संयुक्त कुटुंबाचे महत्व

संयुक्त कुटुंबाचे महत्व

शिरीष उमरे,मुंबई
टीवीवर चालणाऱ्या घराघरात आवडीने पाहील्या जाणाऱ्या टीवी सिरीयल मधे स्पष्ट कारणे दिसतात की संयुक्त कुटुंब पध्दत का मोडकळीस आली !!

द्वेष, आकस, मत्सर, संशय, हाव एकदा डोक्यात घुसले की कँसर सारखे पोखरुन टाकते घर आणि एकमेका विरुध्द कटकारस्थाने सुरु होतात.

आपल्या पुर्वजांनी एकत्र राहण्याचे फायदे ओळखुन तशी यंत्रणा तयार केली. रुढीपरंपरेने ती जोपासत जरी आणली तरी त्यातली नितीमुल्ये कालांतराने पीढी दर पीढी हरवत गेली.

बाप म्हणजे एटीएम मानणारी आणि बायकोच्या बाळंतपणासाठी हक्काची मोलकरीण म्हणजे आई समजणाऱ्या पीढीला ते स्वत: बाप बनतात व म्हातारे होतात तेंव्हा कळतात त्यांनी केलेल्या चुका !! स्वार्थापायी पाश्चात्यांचे अंधानुकरणात नात्याची नाळ तोडुन बसतात.

आम्ही भाग्यवान आहोत याबाबतीत... आई व बाबांकडले आजी आजोबा कडुन सगळे लाड पुरवुन घेत लहानाचे मोठे झालो. सुट्टयांमधे मामाच्या गावी जाऊन मस्त्या करायचो. मावशी व आत्याकडुन झालेल्या प्रेमाच्या वर्षावात चिंब भिजायचो. मामी व काकुंकडुन हट्टाने मागण्या पुर्ण करवुन घेत असु. काका म्हणजे मित्रच ...

आजही मावस, चुलत, मामे, आते भाऊबहीणींशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. एकमेकांच्या अडचणीला धावुन जातो. एकमेकांच्या आनंदात सहभागी होतो. आजही सणासुदीला निर्मळ आनंदाने भेटतो. आजही कोणाच्या न सांगता जावुन धडकु शकतो...

पुढची पीढी हे सगळे मीस करणार... पण त्यांना जाणीव आहे हेच पुरेसे आहे... करीअर साठी पक्षी घरटे सोडतात पण परतीची आस कायम राहते...

आजही ही नात्यांची उब ग्रामीण भागात धग धरुन आहे. शहरी भागात व्यापारी वर्गात अजुनही याची पाळेमुळे तग धरुन आहेत.

पश्चातापानंतर परत मध्यमवर्गीय परतीचे मार्ग शोधत आहेत हा आशेचा कीरण !! तोपर्यंत मित्रांच्या संजिवनीवर सगळे जगत आहेत... तेही कुटुंबाचा भाग ना !! रक्ताचे नाते नसले म्हणुन काय झाले ??!! खरय ना मित्रांनो ?....



दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे,वाशिम
मला आठवते आपल्याकडे अनेक म्हणी आहेत कुटूंब व्यवस्थेवरील त्यातीलच एक " हे विश्वची माझे घर " भारतीय म्हणून आपली संस्कृती आपल्याला सर्व विश्व आपले घर म्हणजेच कुटुंब आहे, हीच शिकवण देत आली आहे.

जगातील इतर कुठल्याही देशात आपल्या देशातील कुटुंब पद्धत्ती विषयीचे आकर्षण राहिले आहे कारण आहे ते म्हणजे आपल्या देशाची संयुक्त कुटुंब पद्धती आजही या जागतिकीकरणाच्या युगात टिकून आहे.

सारे शिकूया, पुढे जाऊया या ओळी मला आता शिन आणताना दिसतात कारण आज मुख्य म्हणजे या शिकलेल्या गाढवांनीच संयुक्त कुटुंब पध्दतीला सुरुंग लावण्याचे काम केले आहे आणि आपल्याकडील टीव्ही मालिकांनी त्यात भर घालून कुटुंब फोडा आणि विध्वंस करा एवढं केलं आहे मन लावून.

मला आठवते " अतिथी देवो भव " मी लहान असताना मामाच्या, मावशीच्या गावी जायचो, मुक्काम असायचा महिनाभर कोणी विचारात नसे कधी जाणार आपसातील प्रेम आपुलकीत बांधलेले होते सर्व, आजकालची परिस्थिती कशी आहे तर "अतिथी तुम कब जावोगे" अशी आहे. सगळा गिचिडमीचीड काला व्हायला लागला.

वृध्दश्रम, नर्सरी, किंडेर्गरडेन यांची कधी आवश्यककता नाही भासली आज परिस्थिती वेगळी आहे त्याच कसं झालं आहे खरं सांगू " सगळं कळतंय पण वळत नाही " असं झालं आहे.


अक्षय कांबळे,पालघर.
      मी आर्मी पर्सनलचा मुलगा. पप्पांची सारखी बदली होणार हे ठरलेलं. आपल्या मागे आपल्या बायको मुलांचे हाल होऊ नयेत म्हणून आम्हाला सुध्दा त्यांच्या सोबतच नियुक्तीच्या ठिकाणी असावं हा त्याचा अट्टाहास. जवळ जवळ 20 वर्ष आर्मी मध्ये सेवा केल्यानंतर रिटायर झाल्यावर प्रथम आमच्या शिक्षणासाठी शहरात वास्तव्य आणि मग पुन्हा दुसऱ्या नोकरीमुळे संयुक्त कुटुंबात राहण्याचा योग, संधी मला फारशी मिळालीच नाही.
      पण आज जेव्हा हॉस्टेल वर रात्री गप्पांचे फड रंगतात तेव्हा जाणवतं की, आम्ही भावंडांनी नक्की काय मिस केलं आहे. हॉस्टेल वर प्रामुख्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली मुलं आहेत ज्यांचं स्वप्न आहे पशुवैद्यक बनाण्याच. प्रत्येकाची घरची परिस्थिती वेगळी आहे. संघर्ष वेगळा आहे. पण प्रत्येकाकडे एक गोष्ट सामाईक आहे. आजी आजोबांच्या आठवणी आहेत. मामाने पुरवलेले लाड, मामीने दिलेला मार, माघारी जाताना आवर्जून दिलेला खाऊचा डबा. मावशीने सांगितलेल्या गोष्टी आहेत. गावाकडची मस्ती. सख्ख्या चुलत भावाच्या लग्नात घातलेला धुमाकूळ, त्यांच्या सोबत खेळ खेळताना झालेली भांडणं, भर उन्हाळ्यात एकत्र जमल्या नंतर रंगनारे पत्त्यांचे डाव. आजोबा मामांनी पोहायला शिकवताना केलेली गंमत. आजीने पोट फुटेस्तोवर खायला घातलेले आवडीचे पदार्थ आणि बरच काही.
      कधी कधी या सर्वांकडे पाहिलं की, कॉम्प्लेक्स येतो. जरी आम्ही practical जगण्यात जरासे वरचढ ठरत असलो. कारण आम्ही याच वातावरणात वाढलो आहोत. रोजच्या जीवनात येणाऱ्या समस्या सोडवायच्या कशा याचा विचार जास्त करायची सवय लागली आहे. त्यामुळे नाती सांभाळण्यात आमची भंबेरी  बऱ्याचदा उडते. पण यांचं असं नाहीये. यांना माणूस म्हणून जगता येत. या सर्वांना प्रेम काय असतं, नाती काय असतात. आणि ती नाती जपायची कशी याचं बाळकडू मिळालं असावं. कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला स्वतःहून नाही शिकता येत. माणूस म्हणून जगायला यांना येत. आणि हेच संयुक्त कुटुंब पद्धतीचं यश आहे असं मला वाटतं.

राकेश पवार,मालेगाव.
      संयुक्त कुटुंब म्हटले की खुप पूर्वीचा तो आमचा परिवार अठवतो अणि ते पपाचे बोलने ते एखाद्या परिकथे प्रमाणे वाटते त्याचे बोलताना असणारी तळमल परिवारा बदलचा जिव्हाळा अठवतो. ते सर्व भावंडे एका जागेवर खेळने आई , काकु ,मावशी त्यांचा आमच्या बदलचा जिव्हाळा आज पण कमी झाला नही आहे पन वेळ बदलते तसा काळ बदलतो सयुक्त कुटुंब आता विभक्त जाले  अणि एका कुटुंबाचे तीन कुटुंब सर्व वेगळे आता दीपावली शिवाय एकत्र येत नही ते........
संयुक्त कुटुंबात एकहाती व्यवहार असतो घरात एक प्रमुख व्यक्ती असते ती सर्व निर्णय घेते  त्याच बरोबर सर्व मुलांवर त्याचा दबाव असतो मुलींवर लक्ष असते
घरातील सर्व गोष्टी शिकायला मिळतात मुलांची आई रागवली तर काकु मुलाना वाचवते हे सर्व सयुक्त कुटुंबात होते  सयुक्त कुटुंब असले की वयवृध व्यक्ती चे हाल होत नही आता खुप ठिकानी आई बाबांना घरा बाहेर केले जाते पन सयुक्त कुटुंबात तस नसते कारण प्रत्येक भावाचा दुसऱ्या भावा वर दबाव असतो त्यात आता सर्व सयुक्त कुटुंब विभक्त होतात त्यात त्याचा दुसऱ्या बदलचा जिव्हाळा कमी होतो यात मोठे नुकसान अपलेच होते आपन विभक्त होतो अणि ते आपले लाहन मूल तेच शीकतात अणि पुढे ते पण तसेच करतात विभक्त कुटुंब हे आजच्या काळाची शोकांतिका आहे.

(यातील सर्व संबंधित छायाचित्रे गुगलवरून घेतलेली आहेत.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************