पावसाळ्यातील ती आणि तो….
राजश्री ठाकूर,मुंबई.
ती तशी बहुगुणी वगैरे ,ऋतूंचा वगैरे विचार न करता जमेल तशी कामात गर्क , तो मात्र काहीसा छंदी , स्वप्नाळू आभाळ पाहून काम करणारा ..
तिला रिमझिम पावसात चालत जाण प्रिय तर तो बाइक वर स्वार होऊन हवा भरून पसार ..
भिजून अवगुंठून ती कोपऱ्यात उभी,
तर तो निडर उभा ठाकलेला ..
सवयीची म्हणून तिची बडदास्त नाहीच , त्याचा मात्र खास म्हणून थाट ..
परिटघडी चे जिणे मात्र दोहोंच्या नशिबी नाही . इतक्या गर्दीत त्यांचे सोबत असणे हरवून जाई ..
एका छताखाली असूनही सहवास असा नाहीच ..
ती छत्री तो रेनकोट जोडी जमतच नाही ..
ती तशी बहुगुणी वगैरे ,ऋतूंचा वगैरे विचार न करता जमेल तशी कामात गर्क , तो मात्र काहीसा छंदी , स्वप्नाळू आभाळ पाहून काम करणारा ..
तिला रिमझिम पावसात चालत जाण प्रिय तर तो बाइक वर स्वार होऊन हवा भरून पसार ..
भिजून अवगुंठून ती कोपऱ्यात उभी,
तर तो निडर उभा ठाकलेला ..
सवयीची म्हणून तिची बडदास्त नाहीच , त्याचा मात्र खास म्हणून थाट ..
परिटघडी चे जिणे मात्र दोहोंच्या नशिबी नाही . इतक्या गर्दीत त्यांचे सोबत असणे हरवून जाई ..
एका छताखाली असूनही सहवास असा नाहीच ..
ती छत्री तो रेनकोट जोडी जमतच नाही ..
प्रतिक्षा बुध्दे,गडचिरोली.
खुप दिवस झालेत, अगदी त्याच्या वाटेला डोळे लावून बसली होती ती. तो शेवटचा भेटून इतका काळ उलटला ना तरीही त्याची आठवण त्याचा ध्यास एक क्षणही तिच्या मनातुन जाईना. जवळ-जवळ एक वर्ष लोटेल ह्या गोष्टीला, तो जेव्हा तिला भेटायला आला होता ना तेव्हा हट्टाने तिने जाऊच दिलं नव्हत त्याला काही दिवस. ते 'काही' दिवस चिंब भिजत राहिली होती ती त्याच्या सहवासात.
या वेळीही त्याची किती आतुरतेने वाट पाहत होती ती. त्याच्या आठवणींत काळीजचं कोरडं पडलं होतं तिचं, मनाला जनु खोल चिरे पडले आहेत असं वाटत होतं. सगळं कसं भकास वाटु लागलं होतं...
पण शेवटी तो आलाच! केवढा तो आनंद अन् केवढा तो उत्सव!
तो येतोय हे लगेच कळलं होतं तिला. त्याने घातलेली साद दाही दिशांत घुमत राहिला. सगळी कडे गारवा जानवत होतं तिला. तिच्या आनंदाचं सुगंध दरवळत राहिला होता मळ्या-शेतात.
आता एवढ्या प्रदिर्घ प्रतीक्षेनंतर भेटले ते दोघं आणि आनंदाला सिमाच रहिली नाही त्यांच्या.
त्याचं प्रेम कोसळत राहिला तिच्यावर, अगदी तिच्या नसानसातुन ते ओसंडुन वाहु लागे पर्यंत. ती तृप्त झाली त्याच्या भेटीने आणि तो पार रीता झाला तिची आतुरता शमवुन.
ह्या वेळीही ती फुलून गेलीए, भिजून चिंब झालीए आणि अगदी टवटवीत दिसु लागलिए.
तो आहे अजुही इथेच, तिच्या भेटीला. पण फार वेळ थांबता यायचं नाही त्याला कारण तो जर आणखी जास्त थांबला.. तर..
तर पूर येईल! हो!
तो समजवेल तीला, म्हणेल " अगं राणी, माझे प्रिये धरणी... येईन ना मी परत पुढच्या वर्षी."
मग ती रागवेल त्याला, "अरे खोडकर पावसा, वाट पाहावी लागेल मला परत तुझी रे अन् हेच होतं सहसा".
यशवंती होनमाने,मोहोळ.
आज मात्र हद्दच झाली , तिच्या संयमाचा अंत झाला होता .तो नेहमीच असं करायचा आत्ता लगेच येतो म्हणायचा आणि तिकडेच .ही बिचारी बापडी तो येणार , फिरायला जायला मिळणार म्हणून नटून बसायची .अहो करणार काय शेवटी नवपरिणीता वधू बावरी ती .तो रोजच हुलकावणी द्यायचा .तीही बिचारी कंटाळून गेली होती .असाच रोजचा आला दिवस जात राहिला .श्रावणाची सुरवात झाली .....आणि ......
माहेरून बोलावणं आलं श्रावण आहे सणाला पाठवा ....मुराळी आला आणि तिला घेऊन गेला माहेरी .मग काय सासरी बावरलेली नववधू माहेरी आल्यावर हास्याचे कारंजे उडवू लागली , मन पाखरू पाखरू गाऊ लागली .....
आत्ता त्याची मात्र पंचायत झाली .तिची सतत आठवण येऊ लागली .मग याने ठरवले अगदी फिल्मी स्टाइल ने सरप्राईज द्यायचे ठरवले .call केला मेहुणीला आणि सांगितल मी येतोय ते सांगू नको तूझ्या ताईला .तो पोहोचला तिच्या घरी .ती न्हवती घरात , ती होती घरच्या टेरेस वर हातात कॉफी घेऊन पावसात उभी राहून गाणं म्हणत होती ' हाय हाय ये मजबूरी , ये मौसम और ये दूरी , तेरी दो टकिये की नौकरी , , , , , , ' तो तिला बघतच राहिला .......पिच colour ची साडी आणि त्यावर golden colour चा slivless ब्लॉउज , मोकळे केस , , , , अप्रतिम रूप पाहून हा दंग झाला .त्यानं तिला पाहिल पडत्या पाऊसात .....आणि तिच्या समोर गेला आणि गाऊ लागला ' भीगी भीगी रातो में , भीगी बरसातो में कैसा लगता हैं ' ? ? ?
त्याने त्या दिवशी जे अनुभवल तेच तो अजूनही अनुभवतोय .....म्हणूनच त्याला पावसातली ' ती ' आणि तिला ' तो ' खूपच आवडायला लागले .....आत्ता ते दोघं गुणगुणत असतात ' टीप टीप बरसा पानी , पानी ने आग लगा दि , आग लगी जो दिल में दिल को तेरी याद आयी ....
शिरीष उमरे,मुंबई.
पावसाच्या सरींमधे मनसोक्त वेड्यागत आसमंतात नाचणारा तो !! आपल्या काळ्याशार शरिराला ओलेगच्च करुन दिवसभर तसाच रानोरान भटकणारा तो !!
बरसणाऱ्या पावसाच्या थेंबांनी उमलणारी ती !! आपल्या गुलाबी कांतीवर थेंबांना मोती बनवणारी ती !!
सायंकाळच्या मदमस्त वेळेतही धुडगुस घालणारा तो !! सांजवेळी त्याची वाट बघनाऱी ती !!
अलगद तीच्या मिठीत शिरुन विसावलेला तो !! त्याला मखमली अलिंगनात कैद करणारी ती !!
रात्रभराचा त्याच सहवास आणि पहाटे सैल झालेली तीची मिठी..
परत आकाशी भरारी घेणारा पाउसवेडा तो भुंगा
आणि
लाजेने गुलाबी झालेली ती कमळपुष्पाची पाकळी !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा