो की एज्युकेशन खूप आहे पण हुनर काय आहे. पण आपण अभ्यासू वेक्ती असतो त्यावतरिक्त दुसरे काही आपल्याला येत नाही.आणि याचा फायदा घेऊन तो वेक्ती म्हणतो की पोस्ट खाली आहे पण त्यासाठी तुमि पात्र नाही पण मी वरच्या सरांना तुमचे नाव सांगण्याचा प्रयत्न करतो पण तुम्हाला थोडे पैसे द्यावे लागेन. असे म्हणतो. आणि त्यामध्ये आपला छळ होतो. म्हणून आज सरकारी नोकरी भ्रम आहे.
    
  
आपण एवढे शिक्षण घ्यायचे आणि त्यानंतर वर्ष न वर्ष नोकरीची वाट पाहत बसायचे तरी नोकरी लवकर मिळत नाही.
      *म्हणून माझ्या मताने सरकारी नोकरी ही आजच्या माणसाचे भ्रम  व आकर्षणआहे.*
*As you wish*
______________________________________________________________________
निखिल खोडे, ठाणे.
            कामाचे ठराविक तास, कामावराती टेन्शन नाही, नोकरीची हमी, सरकारी सुट्टया, समाजामध्ये वरचे स्थान, सरकारी नोकऱ्या म्हटल की असे बरेच विधान आपल्या डोक्यात येते. आणि लहानपणी आई सुद्धा म्हणायची की शिपाई ची नोकरी असली तरी चालेल फक्त नोकरी सरकारी असाव. परंतु खरच हे सर्व सरकारी नोकरी मध्ये शक्य आहे का?
           
             
काही सरकारी नोकऱ्यांमध्ये काही नोकऱ्या ह्या पॅशन किंव्हा आवड म्हणुन स्वीकारत असतात. त्या नोकऱ्यांमध्ये आनंद मिळतो. याउलट काही लोक नोकरीची हमी, आरामदायी नोकरी इत्यादी कारणामुळे सरकारी नोकरी करतात. तर काही लोक आरक्षणामुळे कमी टक्केवारी सुद्धा नोकरीवर लागतात.
                प्राथमिक शिक्षकांचे वेतन जवळपास महिन्याला २५ ते ३० हजाराच्या घरात असते. आणि त्याच ठिकाणी बघायला गेलं प्राइवेट कंपनी मध्ये कौशल्य असुन सुद्धा कमी पगारावरती काम करावे लागतात. याचाच परिणाम म्हणून काही लोक सरकारी नोकरी करणे पसंद करतात. सध्या तरी सरकारी नोकरी लागण्यासाठी ची स्पर्धा आणि भ्रष्टाचार यामुळे काही गरीब विद्यार्थ्यांचं स्वप्न अपूर्ण राहते.
                सरकारी नोकरी अनेक वर्ष प्रयत्न करून सुद्धा नाही लागली तर बरेचदा काही लोक खचून जातात. अशा वेळी त्यांनी स्वतःला सावरुन आधुनिक शेती सारखा पर्यायी व्यवसाय किंव्हा नोकरी करायला पाहिजे.
______________________________________________________________________

  शीतल शिंदे - दहिवडी 
     
सरकारी नोकरी म्हणजे आयुष्य भर आपण मजेत खाउ-  पिवू शकतो .आरामदायी आयुष्य काढू शकतो .मुलांना चांगले शिक्षण देवू शकतो .एकंदरीत कोणतेही टेन्शन नाही .ही एक भावना असते . दुसरी भावना देशसेवा करणे .पोलीस , आर्मी , नेव्ही , सेक्यूरिटी सोडले तर बाकीच्या ठिकाणी किती देशसेवा मनापासून करतात ते त्यानाच माहीत .मोजके कर्तव्यदक्ष आधीकारी सोडले तर किती प्रामाणिक पणे काम करतात कोण जाणे .
काही डिपार्टमेंट मधे तर फक्त पाट्या टाकण्याचे काम करतात .घड्याळाच्या काट्यावर काम करायचे .शासकिय सुट्ट्या आठवडा सुट्टी वरून राजा .
ह्यामध्ये सेवा घेणाऱ्या लोकांची परवड होते .बोलायचे कोणाला आणी कोनाला सांगायचे .कारण ह्या लोकांनी भ्रष्टाचार केला तरी थोड्या दिवसांनी पुन्हा कामावर घेतले जाते त्यामुळे काहीही करायला मागे पुढे पहात नाहीत .
        
भरगच्च पगार , महागाई भत्ते , वेतन आयोग , प्रमोशन वरून दोन वर्ष वाढ , आणी निवृत्ती पेन्शन बिनधास्त .
      
या उलट खाजगी नोकरीत त्यांच्या चौपटीने काम करावे लागते , कामाचे टार्गेट , वरिष्ठांकडून होणारी पिळवणूक , काम जाण्याची भीती , ना भत्ता , ना पगारवाढ .वेल एजुकेटेड असुन सुद्धा त्याप्रमाणे नोकरी - काम मिळत नाही .तुटपुंजा पगार सर्व काही उलट .म्हणून सरकारी नोकरी बरी ही भावना सर्रास असते .
 
खरेतर ह्या ठिकाणी मंत्र्यांपासून त्यांच्या मानधनापासून विचार केला पाहिजे .त्यांना पुरवणाऱ्या सुख सोई ऐश- आराम ह्यात कितीतरी गरीब कुटुंब जगून निघतील .
        
भ्रष्ट्राचारी लोकांवर कडक करवाई केली गेली पाहिजे .इकडे सुशिक्षित बेरोजगार भरपूर पडलेले आहेत .
सरकारी नोकरी नसेल तर काय असेच बसायचे काय करणाऱ्याला  करायचे असेल तर खूप काही करू शकतात .व्यापार - उद्योग , खाजगी नोकरीत राहून सुद्धा आपण बचत ठेवून भविष्याची तरतूद करू शकतो .त्यासाठी आत्मविश्वास नी कर्तुत्व हवे .
­­­­­­­­­­­­______________________________________________________________________
तेजस महापुरे, कराड            
           
आपणा सर्वांना माहिती आहे की बदलत्या काळानुसार करियर बद्दल असणारे आकर्षण हे बदलत असते,उदाहरण घ्यायच झालच तर एक काळ मेडिकल इंजिनीरिंगचा चा होता, MBA चा होता परंतु खाजगी क्षेत्रात सरकारी नोकरी एवढी शाश्वती नसल्याने साहजिकच अनेकांचा मोर्चा हा सरकारी नोकरीकडे वळला त्यासाठी प्रमुख 5 कारणे आहेत असं मला वाटत....        
Image result for government jobs cartoons in marathi
1)पद- सरकारी नोकरीतून मिळालेले पद हे एखाद्याच आयुष्य बदलून टाकत, जर एखादा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असेल तर अनेक जण त्याला चिडवत असतात, त्याला पाहून म्हणतात की बघा हे निघालय येड मोठं पद मिळवायचा अभ्यास करतंय, काहीजण फालतू सल्ला देखील देतात पण जर त्याला पद मिळालंच तर हेच लोक इतरांना सांगतात की मीच त्याला या परीक्षांची तयारी करायला सांगितले होते, म्हणजे त्याला मिळालेल्या पदाच श्रेय हे असले लोक घेतात, पदामुळे त्याला चांगली स्थळे येऊ लागतात.
2)
पैसा- सरकारी नोकरीत पगार व इतर भत्ते हे चांगले असतात, त्यामुळे ते प्राप्त केलेल्या व्यक्तीला पैसे आणि निवृत्तीनंतर पेन्शन यामुळे नोकरी करत असताना व निवृत्तीनंतर आर्थिक दृष्ट्या समर्थ बनवते.                        3) अधिकार- सरकारी अधिकाऱ्यांना असलेल्या अधिकारांमुळे या नोकरिबद्दल आकर्षण जास्त आहे,कारण आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा चांगला उपयोग करून समाजाची सेवा करण्याचं हे प्रभावी माध्यम आहे.              4) प्रतिष्ठा- सरकारी अधिकाऱ्यांना समाजात फार प्रतिष्ठा  प्राप्त होत असते,त्यात जर अधिकारी हा प्रामाणिक असेल तर त्याला लोक डोक्यावर घेतात.                                  5) सुरक्षितता- सरकारी नोकरीत जेवढी सुरक्षितता आहे तेवढी कोणत्याच नाही, एकदा का यात नोकरी लागली की निवृत्त होईपर्यंत काही अडचण येऊ शकत नाही पण जर टोकाचा मूर्खपणा केलाच तर नोकरी जाऊ देखील शकते.
______________________________________________________________________
यशवंती होनमाने .मोहोळ 
सरकारी नौकरी म्हणजे सगळ्यांचा जीव की प्राण .सरकारी नौकरी कशाला तर म्हणे की त्यात एक रुबाब असतो .बरोबर आहे सरकारी नौकरी म्हणजे रुबाब आलाच पण कोणी विचार केलाय का की ही स्पर्धा किती जीवघेणी आणि खर्चिक झालीय ते .
सरकारी नौकरी चे फॉर्म भरायचे म्हणजे प्रत्येक वेळी 400-500 रुपये लागणार त्यात जागा मोजक्याच .अहो कित्येक मुलं मुली तणाव ग्रस्त जीवन जगत आहेत .माझ्या बरोबरीचे काही माझे मित्र मैत्रिणी आहेत त्याना विचारल ना की तुम्ही सध्या काय करता तर त्यांच उत्तर एकच MPSC- UPSC करतो .अहो ती काय नौकरी आहे का .तुम्हाला तुमचं टेलेंट सिध्द करायला सरकारी नौकरी हा एकच मार्ग आहे का ? ?
सगळ्यांना वाटते की सरकारी नौकरी असली की जीवन जगणे सोयीचे होते पण हे चूक आहे .तुम्हाला जर खरंच काहीतरी करायचे असेल तर ते तुम्ही कोणत्याही चांगल्या मार्गाने करू शकता त्या साठी सरकारी नौकरी ची गरज नाही .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************