स्मार्टफोन नंतरचे जग

राजश्री ठाकूर , मुंबई .
        १६ विद्या ६४ कला एका तळहाताएवढ्या आकारात बघायला मिळतील , मानवी वसाहत असलेल्या बहुतांश ठिकाणी हि वस्तू जिनी सारखे काम करेल हे अगदी २१ व्या शतकाच्या सुरवातीला सुद्धा परीकथेसारख वाटलं असतं पण आज आपल्यातील बहुतेक जण या स्मार्टफोन्सच्या मार्गदर्शनाने जगणं सुकर किंवा दुष्कर करत आहेत . 

 आगीच्या शोध , शेतीचा शोध यांनी माणसाला स्थिर केले , चाकाच्या शोधाने गती दिली आणि आता स्मार्टफोन च्या शोधाने आपलं जग पुन्हा एकदा स्थित्यंतरातून जात आहे . 
एखादी अनोळखी वस्तू कितीही उपयुक्त असली तरी प्रथम हाताळताना चुका होणे स्वाभाविक असते , आगीचा उपयोग नक्की कसा करावा हे कळण्या अगोदर बऱ्याचवेळा चटका लागला असणार , जे दिसेल ते जमिनीवर टाकून देणे व त्यातून उगवेल त्यावर उपजीविका करणे इथपासून ते आजच्या कृषी अभ्यासापर्यंत बरेच प्रयोगशील टप्पे आले असतील . भारतातील पहिली रेल्वे आली तेव्हा त्यात माणसांना ढकलून रेल्वेत बसवले जाई हि परिस्थिती मात्र भारतात विशेषतः मुंबईत आजही कायम आहे . तसच ज्या प्रमाणात स्मार्टफोन्स चा उपयोग आहे त्याचप्रमाणे अतिरेकी वापराने होणारे संभावित तोटे सुद्धा आहेत पण महत्वाचे म्हणजे हे तोटे रोखणे आपल्या हातात आहे नसेल जमत तर त्याच स्मार्टफोनवर असणारे ,अॅप्लिकेशन  त्यासाठी मदत करू शकतात . 
   बटण असलेले स्मार्टफोन , टच स्क्रीन फोन आणि इथून पुढे नो स्क्रीन फोन . मळहातावरच फोन असेल संकेत दिला की तो सुरू होईल , फोन बंद असेल तेव्हा हात नेहमीसारखा दिसेल . फोन मधील प्रतिमा हातावरून उचलून पुढ्यात आणू शकतो . सध्या व्हिडिओ कॉल मध्ये स्क्रीन वर दिसणारी व्यक्ती प्रत्यक्ष समोर येऊन बोलेल ( आभासी प्रतिमेच्या रुपात ) , जगातील उत्तमोत्तम साहित्य , शिक्षक अखंड सोबत करतील . शरीराच्या हालचालींवर किंवा विशिष्ट क्रियांवर बॅटरी चार्ज झाल्याने चार्जर डिस्चार्ज होतील . फोन विसरणे , हरविणे , चोरीला जाणे हे होणार नाही .  फारच काय काही विशिष्ट लहरींची स्पंदने मॅच करता आली तर आपल्या स्मार्टफोन च्या मदतीने कुरुक्षेत्रावरील गीता ऐकता येईल , ज्ञानेश्वरांनी हलवलेली भिंत बघता येईल , १५ ऑगस्ट १९४७ चा तो क्षण त्याच साक्षीदार होता येईल . थोडक्यात म्हणजे इतिहास बघता येईल .  इतिहासाच्या मोडतोडीला आळा बसल्याने माणसांचं स्वतः च्या अस्तित्वाशी झगडण थांबेल . याचा उपयोग केला तर सगळ्याचं जगणं हे जीवनप्रिय होईल . सावरकर की गांधी की दोन्ही की कुणीच नाही हे स्वतः चे स्वतः ठरवता येईल . 
पृथ्वीवर मर्यादित असलेली जागा स्मार्टफोन च्या मदतीने कुशलतेने वापरता येईल . शाळा , ऑफिसेस , थिएटर सगळं मुठीत असल्याने हरित क्षेत्र वाढवता येईल . वाहतुकीची आवश्यकता कमी झाल्याने कदाचित इंधन दर पार कोसळेल . देश एकमेकांशी केलेच तर सायबर युद्ध करतील .
  पृथ्वी वरील सुपीक मेंदू व कार्यकुशल हात एकत्र आल्याने आज लागलेला शोध अल्पावधीत जगण्याचा भाग होऊ शकतो . वेळ वाचेल हे नक्की . 
 फक्त त्या मिळालेल्या वेळेचा उपयोग माणसाने स्मार्टली करायला हवा . आता स्मार्टली म्हणजे कसा तर ते सुद्धा स्मार्ट फोनसांगू शकतो . याचा अर्थ माणसाच अवमूल्यन असा खचितच नव्हे . 
   तंत्रज्ञान मानवी वसाहतीवर कुरघोडी करेल , संपवेल हि शंका येऊ शकते मग त्यासाठी काय करायचं ? आपला भस्मासुर होऊ द्यायचा नाही . मोहिनी च्या मोहक नृत्याचा आस्वाद जरूर घ्यायचा पण अविचारी वाहत जायचे नाही. 
एवढ केलं की पुरे . म्हणजे ,  स्मार्टफोन पुढचे जग हा सुवर्णकाळ होईल .
____________________________

शिरीष उमरे, मुंबई

२०१० नंतर आलेल्या ह्या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे प्रचंड ज्ञानाचा व माहीतीचा महापुर आला. अवघ्या आठ वर्षात ह्या स्मार्टफोनने आबालवृध्दांना आपल्या प्रेमात पाडले. 

क्षणात होणाऱ्या गोष्टींमुळे वेळ व पैसा वाचु लागला. करमणुक व माहीती साठी सोशल मिडीयाच्या जागतिक व्यासपीठात इंफोटेंमेंट ही एक अब्जावधी रुपयांची इंडस्ट्री उभी राहीली. 

आता कुठल्याही गोष्टीसाठी लाइनीत उभे राहण्याची कींवा बाजारात जाण्याची गरज उरली नाही. सगळे काही घरपोच उपलब्ध होते. अख्खे जग तुमच्या तळहाताच्या मोबाइलमधे सामावुन गेले आहे. 

लवकरच ह्याचे फायदे ग्रामीण भागातही पाहायला मिळेल. खास करुन शेतकऱ्यांना ह्याचा प्रचंड फायदा होऊ शकतो. 

ह्याचे दुष्परिणाम शहरी भागात जाणवायला लागले आहेत. एक प्रकारचे व्यसन लागले आहे सगळ्यांना... पण मला खात्री आहे हळुहळु हे कमी होइल. सध्या नव्याचे नऊ दिवस सुरु आहे. ही नवलाई लवकरच ओसरेल.


____________________________
प्रविण दळवी,नाशिक

स्मार्टफोन नंतरचे जग हा प्रश्न मला खूप आवडला. बऱ्याच प्रमाणात हे जग स्मार्टफोन सारखे आहे.पण हा स्मार्टफोन कसा निर्माण केला त्याचा उपयोग काय हे मात्र कोडं आहे. जसे स्मार्टफोनच्या गेम्स मध्ये सुरुवात ईझी लेव्हल ने होते आणि पुढे गेल्यावर हळूहळू अवघड होते. तसेच आपल्या या स्मार्टफोन नंतरच्या जगात आहे. बालपण मजेत असते मग तारूण्यात लग्न मग लेकरेबाळे आणि मग म्हातारपणी लेव्हल फार फार अवघड होते आणि मग शेवटी.......गेम ओव्हर (मरण)

गेल्या दशकापासून  स्मार्टफोन आपल्या रोजच्या जीवनाचा इतका भाग झाला आहे की, जणू सर्वव्यापी स्मार्टफोन नंतरचे दुसरे जग असावं.बँक, खरेदी, प्रवासाची तिकिटे, खाणे मागवणे.. कुठलेही काम आता घरबसल्या होत आहे.घरातील कामाच्या नियोजनापासून ते परग्रहावरील यानाचे नियंत्रण करणारे हे यंत्र, लोकांना काम टाळायलाही एक नवीन सबळ आणि प्रभावी कारण पुरवत आहे. ‘शिष्टीम डाउन’ हे वाक्य कधीही, कुठेही ऐकून घ्यायची आता आपली तयारी झाली आहे. बरं आता शिष्टीमच चालत नाही म्हटल्यावर स्मार्टफोन टावर्स तरी काय करणार, असा सहानुभूतीचा विचारही आपण आपसूकच करू लागलो आहोत. ही जी ‘शिष्टीम’ म्हणून वावरणारी, काम करणारी आणि नसल्यामुळे खोळंबा करणारी वस्तू आहे, ती म्हणजे स्मार्टफोन मधील कामकाज प्रणाली (Operating System) स्मार्टफोन चालवणारी व्यवस्था. 

सध्याचे युग हे स्मार्टफोन नंतरचे जग म्हणून ओळखले जाते.स्मार्टफोन नावाच्या या यंत्राने आजच्या समाज जीवनावर सर्वांगीण परिणाम केलेला आहे. स्मार्टफोन हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. यांत चिन्हांवर प्रक्रिया करणारी पद्धती किंवा व्यवस्था असून त्याची रचना व व्यवस्थापन असे असते की, ज्यामुळे माहिती स्वीकारणे, साठविणे व संस्कारित करणे आणि निकाल किंवा उत्तरे तयार करणे या प्रक्रिया आधीच साठवून ठेवलेल्या पाय-या पाय-यांनी बनलेल्या सूचनांचे पालन आपोआप केले जातात.स्मार्टफोनचा रेल्वे, विमान, आरोग्य, बॅंक, उद्योगधंदे, शिक्षण, संशोधन, विमाक्षेत्र, विद्युतविभाग इत्यादी क्षेत्र किंवा विभाग या विविध कार्यांसाठी उपयोग केला जातो. अशा स्मार्टफोनच्या काही वैशिष्ट्यपूर्ण क्षमतांमुळेच याला स्मार्टफोन नंतरचे जग तरी कसे अपवाद असणार ?

____________________________
दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे, वाशिम.

आजच्या घडीला स्मार्टफोन हा प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनून गेला आहे. स्मार्टफोनने सामान्य असो की असामान्य असो सर्वाना आपलंसं करून टाकलं आहे म्हणून स्मार्टफोन सर्वांच्या जिव्हाळ्याचा बनला. 

आता तर स्मार्टफोन जास्त स्मार्ट बनू लागला आणि करलो दुनिया मुटठी मे म्हणत माणसाच्या प्रत्येक कामात, संबंधात, नात्यात, व्यवसायात, नोकरीत सर्वच क्षेत्रात हस्तक्षेप करू लागला, यामुळे कुठं काम सोपी झाली तर कुठं काम बिघडू लागली. उदा लाव रे तो विडिओ।

काळा नुसार बदल घडला पाहिजे पण इथे या स्मार्टफोन युगाने हो स्मार्टफोन युग म्हणेन मी माणूसच बदलवून टाकला आहे, कनेकटिंग पीपल म्हणत आलेलं स्मार्टफोन दुरच्यांना जवळ आणि जवळच्याना दूर करत चाललं आहे.

 वाल्मीक फड,नाशिक.
सध्या स्मार्टफोनचे वारे संपूर्ण जगात वहात आहे.आज मजूर ते अब्जाधीश असला तरी तो स्मार्टफोन शिवाय राहूच शकत नाही अशी परीस्थीती आपल्याला बघायला मिळत आहे.
आहे फायदा पण आहे पण मला तर जास्त नुकसान होतानाच दिसते आहे.फोनच्या अतिवापरामुळे फोन हा सर्वस्व होऊन बसलेला आहे.कुणीही रिस्ते ,नाते,मैञी ह्या गोष्टीकडे लक्ष देण्यास तयार नाही फक्त फोन एके फोन.आणी ह्या अशा गोष्टिंमुळे नात्यातील गोडवा संपुष्टात येण्याची भिती माझ्या मनात डोकावत आहे.
मागिल काळात फोन नव्हता पण प्रेम आणी आपुलकी माञ मनामनात भिणलेली होती.त्या काळात एखाद्या पाहुणा घरी आला तर सर्वच घरातील मंडळी पाहुण्याची  सरबराई करण्यात मशगूल होऊन जात असे.सर्वजन एका ठिकाणी बसून इकडच्या तिकडच्या खुशाली विचारल्या जायच्या पण.
उलटपक्षी आता पाहुणाही फोनवर बोटे फिरवत बसतो आणी घरातील लोकही आपआपले फोन घेऊन त्यात बिझी असतात.मुक्कामी पाहुणा कधी येतच नाही पण थोड्या वेळासाठी आलेल्या पाहुण्यालाही एकमेकांशी बोलायला वेळ नसतो आणी घरातील व्यक्तींना सुद्धा.
तसे फोन आल्यानंतर बर्याच गोष्टि सुलभ झाल्या आहेत.बरेच दिवस गाठीभेटी न होणारे माणसे एका मिनिटांत आपण त्यांच्याशी बोलू शकतो,बाहेरील जगाशी लवकर संपर्क होऊ शकतो.आणी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जगात चाललेल्या घडामोडी आपल्याला घरी बसल्या बसल्या बघायला मिळतात.
असो फोनही खुप महत्त्वाचा आहे आणी आपले नातेवाईक सबंधही तितकेच महत्त्वाचे आहेत म्हणून फोन वापरुन नातीही सांभाळली जावीत एवढीच अपेक्षा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************