प्राथमिक शाळा आणि भारताचे भवितव्य
सिध्देश्वर आघाव,जालना.
समाजात सर्वच स्थरात एक गोड गैरसमज आहे. कि शिक्षकांना भरगोस पगार आहेत.परंतु त्याची जबाबदारीची कोनाला जाणिव आहे का?प्राथमिक स्तरावर किती मेहनत घ्यावी लागते . आपन म्हणतो कि "हमारे देशका उज्वल भविष्य नौजवानके हातोमे है".याच नोजवानांच भविष्य हे प्राथमिक स्तरावरील शिक्षकाच्या हातात असुन ते यांना काय शिक्षण देतात यावर अवलंबून आहे.त्यांचा पाया किती मजबूत आहे यावर त्याचं पुर्ण भविष्य अवलंबून आहे. त्या मुळे कोणाला किती पगार या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही .फक्त पाया मजबूत करण्यासाठी घरच्या व बाहेरच्या लहाना पासुन थोरा पर्यंत सगळ्यांचेच योगदान महत्वाचे आहे. कुमार अवस्थेत आपन जे त्याच्यावर संस्कार करु तेच संस्कार मोठं झाल्यावर कामी येईल . म्हणजे प्राथमिक शाळा आणि भारताचे भविष्य यांचा फार जवळचा संबंध आहे हे निदर्शनास येत .
ज्ञानेश्वर आव्हाड,नाशिक
विदयेविना मती गेली
मतीविना निती गेली
नितीविना गती गेली
गतीविना वित्त गेले
वित्तविना क्षुद्र खचले
इतके अनर्थ एका
अविद्येने केले!!!!
महात्मा फुलेंचे हे शिक्षणविषयक विचार अाजही प्रेरणादायी ठरतात.शिक्षणावाचून मनुष्य आधुनिक युगात निव्वळ पशु समान ,ठार अडाणी आणि मागास बनतो.मूल जन्मतः आईची भाषा शिकते.तेथूनच त्याच्या शिक्षणाचा प्रवास सुरू होतो.पण खर्या अर्थाने मूल प्राथमिक शाळेत दाखल झाल्यानंतर विकसित होण्यास सुरूवात होते.म्हणजेच मूलांच्या अायुष्याला कलाटणी प्राथ.शाळेतून मिळते.अापल्यासारखीच समान वयोगटाची मुले सोबती असल्याने बालके तेथे रमतात.त्यांच्याशी खेळणे,उडया मारणे,मस्ती करणे यांची हक्काची जागा ही प्राथ.शाळाच असते.गाणि ऐकणे व गाणी म्हणायला येथेच शिकविले जाते.गोष्टी सांगणे,संस्कार व शिस्त अंगवळणी याच वयात अाणि याच शाळेत पडतात.कारण हे वय निरागस व निष्पाप असते.जसा सोन्याच्या तारेला आकार दयावा तसा दागिना विध्यार्थी दशेत घडत असतो.गुरूजी नावाच्या व्यक्तिच्या हातून त्याचा विकास होत असतो.आणि आयुष्यभर या गुरूजीला तो सहजासहजी विसरायला तयार होत नाही.इतका प्रभाव प्राथ.शाळेत त्याच्यावर पडलेला असतो.म्हणूनच प्राथमिक शाळेतील शिक्षण प्रत्येकाला मिळायला हवे असा आग्रह इंग्रज काळापासून भारतीय नेते व समाजसुधारक धरत असे.आजही तसा कायदा केला आहे.सर्वांना प्राथ.शिक्षण मोफत व सक्तीचे झाले आहे.वेगवेगळ्या लाभाच्या योजना दिल्या जात अाहे.त्याचे फलितही चांगले मिळत आहे.गरीब श्रीमंत अशा सर्वच घटकांची प्रगती शिक्षणातून होताना दिसत आहे.
आज प्राथमिक शाळांत दर्जेदार इंग्रजी व मराठी शिक्षण मिळत आहे.संगणकाचे ज्ञान दिले जात आहे.डिजिटल वर्गखोल्या व टॅबवर अध्ययन होत आहे.बहुतांशी शाळा आता आय एस ओ प्रमाणित झाल्या आहेत.सामान्य कुटूंबातील पण उच्चशिक्षित,प्रशिक्षित शिक्षकांची नियूक्ती झाल्या आहेत.अशा कारणांमुळे पालक संतुष्ट असल्याचे चिञ व प्राथ.शिक्षणाकडे पहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक आहे.
परंतू शासनाच्या उदारमतवादी खाजगी शाळांना प्रोत्साहन देण्याच्या वृत्तीने तसेच दूष्काळामुळे,रोजगाराअभावी स्थलांतर होण्यामुळे लोकसंख्या घट यामुळे पटसंख्या कमी होऊन कमी पटांच्या शाळा बंद करण्याचे धोरण आणण्याचा घाट घातला जात आहे.तसेच शिक्षकांना शाळाबाह्य कामांत गुंतवून ठेवले जाण्याचे प्रमाण वाढतच आहे.याचा समाजात रोष होण्याची भिती आहे.हे धोरण शिक्षणासारख्या क्षेञाला नक्कीच हानिकारक ठरणारे आहे.आणि एकेक करून प्राथमिक शाळा कमी झाल्यास पुन्हा डोंगराळ,दूर्गम,गरीबांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभिर होऊ शकतो.
प्राथमिक शाळा व त्यातील दर्जेदार शिक्षण हे निरंतर आणि नियमित सुरू ठेवले तर आंबेडकर,शाहू,फूले,कर्मवीर पाटील यांचे प्राथमिक शिक्षण विषयीचे विचार व स्वप्न पूर्ण होऊ शकेल!!
अर्जुन बर्गे,अहमदनगर
शिक्षण है वाघिणीचे दूध आहे आणि ते घेतल्यावर माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही असं Dr बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हंटलं.......
माणसाच्या शिक्षणाची सुरुवात ही आई वडिलांन पासून..... होते.नंतर समाजातील इतर घटकांकडून....
त्यानंतर बालवाडीतुन मुलं है शिकत असत..... त्यानंतर त्याच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा घटक असतो प्राथमिक शाळा...... या प्राथमिक शाळेत शिक्षण घेऊन मुलं है त्यांच्या आयुष्याचा पाया रचत असतात.... तेथून ते घडत असतात..... आणि उद्याच्या देशाचं एक उज्वल भविष्य म्हणून डॉक्टर... इंजिनीरिंग..... वकील.... IAS... IPS... है घडवून एक देशाला ही घडवणार असतात......
पण खरंच सांगितलं त्या प्रमाणे घडत का..... प्राथमिक शाळेत मुलांना त्या प्रमाणे दर्जेदार शिक्षण मिळत का......?? त्याचा आयुष्याचा पाया पक्का होतो का......?? . त्यांना सध्याच्या प्रणाली प्रमाणे शिक्षण दिले जाते का...?? .. शिक्षक वर्ग खरंच आपुलकीने शिकवतो का....?? .... कि जेणे करून आपण देशाच भविष्य घडवतो याची जाणीव तो ठेवतो का......??
तर याच बऱ्याच अंशी नकारात्मकच येतील..... है सगळं देशाचं उज्वल भविष्य घडवण्यासाठी आपल्या शिक्षण व्यवस्थेत खूप सुधारणा करणं गरजेचं आहे...... काही अहवाल येतात कि माध्यमिक शाळेतील 30... ते 40% विद्यार्थ्यांना गुणाकार भागाकार येत नाही.... त्यांना व्यवस्थित वाचता पण येत नाही....... एवढं कसे मागे पडलो आपण......
आपल्या प्राथमिक शाळेतील सगळेच शिक्षक गुणवत्ता पूर्ण शिक्षण देतात का..... शिक्षकांचे ज्ञान वाढवण्यासाठी त्यांचे प्रशिक्षण वर्ग तरी आयोजित होतेत का... तर याच उत्तर पण बऱ्याच. अंशी nahich असेल......
है असच चालत राहील तर तर आपण प्राथमिक शाळेतील पहिली पिढी कस घडवणार आहोत..... यासाठी खूप मोठ्या सुधारणांची शिक्षण व्यवस्थेत गरज आहे......
मुलाला ज्या प्रमाणात या वयात जे गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळणे गरजेचं आहे ते बऱ्याच प्रमाणात प्राथमिक शाळेतून मिळत नाहीये...... म्हणून आज शहरी भागातूनच नाही तर ग्रामीण भागातून पण पालक वर्गांनी खाजगी शाळा ची वाट धरली आहे.......
R. सागर,सांगली
'लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते' असं म्हटलं जातं. याच मातीच्या गोळ्यांना आकार द्यायचं काम प्राथमिक शाळांमधून होत असतं. त्यामुळंच प्राथमिक शाळा एक असं ठिकाण आहे जिथून विद्यार्थ्यांच्या भवितव्याची दिशा ठरते. आजची भारताची परिस्थिती पाहता प्राथमिक शाळा ह्या भारताची एक सक्षम पिढी घडवण्यात खूप मोलाची कामगिरी बजावतील यात शंकाच नाही.
.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी 2020 पर्यंत भारताला महासत्ता बनवायचं स्वप्न बघितलं होतं ज्यामध्ये युवा पिढी एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकते. दुर्दैवानं आज डॉ. कलाम सर आपल्यात नाहीत. अजून त्यांचं स्वप्नही 100% पूर्ण नाही झालं. पण ज्यावेळी त्यांचं स्वप्न पूर्ण होईल त्यावेळी ते पूर्ण करणारी जी पिढी असेल ती पिढी घडवायचा पाया हा प्राथमिक शाळांमध्येच रचला जाईल. त्यासाठीच प्राथमिक शाळांमध्ये आवश्यक त्या सोयी-सुविधा निर्माण करणे, मुलांच्या कलागुणांना वाव देणे, त्यांच्यामधले कौशल्य ओळखून त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.
निखिल खोडे,पनवेल.
प्राथमिक शिक्षणाचा प्रसार हा आर्थिक आणि सामाजिक विकासाचा पाया आहे, हे सर्वमान्य आहे. आतापर्यंत कोणत्याही पक्षाचे सरकार आलेले असो, मंत्री काहीही भाषणे करोत, शिक्षण हा राजकीय पक्षांचा पहिल्या क्रमांकाचा विषय राहिलेला नाही ही परिस्थिती आहे. सरकार शिक्षणा वरची गुंतवणूक कमी - कमी करत आहे, त्यामुळे सरकारी शिक्षणाचा विकास रखडला जात आहे.
नुसते लेखन आणि वाचन म्हणजे शिक्षण नव्हे. प्रत्येक मुलांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांचा शोध घेऊन त्यांचा विकास करणे. मुलांसाठी नवीन संधी उपलब्ध करून देणे. त्यांच्यातील क्षमतांचा पुरेपूर विकास होण्यासाठी आवश्यक ती परिस्थिती सभोवताली निर्माण करणे म्हणजे शिक्षण. शिक्षण हे माणसाच्या विकासाचे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. शिक्षणामुळे माणसाची अस्मिता जागृत होते. 'मी कोण आहे?' याची जाणीव शिक्षणामधून होते. शिक्षणामुळे मानवाची आकलनशक्ती वाढते.
प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे अतिशय दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण असावे. प्राथमिक शिक्षणाचे उद्दिष्ट असे असले पाहिजे, मुलगा किंव्हा मुलगी एकदा शाळेत दाखल झाले की, ते पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावेत, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मत होते.
सर्वांना शिक्षण हे ध्येय कित्येक वर्ष भारताच्या धोरणात आहे, पण अजुन हे स्वप्न पूर्णपणे सत्यात उतरले नाही. प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात आमूलाग्र सुधारणा करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्यक्ष अंबलबजावणी, राजकीय इच्छाशक्ती आणि व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
आकाश थिटे,सोलापूर.
आपण नेहमी म्हणतो की, कोणत्याही देशाचे भवितव्य त्या देशातील असणाऱ्या तरूणांच्या कार्यशक्तीवर, विचारशक्ती वर , आचरणशक्ती वर अवलंबून असते. हे मलाही खरे वाटते. पण मला वाटते की, या सर्व तरुणाई ची शक्ति बाहेर काढण्यासाठी चांगले, योग्य, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे खूप महत्वाचे आहे. या शिक्षणाची सुरूवात प्राथमिक शाळेतून होणे खूप गरजेचे असते. पण आता मात्र परिस्थिती जरा वेगळीच दिसत आहे. लहान मुलांना प्राथमिक शाळेत असताना जेवढ्या नवीन नवीन कल्पना, विचार सुचतात तेवढे नंतर सुचत नसतात मला असे म्हणायचे आहे की, तेवढी त्यांची नवीन शिकण्याची, जाणून घ्यायची जिज्ञासा कमी होते.
प्राथमिक शाळेचे दिवस खूप आनंदाचे वातावरण अविस्मरणीय असतात आणि आपण खूप शिकतही असतो .येथे असताना ज्यांना शिकण्याची, काहीतरी करण्याची थोडी जरी जाणीव झाली की, ते काहीतरी स्वतःसाठी तर करतातच, पण समाजासाठी, देशासाठी नक्की करतात. म्हणूनच येथे चांगले शिक्षण मिळणे खूप खूप महत्वाचे आहे.
माझे ही प्राथमिक शिक्षण खूप छान झाले. खूप चांगले शिक्षकही मिळाले. हे माझे भाग्य समजतो. आजही लहान मुले दिसली की ते दिवस आठवतात, .
आज प्राथमिक शाळांचे स्वरूप बदलून गेले आहे. अनेक जण या शाळा सोडून खाजगी शाळेत जात आहेत. आपण पाहिले कि यामुळेच शासनाला काही शाळा गेल्या वर्षी बंद कराव्या लागल्या.
मी ज्या माझ्या जवळच्या शाळा पाहतो तेथे तर गुणवत्ता खूपच ढासळत चालली आहे. शिस्तीची तर उणीव सतत जाणवत आहे. मुलाचे शिक्षणापासून लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी खूप वाढल्या आहेत. गुरू - शिष्य यांच्यातील आदरभाव तर रसातळाला पोहोचला आहे. या सर्व गोष्टींना तुम्ही, आम्ही, शिक्षक, विद्यार्थी, सरकारची चुकीची धोरणे , समाजातील काही घटक कारणीभूत आहेत.
अशा परिस्थितीत विद्यार्थी कशे शिकायचे व देशाच्या विकासासाठी हातभार लावणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही स्थिती बदलण्यासाठी तुम्ही -आम्ही विचार करू ,कृती करू व परिस्थिती बदलून टाकू .हे जितके आपण जलद गतीने करू तेवढ्या गतीने भारताचे भवितव्य उज्ज्वल होईल.
पी.प्रशांतकुमार,अहमदनगर.
....काय मग घेतलं का मुलाचं ऍडमिशन.. xyz शाळेत का? .. छान छान.. फी जास्त आहे 70-80 हजार पर्यंत पण प्राथमिक शिक्षण महत्वाचं ना.. म्हणून मग..
बापरे? .. म्हणावं वाटत अहो तुमच्या दोन्ही मुलांच्या फी इतकं तर आमचं वार्षिक उत्पन्न नाही हो.. मग आम्ही करायचं तरी काय?
.. भारतात सर्व प्रकारच्या शिक्षणाचा बाजार झालाय.. काही तुरळक अपवाद असतीलही तरीही KG तर PG सर्वत्र बाजार आहे..
....खूप जास्त फी असलेल्या शाळेत चांगलंच शिक्षण मिळत.. खासकरून प्राथमिक.. हे जे लोकांच मत बनलंय तेच चूक आहे.. मुलांना स्मार्ट बनवणं म्हणजे पोपट बनवणं असच त्यांचं मत.. हे म्हणजे कामगार तयार करणं
..मुलांच्या अंगातले गुण-सुप्तगुण,आवड ते जोपासन,वृद्धिंगत करणं हे कुणीच पहात नाही..कला साहित्याची आवड वैचारिक जडणघडण तर आपण हद्दपारच केली शाळेतून.. नुसतं मोठं करण्याची घाई..
... हे जर बदललं नाही तर आपण आख्खी पिढी नासवून बसलेलो असू..
खाजगीत अस तर सरकारी शाळेत कमालीची उदासीनता दिसते.. इलेक्शन,जनगणना,पोलिओ आणि इतर शाळाबाह्य कामातच जास्त वेळ जातो काही वेगळं करू पहायची इच्छाशक्तीही दिसत नाही..
... सगळंच नैराश्य आणणार असताना.. काही चांगले प्रयोग उत्साह वाढवतात.. खासकरून दिल्ली सरकारच काम किंवा काही ZP च्या शाळा माहित आहेत तिथे प्रत्येक मुलाला एक कला प्रकार आणि एक खेळ निवडवाच लागतो.. सगळे खेळाडू किंवा कलाकार थोडीच होणार तरीही का? तर खेळ त्यांच्यात sportsmanship आणेल जी भविष्यात ताणतणावांना सामोरे जाताना उपयोगी पडेल तर कला त्यांना जीवनाचा आनंद घ्यायला शिकवेल..
अशा प्राथमिक शाळा पाहिल्या की वाटतं नाही भारताच भवितव्य चांगल्या हातात राहील...
वाल्मीक फड,नाशिक.
मागिल काळात शाळा म्हटली की,आठवते धोतर घातलेले,अंगात नेहरु सदरा,सदर्यावरून कोट आणी डोक्यावर टोपी अशी व्यक्ती दिसली की,हे हमखास गुरुजी आहेत ह्यात शंकाच नसायची.परंतु गुरूजी गावात दिसले तर त्यांच्या पुढे जाण्याची हिंमत होत नसायची.
आजही मला वाटतय कि शिक्षा करण्याची जी पद्धत पुर्वीपासून होती ती पद्धत तशीच चालू असायला हवी .कारण काय होत की मुलांना कोणत्याही प्रकारचा धाक नसतो पर्यायाने मुले दिलेला गृहपाठ किंवा इतर शैक्षणिक गोष्टि वेळेवर पुर्ण करत नाही आणी त्यांचा शैक्षणिक विकास होत नाही,थोडक्यात म्हणजे पुर्विची शिक्षण पद्धत अतिशय चांगली होती आत्ता ते शक्य नाही हेही मला माहीत आहे.
एक गोष्ट प्रकर्षाने सांगावी वाटते की काही प्राथमिक शाळा आज खुप कष्ट घेतायत.शाळेत अत्यावश्यक असणारे संगणक शिक्षण,,.,विविध खेळ त्यामुळे मुलांचा शारीरिक विकासही होतो आणी बौद्धिक विकासही होतो.
केवळ पारंपारिक शिक्षण देऊन आता भागणार नाही .प्राथमिक शाळेत असतानाच मुलांना स्वछंद त्यांच्या मनाप्रमाणे विषय देऊन शिक्षण दिले तर बघा देशाचे भवितव्य कसे ऊज्वल राहील यात शंका नाही.शिक्षकांनी अश्या गोष्टि तात्काळ सरकारी यंञनेला दिल्या पाहीजे.देशाचे भवितव्य हे शिक्षकांच्या हातात आहे म्हणून शिक्षकाने हे काम एक नोकरदार म्हणून न करता एक सामाजिक बांधिलकी म्हणून इकडे पहावे असे मला वाटते.
शाळेत SMC अध्यक्ष असताना अनेक प्रकारचे प्रयोग मी राबवले. त्यात माझ्या लक्षात एक गोष्ट प्रकर्षाने आली ती म्हणजे पालकांची साथ.भारताचे भविष्य खर्या अर्थाने जर ऊज्वल करायचे असेल तर आजपासूनच आपल्या गावातील परीसरातील ज्या प्राथमिक शाळा आहेत त्यांच्यावरच लक्ष केंद्रित करा तुम्हाला सांगतो भारताचे भवितव्य आपोआप ते मुलं लिहीतील.आपल्याला काही करण्याची गरज रहाणार नाही.कारण आपला देश विविधतांनी नटलेला आहे.फक्त प्राथमिक शाळांकडे सरकारनेच नव्हे तर तळागाळातील प्रत्येक नागरिकाने लक्ष दिले पाहीजे.
शिरीष उमरे, मुंबई
बालपणाचे दिवस आठवले... रामागुरुजी आठवले... पहीले केलेले भाषण आठवले.. वेषभुषा स्पर्धेत जिंकलेले पहीले पारितोषीक आठवले... खलनायकाचा रोल केलेले पहीले नाटक आठवले... शाळेतल्या बागेतले झाडावर चढुन खाल्लेले पेरु आठवले... त्यानंतर खालेल्ला मार आठवला... शेवटचे आठवते ते चौथी ची स्कॉलरशीपची परीक्षा पास होऊन रामागुरुजी, शाळा व आईवडीलांची मान उंचावलेली...
जगाची व जिवनाची ओळख करुन देणारे चार वर्षे !! खेळ, कला व संस्कृतीची आवड लावणारे दिवस .... मातीच्या गोळ्याला आकार देणारा कालावधी...
आता जपान युरोप व इतर देशांच्या अभ्यास प्रणाली बद्दल जाणुन घेतल्यावर जाणवले की आपण बऱ्याच गोष्टीत मागे पडलोय. काळानुरुप बदल न झाल्याने कालबाह्य शिक्षणाचे दुष्परिणामाचे चटके आता जाणवु लागले आहेत.
माझ्यामते... प्राथमिक शिक्षक हा कमीत कमी पीच् डी असावा. त्याला शिकवण्या व्यतिरिक्त दुसरे काम नसावे. मासिक पगार एक लाखापेक्षा जास्त असावा. मासिक आर अँड डी ग्रँट पन्नास हजारापेक्षा जास्त असावी. ३० नागरिक घडवणे ह्यापेक्षा दुसरे टारगेट नसावे... बाकी आवश्यक ती संसाधने उपलब्ध असावीत. तरच आपली पटरीवरुन घसरलेली गाडी जाग्यावर येइल...
रुपाली आगलावे,सांगोला
माझ्या वेळेसच प्राथमिक शिक्षण आठवलं तर असं जाणवत की तेंव्हा फक्त एक शिक्षक 2 ते 3 वर्ग सांभाळायचा.... पहिली दुसरी एका वर्गात आणि तिसरी चौथी एका वर्गात... एकच शिक्षक दिवसभर... त्यातही शाळेतली सोडून इतर कामच जास्त... ना संगणक ना डिजिटल बोर्ड... मला तर आजही आठवत की आम्हाला एक इंग्रजी शिकवणारे शिक्षक होते त्यांनी Apple च स्पेल्लिंग A p p l e.... अस एक एक सांगितलं होतं... A डबल p l e अस सांगितलं तर ते छडी द्यायचे..... हे असं सगळं आमचं प्राथमिक शिक्षण झालं....
पण, आताच अलीकडे एका प्राथमिक शाळेस भेट देण्याचा योग आला... तेंव्हाची परिस्थिती आणि आताची यामध्ये मला बराच फरक जनवला... माझ्या चुलत भावाचा मुलगा ज्याला पहिल्यांदा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं होत... तिथं त्याला काहीच येईना म्हणून परत Z P च्या शाळेत घातलं... आणि थक्क करणारी गोष्ट म्हणजे तो आज मराठीच काय पण इंग्रजीही उत्तम वाचतो....
हा एवढा बदल झाला कसा... खर तर हा बदल शाळेचा नव्हता तर त्या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांचा होता.... प्राथमिक शिक्षण घेताना मुलांच्या वायचा विचार करून त्यांच्या कलान घेऊन शिकवलं तर ते कुठेही शिकतात..... मग ते इंग्रजी माध्यमाच्या शाळा असोत किंवा मराठी... शिकणं महत्वाचं... म्हणून अस वाटत की भारताचे भवितव्य घडवायचे असेल तर सगळ्यात आगोदर शिक्षकांचा घसरत चाललेला दर्जा आधी सुधारवला पाहिजे.... तरच भारताचं भवितव्य उज्ज्वल होईल...
*********(यातील सर्व छायाचित्रे इंटरनेटवरून घेतलेली आहेत.)********
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा