अनिल गोडबोले,सोलापूर.
अफेअर... ज्याला आपण "लफडं" म्हणतो. अफेअर.. या शब्दाचा अर्थ घटना असाही होतो.अफेअर.. या शब्दाचा अर्थ जे फेअर (योग्य) नाही ते.. पण
(अयोग्य) अनफेअर अस ही म्हणता येत नाही ते...तुम्ही काहीही म्हणा.. अफेअर म्हणजे भारी मज्जा बाबा.!एकमेकांविषयी विचार करणं, आवडणं, भेटणं, गुलाब, कोफी आणि बरच काही.. आपल्याला एखादी व्यक्ती आवडते हीच गोष्ट मुळात भरपूर आनंददायक असते आणि त्या पेक्षा समोरच्या व्यक्तीला आपण आवडतो हे प्रचंड आनंददायी असतं..आपले हिंदी पिक्चर यावर तर चालू आहेत.. भिन्नलिंगी आकर्षक बरोबर समलिंगी आकर्षण देखील असते.
आता 14 फेब्रुवारी ला व्हॅलेंटाईन डे नावाचा सण येत आहे.(तो सण आहे की निमित्त आहे की मार्केट उभं करण्याची पद्धत आहे की अजून काय आहे.. ते मात्र कळत नाही) फार मज्जा. फोन कॉल, मेसेज, गुड मॉर्निंग गुड नाईट.. काळजी करणं.. बाहेर फिरायला जाण, एकमेकांचाच विचार करणे.. प्रेम भावना.. असा सगळा कार्यक्रम सुरू होतो.
ते अफेअर शारीरिक पातळीवर पोहचते.. प्रेम भावना आणि काम भावना एकत्र येऊन कृती होतात.. आणि हे सर्व अफेअर मध्ये होत असत.
अनफेअर होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण त्या साठी त्या दोघांनीही आपला स्वार्थ साधून नंतर सोडून देऊ नये..
लग्न केलेले किंवा लग्न न केलेले कोणीही असोत ज्यांनी त्यांनी आपल्या जोडीदाराला आणि स्वतःला देखील फसवु नये.
अफेअर करावं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.. पण ते नैतिक किंवा अनैतिक कोणी ठरवावं.. ते अफेअर सुरक्षित असावं एवढीच इच्छा..
तेव्हा करा लफडं एखादं बिनधास्त.. त्रास न देता.. त्रास न करता..!
प्रीती,सातारा.
तस बघायला गेलं तर अफेअर ह्या शब्दाचा अर्थ प्रकरण असा होतो म्हणून मला तो प्रेम ह्या नात्यासाठी नैतिक वाटत नाही म्हणून एखाद्या प्रेमाच्या नात्याला अफेअर म्हणावं हे योग्य नाही
तस बघायला गेलं तर अफेअर ह्या शब्दाचा अर्थ प्रकरण असा होतो म्हणून मला तो प्रेम ह्या नात्यासाठी नैतिक वाटत नाही म्हणून एखाद्या प्रेमाच्या नात्याला अफेअर म्हणावं हे योग्य नाही
असो आत्ता राहता राहिला प्रश्न प्रेम योग्य की अयोग्य तर मला एक किस्सा सांगावासा वाटतो एकदा असच मी आणि माझ्या मैत्रिणी मधे लग्नवरून चर्चा चालू होती मी तिला म्हणल "बाकी काहीही असो मी लग्न करणार तर घरातल्यांच्या मर्जी नुसार अरेंज मॅरेज च कारण मला ह्या प्रेम अफेअर ह्या गोष्टींवर काडीमात्र विश्वास नाही कारण हल्ली त्यात खरे पना उरला नाही आणि त्यात घरातले परवानगी देतीलच अस पण नाही त्यावर ती म्हणाली तुझ म्हणणं बरोबर आहे पण तुला काय गॅरंटी आहे तुझा होणारा पार्टनर तुला भविष्यात समजून घेईल आणि दुसऱ्या कुणाच्या boyfriend किंवा girlfriend बरोबर लग्न करण्यापेक्षा आपल्या boyfriend किंवा girlfriend बरोबर लग्न करणं कधीही चांगलं.जेणेकरून तुला तुझ्या पार्टनर च्या सगळ्या चांगल्या वाईट सवयी गोष्टी आधीपासूनच कळतील....."
तिच्या ह्या वाक्यांनी मला पुरत गोंधळून टाकलंय त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर मी अजुनही शोधतेय अफेअर:फेअर की अनफेअर.....
रामकिशन जगताप,बीड
जस ग्लास भरलेला आहे की आर्धा आहे हा विवादित विषय आहे तसाच अफेअर्स पण आहे. प्रत्येकाला ते ठरवण्याचा आधिकार आहे. फक्त आपल्यामुळे कोणाच्या मनात विश्वासघात केल्याची भावना येऊ नये व केलेल्या कामामुळे आपलेच मन आपल्याला खायला उठू नये. एवढेच.
किरण बंडू पवार,औरंगाबाद.
प्रेमाच काहीतरी फेअर आहे
पण लाॅयल असलेल्या पार्टनरला फसवणं
जरासं अनफेअर आहे,
एकावरचा प्रेमातला इंटरेस्ट जाणं
हे जरासं विचित्र आहे
आणि महत्वाचं शरीरसुखासाठी
एखाद्याला अंधारात ठेवणं चुकीच आहे,
गरज असते प्रेमाचीही
आणि गरज असते शरीरसुखाचीही
माणसाच्या जन्मजात गरजांशी
तडतोज करणं जरा अनफेअर आहे,
पण खऱ्या अर्थी
विश्वासाला तडा देऊन दुसरं नातं ठेवणं
हे खरचं जरा अनफेअर आहे,
नाण्याच्या दोन बाजूत या
पारडं जड जरा खात्रीच आहे,
विश्वासात घेऊन काही गोष्टींना
जे घडतं तेच इथे फेअर आहे.
आदित्य चौगुले,इचलकरंजी.
याच तिच्याशी किंवा त्याच हिच्याशी अफेअर चालू आहे अशी कधीतरी कुजबुज कानावर येते. म्हणजे काहीजण प्रेम या पवित्र शब्दाला पण अफेअर हे नाव देऊन मोकळे होतात. प्रेमाला वयाचे बंधन नसते पण तेच प्रेम एखाद्याला खुपत असेल तर तो अफेअर आहे असे सांगू लागतो. जर एखाद्याचे अफेअर प्रामाणिक आणि विश्वासावर टिकून असेल तर ते अफेअर फेअर आहे. आणि आपलेच दोन तीन अफेअर आहेत आणि आपला जोडीदार मात्र एकवचनी एकनिष्ठ असावा अशी अपेक्षा बाळगणे हे अनफेअर आहे. हीच बाब वैवाहिक जोडप्यांना लागू पडते. पुरुषाने बाहेर अनेक लफडी करण्याला समाजमान्यता मिळते पण त्याची बायको मात्र चारित्र्यशील पाहिजे ही अपेक्षा बाळगणे म्हणजे अनफेअर आहे. एकमेकांचा एकमेकांवर विश्वास, प्रामाणिकपणा, समंजसपणा असेल आणि नाते जितके निखळ असेल तितके ते अफेअर नक्कीच फेअर असेल.
संकेत मुनोत,पुणे.
अफेअर फेअर केव्हा म्हणता येईल हाही प्रश्न आहे.पण अनेकदा अनफेअर वाटते.
नाते टिकवूया या सामजिक चळवळीचे कार्य करतांना याबद्दल च्या काही केसेस आल्या. गैरसमज नको म्हणून सांगतो कि जी नाती आहेत ती अधिक चांगली होण्यासाठी, त्यातील गोडवा वाढवण्यासाठी ,गैरसमज कमी होऊन एकमेकांना समजून घेत पुढे कसे जाता येईल यासाठी ही नाते टिकवूया चळवळ
सध्या स्वार्थीपणा, टिव्ही सिरियल्स ,सोशल मीडिया आणि इतर ठिकाणी सतत दाखवले जाणारे नाते तोडण्याबद्दल चे आणि तीव्र टोकाचे मत मांडण्याचे विचार इ मुळे नात्यांमध्ये तणाव होण्याचे आणि ती तुटण्याचे प्रमाण खूप वाढले आहे त्यामुळे नाते टिकवूया ही चळवळ तर त्यात आसलेली नाती सुंदर करण्यासोबतच ज्यांचे नाते तुटत आहे त्यावर ही कार्य केले जाते.
यात आलेली काही केसेस मध्ये असे आढळुन आले कि एक जोडीदार नाते टिकवण्याचा कसोशीने प्रयत्न करतोय तर दुसऱ्या तोडण्याचा, मग तोडणारा टिकवणार्यावर येन तेन आरोप करून त्याची किंवा तिची बदनामी करून त्या नात्यातून बाहेर पडतो पण तोपर्यत नाते टिकवायचा प्रयत्न करणारा जोडीदार मात्र कसोशीने प्रयत्न करत राहतो.
यात अनेक केसेस मध्ये असे आढळुन आले कि जोडीदारा चे पहिल्यांदा ज्या कुणासोबत अफेयर होते तश्याच अपेक्षा तो पुढच्या जोडीदाराकडून करतो आणि नाही पूर्ण झाल्या कि त्याला ती गोष्ट जमत नाही असे समजून काही बाही कारण काढून त्याला हैराण करतो आणि सोडून देतो. म्हणजे समजूतदार लोक आहे त्यात adjust करतात पण धरसोड प्रवृत्तीचे लोक त्यात सोडून देतात , यात ज्याने सोडून दिले त्याला काही तेवढा त्रास होत नाही पण मुख्य त्रास होतो तो ज्याने ते नाते टिकवण्याचा प्रयत्न केला त्याला.
उदा- प्रियाने समीर ला पटवून त्याच्याशी लग्न केले पण लग्नानंतर प्रिया सतत समीर कडून अवास्तव अपेक्षा ठेवायला लागली, कि मला वाटत माझा नवरा असा असावा तसा असावा वगैरे.....
समीर प्रेमापोटी अनेक गोष्टी करायचा पण एवढे बदलणे काही शक्य नव्हते शेवटी सतत भांडण इ करून प्रियाने समीर पासून घटस्फोट घेतला , यात समीर पुरता तुटला पण एक दोन वर्षांनी एक चांगली मुलगी आयुष्यात आल्याने तो आनंदी झाला.घटस्फोट झाल्यावर काही दिवसांनी जेव्हा समीरला प्रियाची एक सहकारी भेटली तेव्हा तिने त्याला प्रियाच्या लग्नापूर्वीच्या प्रियकराबद्दल सांगितले आणि त्याला धक्काच बसला, प्रियाला जसा नवरा पाहिजे होता आणि समीरला जे ती सतत तू असा असा बन म्हणायची तो तसाच होता अगदी, समीर च्या प्रिया वरील आंधळ्या प्रेमामुळे प्रियाचे असे काही असेल हे त्याच्या लक्षात च आले नाही.आणि प्रिया आणि तिच्या घरचे स्वतःची चुकी लपवण्यासाठी सतत समीरवर खोटे नाटे आरोप करत राहिली आणि समीर त्याची उत्तर देत राहिला
हेच गणेश आणि सोनम बाबत. लग्न झाल्यवर गणेश सोनम कडून सतत त्याच्या मैत्रिणी ची अपेक्षा ठेवायचा आणि तिला दोष द्यायचा.शेवटी काही बाही कारण काढून त्याने घटस्फोट मिळवला.असे अनेक प्रसंग सांगता येतील ज्याच्यामुळे काहींची आयुष्य उध्वस्त झाली त्यामुळे पुढे दुसऱ्या कुणाकडून तशीच अपेक्षा करणार असाल तर ते अफेअर फेअर नाहीतर अनफेअर
*यातील सर्व छायाचित्रे इंटरनेट वरून घेतली आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा