३ पाऊस व पेरणी.



*रुपाली आगलावे, सांगोला*

     सांगोला......महाराष्ट्रातील सगळ्यात दुष्काळ ग्रस्त भाग, इथं पाऊस पडण्याची एवढी आतुरता असते, जेवढी एका आईला आपला मुलगा रात्री घरी नाही आला तर जशी काळजी लागते न अगदी तशीच... कारण, पाऊस आला तर आला नाही आला तर म वर्षाच टेन्शन डोक्यावर...
     पण जेंव्हा पाऊस पडतो तेंव्हा मात्र सगळी मंडळी आनंदात कमाला लागतात ते म्हणजे पेरणीच्या.... लगबग सुरू होते, बियाणे गोळा करा बैल नांगर सांगा, ट्रॅक्टर वाल्याला सांगा, शेजारच्याच झालं आपलं कधी व्हायचं.... तो ट्रॅक्टरवाला आज येतो बोलून नाही आला म आता काय करायचं. दुसरा सांगायचा का? नको .... तो नीट पेरलं की नाही म उगाच दोन दिवसासाठी अख्या पिकांचं नुकसान नको.... म्हणून म परत त्याचीच वाट बघत बसायचं... हे असं एकंदरीत सगळं वातावरण बघायला मिळत....
     त्या पावसावरच शेतकऱ्याचं आयुष्य जोडलेल असल्यामुळं पाऊस पडला की शेतकरी सगळं दुःख विसरून नवीन आयुष्याची सुरवात करतो.... मला तर हा पाऊस म्हणजे पेरणीच्या स्वरूपात शेतकऱ्याला त्याच्या एका नवीन सुखमय आयुष्यचीच सुरवात करून देतो असच वाटत....
____________________________


*अक्षय डेरे यवतमाळ*

यवतमाळ म्हणजे आपल्या देशातील एक दुष्काळग्रस्त व  शेतकरी आत्महत्येसाठी कुप्रसिध्द जिल्हा म्हणुन ओळखला जातो.

गेल्या ३-४ वर्षापासून पावसाची हजेरी बेभरवश्याची व उपस्थिती कमी कमी होत असल्यामुळे सतत शेतकऱ्यांचे नूकसान होत आहे. साधारणतः ७ जून पासून आमच्याकडे पेरणीला सूरवात होते या एकाच आशेवर की ७ जून पासुन पाउसला सूरूवात होईल मात्र आता तसे काहीच राहीलेले नाही. पेरणी आम्ही ७ जून ला केली आणि पाऊस मात्र २७ जूनला हजेरी लावून निघून गेला आणि सगळ पेरणी चे बीयाणे जमिनीमधेच माती झाले.

 शेतकऱ्यांचा जिव खालवर होतो आता दोबार पेरणी करण्यासाठी. शेतकऱ्यापाशी पैसे नाहीत तरी सूद्धा त्याचा आत्मविश्वास कायम असतो. काहीतरी तडजोड करून पुन्हा पेरणी करतोच .पाऊसाचे आगमन ऊशीरा झाल्यामुळे यावर्षी परत उत्पनात घट होणार. अगोदर पाउसाचे आगमन जून महीन्यातच व्हायचे मात्र ह्यावेळेस संपुर्ण जुन महीना गेला तरी पाउसाचे नाव नाही .

पावसाच्या आगमनाचा आनंद शेतकऱ्या एवढा दूसऱ्या कुणाला होउच शकत नाही. शेतकऱ्यांची शेती ह्या पाऊसावर अवलंबून असते .शेतकरी आहेत तर शेती आहे आणि शेती आहे म्हणुन आपण आहोत.

पाउसाचे आगमन झाले. शेतीतली कामे सूरू झाली. सर्व शेतकरी वर्ग आपआपल्या शेतात काम करण्यास मग्न झाली आहेत..

पांडुरंगा यावर्षी तरी भरघोस शेती पीकु दे रे देवा ..
____________________________


*अमोल धावडे, अहमदनगर.*

घामाचे थेंब पेरून मातीतुन मोती मिळवुन देणारा जगातील एकमेव कारागीर म्हणजे शेतकरी.
मित्रानो पाऊस आणि शेतकरी यांचा एक घनिष्ठ संबंध आहे. लग्न झाल्यावर मुलगी आपल्या माहेरी यायला निघते व घरचे लोक आतुरतेने तिची वाट पाहत असतात त्याचप्रमाणे शेतकरी पाऊसाची आतुरतेने वाट पाहत असतो.

शेतकरी आपल्या जमिनीची मशागत उन्हाळ्यात करून ठेवतो. पाऊस पडण्याचा अंदाज वाटला की पेरणीसाठी जमीन तयार करून ठेवतो. पहिला पाऊस पडला की शेतकऱ्यांची बी बियाणे आणण्यासाठी लगबग सुरू होते. प्रत्येकजन पेरणी करण्याच्या तयारीला लागतो तो उत्साह इतका असतो की घरामध्ये कुठला सण साजरा होत आहे अस वाटत.

पेरणी करण्यासाठी शेजारच्याची बैलजोडी आपल्याकडे घेऊन येणे व पेरणी करून घेणे पुन्हा त्याला मदतीला जाणे. मालकीण बाई फक्त बांधावरून पाहते कस काम सुरू आहे व जेवणाची सर्व जबादारी पार पाडते. पेरणी झाल्यानंतर होणारा पाऊस पाहून तर शेतकरी इतका आनंदी होतो व त्याला विश्वास बसतो की आपलं पीक येणार व तो त्याच्यवरच भरोसा ठेऊन असतो.

आदिवासी पट्टीतील शेतकऱ्यांची तर वेगळीच गडबड असते पाऊस पडला की जमीमध्ये पाणी साठवून त्याची  पाऊसमध्येच मशागत करायची. सगळा चिखल करून त्यामध्ये भाताची लावगड करायची वरून पाऊस सुरू व शेतकरी भाताची लावणी करतो.

मागील दोन ते तीन वर्षे झाले पावसाने हजेरी लावली नाही व पीकही चांगल्या प्रकारे पिकलेले नाही. यावर्षी तरी देवाकडे एकच साकडं आहे की भरपूर पाऊस पडू दे आणि माझ्या बळीराज्याला खुश होऊदे आणि चांगले भरगोस पीक पिकू दे .
____________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************