🌱 वि४🌱 व्हॉट्सअप ग्रुप नियम वाचण्यासाठी व सहभागी होण्यासाठी क्लिक करा./vichar/विचार

🌱 वि४🌿 व्हॉट्सअप ग्रुप

स्थापना:-2 नोव्हेंबर 2017.



आमच्या 🌱वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपने नुकतेच दोन  वर्ष पूर्ण केले. महाराष्ट्रातील हा एकमेव असा ग्रुप आहे जो तरुणाईला लेखक,विचारक बनण्यास मदत करत आहे.तुम्ही किंवा तुमचे मित्र-मैत्रिणी नवलेखक असाल, समाजाप्रती संवेदनशील तरुण असाल, लेखक वा वाचक असाल तर तुमच्या  सक्रीय सहभागाची आम्ही सर्वजण वाट पाहत आहोत. त्यासाठी फक्त खाली दिलेल्या आमच्या ग्रुपचे काही नियम तुम्हाला वाचायचे आहेत. 

नियम : 
1) आठवड्यातून तीन किंवा चार विषय दिले जातात(बदल होत राहतो) त्यातील कमीतकमी एका विषयावर आपले मत मांडायचे आहे.

2) तुम्हाला फक्त संबंधित विषयावर आपले स्वतःचे विचार मांडायचे आहे.कमीत कमी दोन-तीन ओळी असाव्यात. जास्तीत जास्त 500 शब्द मर्यादा आहे.

3)एका विषयावर एकदाच पोस्ट टाकायला हवी.तुमचं विचार तुटक- तुटकरीत्या टाकू नका. तसेच संबंधित विषयावरचे दुसऱ्यांचे लिहिलेले साहित्य शेअर करू नका.

4)तुम्ही अजून दुसऱ्या विषयावर पोस्ट टाकणार असाल तर ती स्वतंत्र टाका.

5)तुमचे मत मराठी भाषेत असावे. त्यासाठी देवनागरी लिपीचा वापर करावा. (मराठी भाषा इंग्रजी लिपीत लिहून नये) 

6) पोस्ट ग्रुपवर टाकताना क्रम:-

पोस्टच्या सुरुवातीस विषयाचा क्रमांक किंवा नाव , तुमचे नाव, तालुका/जिल्हा टाकावा. त्यानंतर संबंधित लेख लिहावा... 

7) तुम्ही व्यक्त होण्यासाठी याशिवाय तुमच्या स्वनिर्मित  कविता, व्यंगचित्र वैगेरे चा वापर करू शकता.

8) हा ग्रुप फक्त विचार व्यक्त होण्यासाठी आहे त्यामुळे सामाजिक उपक्रम, सण समारंभ, वाढदिवस, विशेष दिवस असेल तेव्हा शुभेच्छा, नमस्ते, शुभ प्रभात अशा प्रकारचे मॅसेज टाकू नये. चुकुन मॅसेज टाकल्यास 7 मिनीटात डिलीट न केल्यास आमची टीम तुम्हाला लगेच रिमोव्ह करेल.

9) हा ग्रुप वाद घालण्यासाठी नाही.तुम्हाला कुणाच्या मतावर शंका असल्यास संबंधित युवक-युवतीस व्यक्तिगत संवाद त्यांच्या परवानगी घेऊन  साधावा.

10) या ग्रुप मध्ये युवक आणि युवती असतील त्यामुळे चुकीचा मॅसेज टाकताना भान असू द्या. 

11) प्रत्येकांनी शनिवारी रात्री ११ वाजेपर्यंतच विषयासंबंधी पोस्ट टाकाव्यात. शनिवार रात्री १० ते रविवारी दुपारी 1पर्यंत हा अडचणी, शंका ,चर्चा व विषय सुचना यासाठी राखीव आहे.

प्रत्येक रविवारी दुपारी 1 वाजल्यानंतर पुढील आठवड्याचे विषय दिले जातील.

12)संबंधीत विषयाचे तुमचे विचार फेसबुक पेज , 
 ब्लॉगवर- https://vichar4.blogspot.com/
फेसबुक पेज:- https://www.facebook.com/Vichar4/


13) वरील सर्व विषय हे विविधांगी विषयावर असतील तसेच ते जागतिक ,राष्ट्रीय, प्रादेशिक पातळीवरचे असतील.

14) जो युवक किंवा युवती सलग 3 आठवडे सक्रिय न राहिल्यास त्यांनी स्वतःहून लेफ्ट व्हावे अथवा आम्ही रिमोव्ह करू.

तुम्हाला या अटी मान्य असतील तर खालील चित्रावर क्लिक करा.
नंतर एक  गुगल फॉर्म उघडेल.तो भरून  join होऊ शकता .


Join झाल्यानंतर तुमची ओळख नाव, पत्ता सांगावा.

तसेच ग्रुपसंबंधी इतर कोणत्याही माहितीसाठी
 E-mail: vichar4.group@gmail.com






५ टिप्पण्या:

  1. खूप छान वाटले सोशल मीडिया चा असा वापर सुरू झाला हे पाहून.आपण स्व पासून सुरुवात करूया म्हणून या ग्रुप ला जोडला जाण्याची इच्छा आहे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. या उपक्रमातुन स्वतःच प्रभावी आणि वैचारिक मत व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी मदत होईल त्यामुळे ग्रुप ला जोडण्याची ईच्छा आहे

      हटवा
    2. धन्यवाद...खूप उशिरा रिप्लाय देत आहोत.आपला व्हॉट्सअप क्रमांक पाठवा किंवा 8698611877 वर मॅसेज करा.मॅसेज...ऍड वि४ लिहा.
      -वि४ टीम.

      हटवा
  2. या उपक्रमातून प्रभावी आणि वैचारिक व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी मदत होईल आणि इतरांचे सुध्दा विचार आणि लेखनांचा फायदा होईल

    उत्तर द्याहटवा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************