🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप
महिला दिन: बाजरीकरण.
Source: INTERNET
-अमोल धावडे,
अहमदनगर.
महिला दिनाच्या माझ्या सर्व बहिणीना शुभेच्छा.
महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
८ मार्च रोजी सर्वांचे महिलांवरील प्रेम दिसून येते व्हाट्सएप, फेसबुक व ईतर सर्व माध्यमातून महिलांवरील प्रेम या दिवशी दिसून येते पण आजही महिला सुरक्षित आहे का आपण याचा कधी विचार केला आहे का. महिलेचा आदर हा एका दिवसापुरता मर्यादित नसला पाहिजे महिलेचा आदर हा दररोज केला पाहिजे. समाजामध्ये आजही स्त्री ही सुरक्षित जीवन जगू शकत नाही. समाजामध्ये महिला जगत असताना तिला वेगवेगळ्या लोकांना सामोरे जावे लागते हाच का तो महिलांचा आदर. आपण दररोज टीव्ही न्युज वर पाहतो अनेक वेगवेगळ्या घटना स्त्रियांच्या बाबतीत घडत असतात आज ६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो तर उद्या ७० वर्षाच्या म्हाताऱ्या आजीवर हीच का आपली संस्कृती आणी हाच का महिलांनाचा आदर. आपली बहीण आई बायको ही एक स्त्री आहे आपण जसा यांचा आदर करतो तसाच इतरांचा आपल्या बहीनिप्रमाणे आदर करा तरच आपल्या समाजामध्ये महिलांवरील होणारे अत्याचार थांबतील. आपण पाहतो की आपली मुलगी ७ च्या आत घरात आली पाहिजे आणि मुलाने १२ वाजेपर्यंत घराबाहेर राहिलेले चालते असे का आपल्या मुलाला ही ७ च्या आत घरात बोलवा इतर मुलींकडे आपल्या बहणीप्रमाणे पाहा आणि बघा आपला समाज किती पुढे जातो ते आणि समाजामध्ये स्रियांवर होणारे अन्याय आत्याचार थांबतील.
आपण पाहतो की लग्न झाले की मुलीला आपल्या आई वडिलांना सोडून आपल्या सासरी जावे लागते आणि सासरी गेल्यावर वेगवेगळ्या कारणावरून अगदी सुशिक्षित सुद्धा त्या मुलीला त्रास देतात आणि ती मुलगी असहाय होते ती आपल्या वडिलांकडे पण जाऊ शकत नाही आणि शेवटी ती आत्महत्येचा पर्याय निवडते. तर असे का होते याचा बारकाईने विचार करायला हवा आणि फक्त महिला दिनाच्या दिवशी शुभेच्छा न देता प्रत्यक्षरित्या महिलेचा आदर करायला हवा. आपण पाहतो की आपल्याला स्त्री म्हणून आई पाहिजे, बायको म्हणून एक स्त्री पाहिजे, बहीण म्हणून एक स्त्री पाहिजे आणि मुलगी म्हणून स्त्री नको वंशाचा दिवा हवा व पोटातच तिला मारून टाकतात तिला या जगात येऊ पण देत नाही.
एक स्त्री म्हणून तिला हे जग पाहुद्या आणि तिच आयुष्य जगू द्या. आज महिला उंच शिखरावर जाऊन पोहोचली आहे वेवेगळ्या कार्यक्षेत्रात कार्यरत आहे पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून आज महिला काम करत आहे तरीही महिलांना आजही योग्य प्रकारे वागणूक मिळत नाही.
आणि आपण महिला दिन साजरा करतो.
आपले विचार सर्वप्रथम बदला मग समाज आपोआप बदलेल.
महिलांचा आदर करा.
#HappyWomansday.......
Source: INTERNET
-वैशाली सावित्री गोरख
ग्राफिक डिझाइनर (पंढरपूर) मुंबई.
आंतरराष्ट्रीय महिला दिवसाचा उगम हा नियोर्क शहरात 1908 मधे 15 हजार महिलांच्या आंदोलनाने झाला,ह्या आंदोलनात महिलांची मागणी होती कामाचे तास कमी करावेत, योग्य वेतन मिळावी, मतदानाचा अधिकार द्यावा .नंतर एक वर्षाने सोशालिस्ट पार्टी ऑफ अमेरिकाने पहिला महिला दिन साजरा केला. महिला दिनाला आंतराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करावा अशी कल्पना 1910 मध्ये क्लारा जेटकीन ह्यांनी कोपनहेगन मध्ये श्रमिक आंतराष्ट्रीय महिला कॉन्फरन्स मध्ये दिली.ह्या कॉन्फरन्स ला 17 देशाच्या 100 महिला उपस्थित होत्या नि ह्या सर्वांनी क्लारा जेटकीन ह्यांच्या कल्पनेला मान्यता दिली.अशा तरेने महिला दिन हा महिल्यांच्या हक्कासाठी साजरा झाला पण हल्ली त्याच पूर्णपणे बाजारीकरण झालेलं आहे, आज महिला दिन हा फक्त ऑफर्स साठी साजरा होतो, ह्या भांडवलशाही व्यवस्थेत महिला पूर्णपणे वाहून गेलेत, ह्या सगळ्यातून त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव ही होतं नाही नि करून ही दिली जात नाही.
Source: INTERNET
महेश कामडी, नागपूर.
प्रेमाचा सागर ग तू...
हृदयाची हाक ग तू...
माझ्या जीवनाची सावली ग तू ...
माझ्यासाठी माझा देव ग तू...
'एक स्त्री' माझी आई ग तू...
मला मांडीवर आंघोळ घालणारी ग तू...
हट्ट पुरवणारी मैत्रीण ग तू...
जुन्या गोष्टी सांगणारी राणी ग तू...
संस्कार देणारी देवी ग तू...
'एक स्त्री' माझी आजी ग तू...
न सांगता मनातलं ओळखणारी ग तू...
कधी मायेची ऊबदार शाल ग तू ...
सावली जणू आईची ग तू...
कधी प्रेमाने तर कधी रागीट ग तू...
'एक स्त्री' माझी बहीण ग तू...
भर उन्हात गार वाऱ्याची झुळूक ग तू...
मी असेल शिव तर माझी शक्ती ग तू...
माझ्या सुख दुःखाची सोबती ग तू...
माझे पूर्ण संसार माझे प्राण ग तू ...
'एक स्त्री' माझी पत्नी ग तू...
आईचे अर्धे रूप ग तू...
आईपेक्षा जवळची मैत्रीण ग तू ...
प्रेमाची घागर ग तू ...
आई नंतर सगळ्यात जवळची ग तू ...
'एक स्त्री' माझी मावशी ग तू...
गोड मनाची साखर ग तू ...
आईची माया देई ग तू ...
पुरणपोळीचे जेवण भरवणारी ग तू...
'एक स्त्री' माझी मामी ग तू...
अशी नशिबाने लाभली ग तू ...
कधी कधी छोट्या गोष्टीत रुसणारी ग तू ...
प्रत्येक गोष्टीवर पार्टी मागणारी ग तू...
बेस्ट फ्रेंड चा हक्क गाजवणारी ग तू...
'एक स्त्री' माझी मैत्रीण ग तू...
मायेची ऊब लक्ष्मीचे रूप ग तू...
भावनेचा पाझर ग तू ...
थोडे दिवस राहून आयुष्यभराची आठवण देऊन जाते ग तू...
बाबांची शान आईचे प्राण तू....
'एक स्त्री' माझी मुलगी ग तू...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा