शिरीष उमरे, मुंबई
विषयार्थ हा की एखाद्याबद्दल जाणुन घ्यायचे असेल तर त्याच्या भुमिकेत खोल शिरल्याशिवाय कळणार नाही त्याच्याबद्दल....
जसे की डॉक्टर ! बऱ्याच लोकांना वाटते की हे नुसते बसुन, ऐकुन व तपासुन चार ओळी कागदावर खरडुन लाखो रुपये कमावतात. पण त्यांनी आयुष्यात डॉक्टर बनण्यासाठी घेतलेली मेहनत, जवळपास सात आठ वर्षे डीग्री मिळवण्यासाठी केलेला अभ्यास व त्यानंतरही स्वत:ला नविन संशोधनामधुन शिकत राहण्याची लावलेली सवय, २४ तास ड्युटी करण्याची मानसिक व शारिरीक ताकत बघता काही हजार कमवणारे डॉक्टर जास्त आहेत. फारच थोडे वाममार्गाने लाखो कमावणारे असतात...
तीच गोष्ट लागु पडते आपल्या शिक्षकांना, बॉर्डरवरच्या सैनिकांना, शेतात राबराब राबणाऱ्या शेतकऱ्यांना व घरात काम करणाऱ्या गृहीणींना. त्यांच्याएवढे सचोटीने काम करणे म्हणजे अवघड असते हे जोपर्यंत आपण स्वत: ते अनुभवत नाही तोपर्यंत लक्षात येत नाही.
बरेचदा हा गैरसमज व्यापारी वर्गाबद्दल व शासकीय कर्मचाऱ्यांबद्दल आणि खाजगी जॉब करणाऱ्या लोकांबद्दल ही असतो. प्रत्येकाला दुसऱ्याचे काम सोपे वाटते. काही फायदे पण त्यासोबत काही नुकसान हे प्रत्येक कामात असते. ह्याची जाणीव तोपर्यंत होत नाही जोपर्यंत ते काम आपण स्वत: करत नाही.
प्रत्येकाला दुसऱ्याचे आयुष्य छान, हीरवेगार, विना समस्याचे व आनंदी वाटते... प्रत्यक्षात असे नसते... समस्या सगळ्यांनाच असतात.. बहुतांश त्यातुन जगण्याचा मार्ग शोधतात... काही थोडे च असतात ज्यांना कायम दुसऱ्याबद्दल असुया, हेवा, मत्सर वाटत राहतो...
ह्यातुन एक नक्की शिकण्यासारखे आहे की एखाद्याबद्दल मत ठरवण्या अगोदर हा विचार करावा की मी त्याच्या जागी असतो तर काय केले असते !!
आपल्यातला चांगला माणुस जिवंत ठेवणे हे आपल्या हातात आहे. आपल्यातला वाइट माणसाला वेसण घालण्याचे काम ही आपलेच आहे.
ह्यातुन नक्कीच एकमेकांबद्दल चा आदर वाढेल. गैरसमज दुर होतील. समोपचाराची भावना वाढेल. हीसकावण्याची इच्छा मरुन वाटण्याची इच्छा वाढेल... शेवटी हीच आपली खरी संस्कृती नाही का ?
____________________________
मनोज वडे , पंढरपूर.
हा विषयच काही जणांना समजण्यास जड गेला असेल तसाच मला ही गेला होता.परंतु माझ्याच साथीदाराने हा खूप छान स्पष्ट केला. तरी ही ह्यात माझं व्यक्त करताना काही चुकत असेल तर आपण व्यक्त होऊन मला स्पष्ट सांगितले तरीही आवडेल .
कस आहे .आता बगा आपण एकाद्या office मध्ये गेलो तर आपल्याला तीत थोडा जरी जास्त वेळ जास्त गेला तरी आपण लगेच त्याला म्हणतो .काय राव इतका वेळ का कामाला? परंतु त्याच व्यक्तीला माहिती असत की, त्या कामाला किती वेळ लागणार आहे .म्हणजेच जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.बघा एकदा गाडी वरून पडला तर आपण म्हणतो काय सहज पडला होता की, एवढं का आकड ला आहेस.पण जो पडला आहे .त्यालाच त्याच दुखणं कळू शकते ना म्हणजे कोणताही व्यक्ती आपल्याकडे पाहून कधीच बोलत नाही परंतु इतरांचं म्हटलं की , लागलीच हाताच्या भाया वर करून बोलतो .तर तो कधीही म्हणतो त्याचं चांगले चालले असेल परंतु त्यालाच माहीत असत.आपण ह्यात किती समाधानी आहोत. ह्या म्हणी प्रमाणे जावे त्याचा वंशा तेव्हा कळे ,त्याच व्यक्तीला माहिती असत आपल्या क्षेत्रात किती अ, ब,क,ड आहे ते .म्हणून जो तो आपल्याप्रमाणे करत असलेले काम हे योग्यच असत .पण काय हे असंच करतो तसच करतो .त्यामुळे आपण जर त्यात नसेल तर आपल्याला त्या गोष्टींचे काय कळणार? पण कळायचे असेल तर जावे त्याच्या वंशा कळेल त्यात काय राम आहे आणि काय लक्षीमन हे नक्की .
____________________________
निखिल खोडे, पनवेल
एक दिवस काढा राजस्थान सीमेवर तळपत्या उन्हात कींवा लडाखच्या रक्त गोठवणाऱ्या थंडीत... हातात रायफल घेवुन
एक दिवस काढा नांगरण, वखरण पेरणीसाठी शेतकऱ्यासोबत ... हातात कासरे घेवुन...
‘रक्ताचे पाणी अन् घामाची माती’ करून पिकवलेले रस्त्यावर ओतून तुमच्या नावाने ‘शिमगा’ करताना त्या कष्टकऱ्याच्या मनाला होणाऱ्या वेदनांनी काळीज चिरत गेलं पाहिजे तुमचे. वातानुकूलित वातावरणात बसल्यानंतर त्याच्या व्यथा, वेदनांचा विसर पडत असेल तर तुमचा ‘पाषाण’ झाला समजावे का?
सोपे आहे एसी मधे बसुन सल्ले देणे व दर महीन्याला पगार उचलणे...
जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे !!
____________________________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा