पत्नी


🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप

  पत्नी

Source: INTERNET

प्रतिक्षा बूध्दे, गडचिरोली.

पत्नी... 
पती म्हणजे स्वामी, जसं रोडपती करोडपती तसं पती. मालकच एकंदर. 
पत्नी, त्याच शब्दाचं स्त्रीलिंग. 
पण
पत्नी म्हणजे स्वामिनी किंवा मालकीहक्क जाहिर करणारा नव्हे. का? 
मुळात पुरुषसत्ताक असलेल्या आपल्या समाजाला सवय झालीए पिडवणुकीची. होय. पिडवणुक कुणाची तर ज्याची जमेल त्याची. त्यात एखादी स्त्री स्वत:च सर्वस्व त्यागुन एका नविन व्यक्ति सोबत नवं आयुष्य जगु पाहते, तेव्हा तिच्या त्यागाला तिची कमजोरी समजतो आपला हा महामुर्ख समाज. कमजोर व आपल्या मालकीची वस्तु म्हणुन मग 'पत्नी' ला वागवल्या जातं. 
वास्तविक पाहता पत्नीच त्या स्वयंघोषित सामर्थ्यवान पुरुषाचा आधारस्तंभ असतो हे आपण सहज विसरतो. 
पत्नीच त्या पुरुषाला खरोखर माणुस म्हणुन जगण्याचं सामर्थ्य देते. या संसारात स्वत:च एक वेगळं अनोखं जग निर्माण करुन त्यात त्याला सर्वोत्परी स्थान, प्रेम, माया अशा असंख्य गोष्टी कायम बहाल करत असते, ते सुद्धा कसलाही त्रागा न करता, स्वखुशीने, आनंदाने. स्वत: मृदु असुन सुद्धा कोणत्याही परिस्थितित पतीच्या पाठीशी मात्र खंबीरपणे ऊभी राहते. कधी ती तिचं आनंद त्याच्या सुखदुखाशी जोडते हे कुणाच्या लक्षातही येत नाही. एवढं असुन सुद्धा त्या स्त्रीला , 'पत्नीला' कुणी दुय्यम मानत असेल तेव्हा खरंच या समाजाच्या आजारी मानसिकतेची किव येते.

Source: INTERNET

राज इनामदार 
पंढरपूर 

There is no life without wife 

      कुठे होता तुम्ही? .. कुठे चालला.. कामावरून येयला इतका वेळ का? .. आज कामावरुन लवकर का आला? ... पैसे किती खर्च करता ओ तुम्ही? ... तुम्ही तर नुसतं कवडीचुंबक आहात नुसतं पैसे साठवून ठेवा.. चहा घेणार का कॉफी? .. जेवण आता करता का नंतर? 
          अशा अनेक प्रश्ननांनी नुसतं डोकं जाम होतं.. असं वाटतं आपल्याला हरणटोळं चावले काय?  अरे आपण उघीचच लग्न केल.. सतत प्रश्न आणि वरून हुकूम गाजवत असते ... मी लग्नच नसतं केल तर किती बर झालं असतं असं वाटतं.. 
        पण ऐकादा दिवस असाही येतो.. ती गावाला जाण्यासाठी निघते.. माझ्या मनात आनंदाने लाडू फुटत असतात.. ती गावाला जाते.. पण माझा आनंद हळूहळू मावळंतो... मला  चहा मिळत नाही वेळेवर ना नाश्ता.. नां कुठली गोष्ट वेळेवर सापडते.. त्यातुन जर आजारी असेल तर अहो डॉक्टर कडे या जाऊन असेही शब्द कानावर पडतं नाहीत.. जगणं एकदम कोंडल्यागत होतं.. 
     होय पत्नी घरातील तुळसच  असते.. तीच वास्तव्य घरात लक्ष्मी सारखं असतं.. मुलांसाठी अन्नपूर्णा असते.. अभ्यासाच्या वेळी त्यांच्यासाठी सरस्वती..  दुःखात असलो की धीर देणारी माऊली....किती रूप असतात पत्नीचे. 
ती अर्धांगिनी असते आपली.. पत्नी ही स्वामींनी असते, आपले सर्व काम करणारी नोकराणी नसते ती.. 
पत्नी असते म्हणून घराला घरपणं असते 
धन्यवाद 🙏

Source: INTERNET

अनिल गोडबोले
सोलापूर

दिलेल्या विषयामध्ये हा एक विषय आहे जो मी पुरुष म्हणून लिहू शकतो... पत्नी.. या विषयावर लिहायचं धाडस मी करत आहे या वरून तुमच्या लक्षात येईल की मी किती धाडसी आहे ते..!

पण खरच.. सिंगले...मिंगले.. ब्रेक अप वाले, भरपूर गर्लफ्रेंड असलेले, कमी गर्लफ्रेंड असलेले .. मग राहीलच तर टिक टोक आणि फेसबुक वर जोक करणारे या सगळ्यांनी मिळून जरी लिहिण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य नाही.

काय लिहायचं.. बायको बद्दल.. का लिहायचं??... उपहासाने लिहायचं कीं प्रेमाने लिहायचं.. विरोधात लिहायचं की व्यंगात्मक लिहायचं.. की सरळ आम्ही बापडे पुरुष कसे असतो या बद्दल लिहायचं..??

म्हणजे ज्या व्यक्तीला आम्ही अर्धांगिनी म्हणतो तिच्या बद्दल लिहायच असेल तर किती प्रश्न पडतात.. नाहीतर राजकारण, समाजकारण.. या वर तावातावाने बोलणारे आम्ही किती "हलकट" आणि "दुतोंडी" आहोत हे काही आम्हाला पटत नाही.

कोणताही स्टँड अप कॉमेडी (विनोदी एकपात्री प्रयोग... हल्ली कळत नाही ना) बायको वरील अचकट आणि फालतू विनोद केल्या शिवाय पूर्णच होत नाही.

बाकी बायको काय करते... या बद्दल मी सांगायची गरज नाही.. ती तर आम्ही आणलेली दासी आहे.. मग घरात आम्ही काम केली तर ओरडून सांगायलाच पाहिजे.. मी भांडी घासतो.. मी कपडे धुतो.. मी नोकरी करतो.. मी कमावतो.. उपकारच करतो सगळ्यांवर..

आता तर तिचा हात पण थर थर करत नाही चहा।देताना.. कारण बेवड्या.. तू ढोसून आल्यावर तुझ्या थरथरत्या हातांना धरून ती तुझं सगळं करते..

ती बोलणारच.. ती माणूस आहे.. तू तुझी जागा सोडली की ते होणारच.

काही महिला परिस्थितीचा फायदा घेतातच, वाईट वागतात, त्रास देतात, कायद्याचा गैरवापर करतात, बाहेर लफडे (अफेअर) करतात, खोट बोलतात, भांडण करतात.. याच अजिबात समर्थन होत नाही तस. पुरुषांनी हिंसाचार करणं, हात उचलणे, शिवी गाळ करणे, टोमणे मारणे, कामात न मदत करणे याच ही समर्थन होत नाही..

बाहेर काय घडत आहे या पेक्षा मी जर माझ्या बायकोला माणूस म्हणून वागवलो तर बरेच प्रश्न सुटतील..

असो.. नात्यात असलेले प्रेम आणि तिने केलेला त्याग या सगळ्याला विचारात घेतले पाहिजे. या वेळचा महिला दिन साजरा करत असताना एकच संकल्प करावा.. मी माझ्या बायकोला "गृहीत" धरणार नाही.. एवढेच..!

Source: INTERNET

करिश्मा डोंगरे ,पंढरपूर

 पत्नी म्हणजे बुद्धीने विचार 
  केला तर,
  कधीच न समजनारं व्यक्तित्व.
   पण प्रेमाने विचार केला तर
    एक सरळ अस्तित्व.
   एकदा जर पत्नीने जबाबदारीच
    ओषध घेतलं
   तर आयुष्यभर  थकत नाहीये.
   पत्नीचं जर कौतुक केलं 
   तर ती अपेक्षेपेक्षा जास्त काम 
    करते.
    परिस्थीती किती पण अवघड 
     असूद्या,
    आपल्या नवर्याला कधीच हार मानू देनार नाही.  
दोघांनमध्ये  कीतीही वाद असले तरी,
पत्नीच माघार घेते.
अहंकाराची वात कशी विजवायची हे तीला चांगले माहीत असते.
पत्नीला प्रेम कमी दिल तरी चालेल,ती समजून घेईल.
पण जर तीला आदल नाही दिला,
तर ती आतुन तूटुन जाते.
 नंतर कीतीही प्रयत्न केला तरी तीच्या   मनापर्यंत पोहचू शकत नाही.
संसारातल्या  तारा नाजूक असतात म्हणून ती त्या खूबीने निभवत असते.
तालाची एकही मात्रा चूकु देत नाही.
जर चूकली तर त्या नाराज होतात,सूर बेसूर होतात.
म्हणूनच संसाराच गाणं गाताना फार जपत असते पत्नी.
स्वत:लाही आणि ईतरांनाही.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************