मी का लिहीते / लिहीतो?..भाग एक



अक्षय सयाजी कांबळे,
पालघर.

मी का लिहितो ? छान प्रश्न आहे की नाही ? उत्तर सोप्प आहे आणि अवघड ही ! कारण मी का आणि केव्हा लिहायला लागलो ते आता आठवत ही नाही. मात्र पहिली कविताच लिहिली होती हे फक्त लक्षात आहे माझ्या! वर्ष बदलली, माणूस म्हणून मी ही थोडाफार बदललो. लिहिण्याची प्रेरणा आणि कारणं ही बदलली आहेत. आज काल मी स्वतः साठी लिहितो. मान्य आहे की लेखक आणि वाचक दोन्ही महत्वाचे असतात एकमेकांसाठी तरीही मी स्वतःसाठी लिहितो.
        बारावी नंतर बाहेर पडल्या नंतर दुनियेची खरा संबंध आला. दुनियेच्या शाळेत शिकत होतो आणि अजूनही शिकतोय. आधी राग व्यक्त करता यायचा बिनधास्त पणे. कुणावरही राग काढता सुद्धा यायचा. आता अनेक बंधन आहेत. आधी आधी तोंड आणि हात दोन्ही सतत चालू असायचे. व्यक्त होणं हा स्वभाव आहे. आज ही हात चालतो, पण लिखाणासाठी ( वेळ पडली की तसाही हात चालतोच, प्रमाण थोडस कमी झालंय फक्त) मुक्तपणे व्यक्त होणं माझ्यासाठी शक्य आहे लिखाणातून, म्हणून मी लिहितो.
____________________________________

जगताप रामकिशन शारदा
बीड

 कधी असा प्रश्न पडला नाही. ते आतून यायच. भरभरून बोलायच असायचं पण ऐकणार रसिक कोणी नसायच. मग वही पेन घेऊन भरभरून मोकळे व्हायचे. जोपर्यंत विचार करावा लागत नाही. सवय लागली आता. जून वाचायच आपणच आपले कौतुक करायचे वाटलच तर दोष पण द्यायचा किती वेळ वाया घालवला नको त्या गोष्टीसाठी. कधी कधी समाजातील अस्वस्थता मनात अलगद घुसते आणि माणसाला बैचेन करते.ती बैचेनी माणसाला स्वस्थ बसू देत नाही. आणि अस्वस्थ मन जोपर्यंत मोकळे होत नाही तोपर्यंत माणसाची चिडचिड होते.

तर मग आतापर्यंत काय काय लिहिले तर जमल तस मांडले. सर्वांच्या कौतुकास उतरले अस नाही. पण ढोबळमानाने आपण आपल परिक्षण करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ तयार झाले. स्वतःच्या चुका आपोआप सुधारण्यासाठी वाव मिळाला. कठोर शब्द लिलया पध्दतीने कसे एखाद्याच्या गळी उतरावे लागतात याच शहाणपण येऊ लागल. सुरवातीला फक्त शब्द लिहत होतो मग आपोआप त्यात वास्तव येत गेल वास्तवाशी भावना जोडल्या गेल्या आणि पाहता पाहता लिखाणाशी मी जोडलो गेलो.

जे शब्द जबादारी च्या ओझ्याने बोलू शकत नाही ते लिहू लागलो, अपमान पचवायला पेपर पेनचा सहारा घेऊ लागलो,दुरावलेले संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न अपूरे आहेत त्यातून धडा घेण्यासाठी ते शब्दांत मांडू लागलो. वरून शांत राहण्यासाठी लिखाणात बंड पुकारू लागलो.बोललेले शब्द हवेत विरतात पण लिखाणातील शब्द सतत सोबत राहतात.वास्तवाची जाण करून देतात.तर कधी कल्पनेच्या जगाची सफर घडवतात. माणसाला घडवतात अशा बऱ्याच गोष्टी ची जाणीव झाली. एखादा प्रसंग जीवंत कसा शब्दात उतरायचा आणि मोडलेला कणा कसा मोडला तो शब्दांत मांडताना समोरच्याला कस प्रेरित करायच हे लिखाण करताना कळत. लोखाणाची गमंत खूप वेगळी आहे जगात नसणाऱ्या गोष्टी व्यक्ती यांच्याशी नाळ जुडते तर कधी कधी जिवंत व्यक्ती मनातून उतरल्यावर होणाऱ्या यातना ऐकायला थांबत नाही मग त्या जन्मभर सोबत वागवायच्या नाही तर त्या लिखाणात गाडायच्या डोक्यावर बसलेल भुत एवढ धडकन जमीनीवर आदळायच की पुन्हा आजूबाजूला सुद्धा फिरकले नाही पाहिजे. म्हणून लिखाण करायच.आणि निरोगी मनान जगायच वावरायचे. समाजात नाही जमल तरीही निवांत लिखाण करून जगायच असा आपला म्हणजे माझा फंडा आहे.
___________________________________

अनिल गोडबोले
सोलापूर

दोन दिवसांपूर्वी मी आणि शिरिषदा चर्चा करत होतो... काही लोक लिहितात,.. काही लिहीत नाही.. आपण मात्र सतत लिहीत राहत असतो.. त्यावर शिरिषदा म्हणाले की,"आपण व्यक्त नाही झालो तर संपून जाऊ... म्हणून आपण लिहितो"... आणि खरच... मला जाणवलं की विचार चा एडमीन असो किंवा सदस्य... व्यक्त व्हायला उत्सुक आहे म्हणून तो लिहितो..

तर....विषय असा आहे की, मी का लिहितो?... तर सरळ सरळ उत्तर अस आहे की...  "लिहिण्याची भरपूर खाज आहे म्हणून.." बाकी काही नाही..

आपण जे विचार करतो ते कधी कधी आपण समोरासमोर बोलू शकत नाही किंवा संवाद करण्या सारखी परिस्थिती नसते तेव्हा कागद उपयोगाला येतो.

आपले विचार आपल्या भावना आपण व्यक्त करायचे असेल तर लिखाण करायला पाहिजे. सुशिक्षित असण्याची पायरीच मुळात लिहिणे आणि वाचणे आहे..

पहिल्यांदा आपण करू लिहिलं होतं... शाळेचा अभ्यास सोडून...?? आठवून बघा .. फार हसू येईल..

मी तर प्रेम पत्र लिहिलं होतं( 6वित असताना... तेव्हा पासून लफडेबाज ओ... दुसर काय) ते काही अर्थ नव्हतं... कुठेतरी ऐकलेलं की प्रेमपत्र लिहायच.. लिहिलं.. काय लिहिलं हे पण आता आठवत नाही..

बीएससी ला असताना मी पेपरला बातमी दिली होती कार्यक्रमाची.. मामा पत्रकार आहेत... त्यामुळे मामांनी सांगितलेलं सदर लिहून द्यायचो..

त्या नंतर एम एस डब्ल्यू ला आल्यावर विविध विषयांवर लिखाण झालं... प्रकल्प लेखन झालं.. मग भरपूर लिखाण झालं..
(काही कविता देखील केल्या होत्या... मुक्त छंद मध्ये..सोशल विषयावर..पण त्या बद्दल आपणच बोलू नये)

आता मित्राला एक आभार पत्र पाहिजे होत... ते लिहून दिल.. विचार वर लिहितो... फेसबुक वर लिहितो... अशी खाज भागवण्याचे प्रकार आहेत..

तसही लग्न झालेला माणूस फक्त लिहू शकतो.. मनमोकळेपणाने... असो...
तर लिहा.. लिहिण्यात मजा आहे... उद्या आपण जर मेलो ना.. तरी आपले विचार लोकांना माहीत राहतील.. ते चुकीचे असतील ...बरोबर असतील... पण आपले असतील..

म्हणजे आपण नसताना देखील लोकांना  सोडायच नाही असा (स्वार्थी आणि पारमार्थिक) विचार करून तरी लिहिलं पाहिजे.

तेव्हा लिहा... जर तुम्ही खरच स्वतःवर प्रेम करत असाल तर लिहालच... लिहिते व्हा...
____________________________________

श्रुतिका बिडगर, अहमदनगर.

    इथे पावलागणिक अनेक विचित्र स्वभावाचे लोक असतात. अश्याच लोकांमध्ये मी देखील मोडते. चेहऱ्यावर एक मनात एक! मी कधीच माझी खरी बाजू लोकांच्या समोर नाही मांडली, कारण मला नेहमीच असं वाटायचं की, आपण कधी कोणासमोर मन मोकळं करणं म्हणजे त्याच्या हातात जळत कोलीत देण्यासारखे आहे!
     त्यामुळे मी जमेल तितकं हे टाळायची परिणामी, मी अबोल झाली आणि खूप काही फक्त मनात साठत गेलं. सुरुवातीला मला याचं काही वाटतं नसे. अरे नाही तर नाही ना,उगाच का share करत बसायचं कोणासमोर ? आणि केलंच तर ते लोक याचं फक्त भांडवलचं करणार! पण नंतर जसं- जसं वय वाढतं गेलं, तसं -तसं हे मलाच महागात पडलं. इतर मित्र-मैत्रिणी त्यांना हवं तसं माझ्या समोर मोकळं होत असे. त्यांना काय प्रॉब्लेम असेल तर मी त्यांना लगेच  उपाय सांगत. ते पुन्हा पाहिल्या सारखं वागत.
   नंतर मला जाणवलं, मी असं करूच शकत नाही कारण मी कधीच नव्हतं केलं असं मन मोकळं कोणासमोर! जेव्हा मला हे जाणवलं तेंव्हा पहिल्यांदा माझ्या डोक्याचा भुगा झाला. वाटलं मी कोणाला सांगू हे सगळं ! मलाही सगळं कोणालातरी सांगायचं होतं. की मी आत्ता पर्यंत काय केलंय ,आता पर्यंत काय झालंय माझ्या जीवनात , मी काय करायचं बाकी आहे ,काय आहे माझ्या मनात सगळं -सगळं खरं सांगायचं होतं.
       पण सांगणारं कुणाला? फक्त असंच कोण ऐकलं  माझं? काय करू काय , काहीही सुचत नव्हतं अक्षरशः डोकं धरुन खुर्चीत बसले. समोरच्या टेबलावर बाबांची नवी कोरी डायरी अन पेन पडलं होतं. अधाश्या सारखं  न थांबता फक्त उजव्या पानावर लिहीत गेली हवं तसं , हवं ते...!
जेंव्हा वाटलं ,आता मन मोकळं झालंय पण पुन्हा वाटलं हे तर एकतर्फी बोलणं झालंय आता! मग काय डायरी च्या डाव्या पानावर माझ्याच बोलण्याला ,दुसऱ्याच बोलणं समजून स्वतःची उत्तरं लिहितं गेली...! एका पानावर इनपुट अन् एका पानावर आउटपुट देखील!
    पहिल्यांदाच मी इतर कोणासमोरही मोकळं न होताही मी आपोआप मोकळी झाली! त्यानंतर मात्र मी थांबले नाही, मग मी कधी कवितेच्या माध्यमातून , कधी लेखाच्या माध्यमातून तर कधी असंच कितीतरी पान लिहून...!!!
                -©श्रुतिका
____________________________________

 मयुर ठवळी,
 तालुका मोर्शी जिल्हा अमरावती

मि लिहिण्याचा खूप प्रयत्न केला
लिहू की नको असा मला वाटते
पण तरी आज तुमच्यासमोर मी आज लिहूनच टाकतो
लिहिण्यासाठी असा विशेष कारण काही नाही
पण तरी आज मी तुमच्या समोर मी आज लिहून टाकतो
मी काम करतो नांदेड जिल्ह्यातल्या भोकर तालुक्यामध्ये (भोकर तालुका)
जोगी मराठवाड्यातला शेवटचा तालुका आहे. आंध्र प्रदेशला लागून असलेला. जसा तुमच्याकडे आहे तसा आमच्याकडेही लोक आहेत.
तुम्ही ज्या गोष्टीला करून आमच्याकडे येतात. तसे आमच्याकडेही अंकांमध्ये लोक आमची बिर्याणी स्पेशल खायला येतात. कारण ते माय ग्रेट झालेले लोक आहेत.
आमच्याकडे असलेले 50% लोक तुम्हाला 50% लुंगी मध्ये दिसतात
आणि किती पर्सेंट माहित असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्राची शान स्वीकारलेली असते.
आम्ही या संस्कृतीचे अविभाज्य भाग आहोत आणि ते पण आहेत हे त्यांना पण माहित आहे पण अजून ते स्वीकारण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नाही.
कदाचित त्यांना माहित असेल की मी का लिहितो
त्यांच्या साठी आणि माझ्या साठी लिहिणे आवश्यक आहे
अंजार मी ते लिहू शकलो नाही तर माझ्या आधाराची भावना माझ्यामध्येच राहील.
म्हणून मी लिहितो
मी आज सध्या परिस्थितीत
जवळपास तीन हजार महिलांसोबत काम पाहतो
पण माझा एक खूप छान अनुभव आह
पण कदाचित तो तुमच्यासाठी नसू शकतो
आज मी काम करत असलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या भोकर तालुक्यामध्ये
महिला बचत गटात सोबत
काम करत असताना
मला जे काही अनुभव आले
ते मी तुमच्या समोर स्पष्ट करीत आहे.
पण आपण तुमच्या मते कुणाला चांगली म्हणू शकतो.
कारण या जगात कोणीही 50% पेक्षा जास्त चांगले नाही
आणि 50% पेक्षा जास्त कोणीही वाईट नाही
हा माझा स्वतःचा अनुभव तुमच्यासमोर वाटत आहे.
मी का लिहितो मलाही माहित नाही पण आज खुप दिवसानंतर तुमच्या समोर येत आहे.
कारण त्याला खूप कारणे आहेत
आज जोपर्यंत घेत गेलो तोपर्यंत फेल गेलो.
तुम्ही जरा असेच मला सहकार्य करत राहा
त्याला मी शंभर टक्के लिहिण्याचा प्रयत्न करेल.
आता रहायला विषयी लिहिण्याचा
मला न्यायला खूप आवडते
पण माझ्या  बिझी सोडून मध्ये
मी तुम्हाला वेळ देऊ शकेल की नाही मला माहीत नाही.
कारण जेवला विकास सेक्टरमध्ये महिला बचत गटांना सोबत तो काम करू शकत नाही. एवढं काय मी सध्या परिस्थितीमध्ये करू शकतो. (याचा अर्थ असा नाही की मी रिकामा आहे)
आमच्या सोबत असणारे आमचे सहा मित्र पेपर लिहिण्याचा प्रयत्न करतात आणि खूप छान लिहितात
त्याप्रमाणे आज मी पण खुप दिवसानंतर लिहिण्याचा प्रयत्न करत आहोत.

मी का लिहितो याचा तुम्हाला उत्तर पाहिजे असेल
तर तुम्हाला
आजा डोंजा उचलली आपके ओशियन मे सलो मोशन हे टिक टोक वरील गाणं ऐकावाच लागेल.
बसे शेवटचा सांगण्याचा प्रयत्न करतो कि जिच्यासाठी मी लिहितो ती ऐकण्याचा प्रयत्न पण करत नाही.
मला माहित नाही ते त्याच्यासाठी काढली खूप कारणे असतील.
पण ती ऐकत नाही म्हणजे खूप झाला माझ्यासाठी.
म्हणतात की ही दुनिया गोल आहे म्हणजे कधीतरी आम्ही भेटणार आहोत आणि कधी ती मला भेटणार आहे.
पण कधी की मला भेटणार आणि मी तिला कधी भेटणार हे तिलाही माहीत नाही आणि मलाही माहित नाही.
पण तुम्ही असं समजा की मी तिच्यासाठीच लिहत आहे आणि तिच्यासाठी लिहू शकतो.
धन्यवाद
____________________________________

राजश्री ठाकूर , मुंबई .

    मी का लिहिते ? अर्थात लिहिता येत म्हणून . पण हि क्रिया हृदय किंवा फुफुप्साचे काम चालते तशी अनैच्छिक नाही पुर्णतः ऐच्छिक आहे . दिवसाच्या कुठल्याही वेळी कागद आणि पेन यांची सोबत हवीशी वाटते . अगदी एटीएम ची पावती , पाटी , फळा , कसलाही चुरगळलेला बिलाचा कागद , तिकिटे , जुन्या प्रिंट आऊटस ची मागील बाजू , ठेवणीतली डायरी व लेखणी आणि आता डिजिटल फलक , मेसेजेस कशावरही आपसूक लिहिलं जात..
  आपण फार वैचारिक किंवा जग पालटून टाकू असे लिहितो या गैरसमजात अस्मादिक खचितच नाही .. पण लिहिण .. लेखन हि गोष्ट खूप कृतार्थ करून जाते ..
नैत्यिक चिजांशिवाय , जवळ असलेला एक कागद आणि पेन म्हणजे आपण श्रीमंत अशी अस्मादिकांची समजूत ..सामर्थ्यवान वाटत या दोन्ही गोष्टी बाळगताना .
कागदावर उमटलेले ते अक्षर बघून मनात तृप्त तवंग उमटतो ..
आपण आपल्याला हवं तेव्हा लिहू शकतो याचा अर्थ आपल्या आजूबाजूच्या जगाचही बर चाललं आहे ,
मेंदूत , मनात असलेल्या गोष्टी कागदावर उलटवण्यासाठी जेव्हा ती लेखणी बोटाच्या दुलईत अवगुंठून उभी असते तेव्हा मेंदुपासून बोटापर्यंतचे सर्व स्नायू कार्यरत आहेत त्यांना रक्तप्रवाह सुरळीत सुरू आहे हा दिलासा मिळतो .. सलग काही वेळ विचलित न होता लिहिता येत तेव्हा शरीरातल्या सर्व संस्था सुरळीत आहेत याचा आनंद मिळतो .. मनातलं सगळं कागदावर झरझर उमटत ते साजिर रूप बघून आपलं मन , विचार प्रक्रियाच जणू समोर उभी ठाकली आहे हा अनुभव येतो ..  लेखन , लेखन सामग्री शोधणारे ते अनामिक , विचारांना माध्यम देणारे शब्द , मुलींना शिक्षण सुरू करणारे फुले दाम्पत्य , शाळेत घालणारे आई बाबा , पुढे भाषेतील रुची वाढवणारे शिक्षक आणि या सगळ्याचा एकत्रित विचार करून लेखन करणारी व्यक्ती या सगळ्यांबद्दलच कृतज्ञता जाणवते .
  नेहेमी लेख लिहिले जातात असेही नाही , कधीतरी नवीनच खेळ डोक्यात येतो आज अमुक एका अक्षरापासून सुरू होणारे शब्द लिहूया , आज केवळ विशेषणे आज राज्यांची नावे , किंवा औषधांची नावे , शब्दांच्या भेंड्या , गाणी , आवडता परिच्छेद , संवाद असे सुचेल आणि रुचेल ते .
  लिखाणातून होणारे संभावित लाभ , विकास याकडे अजूनतरी लक्ष वेधलं जातं नाही .
लिहिणे या क्रियेशीच निष्ठा इतक्या जोडल्या गेल्या आहेत की पुढचा जन्म असलाच तर तो बहुप्रसव फाऊंटन पेन चा मिळवा अन् त्या निर्मितींनी बहू सृजन जगावे ..
____________________________________

पी.प्रशांतकुमार,
अहमदनगर

...नेमकं सांगता येणार नाही
पण स्वभावात: मला माझ्या मनात आलेल्या कल्पना,सुचलेले विनोद,आवडलेलं,वाचलेलं काही,पाहिलेला सिनेमा,मॅच आदी काहीही अगदी शुल्लक गोष्टीही शेअर करायला आवडतात..  जवळ असलेल्यांशी जशा गप्पा मारतो तशाच थोड्या लांबच्यांशी लिहून मारलेल्या गप्पा..

काही थोड्या विनोदी घटना किंवा स्वतःची झालेली फजिती वगैरे तर रंगवून रंगवून पुनःपुन्हा सांगायला आवडतात.. अर्थात त्या तितक्याशा चांगल्या लिहिता येत नाही याला दोन कारण एक म्हणजे लिखाण कौशल्य कमी पडत आणि दुसरं म्हणजे कंटाळा.. घटना ,गोष्टी,विनोद,किंवा इतर काहीही ज्या वेगाने विचार डोक्यातून बाहेर येतात त्या वेगाने लिहिता येत नाही ,शब्दात पकडता येत नाही नंतर आठवतही नाही ..
.. तरीही थोडीफार लिहायची सवय लागली ती शाळा-कॉलेजात डायरी लिहायचो त्यामुळे.. कित्येक वर्षात नंतर काही लिहिलं नाही पण आजही आवरताना ते जूनं काही वाचलं की मस्त वाटत.. ती मस्ती,उनाडपणा,टेन्शन (आज वाटतं आपण कसल्या फालतू गोष्टींच घ्यायचो).. आजही लिहिताना भरकटलाच विषय

असो अर्थात मी लिहितो ते मोकळं होण्यासाठी.. गप्पा मारण्यासाठी..
____________________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************