सरकारचा नोटाबंदीचा निर्णय क्रांतिकारक की फक्त जाहिरातबाजी??

🌱"वि४"🌿या व्हॉटसअप ग्रुपवर नोटबंदी या विषयावर व्यक्त झालेल्यांचे निवडकजणांचे विचार:

सचिन आशा सुभाष पुणे.-
नोटबंदी हा फक्त आणि फक्त राजकीय stunt होता हे एव्हाना आपल्या सर्वांना कळून चुकलं आहे, त्यामुळे मी त्यातील आकडेवारी, परिणाम किंवा पार्श्वभूमी बद्दल बोलणार नाही. आपण सुज्ञ आहात.मुद्दा उरतो What next.?केवळ वैयक्तिक राजकीय महत्वाकांक्षेपोटी  परिणामांची पर्वा न करता सबंध देशाची अर्थव्यवस्था दावणीला लावणाऱ्या मानसिकतेला आपण 'देश' या चष्म्यातून कसे पाहता.? राजकीय, सामाजिक मतभेद थोडे बाजूला ठेऊन जर आपण या घटनेकडे पाहिलं तर आपल्याला त्यातील धोक्याची पातळी अधिक स्पष्ट दिसेल असं मला वाटतं. म्हणूनच देशाचा सामान्य नागरिक या नात्याने मला अशी शासनकर्ती मानसिकता देशासाठी धोकादायक वाटते. कोणत्याही राजकीय संकटात नसताना जर असे निर्णय घेतले जात असतील तर *जेव्हा यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे अशी परिस्थिती निर्माण होईल तेव्हा देशात आणीबाणी आणायला ही हे लोक मागेपुढे पाहणार नाहीत* हे मी 2013 पासून सांगत आलो आहे. पक्ष, देश यापेक्षा जेव्हा जेव्हा माणूस मोठा झाला आहे, तेव्हा तेव्हा, इतिहास साक्षीदार आहे पक्ष आणि देशाचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. म्हणूनच नोटाबंदी नंतर स्वतः पोळत असूनही त्याला समर्थन देणारे देशबांधव जेव्हा मी पाहतो तेव्हा मला त्यांच्यात भिनवल्या गेलेल्या चुकीच्या राष्ट्रप्रेमाची ही चिंता वाटते. कारण हे तेच असतात जे व्यक्तिपूजेसमोर आपले नागरिकत्व गहाण ठेवून देश अजूनच धोक्यात आणत असतात. म्हणूनच मला आधी अशा लोकांचं राष्ट्रीयकरण करणं  महत्वाचं वाटतं. शेवटी *भारतीय राजकारण हे अस्मितेच्या आडून केलं जाणारं अस्तित्वाचं राजकारण आहे.* कधी गाय पुढे येईल तर कधी गीता तर कधी नोटबंदी तर कधी अजून काय पण मी या सर्वच घटनांमध्ये माझे सर्व विचारधारा, पूर्वग्रह दूर ठेवत होणाऱ्या बदलांना 'देशाच्या चष्म्यातून' बघू शकलो तरच आपली विचारांची बैठक पक्की होईल त्यातून ठाम आणि व्यापक कृती जन्म घेईल आणि पर्यायाने हे राजकीय stunt फसतील असं मला मनोमन वाटतं.

सौदागर काळे,पंढरपूर-
💠 *नोटबंदी हा क्रांतिकारक निर्णय माझ्यामते नाही.*
🔸 _- क्रांती ही समूहाच्या,समाजाच्या उस्फूर्त व विद्रोही भावनेतून उदयास आलेली असते.असा आपल्याला जगाचा इतिहास सांगतो.उदा.रशियन राज्यक्रांती,फ्रेंच राज्यक्रांती किंवा आपल्या भारताचा स्वातंत्र्यलढा._
🔸 _नोटबंदी व्हावी म्हणून कोणीच लढताना दिसला नाही._
🔸 _प्रत्येक क्रांती ही अनेक दुःखाना विसरून चेहऱ्यावर हसू व विजयाची भावना आणते.पण इथं उलट झालं ;नोटाबंदी झाल्यानंतर अनेकांना नोटांबदली साठी रांगेत उभे राहताना जीव द्यावा लागला._
🔸 _या जगात अशी कोणती क्रांती झाली की ती मिळाल्यानंतर अनेकांना आपला लाखमोलाचा जीव गमवावा लागला असेल!🔸 महमंद तुघलक ने आपली राजधानी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेली होती.म्हणून इतिहासाने त्याची नोंद क्रांतीकारक नव्हे तर *लहरी महंमद* अशी केली.
🔸 *ज्याचा माल खपत नाही त्यालाच बाजारात इतरांपेक्षा जास्त ओरडावे लागते.कदाचित नोटाबंदीसाठी मोदी सरकारला असे  जाहिरातीद्वारे ओरडावे लागत आहे.*
         
            
अक्षय पतंगे,हिंगोली -
मी दिल्लीवरून घुमान या ठिकाणी गेलो.घुमाण हे ठिकाण पंजाब राज्यात आहे. घुमाणनगरी संतशिरोमणी नामदेव महाराजांच्या वास्तव्याने पंजाबची  अलंकापुरी झाली आहे. मी गेलो तो निश्चलीकरणाचा काळ होता. घुमाण मुक्कामी असताना मला पुढील प्रवासासाठी पैसे हवे होते. शोधाशोध करून एटीएम दिसायचे, सगळे लोक एटीएमसमोर उभे असल्याचे दिसायचे, गर्दी दिसायची,नोटाबंदीची चर्चा ऐकू यायची, कुणाला बाजार, कुणाला मुलांची शाळेची फीस इत्यादी.
वाटायचं आता पैसे मिळतील,पुढील प्रवास मजेत होईल पण एटीएममधील पैसे काही वेळातचं संपायचे. बरेचं लोक सकाळपासुन रांगा लावायचे. पैसे संपल्याने परत जायचे, माझीसुद्धा तीचं गत होती.असो.
     काही दिवसांपुर्वी रिजर्व बँक ऑफ इंडीयाने सांगितले ९९% पेक्षा जास्त सर्व जुन्या नोटा परत आल्या. म्हणजे निश्चलीकरणामुळे  नेमकं काय साध्य झाले ?
           देशाची आर्थीक घडी विस्कटण्याबरोबरचं सामान्य माणसांच्या झालेल्या हालअपेष्ठा,बँक अधिकारी, कर्मचारी यांना कराव्या लागलेल्या प्रचंड मेहनतीची मोजदाद होणे अशक्य आहे.
रोजगार,लघुद्योग इ. उपजिवीकेशी निगडीत असलेला वर्ग अजुनही सावरण्याचा प्रयत्न करत आहे. २० कोटींपेक्षा जास्त लोक गरीबी सोसत असताना त्यापेक्षा हा निर्णय खरचं महत्वाचा होता ?
पाहूया वाट,अजुन काही वर्षे...!!

सिताराम ढगे,मंगळवेढा -
नोटबंदी हि देशाच्या इतिहासात काळिमा फासणारी घटना होय.
कारण यामुळे सर्वत जास्त मनस्ताप समान्यना झाला आणि त्याची जी अपेक्षा होती ती फोल ठरली .
     काळ्या पैसा ची माहिती बाहेरचे देश देईनात म्हणून काहीतरी करायचं म्हणून त्या बोकील सारख्यांच ऐकून नोटबंदी लादली गेली. यामुळे काय फायदा तर झालाच नाही पण याचे दूरगामी परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर झाले .
     व्यपार मंदावला अनेकांचे रांगेतच  प्राण गेले ? हेच का याचे अच्छे दिन आले? शेतकरी बेहाल झाले? यांच्यावर 302 नुसार कारवाई का करू नये ?
      मोदीजी जर का तुम्ही 8 वाजता म्हणाला असता कि
       " देश में आज से कोई भी किसान कि चीज सस्ती नहीं मिलेगी उसकी किंमत हम तय करेंगे वो भी देढं गुना "
       मग आम्ही तुमचे गुणगान गायले असते ....पण तुम्ही  आमचे मरण च निश्चित केले....
     होय मी लाभार्थी तुमच्या फडतूस योजनांचा आणि तुमच्या फसव्या नोटबंदीचा .....
        होय हे तुमचं सरकार ....
           आमचं नाही....
           ‎
अमोल घोडके, पंढरपूर.-
मोदींनी  घोषणा केल्यापासून भारताच्या रोख अर्थव्यवस्थेत गोंधळात फेकले गेले आहे की 500 आणि 1,000 रुपयांचे नोट्स कायदेशीर निविदा बंद होतील आणि वर्षअखेरीपर्यंत बँकेत जमा करावे लागतील. अर्थतज्ज्ञांच्या मते, ही योजना दीर्घकालावधीत फायदेशीर ठरणार आहे कारण ती कर चुकवणे आणि भ्रष्टाचार निर्मूलन करण्यावर लक्ष्य आहे. जरी अल्पकालीन काळात, भारताच्या इतिहासातील मनी लॉन्डरिंगवरील सर्वात मोठा कारवाई काही असामान्य दुष्परिणाम करत आहे. येथे काही अनपेक्षित परिणाम आहेत भारतीय अर्थव्यवस्थेची मंदावून चालू राहिली आहे, ज्यामुळे बँकेच्या व्यवसायावर विपरित परिणाम होऊ शकतो
काळ्या पैशाच्या समस्येचा ठाम निश्चय हे एक संपूर्ण यशस्वी झाले नाही.
उपभोक्ता टिकाऊ वस्तूंच्या स्थिरतेत अलीकडे पर्यंत बदलून दिल्याप्रमाणे डिसेंबर 2016 नंतर पूर्व-नॅनोटिसेझेशन वाढीचे सर्वात मजबूत ड्रायव्हर असलेल्या उपभोग आणि सेवा ही लक्षणीय घट झाली. सेवांमध्ये व्यापार, स्थावर मालमत्ता, हॉटेल आणि रेस्टॉरंट, बांधकाम आणि वाहतूक हे विशेषतः कठीण दाबा भांडवली वस्तूंच्या उत्पादनातील निरंतर वाढीचा आणि व्यावसायिक क्षेत्रातील सरासरी बॅंक पतपुरवठा जानेवारी-ऑक्टोबर 2016 मध्ये 9.9 टक्क्यांवरून 5.6 टक्क्यांवर घसरला असल्याचे दिसून आले आहे. नोव्हेंबर 2016 ते सप्टेंबर 2017. अनेक सूक्ष्म व लघु कंपन्यांचा व्यवसाय बंद झाला कारण त्यांना कामकाजाचे भांडवल मिळत नव्हते. हे केवळ तिमाही कॉर्पोरेट कमाईमध्ये घेतले जाते. तसेच, काही अंदाजानुसार, जवळपास 5 दशलक्ष रोजगार संसाधनामुळे गमावले गेले होते. रिटेल आणि एमएसएमई क्षेत्रांमधून येणार्या अतिरिक्त तणाव  मुद्द्यांनंतर बँकांच्या बॅलेन्स शीट्सवर मोठ्या प्रमाणावर ताण आला.

पत्रकार संकेत कुलकर्णी थोडक्यात पण मार्मिक मत मांडतात-:

नोटबंदी केवळ दलाल बैंकर्स याना मोठे करण्यासाठी ....
आणि व्यापरी वर्गला स्वत : च्या अधीन करण्यासाठीचा प्रयत्न ....

गुजराती है भाई .... ' धंदा ' तो होगाही

करण, हिंगोली-
नोटबंदी ही किती फायद्याची की नुकसानाची यावर मी जास्त काही  सांगू शकत नाही कारण मी तज्ज्ञ नाही पण माझा नोटबंदी वरचा अभ्यास किंवा नोटबंदीची माहिती  जी माझ्यापर्यंत आली त्यावरून मी सांगू शकतो की ज्या दिवशी संध्याकाळी नोटबंदी झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी मी मार्केट मध्ये बघितलं की काही लोक म्हणत होते की निर्णय बरबोर आहे कोणी म्हणत होत निर्णय चुकीचा आहे पण मला वाटले जोपर्यंत मी या वर अभ्यास करत नाही तो पर्यंत मी काही सांगू शकणार नाही कारण प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात.
ज्या लोकांकडे काळा पैसा होता त्यांना हा निर्णय चुकीचा तर वाटणार कारण नोटबंदी झाल्यानंतर त्यांच्या कडे काही उपाय नव्हता त्यामुळे बऱ्याच काळा पैसा असलेल्या लोकांनी गरीब लोकांना काही रुपये देऊन रांगेत उभे केले हे मी नाही काही नोटबंदी समर्थक न्युज वर आलं.मग काही न्युज वर दाखवत होते किंवा मी वाचलं की ते निर्णय चुकीचा आहे असं ते म्हणत होते पण जवळ पस प्रत्येक राजकीय पक्षाने ज्याचे त्याचे न्युज CHANNEL किंवा वर्तमानपत्र विकत घेतले विपक्षाच काम आहे टीका करणं हे आपल्याला माहीत आहे आणि एक उदाहरण देतो जर मी एखाद्या माणसाला म्हटलं की मी तुला 1000 रुपये देतो तू म्हण की सूर्य पश्चिमेला उगवते ,तो म्हणेल.त्याच प्रकारे काही असच झालं .जर आपण POSITIVE बाजू बघितलं तर असं दिसलं की नोटबंदीची बरेच फायदे झाले जसे की काश्मीर मधले बरेच दंगे जवळपास कमी झाले,ज्या लोकांकडे काळा पैसा होता त्यांना मोठी अडचण निर्माण झाली,बरेच राजकारणी लोक ज्याच्याकडे काळा पैसा होता त्यांचे चेहरे समोर आले,बऱ्याच नक्षलवाद्यांनी surrenender केले.
मला असं वाटतं की हा निर्णय आपल्या प्रधानमंत्रीनी घेतला ते असच घेतला नसेल त्यांना पण बराच अभ्यास करावा लागला असेल त्यांनी पण बऱ्याच economist कडून समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल कारण नोटबंदी हा काळा पैसा आणि भ्रष्टाचार याविरुद्ध मोठा डाव होता.
पण मी नोटबंदीचा पूर्णपणे समर्थन करत नाही कारण यामुळे लोकांना बरंच त्रास सहन करावा लागला,100 जणांचा मृत्यू झाला रांगेत उभे असताना ,बऱ्याच छोट्या मोठ्या धंदे बंद पडली,शेतकऱ्यांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम झाले.
पण जर हा निर्णय पूर्णपणे यशस्वी झाला नाही याचा अर्थ काही प्रमाणात यशस्वी झाला आपण ते पण बघितलं पाहिजे आणि अस नाही की सगळे लोक या निर्णयाला oppose करत आहेत बऱ्याच राष्ट्रांनी,मोठी उद्योजकांनी या निर्णयाचे स्वागत केले.मला असं वाटतं की आपल्यापर्यंत या निर्णयाची negative वार्ता जास्त पोहचल्या कारण सरकारने होईल तेव्हढी जलद सुविधा पोहचवली.
काही चुकीचं वाटत असेल तर क्षमा असावी

सोमनाथ आदमीले-
8 नोव्हेंबर2016 लाआपल्या देशात नोटबंदी केली गेलीआणि एका क्षणात 500आणि 1000 रुपयाचे 86% चलन बाजारातून काढून घेतले गेले .हा खूप मोठा निर्णय होता कारण    भारताची अर्थव्यवस्था हि कृषिप्रधान अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते,त्यामुळे शेतीशी संबधित आर्थिक व्यवहार ठप्प झाले,असंघटित क्षेत्रातील रोजंदारीवर काम करणाऱ्याचे हाल झाले .नोटबंदीचा खूप दूरगामी परिणाम होणार आहे,कारण हा निर्णय घेताना  पंतप्रधानांनी पूर्वतायरीची जोड दिली नव्हती असे मला वाटते.
                  नोटाबंदीने काळा पैसा बाहेर येईल,दहशतवाद कमी होईल ,कॅशलेस व्यवहारांना चालना मिळेल,नक्षलवाद कमी होईल ,महागाई कमी होईल,असे सांगण्यात आले परंतु यातील कॅशलेस व्यवहाराचे प्रमाण वाढ सोडले तर कोणतेही ऊधिष्ठ पुर्ण झाले नाही .
                   15.44 लाख कोटींपैकीं15.28 लाख कोटींच्या  (99%)नोटा  आरबीआयकडे जमा झाल्या.म्हणजे डोंगर पोखरून  उंदीर बाहेर काढण्याचे काम मोदी सरकारने केले. काला पैसा हा रोख स्वरूपात कमी असतो,तर रियल इस्टेट,सोने यांच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात असतो.                        

नोटबंदीने आर्थिक मंदी आली ,रोजगार कमी झाले.सामान्य जनता मात्र या निर्णयाने भरडली गेली,पैशासाठी लोकांचा रांगेत मृत्यू झाला आणि त्यांना भक्तांनी राष्ट्रभक्तीच सर्टिफिकेट देऊन टाकले .

माझ्यामते नोटबंदी हा फसलेला निर्णय आहे .सरकार कॅशलेस इकॉनॉमी करण्याच्या नादात जनतेलाच लेसकॅश  केले.नोटबंदीचा सर्वात जास्त फायदा हा श्रीमंत लोकांना झाला,त्यांनी काळा पैसा पांढरा करून घेतला

राहुल अनपट,मंगळवेढा-
कवितेतून मत-
*नोटा बंदी*
होती काळी म्हणून
तिला रंग दिला
बंद केल जिला
१००० ची नोट म्हणतात तिला.।

कुणाकडे दोन नंबर होते
कुणाकडे कष्टकऱयांची होते
विकासाच्या नावावर मला टाळून
ह्यांची नोट बंदी होते ।

कुठे आहे मी
काळ्या पैशात कि पांढऱ्या
इथं माणसाचं नाहीत माणसात
मग नोटबंदी कुठं अन कशात ।

अमोल गायकवाड-
नोटबदी हा बहु-आयामी निर्णय असून त्याचे राजकारण होणे चुकीचे आहे. सरकारने सुरुवातीला लोकांना bank account सुरु करण्यास प्रोत्साहीत केले, नंतर लोकांना आपल्या जवळचे black money जाहीर करुन tax भरून मुख्य प्रवाहात येण्याची संधी दिली आणी त्यानंतर नोट बंदी जाहीर केली. आणि आता GST.
      यावरून असे लक्षात येते कि सरकारला लोकांच्या जवळील पैशाचे (cash) विवरण हवे होते. आता तुमचा पैसा मुख्य प्रवाहात आला आहे त्याच्या  पाऊलखुणा ठळक पणे उमठु लागल्या आहेत. यांत्रिक त्रूटी आहेत त्या कालांतराने दुरुस्त होतील. पण कोणत्यातरी पिढीला हा त्रास सहन करणे अपरिहार्य होते. Less-cash आपण सहज वापरु शकतो. जेव्हा सुरुवातीला mobile आले होते आणि आता तोच mobile आगदी दोन वर्षाची मुलहि सहज हाताळतात त्याप्रमाणे less-cash प्रणाली सुद्धा आपण वापरु याचा मला विश्वास आहे.
       शेवटी आपण एखादे नेतृत्व स्वीकारले तर त्याच्या निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभे रहाणे गरजेचे असते त्याशिवाय संघ विजयी होत नाही.

अनिल गोडबोले,सोलापूर-
८ नोव्हेम्बेरला रात्री जेव्हा नोट बंदी लागू झाली तेव्हा त्याच काय महत्त्व आहे किवा काय परिणाम होईल हे कळायला मी काही अर्थतज्ञ नव्हतो पण अस वाटत होत कि यातून भ्रष्ट्राचार कमी होईल आणि कॅशलेस मुले पैसे घेऊन फिरावे लागणार नाहीत, तसेच जे पैसे बाहेरून व्यवहार होऊन लोक गैर कामासाठी वापरणारे आहेत त्यांची गोची होणार असेही वाटत होते. त्यानंतर नोटा बदलून घ्यायच्या आहेत हे देखील कळाल. भरपूर चर्चा सोशल मिडिया, tv वरील कार्यक्रम.... भाषण... अस वाटत होत कि देशात खूप भारी काहीतरी होत आहे.

या मध्ये अर्थ तज्ञ अनिल बोकील यांचा कार्यक्रम ABP माझा वर बघितला. आणि अस वाटल कि जे होतंय ते योग्य होत आहे. पण हि द्विधा अवस्था पार कोलमडून तेव्हा पडली जेव्हा रांगेमध्ये उभारून नोटा बदलून घ्याची वेळ आली. ( जास्त पैसे नसल्यामुळे जास्त त्रास झाला नाही.) हॉस्पिटल मधून रुग्णांना बाहेर काढल्याच्या आणि रांगेत मेलेल्यांच्या कथांसोबत मदतीचे हात पुढे आलेत असेही वाचत होतो... ३१ डिसेंबर पर्यंत सगळ गोंधळत गेल.

त्या नंतर जी आकडेवारी आणि माहिती भेटत गेली ती काही फार बरी नव्हती. GDP कमी झाला. काळा पैसा काय दिसला नाही पण गुलाबी पैसे मिळतात कि नाही अशी अवस्था निर्माण झाली. जे लोक काम करून पैसे मिळवत होते त्यांच्या कडे पैसे कमी झाले त्यामुळे मार्केट रिकामा झाला.

त्या नंतर GST आल पण त्यावर काही आता जास्त बोलत नाही परंतु नोट बंदी मुले व्यवसाय चालत नाहीत लोक पैसा गुंतवत नाहीत अस नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. आतंकवाद कमी नाहीच झाला... त्याच मिडिया रिपोर्ट कमी झाल. वेश्या व्यवसाय करणार्या महिलना काही कमी नाही त्यांना त्यांचे पार्टनर मस्त सांभाळतात.. मानवी तस्करी वर परिणाम झाला असेल (मानवी तस्करी आणि वेश्या व्यवसाय हे दोन वेगळे भाग आहेत). थोडक्यात ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना काही फरक पडलेला नाही पण नवीन पैसा तयार होत नाही म्हणून ते हि चिंतेत आहेत.

आता तर ९ लाख करोड रुपये बँकांना दिलेत त्याचा काय परिणाम होतोय बघायचं पण लोकांनी पैशाचे व्यवहार थांबवलेले नाहीत तर बदलेले आहेत. बाकी मदत करायला CA तयार आहेतच. पण NGO चा फंड बंद झाला. गरीबाकडे फक्त आशा सोडून आता काही उरलेलं नाही अस चित्र दिसतंय. हे चित्र लवकरच बदलो हि अपेक्षा .....

 दत्तात्रय डोईफोडे-
 ‎ऐसे कैसे विचारी मना आले,
 ‎ अचानकपणे नोट बंदी केले,
 ‎जुन्या सर्व नोटा उद्या न चाले,
 ‎ ऐसें मोदी सहजच वदले.                      दुसऱ्या दिवशी गोंधळ उडाले,
 ‎ सगळीकडे सुट्टी जाहीर केले,
 ‎ त्यामुळे थोडेसे हायसे वाटले, 
 ‎पण लवकर चूक लक्षात आले,
 ‎ जनांसी थोडे दिवस मागितले,
 ‎ तरीही प्रश्न नाहीस सुटले,  
  काही मृत्यू अंगासी आले,    
  ‎काही करता काहीच झाले,  
  ‎सारवा सारव चालू केले,
  ‎पण तोवर नोट बंदी जणासी बुडविले,
  ‎ सर्व विचारे मोदी ऐसें कैसे केले,
  ‎मोदी आता एक शब्द ही न वदले
  ‎तेच जन म्हणे चांगलं केले,
  ‎झालं तेवढं वाटोळं पुरेसे झाले....

प्रविण देवरे,बागलाण-
खरतर नोट बंदीचा विचार केला तर तो अपयशी ठरला आहे अस मला वाटत ।।
कारण भारतातील जे काहि सर्व सामान्य नागरिक आहेत किव्हा अशिक्षित, वृद्ध, सर्वसामान्य शेतकरी यांच्यासाठी तो खरच काळा दिवस होता ।। मलातरी वाटत नोट बंदीची ती वेळ चुकली. नेमक्या त्याच कालावधीत लोकांच्या घरांमध्ये लग्नाचे वातावरण होते. काहि लोकांना तर थोडक्यातच आपले लग्न आटपुन घ्यावे लागले. अनेक लोकांना ATM च्या लाइनित हूभे राहवे लागले. त्यात अजुन एकादिवसाला कितितरिच पैसे मिळतील अशी अट ठेवण्यात आली. खर म्हणजे काळा पैसा बाहेर आणण्यासाठी हा सर्व खेळ चलला होता. पण ज्या लोकांकडे काळा पैसा होता त्यांनी आपल्या ओळखी किव्हा वशिल्याच्या माध्यमातून तो पांढरा केलाच मग यांच्यात गुंतल कोण तर गरीब वर्ग सर्वसाधारण मानुस ज्याला आपल्या एक हजार रूपयांसाठी देकिल बँकेच्या दारापुढे दिवसभर हूभे राहवे लागले.
     नोट बंदी झाली तेव्हा आम्ही वर्ग मित्र निर्मला निकेतन समाजकार्य महाविद्यालय मुंबई येथे एका ग्रामशहरी अध्यन सप्ताह साठी गेलो होतो. आणि तो पूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांनीच आयोजित केला होता आणि तो सात दिवसांचा होता. नोट बंदी झाली त्या कालावधीत साधारण आमच्या कार्यक्रमाला तिन ,चार दिवस झाले असतील. आमचे सर्व पैसे त्या विद्यार्थ्यांनी बँकेत ठेवले होते. आणि अच्यानक आठ तारखेला नोट बंदी ची बातमी आली आणि आम्ही सर्व घबरलो.सर्व विद्यार्थांकडे घरपरति साठी पाचशे आणि एक हजारच्या नोट होत्या. त्याठिकाणी आम्हाला परिस्थितीचा खुप सामना करावा लागला. प्रत्येकावर मानसिक तान निर्माण झाला.
     तर मला याच्यातून हेच म्हणायचे आहे की शिक्षित लोकांना जर एवढा त्रास होत असेल तर आपण विचार करू शकतो की गरीब किव्हा अशिक्षित लोकांना किती त्रास सहन करावा लागला असेल. त्यांच्यावर किती मानसिक त्रास निर्माण झाला असेल .
    मला वाटत भारत सरकारचा हा निर्णय चुकीचा ठरला. गरीब जनतेला याचा खुप मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला. तरी देखील काळा पैसा हा पांढरा झाला आणि ते लोक अजुन देखील आनंदाचे जीवन जगत आहेत

मयुरी देवकर-
8 नोव्हे 2016 रोजी नोटाबंदी ची घोषणा जाली व खऱ्या अर्थाने दररोजचे सुरळीत जीवन विस्कळीत झाले .व्यवस्थित चाललेले सर्व व्यवहार ठप्प झाले आणि जुन्या नोटा बँकेत भरण्यासाठी तर सर्वसामान्य लोकांचे खूपच हाल झाले .यामधे सगळ्यात जास्त भरडली गेली ती सर्वसामान्य जनता ...आपल्या व्यवस्थेमध्ये हाच दोष आहे की जे काही निर्णय होतात , कारवाया होतात या सर्वांमध्ये नुकसान होते ते  ' सर्वसामान्य जनतेचेच ' ....आम्ही स्वतः बाहेरगावी राहत असल्याने मेस , खर्चासाठी आम्हाला सुद्धा म्हणजे विद्यार्थ्यांनासुद्धा पैशासाठी  ATM च्या बाहेर 4-5 तास उभे रहावे लागले तेही दैनंदिन गोष्टींच्या च पूर्ततेसाठी फक्त ....
       खरंच ' नोटाबंदी  '  हा खुप विचार करायला लावणारा निर्णय होता . सर्वांनाच त्यावेळी निर्णय जाहीर झाल्यानंतर वाटले की , आता काळा पैसा कमी होईल , भ्रष्टाचार कमी होईल ...पण कशाचे काय काळा पैसा कसा पांढरा झाला ते कोणालाच समजले नाही  हेच याचे ' यश  ' म्हणावे लागेल 😬.....त्याचप्रमाणे कैशलेस अर्थव्यवस्था बनण्याच्या द्रुष्टीने हा निर्णय पूरक होईल अस वाटलं होत पण काय ....आम्ही स्वतः या cashless system वर नोटबंदी नंतर एक प्रोजेक्ट केला ..तेंव्हा आम्हाला समजून आले की , समाजामध्ये किती लोकांना माहीत आहे हा शब्द ..अशिक्षित न्हवे तर कॉलेज मधील मुलांना सूद्धा ऑनलाइन बँकिंग , नेट बँकिंग , कैशलेस साठी ची नवीन ॲप , बँक ॲप कोणती आहेत कशी वापरायची माहीत नव्हत.म्हणजे अजून तरी सर्वाना त्यांची साधी तोंडओळख ही नव्हती , नाव ही माहीत नव्हते मग कसे करणार आम्ही कैशलेस  व्यवहार ? ?
   त्यावेळी म्हणजे नोटाबंदी च्या काळात  खऱ्या अर्थाने छोटे छोटे व्यापारी , शेतकरी , रिक्षाचालक या सर्वांना खूप त्रास झाला . अगदी उपजीविका करने सुद्धा मुश्किल झाले होते .
    आणि म्हणुनच ही योजना जरी अयशस्वी झाली असली तरी आपण तरुणांनी सजग होवून  कैशलेसचे जे ॲप आहेत ते आधी आपण समजावून घेवुन कैशलेस सिस्टम चे फायदे काय आहेत यावर विचारमंथन करून आपण ज्यांना हे माहीत नाही त्यांच्याकडे पोहोचवून कैशलेस विषयी माहिती व जागरूकता निर्माण करायला हवी आहे ...

शरद कांबळे-
‎‬8 नोव्हेंबर 2016 ची ती रात्र,पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार आहेत अशी बातमी आली आणि मी टीव्ही समोर बसलो.पंतप्रधानानी अत्यंत धाडशी निर्णय घेतला.देशातील 500 आणि 1000 च्या नोटा बाद ठरवल्या.राजकारण बाजूला ठेवून विचार केला तर हा खरचं क्रांतिकारी निर्णय होता.सामान्य माणसांनी या निर्णयाचं स्वागतच केलं.पंतप्रधानानी भाषणात काळा पैसा, भ्रष्टाचार या वर घणाघात केला.त्यामुळे सामान्य माणूस सुखावला आणि मनोमन अत्यंत खुश झाला,कारण त्याला वाटत होतं की आता काळा पैसा असलेली लोक रस्त्यावर येणार,त्यांच्या घरावर धाडी पडणार इत्यादी.या काळात लोकांचे अत्यंत हाल झाले पण लोकांनी देशासाठी ते सहन केले.या निर्णयाला विरोध करणं देशभक्तीशी जोडलं गेलं.या निर्णयामागील उद्देश जरी चांगला असला तरी तो ज्या प्रमाणे अंमलात आणला गेला त्या अर्थव्यवस्थेचं अक्षरशः कम्बरड मोडलं.अर्थव्यवस्थेतील 86% चलन एका झटक्यात काढून घेतलं आणि त्यामुळे सामान्यांचे झालेले हाल आपण पहिलेच आहेत किंबहुना अनुभवले आहेत.नोटबंदीचा हा निर्णय यापेक्षा चांगल्या प्रकारे नक्कीच अमलात आणला असता.मूठभर लोकांना शोधण्यासाठी संपूर्ण देशाला वेठीस धरलं गेलं.आता वर्ष उलटून गेल्यावर सरकार निर्णयाच्या समर्थनात तर विरोधक विरोध करण्यात दंग आहेत.या विषयाचा अगदी चोथा झालेला आहे.निर्णय योग्य की अयोग्य या बद्दल प्रतेकांची मते वेगवेगळी आहेत आणि त्यांचा मी आदर करतो,पण काही तथ्य आहेत ती अशी:
1)बाद केलेल्या नोटांपैकी 99.96%पैसा अर्थव्यवस्थेत परत आला.मग काळा पैसा गेला कुठे?
2)नोटबंदी झाली तेव्हा शेतकऱ्यांची खरिपाची पिकं निघाली होती.पण बाजारात पैसाच नसल्यामुळे त्यांना आपलं धान्य कवडीमोल दराला विकावं लागलं.मजुरांना केलेल्या कामाचा रोजगार न मिळल्यामुळं अक्षरशः भूकं रहावं लागलं.
3)सरकार म्हणतंय आम्ही कुणाच्या खात्यात निहित स्रोतापेक्षा जास्त पैसे आले यावर लक्ष ठेवून आहोत,पण अजून अश्या एकही खातेदारावर कार्यवाही झालेली दिसत नाही.
4)काही लोकांकडून असं समर्थन केलं जातं की,यामुळे कॅशलेस व्यवहारांना चालना मिळाली.कॅशलेस साठी सामन्यांना वेठीस धरणं कितपत योग्य आहे?
5)नोटबंदीमुळं दाहशवाद्यांचं नुकसान होईल असं सांगितलं गेलं पण अजून तरी तसं दिसत नाही.शेवटी एवढचं सांगावं वाटतं की सरकारने हा निर्णय क्षुद्र राजकारणासाठी न रेटता, देशहितासाठी या कुरघोडीच्या राजकारणातून माघार घ्यावी आणि अर्थव्यवस्थेचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी देशातील जनतेला विश्वासात घेऊन उपाययोजना करावी.देश नक्कीच त्यांना साथ देईल.

बालाजी सानप-
मला वाटलेले negative point:-
नोटाबंदीचा उद्देश चांगलाअसो किंवा वाईट परिणाम मात्र सामान्य माणसांना माणसांना भोगावे लागले हे मात्र नक्की,
बऱ्याच ठिकाणी अनेक संस्थाचालकांनी,कारखानदारांनी,उद्योजकांनी त्यांच्याकडे असलेला काळा पैसा त्यांच्या कर्मचाऱ्यांची बळजबरीने मदत घेऊन पांढरा केला ही माझ्यासमोरची ताजी उदाहरणे आहेत....बऱ्याच लोकांना कॅशलेस अर्थव्यवस्था माहिती नव्हती ती नोटाबंदी नंतर बऱ्याच जणांना माहिती झाली
नोटाबंदी नंतर मी स्वतः अनेक व्यवहार कॅशलेस करू लागलो
आणि नोटाबंदीनंतर काश्मीर मधील आपल्या आर्मीवर होणारी दगडफेक बऱ्याच प्रमाणात कमी झाली....

©"वि४"व्हॉटसअप ग्रुप.
https://vichar4.blogspot.in/?m=1

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************