वि४ ग्रुपचे नियम

व्हॉट्सअप सारख्या माध्यमाचा विधायक वापर करत अविरत सुरू असलेल्या वि४ ग्रुप मध्ये सहभागी व्हा !! 

तरुणाईचे स्वविचाराचे बिनधास्त  व्यासपीठ .....


नियम : 


1) प्रस्तुत आठवड्यात दिलेल्या कोणत्याही एका (कमीतकमी) विषयांवर स्वतःचे विचार/मत व्यक्त करायचे आहेत.


2) तुमचे लिखाण मराठी भाषेत असावे.मराठीच्या स्थानिक बोलीभाषेत (उदा.मालवणी,अहिराणी,वऱ्हाडी इत्यादी)असेल तर उत्तम. त्यासाठी देवनागरी लिपीचा वापर करावा.


3) लिखाण करताना संदर्भ वापरले असेल तर त्याचा उल्लेख करावा.


4)  संबंधित लिखाण ग्रुपवर प्रसिद्ध करताना पुढीलप्रमाणे क्रम असावा :- विषयाचे नाव किंवा क्रमांक...स्वतःचे नाव,तालुका/शहराचे नाव ...संबंधित लिखाण


5) ग्रुपमध्ये संबंधित विषयाच्या व्यतिरिक्त पोस्ट केले तर सदस्याला रिमोव्ह केले जाईल.चुकून मॅसेज पोस्ट झाला तर 7 मिनिटांच्या आत डिलीट करावा.


6) ग्रुपमध्ये प्रत्येक विचारधारेचे सदस्य आहेत.काहींचे मत पटले नसेल तर निर्धारित केलेल्या दिवशी ग्रुपमध्ये चर्चा करू शकता अथवा संबधित सदस्याबरोबर व्यक्तिगत चर्चा करू शकता.


7) आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पुढील आठवड्याचे विषय प्रसिद्ध केले जातील.लिखाण करण्याचा कालावधी: सोमवार ते शुक्रवार (रात्री 11 वाजेपर्यंत)


8) आठवड्यातील प्रत्येक शनिवार व रविवार हा शंका,अडचणी,विषय सूचना,लेटेस्ट घडामोडी इत्यादी.चर्चा करण्यासाठी राखीव असेल.


9) तुम्ही ग्रुपमध्ये व्यक्त केलेले विषयावरील संबंधित लिखाण वि४ च्या ब्लॉग,फेसबुक पेजवर ,ऑनलाइन मासिकाद्वारे(गवाक्ष) प्रसिद्ध केले जाईल.  



 (शेवटचे अपडेट :-17-09-2020 )



1 टिप्पणी:

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************