महेश कामडी,नागपूर.
एक छोटेसे गाव होते.पंधरा-वीस घर असलेले डोंगरी आणि जंगली भागात वसलेले हे गाव. डोंगराळ व जंगली भाग असल्यामुळे या गावात सोय-सुविधा फारच कमी,बाहेरच्या दुनियेशी हवा तसा संपर्कही नव्हता.त्या गावातील एक कुटुंब पती-पत्नी आणि त्याची आई असे तिघेजण राहत. त्याची आई डोळ्याने आंधळी असते, पण पूर्णपणे नाही. दिवसा तिला बर्यापैकी दिसते, मात्र रात्रीचे तिला स्पष्टपणे दिसत नाही. तर पुसट पुसट दिसते. गावातील फक्त पाच - सात घरीच शेती करणारी असतात. बाकीचे आपले रोजचे जीवन जगण्यासाठी पोटाची भूक मिटवण्यासाठी जंगलातील फळे - मुळे, मास यावर आपले आयुष्य काढत होते. शिक्षणाकरता आरोग्याकरिता कुठलीही सुविधा नसलेले असे हे गाव.
त्या कुटुंबातील महिला गर्भवती आठवा महिना संपतच आलेला पण तरी तिला जंगलात जावे लागत. नवरा आणि ती दोघेही सोबत जात. असे कधी गावातील शेती काम मिळाले तर ते काम करत त्यांच्या मोबदल्यात धान्य मिळत. त्याची आई म्हातारीअसल्यामुळे घरीच राहायची. जंगलात विविध प्रकारचे प्राणी पक्षी होते.वाघ, अस्वल पण होते मात्र त्यांची सीमा होती ते गावात येत नव्हते. जंगल मोठे असल्यास कारणामुळे गावातील लोकही त्याच्या सीमेत प्रवेश करत नसे. आता तिला नऊवा महिना सुरू होऊन दोन दिवस झाली होती. त्यातच तिच्या नवर्याची तब्येत बिघडली. गावात आणि जवळपास कुठलीही आरोग्य सुविधा नसल्याने घरीच होईल ते उपचार करुन बघत. पण पोटाचा प्रश्न पुढे होता. त्याची आई म्हातारी असल्याने जंगलात जाऊ शकत नव्हती म्हणून त्याची पत्नी नऊ महिने तीन दिवस झालेल्या गर्भवती अवस्थेत जंगलात जात होती. मिळेल ते फळ मास काड्या घेऊन येत होती. असे पुढे दोन दिवस सुरळीत चालू होते. तिला पोटात अधून मधून थोड्या कळा येत असे. पण त्याकडे दुर्लक्ष करत, असंच तीन-चार दिवस गेली ती जंगलात फळे शोधत असताना तिला कशाचा तरी आवाज जाणवला. तिने आजू बाजूला बघितले पण कोणीही नव्हते. म्हणून ती आपल्या कामाला लागली हा प्रकार तिच्यासोबत तीन-चार वेळा घडला म्हणून ती आता थोडी घाबरली. आणि तेथून जरा वेगाने निघाली, सोबत काही ओझे असल्याने तिला थकवा आला आणि ती एका झाडाजवळ बसली थोडा अंधारही पडत होता. पण तिला चालणे आता शक्य नव्हते, तिला पुन्हा जाणवले की आपल्या जवळ कोणी तरी बघत आहे म्हणून तिने मागे वळून पाहिले. पण कोणीच नाही काही वेळात तिला एक वेगळाच आवाज आला तिने कधी ऐकलाच नव्हता. आणि अचानक तिच्या समोर एक वेगळाच प्राणी उभा राहिला. जो तिने कधी बघितला पण नव्हता आणि अशा प्राण्याबद्दल कधी ऐकलं पण नव्हते. ते काय आहे! तिला कळत नव्हते. ती खूप घाबरली होती.
त्याच्या अंगावर फारसे केस नव्हते, चार पाय होती. पण समोरील दोन पायांचा हाता प्रमाणे वापर करत. शेपूट असून नसल्यासारखे म्हणजे एकदम छोटेसे, डोळे माणसांच्या डोळ्या सारखेच पण थोडे मोठे आणि लालभडक, तोंड कुत्र्याच्या तोंडा सारखे लांब पण कुत्र्याच्या तोंडात पेक्षा कमी लांबीचे, दात पुढील छोटे पण धारदार. त्याला दोन पायावर उभे राहणे जमत होते.ती खूपच घाबरली होती. गर्भवती आणि थकलेली व समोर एक विचित्र प्राणी तो तिच्या जवळ येत होता. ती घाबरत मागे शरीर ढकलत होती. व एका झाडाला धडकली तो प्राणी तिच्या पाया पासून तिच्या शरीराचा वास घेत होता. वास घेता घेता पोटापर्यंत आला. आणि पोट चाटू लागला तिला पोटात कळ्या होऊ लागल्या. बाळ आईला पोटात पाय मारल्या प्रमाणे, तो प्राणी वास घेत थोडा खाली आला. तोपर्यंत तिने दगड हाती घेतला आणि त्याच्या तोंडावर मारला. तसेच टाईम मिळाला. आणि ती कशी बशी तिथून परत घरी आली.
पण जंगलात काय घडले हे घरी नवऱ्याला सांगण्यात आधीच तिच्या पोटात मोठमोठ्याने कळ्या होऊ लागल्या. आणि रात्री तिची डिलिव्हरी झाली. आणि दोन मुले जन्माला आली. ती बेहोश पडली होती नवरा बिमार व ससुला दिसत नव्हते. नवरा त्याच्याने होईल ते करण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला उठणे ही शक्य नव्हते. तो पाय घासत चुलीजवळ गेला पाणी गरम करायला ठेवले. ती बेहोश पडली होती. सासू तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आपल्या अंदाज घेत घेत जात होती. नाळ तसेच जोडले होते. बाळ रडत होती पण आवाज स्पष्ट नव्हता. घरचे दार उघडे होते. एक छोटासा दिवा पेटत होता. त्याच क्षणी तो प्राणी आला आणि त्या मुलांजवळ गेला. म्हातारी तिच्या दिशेने जातच होती. तो पर्यंत त्या प्राण्याने एका बाळाचे नाळ तोडले आणि खाऊन घेतले. व त्याला चाटू लागला म्हातारीला पुसट पुसट दिसायला लागल. तिला वाटलं कुत्रा असेल ती काडी उगारताच तो प्राणी तिथून पळून गेला. नवरा पाणी घेऊन आला म्हातारीच्या सांगण्याप्रमाणे तो काम करू लागला. पण त्याला ते नाळ कुठे गेली लक्षात आले. त्यांनी त्यावर लक्षही दिले नाही.
असेच वर्ष निघत गेली. दोघेही मोठे होऊ लागले. सोबत खेळत राहत फिरत (ज्याला त्या प्राण्याने चाटले ज्याची नाळ खाल्ली त्याला राम म्हणू आणि दुसरा श्याम) गावातही थोड्या हळूहळू सुधारणा होऊ लागल्या होत्या. पण राम श्याम पेक्षा नेहमी समोर असायचा कोणत्याही गोष्टीत. गावात आता ही शाळा नव्हती शिक्षणासाठी जायचं असल्यास पंधरा-सोळा किलोमीटर जावे लागत राम आणि शाम तसे अभ्यासात दोघेही हुशार निघाले शिक्षणासाठी पायी जात. त्यांनी खूप मेहनत घेतली. सतरा अठरा वर्षाच्या वयात रामच्या शरीरात कधीकधी वेदनां जाणवत पण त्यांनी लक्ष दिले नाही. कालांतराने त्याचे शरीर श्याम पेक्षा जड होतगेले, त्यासोबतच त्याची स्फूर्ती पण वाढत होती सर्वांना वाटायचे वयात येत असल्याने होत असेल. एक दिवस शाम घरीच होता आणि राम शाळेत गेलेला, शाळेतून येताना त्याला काही वर्षांपूर्वी त्याच्या आईला दिसलेला प्राणी दिसला. त्याच्या आईने या प्राण्याबद्दल कोणालाही काहीही सांगितले नव्हते आणि रामने ही अशा प्राण्याबद्दल कधीही काहीही ऐकले नाही, वाचले नाही. राम घाबरतो आणि तिथून पळत सुटतो खूप वेगाने धावतो. तो प्राणी त्याचा पाठलाग करतो व पुन्हा त्याच्या समोर येतो. रात्रीचे सहा-सात वाजत असते. तो राम च्या जवळ येतो. आणि तिच्या कानाजवळ पंजा मारतो वर राम त्याच्या सारख्या रुपात बदलू लागतो. काही वेळातच आपल्या खऱ्या रूपात राम मानवी शरीरात येतो. पण बेहोश असतो. तो प्राणी त्याला गावाजवळ आणून सोडतो आणि जंगलात परत जातो. रामला अर्ध्या-पाऊण तासाने होश येतो. पण काय घडले हे रामला माहीत नसते. घडलेला सर्व तो विसरून जातो.
आता शिक्षणा करिता काही दिवसात राम आणि श्याम हे दोघेही आपले छोटेसे गाव सोडून एका मोठ्या शहराकडे जातात. मिळेल ते काम करतात आणि आपले शिक्षण पूर्ण करतात.पण रामची अवस्था मात्र गंभीर होत असते. 25 वर्षाचा होत असताना एके रात्री तो अचानक झोपेतून उठून निघून जातो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा उठतो. न्यूज पेपर मध्ये बातमी असते एकाच नगरमधल्या नवजात शिशु ची डोळे लाल रंगाची आहे. तर असे तीन मुले एकाच नगर मधली आहेत. हा कसला प्रकार असेल, की चमत्कार? आणि त्या बाळांची नाळ पण गायब आहे.
पुन्हा तीन दिवसांनी हाच प्रकार घडतो कुठल्यातरी दुसऱ्या नगरमध्ये यात पाच मुले होते. पण आता डोळेच नाही तर त्यांचं तोंड. कान. पाया प्रमाणे दिसणारे हात. वेगवेगळे प्रकार दिसू लागले. राम आणि श्याम दोघेही एका विज्ञान प्रयोग शाळेत होते. हा कसला प्रकार आहे याची चाचणी त्यांच्या प्रयोगशाळेने करायची ठरवली. त्यात दोघेही हुशार त्यांनी काही हप्त्यात हा कुठल्या प्राण्यांची किंवा हे प्राण्यांच्या डी. एन. ए. पासून होते हे सिद्ध केल. पण मानवात प्राण्यांचा अंश कसा?
आता शहरात हा प्रकार वाढतच चालला होता. राम आतही रात्री बरेचदा नसायचा. श्यामच्या लक्षात आले. आता रामने या मुलांच्या आजाराकरिता औषध बनविले, ज्यांनी त्या मुलांमध्ये असलेल्या वेगळेपणा दूर होत गेला. पण महिन्यातून एकदा ते मुले त्या रूपामध्ये पुन्हा येत होते. हे बघून त्याला स्वतःवरच राग आला आणि त्यांनी प्रयोगशाळेत एका काचेच्या टेबलावर आपले हात जोरात आदळले श्याम सोबत होता. त्याच्या हाताला रक्त लागले आणि त्या रक्ताची काही थेंब त्या मुलांसाठी बनवत असलेल्या रसायनांमध्ये पडले. पण ते औषध फक्त वीस मुलांना पुरेल इतके होते. ते औषध वीस मुलांना दिले ते कायमचे बरे झाले. आता हे कसे घडले यावर राम आणि शाम दोघेही खूप विचार करत बसले. पण त्यांना काही उत्तर मिळाले नाही. एकेदिवशी झोपेतून राम उठून जात होता. श्याम त्याच्या पाठी गेला. तो एका खोलीत जाताच श्याम बाहेर त्याची वाट पाहत थांबला. खोलीतून एक वेगळाच प्रकार बाहेर पडला. त्याच्यात ते सर्व गुण होते जे त्या मुलांमध्ये एक एक होते. श्याम हे सर्व बघून चकित झाला. दुसऱ्या दिवशी पण 20 मुलांची बातमी आली. ते बघून राम ने श्यामला पहायला सांगितले. पण श्याम नाराज दिसत होता. राम ने त्याला विचारले पण त्यांनी काही सांगितले नाही. रामने त्याला खूप फोर्स केला शेवटी, आईची शपथ दिली. तेव्हा श्याम ने रामला रात्री काय काय घडले ते सांगायला सुरुवात करताच, त्याचे वडील वारले अशी बातमी घेऊन त्याच गावातील एक मुलगा आला. ते जसेच्या तसे गावी निघाले.रात्री काय घडले सांगायचे राहिले. वडिलांच्या सर्व अंत्यविधीचा कार्यक्रम उरकल्यावर काही आठ-दहा दिवस गावीच राहायचा विचार केला.
येथेही राम रात्रीचा गायब असायचा. गावातून पंधरा-सोळा किलोमीटर असलेल्या गावात आता शहरातील तोच प्रकार मुलांमधील वेगळेपणा झपाट्याने समोर येऊ लागला. एके दिवशी रात्री राम नव्हता त्याच्या आईने श्यामला त्याच्याबद्दल विचारले कुठे गेला काय झाले. तेव्हा भीत-भीत हा आतापर्यंतचा सर्व प्रकार श्याम ने आईला सांगितला नंतर आई पण त्याला तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगते. त्या प्राण्याबद्दल सांगते. राम एका रात्री पुन्हा उठून जातो तो जंगलाच्या दिशेने जात असतो आणि त्याच्या मागे मागे श्याम जातो. राम चालता चालता आपले रूप बदल जातो हे सर्व शाम बघत असतो. आणि एका ठिकाणी राम पूर्णपणे बदलून जातो. व थोड्याच वेळाने तेथे तो प्राणी येतो. ते बघून आईने सांगितलेले खरे आहे हे श्यामला पटते. त्याच्या पाठलाग करत शाम मागे जातो. ते दोघे नवजात बाळांची नाळ खातात आणि त्यांना माने जवळ काहीतरी करत असते. मात्र फक्त प्राणी बघत असतो आणि राम बाकी सर्व काम करत असतो. दुसऱ्या दिवशी श्याम रामला वापस जाण्यासाठी बोलतो. व ते शहरात वापस जातात. पण आता शहरात गेल्या पंधरा दिवसात कुठल्या ही नवीन केस नसल्याचे त्यांना कळते. शाम आता सर्व समजून जातो. पुन्हा दहा-बारा दिवस लुटून जाते पुन्हा ते केसेस वाढणे सुरू होते. लॅब मध्ये प्रयोग त्यांचा सुरूच असतो. पण नेमके चुकते कुठे हे दोघांनाही कळत नाही. तेव्हा श्यामला तो दिवस आठवतो जेव्हा रामने रागात आपला हात काचेच्या ग्लासवर मारला आणि त्याच्या हातातला रक्त लागले. म्हणून तो रामला काहीही न सांगता त्याला झोपेचे इंजेक्शन देऊन त्याचे थोडे रक्त घेतो व त्या प्रयोग शाळेत त्यावर प्रयोग करून औषध तयार करतो. आणि ते औषध या संक्रमित मुलांना देतो. पण महिन्यातून एकदा ती मुले त्या रूपामध्ये येत होतीच.
पण आता हे राम ला कसे सांगायचे हा प्रश्न श्याम पुढे उभा राहतो? म्हणून श्याम त्याची तीन-चार दिवस व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो. व चांगला वेळ बघून त्याला हा सर्व प्रकार सांगतो. व राम या गोष्टीवर विश्वास करतो. आणि आपल्याच रक्तापासून औषध बनवितो. पण त्या औषधांपासून महिन्यातून एकदा ती मुले प्राण्यांच्या रूपात येत होती. तेव्हा श्यामच्या डोक्यात आले गावातील प्राण्याविषयी तो रमला त्याबद्दल बोलतो. नंतर दोघेही गावी जातात राम त्याच्या आईकडून सर्व त्या प्राण्याबद्दल ऐकून घेतो. मग राम व श्याम त्या प्राण्याला पकडण्याची योजना बनवितात. राम रात्री नऊ दहा नंतर आपले रूप बदलत होता. म्हणून राम व श्याम दिवसात सर्व त्या प्राण्याला पकडण्याची व्यवस्था करून ठेवली होती. ज्या पिंजऱ्यात त्या प्राण्याला पकडायचे होते, त्या पिंजऱ्याला दोन भागात विभागले होते. एका भागामध्ये राम होता. राम आपले रूप बदलत होता. तेवढ्यात तो प्राणी आला व त्या पिंजऱ्यात गेला. आणि श्यामने पिंजरा बंद केला. राम आपल्या मानवी रूपात येईपर्यंत श्याम वाट बघत होता. आणि तो प्राणी पिंजऱ्यात बंद झाला. त्याला बेहोश करून घेतले, व राम काही वेळात आपल्या मानवी रूपात आला. राम व श्याम ने त्याचे रक्त काढले. व त्याला पिंजऱ्यातच ठेवून लगेच शहरात आपल्या प्रयोगशाळेत गेले. व त्याच्या रक्तापासून औषध बनविले. ते औषध घेऊन गावी आले. गावाजवळील काही गावात ज्या मुलांवर यांचा हमला झाला होता. त्या मुलांना ती औषध दिले एक दीड महिने त्यांनी गावीच राहून वाट बघितली तोपर्यंत त्या प्राण्याला मास रोज खायला देत. आणि रात्री रामला एका बंद खोलीत कैद करून ठेवत. दीड महिन्यानंतर रामच्या रक्तापासून महिन्यातून एकदा प्राणी रूपात येणारी मुले या प्राण्याच्या रक्तापासून बनलेल्या औषध दिल्याने कायमची बरी होऊ लागली. म्हणून आता राम व श्याम ने तीच औषध राम ला द्यावी ठरविले. व रामला ती औषध दिले पण राम मात्र पूर्णपणे बरा झाला नाही. म्हणून राम ने स्वतःहून पुन्हा औषध जास्त प्रमाणात घेतले. व त्या प्राण्यासारखा तोही कायमचा बनला म्हणून श्यामने रामला ही पिंजऱ्यात बंद करायचे ठरविले व एकाच पिंजऱ्यात दोघांनाही ठेवले मात्र ते आता एकमेकांचे शत्रू वाटत होते व मारामारी करत दोघेही मरण पावले.त्या प्राण्याचे रक्त फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवले व त्या पासून बनविलेले औषध सर्व त्यांच्या शिकार झालेल्या मुलांना दिले व ते सर्व बरे झाले......
काही दिवसानंतर श्याम त्या प्राण्यांच्या रक्तावर रिसर्च करतो व त्याच्या मध्ये दिसून येते की तो प्राणी तीनशे-साडेतीनशे वर्षांपूर्वीचा असावा. त्यानंतर, श्याम वेगवेगळ्या ठिकाणी त्या प्राण्याबद्दल माहिती अशाप्रकारे शोध घेऊ लागला. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याबद्दल काही मिळेल अशीच त्याची आशा होती. त्याला एका विज्ञान लॅब मध्ये त्याला एक साडेतीनशे वर्षापूर्वीचे एका वैज्ञानिकांचे रफ लिहिलेले काही कागदाचे पाने मिळाली. त्यामध्ये त्या प्राण्याचे हुबेहूब वर्णन केलेले होते. आणि तिथेच त्या प्राण्याला म्हणजेच एका मानवावर प्रयोग करून ते बनविल्या गेले होते. आणि तिथल्या वॉचमनच्या निष्काळजीपणामुळे तो मानवी प्राणी तिथून पळून गेला. याबद्दल बाहेर कोणालाही माहिती नसल्यामुळे तो वैज्ञानिक कोणासमोरही ही गोष्ट आणू शकला नाही. की त्याच्या द्वारे त्याला बनविला गेलं होतं. त्या फॉर्मुलेचे पानही तेव्हाच कदाचित याप्राण्या सोबतच हरवलेले होते. यावरून श्यामला हे सिद्ध झाले की तो कुठलाही प्राणी नसून एक मानवी प्रयोगाचा नमुना होता.
तो आता पूर्णपणे नष्ट झालेला होता........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा