दत्तात्रय तळवडेकर सिधुदुर्ग
शिक्षक म्हटलं की आपणास वाटत की सगळा समाज घडविण्याचा ठेका घेतलेला व्यक्ती पण आपण हे विसरून जातो की पालक या नात्याने आपलीही तेवढीच जबाबदारी आहे ती सुसंस्कृत समाज घडविण्याची .असो पण शिक्षक आणि शैक्षणिक धोरण असा विषय हवा होता कारण सुसंस्कृत समाज घडवायचा असेल तर शिक्षकांसोबत शैक्षणिक धोरण ही महत्वाचे आहे पण आज कालच्या राजकर्त्यांनी शिक्षणाचा बाजार केलाय असे खेदाने म्हणावे वाटते आणि त्याचाच परिणाम म्हणून की काय मराठी शाळेतील विध्यार्थी संख्या त्या शाळेतील शिक्षकांपेक्षाही कमी झाली आहे. आणि त्याव्यतिरिक्त आपल्या शिक्षकांवर दिलेले अतिरिक्त कामाचा ताण म्हणजे जनगणना, आहार देने हिशोब ठेवणे , निवडणुकीची कामे देने वैगेरे . त्यामुळे शिक्षक आपले मुख्य काम सोडून बाकीच्या कामाकडे लक्ष देऊ लागलेत आणि त्यात मुलांच्या परीक्षाही बंद झाल्यात . मग अश्या अवस्थेत समाज घडेल कसा? आणि तो घडला नाही तर त्यास जबाबदार कोण ? शिक्षक की सरकार ?
–----------------------------------
रुपाली आगलावे,
सांगोला
शिक्षक म्हणून समाजात वावरताना खरंच एक वेगळीच प्रचीती येते ती म्हणजे नेहमी जबाबदारीची जाणीव होत राहते की, आपल्या विद्यार्थ्यांचं भविष्य आपल्या हातात आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना एक शिक्षक म्हणून खूप विचार पूर्वक करावी लागते.
शिक्षकाला सुसंस्कृत समाज घडवायचा एक मूलभूत घटक मानला जातो आणि ते तितकंच खरं आहे... मान्य आहे की समाजातील इतर मंडळींवर पण ती जबाबदारी आहे पण एका शिक्षकाची जबादारी ही जरा जास्त असते मुलाच्या जडणघडणी मध्ये. पण प्रत्येक वेळी एखाद्या मुलाने काही चुकीचं केलं तर त्यावेळी फक्त शिक्षकाला जबाबदार धरण चुकीचं आहे... कोणताच शिक्षक कोणत्याही मुलाला चुकीचं किंवा वाईट मार्गावर जाण्यासाठी कधीच सांगत नसतो... त्यामुळे आशा वेळेस शिक्षकाला वेठीस धरण चुकीचच...
शाळेत आलेला विध्यार्थी शिक्षकाकडे एका अपेक्षित नजरेने बघत असतो.. आणि ती अपेक्षा पूर्ण करणं ही एक शिक्षक म्हणून प्रत्येक शिक्षकाची जबाबदारी आहे... एका मातीच्या गोळ्याला कसा आकार द्यायचा हे त्या शिक्षकावर अवलंबून असत... आणि म्हणूनच एका सुसंस्कृत समाजाचा पाया घडविणारा घटक म्हणून शिक्षकाकडे बघितलं जातं.
--------------------------------------------
किरण पवार
औरंगाबाद,
"शिक्षक" या शब्दाला अर्थ आणि भारतीय संस्कृतीत स्थान आपण तितकचं दर्जात देत आलो आहोत आजवर. कारण शिक्षक नाही म्हणजे सरळसरळ दिशाहीन भरकटणं, आणि हे भरकटणं कधीही न संपणार लवकरात लवकर साहजिकच अंताकडे जाणारं असतं. पण सध्या महाराष्ट्रात तरी किमान या शिक्षकावर अन्याय होताणाच दिसतोय. काही ठिकाणी एकीकडे शिक्षक बिनपगारी मुलांना शिकवून स्वत:च पोट भागवण्याकरता भाजी विकत आहेत तर कुणी अंड्याचा व्यवसाय करत आहे. खरतर शिक्षकभरती आणि रखडलेली प्रक्रिया एकदाची आत्ताकुठे मार्गी येऊ पाहतेय पण त्यातही सरकारची संथ गती चालूच असल्याचं निदर्शनास येतय.
काही शिक्षकांना परिस्थितीपुढे हतबल व्हावं लागलं तर काही शिक्षकांनी नव्या प्रयोगांना राबवून समाजापुढे नवे आदर्श निर्माण केल्याच आज पहायला मिळतयं. एका ठिकाणी शिक्षकांनी नक्षलवाद्यांना दररोजच्या विश्वास संपादनातून सध्याच्या राहणीमानात आणून ठेवल. ही मोठी गोष्ट नक्कीच म्हणावी लागेल. आजवर ज्या शिक्षकांनी स्वावलंबनाचे विद्यार्थ्यांना केवळ धडेच दिले त्यांनीदेखील यावेळी स्वत: स्वावलंबनत्वाचे तीव्र धोरण हाती घेतल्याच पहायला मिळालं. पण एकूणच सारासार विचार करता शिक्षकांवर जी काही सध्याची वाईट परिस्थिती ओढावली आहे त्याला कुठेतरी सरकार जबाबदार आहे, हे मात्र निश्चित. बाकी शिक्षकांबद्दल मनात आदर व प्रेम कायम राहिल; एवढं नक्की.
धन्यवाद!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा